आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे. हे साफ करताना कसरतच करावी लागते. उंच स्टूलवर चढून ह्यातील बाउल्स अलगद काढून धुऊन पुसून ठेवावे लागतात. धुतल्यावर अजून आकर्षक दिसतात.
पण गेल्या तीन-चार वर्षांपासून एक बुलबुल आमच्या ह्या घरावर मालकी हक्क दाखवत असल्याने आम्हाला ह्या झुंबराचा वापर कमी करायला मिळतो. आमच्या आजुबाजुच्या परिसरात भरपूर झाडे आहेत. त्या झाडांवर ढोलीपण केलेल्या आहेत पक्षांनी.
ह्या ढोलींत फक्त साळुंखी पक्षांचे अस्तित्व दिसते. ह्याचे कारण कदाचित परिसरात फिरणारे साप असतील. हे साप ढोलीत जाऊन पण पक्षांची अंडी खातात. त्यामुळे ह्या ढोलींवर फक्त साळुंख्या आपला हक्क गाजवतात. ह्या साळुंख्या सापा पासून नेहमी सावध असतात आपल्या ढोलीतील पिल्ले किंवा अंडी सापाने खाउ नयेत म्हणून. साप दिसले की त्यांना टोचायला त्यांच्या मागे कर्कश्य आवाज करत पाठलाग करतात. त्यांच्या सोबतीला एखादा कावळाही असतो कर्कश्य आवाज करत. ह्या मैना पक्ष्यांचा आणि कावळ्यांचा एकत्र कर्कश्य आवाज आला आणि बाहेर जाऊन बघितले की हमखास तिथून साप जाताना दिसतो. पण बुलबुल पक्षी हे घाबरट असतात. ते कधी असे सापाच्या मागे धावताना दिसत नाहीत. उलट जराशी जरी कसली चाहूल लागली की पळून जाताना दिसतात. त्यामुळे कदाचित ह्या बुलबुल पक्षाने आमच्या हॉलमधील झुंबर आपले माहेरघर किंवा सुरक्षित नर्सिंग होम म्हणून मानले असेल. कदाचित तिला ह्या घरट्यात राहताना शिश महालात राहिल्यासारखंही वाटत असेल असही मला वाटत असत.
वर्षातून दोन ते तीन वेळा ह्या बुलबुलची डिलिव्हरी आमच्या झुंबरात होते. आता ही एकच बुलबुल आहे की परंपरेनुसार तिची पिल्ले मोठी होऊन आमच्या झुंबरात आपली डिलिव्हरी करून घेतात हे संशोधन करणे कठीण आहे. कारण सगळेच बुलबुल सारखे दिसतात. त्यांचा डोळ्यांखालील आणि शेपटा खालील लाल भडक रंग त्यांच्या सौंदर्यात भर पाडतो.
इतर दिवशी हे बुलबुल आमच्या चिकू पेरूच्या झाडावर हिंडताना दिसतात. वायरवर कधी कधी झोके घेताना पण दिसतात. पण त्यातील बुलबुलला आपल्या आईपणाची चाहूल लागली की तिचे पाय आमच्या झुंबराकडे वळतात. मग ही बुलबुत आपल्या छोट्याश्या चोचीत गवताच्या काड्या, पान, कापूस घेऊन येताना दिसते. आम्ही झुंबर साफ करायला घ्यायच्या आत तिचे घरटे ती तयार करते. जर कधी अर्धवट घरटे आम्ही काढून टाकले तरी ती तिची जिद्द सोडत नाही. ती आपले कार्य चालूच ठेवते. झुंबरातील गवत काढून आम्ही मोठी माणसं थकतो. पण त्या इवल्याश्या चोचीत आपल घरटं साकारण्याच स्वप्न पाहात असलेली बुलबुल हार मानत नाही. अखेर ती आपल छोटस घरट तयार करते आणि त्यात अंडी घालते.
एकदा का हिने अंडी घातली की हा झुंबर आमचा राहत नाही. फक्त पोटापाण्याची सोय करण्यापुरती ही बुलबुल बाहेर जाते. बाकी दिवस रात्र ती आपल्या झुंबराच्या घरट्यात राहते. त्या काळातही ती आपल्या चोचीत काही ना काही आणत असते. कदाचित आपली दिवस रात्रीची शिदोरी जमा करत असेल किंवा डिलिव्हरीनंतरची पूर्वतयारी करत असेल. आता ही बुलबुल आमच्याकडे डिलिव्हरीला आल्याने आम्हालाही तिची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला काही छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. हे बुलबुल घरात बसले की आम्हाला झुंबराच्या बाजूला असलेले दोन्ही पंखे लावता येत नाहीत, नाहीतर ही बुलबुल अचानक कधीतरी बाहेर जायला निघते आणि पंख्याला धडक मारून आपल्या पंखांना इजा करून घेते.
कधी कधी शिटही लादीवर टाकून जाते. तेव्हा मात्र खूप राग येतो तिचा आणि कधी एकदाची डिलिव्हरी करून जाते अस होत.
एकदा का हिने अंडी घातली की दीड महिना तरी आम्हाला झुंबराचे दिवे लावता येत नाहीत. मग तेव्हा कोणतेही समारंभ असूदे. घराला टाळ लावून जाताना हिच्यासाठी स्लायडींग उघडी ठेवावी लागते म्हणजे ती बाहेर जाऊन आपले पोट भरून यावी म्हणून.
जर आम्हाला माहीत असते की ही काय खाते, हिला कसले डोहाळे लागले आहेत तर कदाचित तेही तिला आणून दिल असत म्हणजे तिला तेही कष्ट नसते पडले. आम्ही एकत्र कुटुंबात राहत असुनही कोणी बोलत नाही हाकलवत नाही म्हणून हिचा संचार आमच्या घरभर चालू असतो. खूप लाडावली जाते ह्या दिवसांत ती.
जवळ जवळ एक महिना होत आला की आनंदाची कुजबुज झुंबराखाली ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो. मग अचानक एक दिवस झुंबराखाली पिल्लांची चुचू सुरू होते. मग टेबल, खुर्च्या, स्टूलवर चढून आम्ही झुंबरात डोकावू लागतो. पण बाउल खोलगट असल्याने ही पिल्ले दिसत नाहीत. जेव्हा माता बुलबुल तिच्या पिल्लांना आपल्या चोचीने त्यांच्या चोचीत भरवत असते तेव्हा फक्त पिल्लांची चोच दिसते. अगदी घोडा स्टूल घेऊन कॅमेऱ्याने फोटो काढून ह्या पक्षांना झुंबराच्या बाउल मध्ये पाहता येत.
बघत असताना अगदी जवळ गेलो तरी आई झालेली बुलबुल आमच्या अंगावर येत नाही. कारण तिने आमच्यावर माहेरच्या माणसांसारखा विश्वास ठेवलेला असतो. तिच्या कडे बघताना अस वाटत की ती आम्हाला आनंदात सहभागी करून घेत आहे.
साधारण दहा दिवस झाले की अचानक कधीतरी ही पिल्ले खाली उतरलेली दिसतात. ही पडली की काय अशी भीतीही तेव्हा मनात येते. पण भरारी मारण्याचे हे त्यांचे पाहिले पाऊल असते.
पिलेही अगदी आमच्याघरात बिनधास्त फिरत असतात. ह्यावेळेस तर माझ्या मुलीच्या दप्तरावर बसुन शाळेत जाण्याचा हट्ट करत होता.
पण माता बुलबुल अजुन तुम्ही लहान आहात समजाउन आपल्या बाळांना बाहेरच्या जगाची दिशा दाखवते. आणि बाळांना दिशा दाखवता दाखवता ती पण आमच्या घरची दिशा विसरते.
ती आणि पिल्ले येण्याची आम्ही थोडे दिवस वाट बघतो. पण ती कदाचित आपल्या बाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी गर्क असेल. ती येण्याची बंद होते त्या दिवसांत आम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटत. सवयीने कधी कधी आम्ही गरम होत असेल तरी फॅन लावत नाही. सण असेल तरी झुंबर लावत नाही. मग हळू हळू ती आता येतच नाही हे लक्षात येत. मग आम्ही झुंबर साफ करायला घेतो. झुंबर साफ करताना तिने विणलेले घरटे ती आमच्या उपयोगी पडेल म्हणून कदाचित आम्हाला ठेवून जात असेल.
पण आम्हाला वाटत की बाहेर एखाद्या झाडावर हे घरटं ठेवलं तर ही बुलबुल किंवा तिची पिल्ल परत त्या घरट्यात येऊन बसतील. म्हणून आम्ही ते घरटं घराच्या बाहेर एखाद्या झाडावर ठेवतो. पण नंतर त्यात ती बुलबुल किंवा तिची बाळ फिरकतही नाहीत. मग अचानक काही महिन्यांनी बुलबुल परत आपले बाळंतपण करण्यासाठी तिच्या माहेरी म्हणजे आमच्या झुंबरावर येते.
असुदे म्हणजे तुला मासे आणि
असुदे म्हणजे तुला मासे आणि रानभाज्या वाटल्या असतील ना ? ते पक्षी ते कच्चच खात असतील. ते बर आहे त्यांच्यात शिजवण्याची वगैरे कटकट नाही.
जागू.. स्वातंत्र्य
जागू.. स्वातंत्र्य उपभोगणार्या बुलबूल सारख्या एका पक्ष्याने तुमच्यावर विश्वास ठेवला तेव्हा खूप नशिबवान आहेस समज.. !!
आमच्या खिडकीच्या अगदी जवळ नि समोरच असलेल्या अशोका झाडावर मागे बुलबूलचे जोडपे विसावले होते.. पिल्लांचा आवाज येत असे पण गर्द पानांच्या दाटीमुळे दर्शन काही झाले नाही.. मात्र त्यांचे घर बांधण्याचा खटाटोप नि नंतर नुकत्याच जन्माला घातलेल्या पिल्लांची इतर पक्षीप्राण्यांपासून घेतली जाणारी काळजी हे सगळे निरीक्षण करायला मस्तच वाटत होते.. तुम्हाला तर घरातच बघायला मिळतेय.. सह्ही !
जागु मस्त ग, खरच नशिबवान आहेस
जागु मस्त ग, खरच नशिबवान आहेस तु , यो च म्हणण मनापासुन पटेश
यो रॉक्स, थंड मनापासुन
यो रॉक्स, थंड मनापासुन धन्यवाद.
धन्य गं बाई तू, इतक्या वेळा
धन्य गं बाई तू, इतक्या वेळा त्या बुलबुलचं बाळंतपण मोठ्या कौतुकाने करतेस! त्या बुलबुल पक्ष्यांना तुझं घर म्हणजे आपलं हक्काचंच वाटत असणार!
अरुंधती हो ग खरच त्यांना
अरुंधती हो ग खरच त्यांना हक्काचच वाटत घर. पण ते फक्त बाळंतपणच करायला येतात. एकदा ते झाल की परत नाही येत.
लेखात दोन फोटो लोड केले आहेत.
लेखात दोन फोटो लोड केले आहेत.
मस्त...
मस्त...
>>>अवल त्यांचे बारकाईने
>>>अवल त्यांचे बारकाईने निरिक्षण करा <<< अगं जागू मी आरती २१ त्यामुळे "कर " असे म्हण
अगं हो त्यांच्याकडे बघत असताना किती वेळ गेला कलतही नाही, हो ना ?
अगदी बरोबर. तु आयडी कशाला
अगदी बरोबर.
तु आयडी कशाला बदलतेस ? परत आरती कर आधी.
खूप गोड झालाय हा बाळंतपण आणि
खूप गोड झालाय हा बाळंतपण आणि माहेरपणाचा लेख मी ट्रान्स्लेशन साईटवरुन हा वाचला होता पण त्या साईटवरुन प्रतिक्रिया देता येत नसल्याने तेव्हा दिली नव्हती आणि नंतर प्रतिक्रिया द्यायला विसरुनच गेले होते गं. तू पुर्वीही ह्या बुलबुल पक्षांबद्दल कुठे उल्लेख केला होतास का?
धन्स अश्विनी असेल कदाचीत. आता
धन्स अश्विनी असेल कदाचीत. आता नक्की कुठे केला होता ते आठवत नाही.
आहा जागू मस्तच. हल्ली
आहा जागू मस्तच. हल्ली रविवारचा माझा उद्योग असतो फोटो काढणे पक्षांचा. तुझा उद्योग छानच पण.
झुंबरातला घर्ट्याचा फोटो फार
झुंबरातला घर्ट्याचा फोटो फार छान... कसा काढला हा फोटो.... म्हणजे झुंबर तर खाली उतरवले नसणार आणि वरून काढणे म्हणजे दिव्यच....
खि डकीतील फोटोही मस्त.
जागू, मस्त लेख आणि सुंदर
जागू, मस्त लेख आणि सुंदर फोटो. अता घरी येणाअर्या पाहुण्यांनी बाळंत्विडा घेऊन जायला हवं.
मृण्मयी काय छान आयडीया
मृण्मयी काय छान आयडीया सुचविलीस. कधी येतेस घरी ?
डॉ. कैलास त्या झुंबराचे बाउल्स निघतात बाकी सांगाडा वरच असतो. साफ करण्यासाठी आम्ही ते बाउल्स खाली काढतो.
ओक्के....
ओक्के....
अरेच्चा... हा 'बुलबुल' आहे
अरेच्चा... हा 'बुलबुल' आहे काय!! मस्तच!
म्हणजे ही फॅमिली तुमचे कायमचेच भाडेकरु झालेत की!!
अग भाडेकरु नाही ग माहेरवाशिण
अग भाडेकरु नाही ग माहेरवाशिण आहे ती.
जागू... सहीच ग.
जागू... सहीच ग.
अप्रतिम लेख आणि फोटो! खरोखरच
अप्रतिम लेख आणि फोटो! खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात.कारण पक्षी बहुधा माणसांवर विश्वास ठेवत नाहीत. पण इथे तर तुमच्या सोबत ते सुखाने रहाताहेत,शिवाय पिल्लं पण! पिल्लांसाठी तर ते जीव टाकतात.पण तुमच्या बुलबुलांचा तुम्ही विश्वास संपादन केलाय. ही खूप मोठी achievement आहे असं मला वाटतं. असाच नेहेमी नेहेमी त्यांनी तुमच्या कडचा पाहुणचार (माहेरपण) enjoy करावा ही सदिच्छा!school bag वरचा फोटो मस्त आणि त्यावरची comment पण सही! खरंच त्या पिल्लाने हट्ट केला असावा असे वाटावे इतका तो फोटो मस्त आलाय.
छान
छान
भु.न्गा, शान्कली, डॉलर
भु.न्गा, शान्कली, डॉलर धन्यवाद.
जागू फार मस्त लेख आणि फोटो !
जागू फार मस्त लेख आणि फोटो ! खरोखरच तू फार भाग्यवान आहेस ग!
जागु, अगदी भन्नाट वाटली ही
जागु,
अगदी भन्नाट वाटली ही तुमच्या बुलबुलची कथा !
तुमच्या घरची आता ती एक मेंबरच झाली आहे जणु !
तुमच्या सारख्या काही निसर्गप्रेमी लोकांमुळे तर या पक्षी-प्राणी यांचा या 'माणसांवर' थोडा तरी विश्वास अजुन शिल्लक आहे..!
जागू, फोटो व वर्णन अप्रतीम.
जागू, फोटो व वर्णन अप्रतीम. कित्ती छान लिहितेस ग तू. आणि घरभर फिरणारी पिल्ले तर काय छान दिसतायत. मस्तच.
एकाच वेळी ३ कामे करतेस तू.
१) बुलबुल संगोपन (माहेरपण)
२) बुलबुल नर्सिंग होम.
३) बुलबुल पाळणाघर (बालसंगोपन)
खरोखरच तू फार भाग्यवान आहेस ग! पक्षांचाही विश्वास संपादन केलास. धन्य तुझी.
जागू सम जागूच.
जागू ,सोSSSS
जागू ,सोSSSS क्यूट्.बाळ्,बाळंतिणीचे वर्णन मस्तच.
खरचं शांकली. मायबोलिवर मी
खरचं शांकली.
मायबोलिवर मी पक्षी-प्राणी यांच्यावरचा हा तिसरा लेख वाचत आहे. पहिले दोन, एक बेटीने लिहिलेल्या ग्यान्स आणि दुसरा टण्याच्या आईनी लिहिलेला वान्या.
प्रज्ञा, अनिल, शोभा, समई,बी
प्रज्ञा, अनिल, शोभा, समई,बी धन्यवाद.
बी त्या लिंक टाक ना.
जागु फार सुंदर..
जागु फार सुंदर..
Pages