६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.
ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.
खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.
१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.
हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.
१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.
फोटो? (नगल्या म्हणजे काय
फोटो? (नगल्या म्हणजे काय इथपासूनच आमची बोंब असल्याने फोटो मस्ट आहे. :))
फोटो?? फोटो??
फोटो?? फोटो??
अग बाई फोटो टाक ना?
अग बाई फोटो टाक ना?
फ्राय मुडदुशा खाल्लेत..ये भी
फ्राय मुडदुशा खाल्लेत..ये भी ट्राय करना पडेगा...रेशिपी आवडली नोट करुन योग्य व्यक्तींकडे पोचवणेत येईल
म्हणजेच खायला मिळेल ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोटो नाही............
फोटो नाही............ प्रतिक्रिया नाही.............:अरेरे:
मला याचा काही उपयोग
मला याचा काही उपयोग नाही!!!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा घ्या फोटो!! हे घेऊन या
हा घ्या फोटो!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे घेऊन या आणि मग शैलुने सांगितलेली कृती करा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भ्रमा, धन्यवाद. पुण्यात
भ्रमा, धन्यवाद.
नायतर टाकला असता फोटो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यात नगल्या कुठे मिळतात नेहमी?
दुष्ट , दुष्ट मुलगी ! अरबी
दुष्ट , दुष्ट मुलगी ! अरबी समुद्रापासून हजारो मैल दूर असणार्यांना जळव अजून !!
मेधा, आम्हालाही नाही
मेधा, आम्हालाही नाही मिळालेल्या बर्याच दिवसांत. हे आपलं आठवण आली नगल्यांची म्हणून..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शैलजा आता तूही ? इतके दिवस
शैलजा आता तूही ? इतके दिवस जागू जळवायची आता तू![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पन मिर्यानी मस्त वेगळीच चव येईल नाही. आता शोधते पुण्यात कोठे मिळतात का. आता निघतेच आहे मासे खरेदीला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे गं. पण लसूण अजिबात नाही
सगळ्यांच मासळीला लसूण लावत
सगळ्यांच मासळीला लसूण लावत नाहीत गं.
अगं आम्ही सीकेपी आपलं ज्यात
अगं आम्ही सीकेपी आपलं ज्यात त्यात लसूण ढकलत असतो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नगलीचा वास उग्र नाही. खरं तर
नगलीचा वास उग्र नाही. खरं तर पापलेटसारखीच मासळी आहे ती, बिन वासाची. चवही सौम्य आहे, म्हणून लसणाची गरज नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर, बर. आता बघते करून
बर, बर. आता बघते करून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुड्दुस हे फक्त रोगाचं नाव
मुड्दुस हे फक्त रोगाचं नाव आहे असं समजत होते..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुम्हा लोकांना कित्त्त्त्ती प्रकारचे मासे माहीत असतात.. आमची गाडी सुरमई, पापलेट, कोळंबी, हलवा, रावसच्या पुढे काही जात नाही.
मुडदुशे हे मांदेलीचे कझिन
मुडदुशे हे मांदेलीचे कझिन आहेत.
चवीष्ट लागतात.
हे लहान मासे म्हणजे मुडदुशे,
हे लहान मासे म्हणजे मुडदुशे, मांदेली, सौंदाळे, पेडवे, शेतकं यांनाच खरी चव असते. पण दुर्दैवाने अशा माशांची मागणी फार कमी झाली आहे, त्यामुळे बाजारात येतही नाहीत.
मला आमच्या गोरेगावच्या बाजारात वर्षभरात एक-दोन वेळा सौंदाळे मिळतात. मुडदुशे मात्र भरपूर, विशेषतः पावसाळ्यात.
अगं अगं चिंगी,मूडदूस नाही गं
अगं अगं चिंगी,मूडदूस नाही गं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भ्रमा म्हणतोय तसं खरी चव लहान मासळीलाच असते. मोठी ठराविक मासळी आजकाल सगळ्यांना ठाऊक असते, पण अस्सल मासेखाऊ लहान मासळीचीच निवड करणार.
फोटो मस्ट आहे...
फोटो मस्ट आहे...
दक्षे, फोटो मस्ट की मस्त??
दक्षे, फोटो मस्ट की मस्त??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
फोटो पाहुन खायचं की नाही ते ठरवणारेस कां?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दक्षिणा, अगं दिला आहे की
दक्षिणा, अगं दिला आहे की भ्रमाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भ्रमा, मस्तच आसतला रे
>>मुडदुशे हे मांदेलीचे कझिन
>>मुडदुशे हे मांदेलीचे कझिन आहेत.>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फोटो बघून खायनसा दिसला हा काय?
मस्ट असो वा मस्त दक्षे तू म्हटलस म्हण्जे....
शैलजा मस्तच. आता मला
शैलजा मस्तच.
आता मला मार्केटमध्ये मुडदुशा शोधायला लागतील. नाही मिळाल्या तर समुद्रावर जाळ लावुन बसायला लागेल.
जागू, जाळं लावशील तेह्वा
जागू, जाळं लावशील तेह्वा माझ्यासाठीपण पकड हां नगल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो वरुन तरी मुडदुसे म्हणजे
फोटो वरुन तरी मुडदुसे म्हणजे काणे फिश अअसे दिसतेय. हे काणे फ्राय मुंबईत समथींग फिशी (तुंगा ईंटर नॅशनल) आणि बँगलोर ला कूडला मधे मस्त मिळतात. कालवणातले हे मासे अजुन खाल्ले नाहित
माझ्या तोडांक पानी सुटला.
माझ्या तोडांक पानी सुटला. पुण्याला कोणच्या हाटलात नगलीच कालवण मिळत ? कलकत्ता बोर्डीग बंद झालय. तिथ फक्त मोठ्ठा मासा मिळायचा.
शैलू तू हाटेलच टाक बघू कसा.
शैलू तू हाटेलच टाक बघू कसा. तेव्ह्ढीच पुणेकरांची पण सोय जायत नी तू पण त्यानिमित्ताने नवीन व्यवसायात येशीत.
आणि जागू तू ईथे मुंबयत टाक. मुंबयकरांची सोय ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तेवढी जागा आणि भांडवल दिलस की
तेवढी जागा आणि भांडवल दिलस की चललयच व्यवसाय करुक![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
sahi.... puNyat aalyavar
sahi.... puNyat aalyavar kamalaa lagalee aahe
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages