Submitted by कमलाकर देसले on 10 January, 2011 - 11:37
गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;
पावतो का "तो" ? करा दावा कितीही ..
तृप्त होतांना अशी अतृप्त का रे ?
वाज गोपाला तुझा पावा कितीही..
तो उद्याचा सिंह हे ध्यानी असू द्या ;
शांत हा वाटे जरी छावा कितीही ..
ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ..
सत्य नाही झाकता येते कधीही ;
दाखवा खोटाच देखावा कितीही
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छावा, लावा, देखावा छान.
छावा, लावा, देखावा छान.
<<<गंध,माळा वा टिळा लावा
<<<गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;
पावतो का "तो" ? करा दावा कितीही ..
तो उद्याचा सिंह हे ध्यानी असू द्या ;
शांत हा वाटे जरी छावा कितीही ..
ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ..>>>
या तीन द्वीपदी आवडल्य्य!!
छान सगळे शेर आवडले..
छान
सगळे शेर आवडले..
मतला आणि छावा आवडले!!
मतला आणि छावा आवडले!!
शुभेच्छा!!
प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद !!
प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद !!
वाज(व) गोपाला तुझा पावा
वाज(व) गोपाला तुझा पावा कितीही.. असं हवं होतं ना?
वाजु दे कृष्णा तुझा पावा कितीही असं केलं तर? सूट घ्यावी लागेल खरी, पण गोपाला वाज असं म्हणायचंच नाहीये ना!
हाच शेर नेमका सर्वात आवडला होता...