४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे.
१ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी.
वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पू सुकं खोबरं.
तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो.
कांदा, कोथिंबीर बाssssरीक चिरून घ्यावे. हरभर्याचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होउ देऊ नयेत.
बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.
_शक्य असल्यास कांदा, खोबर्याच्या वाटीचा तुकडा हे चुलीत अथवा गॅसवर भाजून घ्यावे. तसे केल्यास कांदा परतायची गरज नाही.
_वाटी लहान असल्यास दीड ते दोन वाटी सोलाणे घ्यावेत.
_खोबरे न घालता तीळ एखाद चमचा जास्त घेतले तरी छान लागते.
_तीळ अजिबात न घालता नुसते खोबरे घातले तर ह्याच रश्शात वांगी आणि सोलाणे न घालता उकडलेली अंडी घालून एग करी होते.
_काळा मसाला नसल्यास गरम मसाला, द ते म, गोडा मसाला घाला. (चव तशी येत नाही पण आता नाहीच्चे म्हंटल्यावर काय करणार :फिदी:)
जबरीच फोटो. बायदवे, हे हरभरे
जबरीच फोटो. बायदवे, हे हरभरे दिसतात कसे ते ही सांगूनच टाक.
अगं ताजे हरभरे खाल्ले नाहीत
अगं ताजे हरभरे खाल्ले नाहीत का कधी ? हे बघ इथे आहेत. इंग्रो मध्ये मिळतात.
काय भारी फोटो आहे. रेस्पी पण
काय भारी फोटो आहे. रेस्पी पण मस्त आहे. नक्की करून बघेन.
अग हे असेच असणार हे आठवत होतं
अग हे असेच असणार हे आठवत होतं पण तरी खात्री करुन घ्यायची होती. आणेन आता पुढच्या वेळी.
काय फोटो आहे.. तों पा सु
काय फोटो आहे.. तों पा सु :).
सोलाणे म्हणाजेच ते हिरवे हरभरे, देशात गड्ड्या घेऊन येतात ना ते हरभरे वाले, इथे सुट्टे मिळातात .
हरभर्याची उसळ -भाकरी अजुन एक आवडता मेनु :).
भारी आहे रेसिपी..फोटो पण
भारी आहे रेसिपी..फोटो पण सहही! आई साधारण अशीच भाजी हरभर्या ऐवजी मटार घालून करते..आता ही आयडिया देईन
सही मस्त दिसते आहे भाजी
सही मस्त दिसते आहे भाजी
किती सुरेख दिसतीय ही भाजी.
किती सुरेख दिसतीय ही भाजी. फ्रोजन हरभरे वापरले तर तेवढीच छान लागेल का?
काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला ना???
विदर्भात अशीच साधारण ' वांगं
विदर्भात अशीच साधारण ' वांगं -पावट्याच्या शेंगाची ' पण भाजी पॉप्युलर आहे. ( पोपटाच्या शेंगा म्हणतात पावट्यांना तिथे )
माझ्या माहितीत तरी काळा मसाला
माझ्या माहितीत तरी काळा मसाला उग्र असतो गोड्यापेक्षा. दतेम बहुतेक तरी काळा मसाला प्रकार आहे.
फ्रोझन वापरायला हरकत नाही. मी एरवी करते फ्रोझन हरभर्यांची पण अर्थातच ताज्याची सर नाही
वा छान आहे फोटो आणि रेसिपी पण
वा छान आहे फोटो आणि रेसिपी पण .. तेल कमी आणि वांगी न तळता नेहेमीच्या फोडणीवर वाटण घालून शिजवली तर किती फरक पडेल बघायला हवं ..
काय फोटो आहे..अगदी तों
काय फोटो आहे..अगदी तों पाअगदी:)
मस्तच रेसिपी आणि फोटो तर एकदम
मस्तच रेसिपी आणि फोटो तर एकदम तोंपासु
इथे हे सोलाणे फ्रेश चिक-पीज म्हणून वॉलमार्टमध्येही मिळतात. आपल्याकडे संक्रांतीला मातीची सुगड घेऊन त्यात हे सोलाणे,उसाचे करवे, बोरं, कापूस असं भरुन द्यायची पद्धत होती पूर्वी. तेव्हा हे नुसतेच सोलून कच्चेच खायचो आम्ही. हल्ली मात्र असं संक्रांतीचं वाण मागेच पडलंय.
मस्तय रेसिपी. फोटो पण झक्कास.
मस्तय रेसिपी. फोटो पण झक्कास.
पाहुनच पाणी सुटलय
पाहुनच पाणी सुटलय तोन्डाला......
सशल, वांगी नुसती परतून घेतली
सशल, वांगी नुसती परतून घेतली आहेत. तळण्यासाठी म्हणून भाजीत जास्त तेल घालायची गरज नाही. आणि वांगी तळून नाही घेतली तरी चांगली होते भाजी. घाई असताना वांगी तळण्या-बिळण्याचे सोपस्कार करताना आईला बघितलं नाही कधी
अगो, सोलाणे वॉलमार्टमध्ये मिळतात माहिती नव्हतं. कधी गेले तर लक्ष ठेवेन.
हरभर्याच्या शेंगा पहिल्यांदा
हरभर्याच्या शेंगा पहिल्यांदा इकडे बघितल्या तेव्हा खुप मस्त वाटलं होतं .. पण त्यातले दाणे गोड असले तरी कोवळे नसतात .. एकतर तिकडे ते पाल्यासकट असतात त्यामुळे शेंग शोधून, सोलून खाण्याची मजा औरच होती .. पण ईतर भाज्यांप्रमाणे हरभर्यांच्या चवीतही फरक जाणवतो .. तेही genetically modified असावेत का?
इकडे बे एरियात वॉलमार्ट सुपर सेंटर नाही पण ह्युस्टन ला बघितले नव्हते कधी .. आमच्या Indian स्टोर मध्येच मिळतात फक्त ..
सगळ्या वॉलमार्टस मधून नाही
सगळ्या वॉलमार्टस मधून नाही मिळत. मिनेसोटात कधीच नाही पाहिले. पण तिथल्या लोकल ग्रोसरी चेनच्या ग्लोबल सेक्शनमध्ये त्यांनी भारतीय दीप आणि स्वादच्या डाळी, आमरसाचे टिन्स असं ठेवायला सुरुवात केली होती. इथे ते नाही दिसत पण सुपर वॉलमार्टमध्ये सोलाणे,दुधी, कारली हे भाज्यांच्या विभागात असतं
आमच्या इथे तर कॉस्टको मध्ये
आमच्या इथे तर कॉस्टको मध्ये पण मिळतात हरभरे (कोवळे असतात.) पण तिथला पॅक खुपच मोठा येतो त्यामुळे Indian स्टोर मधुनच आणते.
जबरी, तोंपासु फोटो!! नक्की
जबरी, तोंपासु फोटो!!
नक्की करुन बघेन.
जबरदस्त. मैत्रिणीकडे करून
जबरदस्त. मैत्रिणीकडे करून नेइन.
सोलाणे आणतोच आता!
सोलाणे आणतोच आता!
मस्त आयडिया. करुन पाहणार.
मस्त आयडिया. करुन पाहणार.
सिंडी, ही भाजी नागपूरला सासरी
सिंडी, ही भाजी नागपूरला सासरी माहेरी नेहमीच होते. मसाला हाच. फक्त सोलाण्यांऐवजी कोवळे पोपटीचे दाणे घालतात. झकासच लागते. या भाजीबरोबर पोळी चालत नाही मात्र. सगळ्यांना भाकरी नि लसणाचा ठेचाच हवा असतो याबरोबर.
मस्त आठवण करून दिलीस. करायलाच हवी आता.
>>काळा मसाला म्हणजेच गोडा
>>काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला ना???
मी पण हेच विचारायला आले होते!! जर तो वेगळा असेल तर त्याची कृती देउ शकाल का?? आणि दतेम म्हणजे काय??
सिंडरेला, तोंडाला पाणि सुटलं
सिंडरेला,
तोंडाला पाणि सुटलं फोटो पाहून. मस्तंच गं...
स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प! स्लर्प!
सिंड्रेला, मस्त फोटो आणि कृती
सिंड्रेला, मस्त फोटो आणि कृती पण ...
सशल,
चायनीज मार्केट मध्ये पण चेक करा... मिलपीटास मध्ये आहे एक बहुतेक ...
स्लर्रप स्लर्रप! मस्त पाकृ.
स्लर्रप स्लर्रप! मस्त पाकृ.
हायला! काय फोटो आहे
हायला! काय फोटो आहे जबरी!!
वांगी आधी तेलात परतून घ्यायची आयड्या इथे वाचल्यावर कळली. मला इतके दिवस समजायचंच नाही की लग्नातल्या जेवणातली वांगी अशी छान कशी काय दिसतात आणि आपण केलेली तशी का नाही दिसत...
आमच्याकडे पंचमेळी करतात त्यात वांगं, बटाटा, सोलाणे, पावटे आणि शेवग्याच्या शेंगा घालतात. जेवण झाल्यावर हिंगाष्टक मस्ट
ओल्या तुरीच्या दाण्यांची पण
ओल्या तुरीच्या दाण्यांची पण अशीच करतात ती पण मस्त लागते.
Pages