डोळे...

Submitted by mayurlankeshwar on 6 June, 2008 - 08:50

बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे

आठवणींचे वादळ आले
एकाएकी थिजले डोळे

दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे

ह्या अश्रुंचे आधण झाले...
आयुष्याचे शिजले डोळे!

स्वप्नांचा हा जागरगोंधळ
नाही माझे निजले डोळे
--- मयूर

गुलमोहर: 

अरे वा. बर्‍याच दिवसांनी फुलतोय मोरपिसारा!
दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे
हा मस्तच.
पण
ह्या अश्रुंचे आधण झाले...
आयुष्याचे शिजले डोळे!
हा आगळावेगळा वाटला. हल्ली सैंपाक करतोस की काय? Light 1
Happy

ह्या अश्रुंचे आधण झाले...
आयुष्याचे शिजले डोळे!

नेमका हाच शेर नाही कळला......

ह्या अश्रुंचे आधण झाले...
आयुष्याचे शिजले डोळे!

हा शेर न कळायला काय झाले ? आपल्याला कळला बुवा.
अति रडण्याने डोळे गरम होतात.डोळे सुजतात देखील.आता अति रडल्याने डोळे अति गरम झाले तर त्यातले अश्रु उकळणारच.अश्रुला आधण येणार मग त्यात डोळे शिजणारच. (आता अश्रुत डोळे की डोळ्यात अश्रु हा प्रश्न मला नका विचारु.)
किंवा
भविष्यात अश्रुच उरले आहेत त्यामुळे आयुष्य अंधकारमय झाले असाही अर्थ निघु शकतो.
कविला यापेक्षाही वेगळा अर्थ अभिप्रेत असेल तर ते खुलासा करतीलच.