Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 January, 2011 - 01:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
नवअलकोल चा पाला चिरुन
कांदेमुळ्याचा पाला चिरुन
कांदा १ ते २
राई, जिर
हिंग
हळद
बेसन
मिरच्या चिरुन २-३
मिठ,
चिमुटभर साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
१ चमचा लिंबाचा रस
तेल
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करुन त्यावर राई जिर चांगल तडतडल की त्यावर कांदा, मिरची घाला. कांदा परतवुन त्यात हिंग, हळद घालुन नवअलकोल व मुळ्याचा पाला घाला. झाकण ठेउन थोडा शिजु द्या. मग त्यावर बेसन, गोडा मसाला घालुन ढवळून शिजु द्या. शिजत आले की त्यावर मिठ, साखर व लिंबाचा रस पिळून वाफ आणा. करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा:
नुसत्या नवअलकोलचा भगरा अजुन छान होतो. पण काल मी नवअलकोल आमटीसाठी आणि कांदेमुळा सॅलेडसाठी आणला होता. आणि हा जिवनसत्ववाला पाला टाकुन देण जिवावर आल. म्हणुन दोन्हींचा मिळून भगरा केला.
ह्याला तेल थोड जास्त घातल की अजुन चव येते.
माहितीचा स्रोत:
सा.बा. आणि माझा प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कांदेमुळा म्हणजे काय?? लाल
कांदेमुळा म्हणजे काय?? लाल मूळा की पांढरा??
टाकता टाकता वाचलेला नवअलकोल व
टाकता टाकता वाचलेला नवअलकोल व मुळ्याचा पाला
नवअलकोल पाला
कांदेमुळ्याचा पाला
भगर्यचे काही सामान
फोडणीला टाकलेला कांदा.
ह्यात खाताना मिरची दिसली जात नाही म्हणून खबरदारीसाठी मी मसाला घालते. पण मिरचीची चव चांगली येते.
पाला शिजल्यावर घातलेले बेसन
तयार होत आलेला भगरा/झुणका
मी मुळा आणि गाजर सॅलेड साठी कापले होते. त्याचेच ह्यावर डेकोरेशन केले. त्यामुळे एक प्लेटही वाचली.
रोचिन कांदेमुळा म्हणजे पांढरा
रोचिन कांदेमुळा म्हणजे पांढरा मुळा खाली त्याचे पांढरे मुळ असते. वर सॅलेड डेकोरेशन केले आहेत त्यात पांढरा मुळा आहे.
हि पाने आणि डाळ हे काँबिनेशन
हि पाने आणि डाळ हे काँबिनेशन आहरदृष्ट्याही चांगले असते. अवश्य खावीत हि पाने.
करुन बघु.
करुन बघु.
करत असतानाच खमंग वास सुटतो
करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.>> जागुतै अंतःनको पाहु....... मला प्रचि बघुनच भु़क लागलीय आणि २ मिनिटांआधीच जेवलो होतो
येस्स! मी मुळ्याच्या पाल्याची
येस्स! मी मुळ्याच्या पाल्याची भाजी नेहमी करते. डाळ घालून किंवा बेसन लावून. मला तर ती नुसती खायलाही आवडते.
भाकरीबरोबर तर अ ल टी अ मे अ ट लागते
जागू, मस्त दिसतोय फोटो.
जागू, मस्त दिसतोय फोटो. भाकरीबरोबर वगैरे खायला मस्त लागत असेल.
हो झुणका भाकर ही तर जोडीच
हो झुणका भाकर ही तर जोडीच आहे. आणि कोणतीही पालेभाजी आणि भाकरी छानच लागते.
दिनेशदा, वाल्याकोळी, चातक, प्रिती, सायो धन्यवाद.
मस्त
मस्त