यजेनोवा (Jarzynowa) सॅलड

Submitted by तृप्ती आवटी on 26 December, 2010 - 14:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सॅलडसाठी: ३ मध्यम गाजरं, २ पार्सली रुट, १ सेलेरी रुट, २ मध्यम बटाटे, लीक - बोटभर लांबीचा तुकडा - फक्त पांढरा भाग, १ ग्रीन अ‍ॅपल, २ गार्लिक डिल पिकल्स, १ कॅन हिरवे मटार (१४ औंस), २ हार्ड बॉइल्ड एग्ज्.

ड्रेसिंगसाठी: ३ टे स्पू मेयोनिज, १ टे स्पू मस्टर्ड, चवीप्रमाणे फ्रेश ग्राउंड पेपर आणि मीठ.

क्रमवार पाककृती: 

सफरचंद, लीक, अंड आणि पिकलच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. इतर सर्व भाज्या उकळत्या पाण्यात हलक्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना थोडे मीठ घातले तरी चालेल. भाज्या कुरकुरीत राहिल्या पाहिजेत, फार गाळ शिजवू नयेत. बटाटे बाकी भाज्या शिजत आल्यावर घालावेत. पाणी काढून भाज्या जरा कोरड्या पुसून घ्याव्यात. सगळ्या भाज्यांच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. कॅन्ड मटार, ह्या भाज्या आणि आधी चिरलेले घटक एका भांड्यात एकत्र करावेत. त्यात ड्रेसिंगसाठी दिलेले घटक घालून नीट हलवून घ्यावे. घट्ट झाकण (फॉइल किंवा प्लॅस्टिक रॅप चालेल) लावून तासभर फ्रीझमध्ये ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोक जेवायला असतील तर एव्हढे सॅलड पुरते
अधिक टिपा: 

_चवीप्रमाणे सफरचंद किंवा डिल पिकल एखादे जास्त घातले तरी चालेल.
_आवडत असेल तर स्पायसी मेयोनिज वापरावे.

माहितीचा स्रोत: 
इंस्टंट माहेर
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users