१)चिकन बाईट साईझ तुकडे करून ( ग्रोसरी स्टोअर मधे बरेचदा थिनली स्लाईस्ड चिकन ब्रेस्ट मिळतात ते सोपे पडतात पटकन तुकडे करून घ्यायला.) साधारण १ पाउंड
२)तळणी साठी तेल
मॅरिनेशन साठी
१) आलं,लसूण, मिरची,कोथिंबीर पेस्ट
२)मीठ
३)मीरपूड
४) १ अंडं
५) कॉर्नफ्लोअर
६)शानचा तंदूरी चिकन मसाला १ छोटा चमचा
७)तिखट १ टीस्पून
सॉस साठी
१)टोमॅटो केचप १ टेबलस्पून
२)सोय सॉस १ टीस्पून
३)हॉट सॉस १ टीस्पून
४)बारीक चिरलेले आलं, लसूण, हिरवी मिरची
५)स्प्रिंग ओनियन ४-५
६)कांदा १ छोटा बारीक चिरून
७)भोपळी मिरची बारीक चिरून २ टेबलस्पून
८)चवी प्रमाणे मीठ मीरपूड
१) प्रथम चिकन साफ करून त्याचे बाईट साईझ तुकडे करून घ्यावेत.
२) चिकनला मीठ,मिरपूड,(आलं+लसूण्+मिरची+कोथिंबीर) पेस्ट लावून मुरवावं.
३) करायला घेते वेळी ह्या चिकन मधे एक अंडं फेटून घालावं. गरजे प्रमाणे कॉर्नफ्लोअर्,तिखट,शानचा तंदूरी चिकन मसाला घालावा.
४)आता हे तुकडे तेलात तळून घ्यावेत.
५)सर्व तुकडे तळून झाल्यावर एका पातेल्यात थोडे तेल तापवावे.
६)आलं,लसूण,मिरची, पातीचा कांदा, कांदा,भोपळी मिरची असे क्रमा क्रमाने परतावे.
७)त्यात टोमॅटो केचप, सोय सॉस, हॉट सॉस, मीठ,मीरपूड घालावे. सर्वात शेवटी तळलेले चिकन मिक्स करावे.
चिकन मुरवल्या नंतर लागणारा वेळ साधारण ३० मिनिटे. चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट मॅरिनेट करते. थंडीच्या दिवसात हे चिकन आणी जोडीला स्वीट कोर्न सूप, हाक्का नूडल्स आणी व्हेज स्टरफ्राय असा मस्त मेनू होतो.
कसलं जबरी दिसतय. पनीर करुन
कसलं जबरी दिसतय. पनीर करुन बघणार ह्या कृतीने
सिंडे, काय कचरा केलास
सिंडे, काय कचरा केलास रेसिपीचा.
मी ही पनीरच करणार.
सिंडी पनीरच्या जोडीला मिळालं
सिंडी पनीरच्या जोडीला मिळालं तर थोडं बेबी कॉर्न पण घाल. छान लागतं.
बर बर
बर बर
काय नाव आहे, चिकन लात मार के
काय नाव आहे, चिकन लात मार के
मस्त आहे पण रेसिपी.
प्रॅडी , मस्तच ! या वीकएंडला
प्रॅडी , मस्तच ! या वीकएंडला पार्टीसाठी मेन्यू शोधतेच आहे.

सिंडे , सायो -- पनीर नाही मिळाले तर प्लीज बटाटे घालू नका हं .
(No subject)
नाही, बटाटे नाही. पनीरच
नाही, बटाटे नाही. पनीरच घालूया ग सिंडे
भेंडी नाही तर वांगी चालतील का
भेंडी नाही तर वांगी चालतील का ?
प्रज्ञा, फोटो सही आहे. परवा
प्रज्ञा, फोटो सही आहे. परवा पार्टीसाठी नवर्याला देते करायला रेसिपी.
हसता काय ग बटाट्यांना.. मी चिकन खात नाही, पनीर मला आवडत नाही. मग आम्ही हा पदार्थ खाऊच नये की काय
प्रॅडी, अफलातून फोटो आणि
प्रॅडी, अफलातून फोटो आणि चवीलाही तितकंच छान लागत असणार. एकदम तोंपासु

बाकी पनीर घालून ही रेसिपी खरंच छान होईल ( आणि प्रॅडी म्हणते तसं बरोबर बेबी कॉर्न घालूनही ). बटाटे आणि पनीर घालून पांढरा रस्सा म्हणजे अल्टिमेट अपमान होता
मस्त रेसेपी. उद्या चायनिज
मस्त रेसेपी. उद्या चायनिज मेन्यु आहे रात्रीसाठी. त्यात हा पदार्थ नक्की.
३१st च्या मेन्युत हे
३१st च्या मेन्युत हे स्टार्टर एकदम बेस्ट जाईल....
धन्स गं एवढी मस्त रेसिपी दिल्याबद्द्ल. पनीरही मस्त जाईल....
(ज्यांना वांगी/भेंडी/दुधी/पडवळ्/गिलकी/दोडके इ.इ. वापरुन कराविशी वाटतात त्यांनी ती करावीत, त्याची चर्चा इथे करुन आमच्या तोंडाची चव घालवु नये
)
वॉव.. मस्त रेसिपी आहे. भारी
वॉव.. मस्त रेसिपी आहे. भारी लागत असणार! मेन्यूही मस्त आहे.
सायो, सिंडी- पनीर काय? तोफू घाला. गो हेल्दी!
फ्लॉवरचे तुरेही मस्त लागतील.
आई ग.... गुरुवारीच नेमकी
आई ग.... गुरुवारीच नेमकी पाहीली ही रेसिपी. लगेच जाउन बनवतापण नाही येणार. पण हा रविवार ह्या रेसिपीसाठी दिला.
काय दिसतोय तो फोटु प्रादी. लै
काय दिसतोय तो फोटु प्रादी. लै भारी.
मस्त वाटते आहे रेसिपी. करुन
मस्त वाटते आहे रेसिपी. करुन बघणार नक्की.
प्रज्ञा, तोंपासो फोटो आणि
प्रज्ञा, तोंपासो फोटो आणि मऽस्त पाकृ. 'चिकन हाथ मार के'..करून बघाच्चं म्हंजे काय बघाच्चंच!
जबरी फोटो! माझ्या
जबरी फोटो!

माझ्या सुगरणपणाच्या कमाल मर्यादा पाहता मी ट्राय केलंच तर 'माकाचु' मध्ये पोस्ट नक्की!
ओ मृ आज्जी, चष्मा लावा नी
ओ मृ आज्जी, चष्मा लावा नी वाचा पाहू नीट. चिकन हाथ मारके नाहीये- चिकन लात मारके आहे.
प्रज्ञा, अफलातून पाकृ आहे. मी
प्रज्ञा, अफलातून पाकृ आहे. मी शाकाहारी, पण अंडं घालेन. बरेच दिवस शोधत होते ही पाकृ, थँक्स!!
फक्त सायो, सिंडी आणि इतर शाकाहारींसाठी (हे वाचूनच ज्यांच्या तोंडाची चव जाणार असेल त्यांनी कृपया वाचू नये) : इकडच्या हॉटेलांमध्ये 'व्हेज क्रंची' नावाने स्टार्टर मिळतं ते असंच असतं, दिसतं आणि चवीलाही असंच लागतं. त्यात पनीर, बेबी कॉर्न, भेंडी (होय!), भो. मिरची, छोटे कांदे, बेबी गाजरं किंवा गाजराचे चौकोनी तुकडे असतात. करून पहा.
व्वा! मस्त आहे रेसिपी!
व्वा! मस्त आहे रेसिपी! उद्याचा बेत पक्का!
जबराट रेसिपी आहे..घरातल्या
जबराट रेसिपी आहे..घरातल्या चायनिज वेड्यांच नक्की समाधान होईल या डिशनी अस वाटतय
उद्या नाहीतर परवाच नक्की..धन्यवाद एवढी सोपी रेसिपी शेअर केल्याबद्दल
एकदम तोंपासू रेसिपी
एकदम तोंपासू रेसिपी
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना. व्हेरिएशन्सचे फोटो येऊदेत.
मस्त
मस्त
मंजुतै, तुमची स्पॉइलर
मंजुतै, तुमची स्पॉइलर वॉर्निंग पाहिल्यावर लगेच डोळे मिटुन घेतले आणि प्रतिसाद संपल्यावरच उघडले बै....
चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट
चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट मॅरिनेट करते. >> फ्रीज मधे / की बाहेर
फ्रीज मधे
फ्रीज मधे
प्रज्ञा, काल रात्रीच्या
प्रज्ञा, काल रात्रीच्या जेवणात हे चिकन केलं. दोन-तीन बारकेसे बदल म्हणजे शॅलो फ्राय केलं, तंदूरीचिकन मसाला नव्हता म्हणून कढाई चिकन मसाला घातला आणि सॉससाठी चिरण्या ऐवजी आलं लसूण बारिक किसून घेतलं. सॉस जरा जास्त झाल्यामुळे चिकन तुकडे कोरडे (अॅपेटायझर स्टाइल) न होता भाताबरोबर खाता आले. घरी मंडळींनी प्रचंड आवडून खाल्लं. पाककृतीबद्दल धन्यवाद!
Pages