Submitted by Kiran.. on 28 December, 2010 - 12:56
ऑर्कूटवरचे बरेच जण इथं आहेत. तसंच माबोवर भेटलेल्यांचेही ओर्कूट प्रोफाईल आता माहीत होत चाललेत.
ऑर्कूटवरच्या जुन्या बॅचला मात्र आता चैतन्य हरवल्यासारखं वाटू लागलय. ब-याचशा कम्युनिटीज ओस पडल्यात. काही ठिकाणी सदस्यसंख्या घटली नसली तरी सदस्य फिरकतच नाहीत. ज्यांच्या लेखण्यांमुळं काही कम्युनिटीज नावारूपाला आल्या त्या लेखण्याही थंड पडल्यात.
प्रोफाईल व्हिजीटर्सची संख्या लक्षणीय रित्या घटलीय. वैयक्तिक स्क्रॅप्स कमी झालेत. ( नव्या ऑर्कूटमधे स्क्रॅप्स टू ऑल नावाचा प्रकार आहे जो अगदीच रद्दी वाटतो. स्पॅम वाढलेत त्याने).
एकंदरीत ऑर्कूट ढेपाळलय कि काय असं वाटू लागलंय. तुमचं काय मत आहे मित्रांनो ? आणि हे खरं असेल तर कारणं काय असावीत ?
( नवीन काही लिहायचा विचार नव्हता खरं तर.. पण हे खूप जाणवतय बरेच दिवस )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सध्या फेसबुकने ऑर्कुटला मागे
सध्या फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकलंय.
८-९ वर्षे केले की त्याने
८-९ वर्षे केले की त्याने राज्य...
आणि बदल हवाच की... फेस बुक आले.. ओर्कुट मागे पडले. पुढे फेसबुकची पण हवा जाईल. (माझ्या दृष्टीने गेली आहे. मी उडवून टाकले.)
ऑर्कुट ढेपाळलेच आहे... प्रमुख
ऑर्कुट ढेपाळलेच आहे...
प्रमुख कारण म्हणजे कम्युनिटी कोणती असावी ह्याचे काहीच ताळतंत्र नाहीये त्यामुळे 'सावळागोंधळ' सुरू आहे नुसता....
शिवाय स्पॅम तर प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
विजयजींशी सहमत...... स्पॅमचं
विजयजींशी सहमत...... स्पॅमचं प्रमाण प्रत्येक कम्युनिटी मधे इतकं वाढलंय की सगळीकडे....गोंधळाने उच्चांक गाठलाय....ऑर्कुट्,फेसबुक सगळीकडे हेच आहे. त्यामुळे डिस्कशन फोरम्स वरील उपस्थिती वाढू लागलीये....
फेसबुक नेटवर्किंगसाठी कदाचित
फेसबुक नेटवर्किंगसाठी कदाचित सरस असेल. पण फोरम (कम्युनिटीज) च्या बाबतीत ऑर्कूट फेसबुक पेक्षा चांगलं आहे. ज्यांना चर्चा घडवून आणायच्यात त्यांच्यासाठी तुलनेने ऑर्कूट चांगलं आहे. सध्या लोक कंटाळलेत. बदल हवा म्हणून फेसबुक कडे वळालेत. तिथं कंटाळले कि येतील पुन्हा ऑर्कूटवर.
ऑर्कूट दुधारी तलवारीसारखं आहे. उपयोग जसा करू तसं आहे. सिंधुताई सपकाळ नावाची एक कम्युनिटी आहे. तिच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम पार पाडले जातात. निधी उभारला जातो. हे सगळं शिस्तबद्ध रितीने चालतं.
फेसबुक वर हे शक्य आहे का ? ( मला जास्त माहीती नाही फेसबुक ची किंवा इतर नेटवर्किंग साईटसची..)
धन्यवाद मित्रांनो.. विजयजी
धन्यवाद मित्रांनो..
विजयजी खरं आहे तुमचं. विशिष्ट उद्देशाने स्थापन झालेल्या कम्युनिट्या टिकून आहेत. एखाद्या कॉलेजचे माजी विद्यार्थी, विशिष्ट उपक्रमासाठी एकत्र आलेले यांचे ग्रूप्स चांगले चालतात. पण ऑर्कूटवर येऊन नवीन ओळखी होणे त्यातून कम्युनिटीज बनवणे या सर्व प्रकारातल नावीन्य ओसरलं आहे. सुरूवातीला असणारं गुडी गुडी वातावरण साफ निवळलंय. आता सदस्यांचे मूळ स्वभाव उफाळून येतात. मग भांडणं मारामा-या हे चालू होतं. ब-याचशा ठिकाणी मॉडरेटर विरूद्ध ओरड हा एकमेव इश्शू हॅपनिंग असतो. मॉडरेशन म्हणजे काय हे पण लोकांना क्लिअर नाही. ऑर्कूटवर येण्याआधीचा उत्साह, नवीन जगात प्रवेश केल्याचा आनंद मावळलेला असतो. माणसं इथून तिथून सारखीच हा साक्षात्कार झालेला असतो.
मग आपला तो बाब्या सुरू होतं. आपल्या माणसाच्या खोड्या प्रिय वाटतात. इतरांच्या गंभीर चुका वाटतात आणि मग उरलासुरला रस संपून जातो. अशा वेळी नवीन काही ट्राय करायचा मोह होतो. पण माणसं बदलणार आहेत का ? कुठंही जा.. पळसाला पानं तीनच.
ऑर्कूटला एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे तिथलं तुमचं लिखाण सर्च इंजिनमधे न दिसणं..
ऑर्कूटला एक प्रॉब्लेम आहे आणि
ऑर्कूटला एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे तिथलं तुमचं लिखाण सर्च इंजिनमधे न दिसणं..>>>
तीही सोय झालीये आता.. फक्त कम्युनिटी ओनरची परवानगी/सेटींग बदल करायला हवेत.
फेबु पेक्सा आरकुट बरंच!
ऑर्कुट गाजत होतं, त्या काळात
ऑर्कुट गाजत होतं, त्या काळात मी नेट फार वापरतच नव्हते....वेळच नसायचा अजिबात.
फेबु वापरतेय. कदाचित त्यामुळेच मला फेबु जास्त आवडतं.
पण फोरम (कम्युनिटीज) च्या
पण फोरम (कम्युनिटीज) च्या बाबतीत ऑर्कूट फेसबुक पेक्षा चांगलं आहे. >> सहमत !
एकेकाळी खूप ऑर्कुट वापरले..
एकेकाळी खूप ऑर्कुट वापरले.. वाद - चर्चा, धमाल - मस्ती.. सर्व काही.. पण आता वेळ नसतो तितका.. मला आजही वाटते की ओर्कुट ढेपाळत चालले असले तरी थोबाडपुस्तिकेपेक्षा नक्कीच चांगले होते...
मी केवळ लोकाग्रहास्तव फेबुवर
मी केवळ लोकाग्रहास्तव फेबुवर आले..सगळी मंडळी फेबु वर मैत्रीसाठी पत्रं टाकयला लागली...मग काय!! केलं लॉगिन!
पण अजूनही मी नियमीत असं फक्तच ऑर्कूट वापरते. फोटो वगैरे अपलोड करते. फेबु फक्त शो साठी आहे.
ऑर्कूटची सेटिंग्सपण अशी केली की कोणीही यावं टिकली मारूsssनी जावं असं नाही होत. फेबु वर केलेली सेटिंग्स ऑटोमॅटिकली बदलली हे गौडबंगाल कळत नाही!!
भारतात फेसबुक फेमस झाले ते
भारतात फेसबुक फेमस झाले ते अमेरिकेत वापर वाढल्याच्या बातम्या ऐकून ...
मला तरी फेसबुकचा अजूनही चांगला उपयोग सापडला नाहीये (व्यक्तिश:)
मला अजूनही गुड ओल्ड फोरम्स छान वाटतात.
उगाच काय ते हे लाईक आणि ते लाईक करत बसायचे ?
भटक्याला अनुमोदन
भटक्याला अनुमोदन