सुके करण्यासाठी
खुबड्यांचे ४ ते ५ वाटे
२ कांदे
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
सिमला मिरची १ कापुन
मिठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी मुठ
१ हिरवी मिरची
तेल
अर्धा चमचा गरम मसाला
टोमॅटो किंवा आमसुल
एलवण्याच्या कढीचे साहित्य
खुबड्या उकडल्याचे पाणी
१ कांदा बारीक चिरुन
५-६ लसुण पाकळ्या चिरुन
१ ते २ मिरच्या बारीक चिरुन
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
हिंग, हळद
मिठ
थोडा चिंचेचा कोळ
खुबड्यांचे सुके ची पाककृती:
खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात. उकडलेल्या खुबड्या थंड झाल्या की उकडलेले पाणी एका भांड्यात काढून घ्यावे कढीसाठी. खुबड्यांच्या पाण्याच्या कढीला एलवण्याची कढी म्हणतात.
सुई घेउन खुबडीच्या वरील कच सुईचे टोक खुपसुन काढावी. ह्या कचेला चिकटूनच खुबडीचा गर (गोळा) बाहेर येतो. कच टाकून देउन गोळा घ्यावा. सगळ्या खुबड्या काढताना चुकुन एखादी कच जाण्याची शक्यता असते. पण ही कच आढळल्यास लगेच काढून टाका. कारण ह्या कचेला धार असते. ह्या खुबड्या एक एक काढायला भरपुर वेळ लागतो. साधारण एक तास तरी लागतो ४ ते ५ वाट्यांना. ज्यांना पेशन्स आहेत अशेच खवय्ये हे काम करतात.
आता तेलावर लसूणाची फोडणी देउन त्यावर कांदा बदामी रंगावर परतवा. हिंग, हळद, मसाला घालुन परतवुन त्यात खुबड्या घाला. सिमला मिरचिच्या फोडी घाला. झाकण ठेउन त्यावर पाणी ठेउन एक वाफ आणा. खुबड्या शिजवण्याची गरज नसते कारण त्या उकडल्यामुळे आधीच शिजलेल्या असततात. आता त्यावर चिरलेला टोमॅटो किंवा आमसुल घाला. टोमॅटो घातल्यास वाढणीसाठी भर पडते. मिठ, गरम मसाला, हिरवी मिरची मोडून, चिरलेली कोथिंबीर घालुन परतवा व २ ते ३ मिनीटे शिजवुन गॅस बंद करा.
एलवण्याची कढीची पाककृती
तेलावर लसुण, हिंग, हळद, टाकुन जास्त न परतवता (लसुण शिजवायचा नाही पटापट सगळ टाकायच) खुबड्यांचे पाणी व चिंचेचा कोळ टाकुन चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर टाकावी. मिठ टाकावे ही कढी उकळवायची नाही. चव जाते. गरम झाली की बंद करायची. अगदी बेस्ट लागते. साधारण चिंचेच्या कढी सारखीच.
खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात.
खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात. हा गोळा पुढे क्रिम कलर, राखाडी कलर आणी शेवटी काळा कुळकुळीत गोळा असतो. काही काही खुबड्यांचा काळा गोळा खुबडीतच अडकुन बसतो. आम्ही लहान असताना आईच्या सगळ्या खुबड्या काढून झाल्या की हा गोळा काढण्यासाठी दगड घेउन खुबडी फोडून हा गोळा काढून खायचो. काय आनंद असायचा त्यात ? मग टाकलेल्या रिकाम्या खुबड्या आम्ही कवडी कवडी म्हणून खेळायला घ्यायचो.
एलवण्याच्या कढी करण्यामागचे रहस्य खुबड्यांचे व्हिटॅमिन्स पुर्ण मिळणे हेच असेल.
छान प्रकार दिसतोय! सुताऐवजी
छान प्रकार दिसतोय! सुताऐवजी सुईने स्वर्ग गाठायचा !! मासे प्रकरणात सिमला मिरची, हे नाविन्यपूर्ण वाटतंय, करून पहायलाच हवं.
जागूजी, सादरीकरण अप्रतिम.
जागु मस्तच ग !!!!!!
जागु मस्तच ग !!!!!!
मनस्विनी कालवांच्या दगडांवर
मनस्विनी कालवांच्या दगडांवर सुद्धा असतात ह्या खुबड्या.
अनिलभाई
तिसर्या सारखेच पण जरा जाड असतात.
तिसर्यांसारखे नाही साधारण गोगलगाईसारखा आकार असतो पण छोटी साईझ.
आर्च आम्ही पण ह्याच्या कवड्या कवड्या खेळायचो.
सिंडरेला, सावली धन्स.
भाऊ धन्यवाद. सिमला मिरची
भाऊ धन्यवाद. सिमला मिरची घालणे हे परंपरागत नाही पण मला वाटले एकदा चांगली लागेल म्हणून घालुन बघितली तर छान लागली. तेंव्हापासुन घालायला लागली शिवाय भरीलाही होते.


नुतन तुला माहीत असेल ना ग ?
मी खुबड्यांचा अजुन फोटो देते.
५ स्टार का खाना एक तरफ्....और
५ स्टार का खाना एक तरफ्....और जागुतै का "जेवाण" एक तरफ......
हो ग जागु , आमच्याकडे याला
हो ग जागु , आमच्याकडे याला खुबड्याच म्हणतात . मी लहानपणी खाल्लया आहेत या , पण हल्ली मी जेव्हा अलिबागला जाते तेव्हा मिळतच नाही .
चातक नुतन
चातक

नुतन
आयला हा प्रकार मी कधी पाहिलाच
आयला हा प्रकार मी कधी पाहिलाच नै.. जागु खायला घाल गं मला......
साधना तुला खुप काही खायला
साधना तुला खुप काही खायला घालायच आहे ग. तु आणि ऐशु यायची वाट बघतेय.
तु आणि ऐशु यायची वाट बघतेय.
तु आणि ऐशु यायची वाट बघतेय. >>>> कहां फेडेगी ये पाप जागु ????
Pages