"मेल्टिंग मोमेंट" कुकीज (फोटोसहित)

Submitted by लाजो on 5 November, 2010 - 10:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुकी साठी:

२५० ग्रॅम बटर (रुम टेम्परेचर - मऊसर)
दीड कप मैदा
चिमुटभर बेकिंग पावडर
४ टेबल स्पून आयसिंग शुगर
४ तेबल स्पून कस्टर्ड पावडर

क्रिम साठी:

दीड कप आयसिंग शुगर
अडिच टेबलस्पून बटर
व्हॅनिला इसेन्स किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट

क्रमवार पाककृती: 

कूकी:

सर्वप्रथम ओव्हन १५० डि सेंटीग्रेड ला तापत ठेवा.
बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर ठेऊन तयार ठेवा.

१. बटर आणि आयसिंग शुगर एका काचेच्या बोलधे एकत्र करुन क्रिम्र्र आनि फ्लफी होईपर्यंत फेटा;
२. दुसर्‍या बोलमधे कस्टर्ड पावडर, मैदा आनि बेपा एकत्र चाळुन घ्या.
३. आता लो स्पीड्वर किंवा बीटर ने बटर बीट करत करत मैदा + कपा + बेपा मिश्रण २ -२ चमचे एका वेळेस अस घालत मिक्स करा.
४. आता सगळे मिश्रण नीट एकत्र करुन गोळा तयार करा. साधारण फुलक्याच्या कणकेची सॉफ्ट कन्सिस्ट्ंसी यायला हवी.
५. या गोळ्याचे साधारण २४ भाग करुन त्याचे छोटे गोळे बनवा.
६. हे गोळे ५-१० मिनीट फ्रिज मधे ठेवा. जास्त नको नाहीतर बटर कडक होइल.
७. गोळे बाहेर काढुन बेकिंग ट्रे वर अरेंज करा. प्रत्येक गोळ्याच्या मधे थोडी गॅप ठेवा.
८. आता फोर्क च्या मागच्या बाजुने प्रत्येक गोळा हलकेच दाबा. फार जोरात नको नाहीतर कुकी फ्लॅट होइल.

IMG_1886.JPG

९. या कुकीज साधारण १५ मिनीटे बेक करा. कूकीज खुप ब्राऊन होता कामा नयेत. साधारण बटरच्या रंगाच्याच दिसायला हव्यात.
१०. कुकीज बाहेर काधुन थंड होऊ द्यात.

IMG_1924.JPG

क्रिम / आयसिंग:

बटर, आयसिंग शुगर आणि व्हॅनिला हलके आनि फ्लफी होईपर्यंत फेटा. फेटल्यावर फार नरम असेल तर ५-१० मिनीटे फ्रिज मधे ठेवा.

कुकी अन क्रिम

- जेव्हढ्या कुकीज झाल्यात त्यातल्या अर्ध्या कुकीज च्या फ्लॅट बाजुवर क्रिम्/आयसिंग लावा आणि वरती दुसरी कुकी (फ्लॅट बाजु येइल अशी) ठेवा. हलकेच दाब द्या.

झाल्या मेल्टिंग मोमेंट कुकीज तयार Happy

IMG_1928.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन कुणी थांबत नाही :)
अधिक टिपा: 

- या कुकीज खुप हलक्या आणि खुसखुषीत होतात.
- यात बटर ऐवजी मार्गरीन किंवा तत्सम अजिब्बात वापरु नये Proud चवीची वाट लागते...
- क्रिम/आयसिंग मधे आवडत असल्यास लेमन्/ऑरेंज झेस्ट घालु शकता.
- क्रिम्/आयसिंग मधे चॉकलेट घालु शकता.

माहितीचा स्रोत: 
बेस्ट एव्हर बेकिंग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या लेकीची मजा.

आई पण तेव्हा निरनिराळी देशातील बेकींग शिकल्यानंतर रोज रात्री काहितरी बेक करायची मग आम्हाला सकाळी डब्यात एक डेझर्ट मिळायचे. ते दिवस आठवले.

मी करुन बघितले कुकीज्...मस्त झालेले खुसखुशीत....फक्त ते क्रिम वगरै नाही घातले, नुसते कुकिज बनवले Happy

धन्स गं लाजो Happy

DSC03357.JPG

अरे व्वा! मयुरी, मस्त दिसताय तुझ्या कुकीज Happy
कुकीज करुन इथे कळवल्याबद्दल धन्यवाद Happy

@ चिऊ, इलेक्ट्रिक ओव्हनमधे होतिल या कुकीज Happy

लाजो..... अगं काय एकसे एक पाककृती करतेस गं..... !!
तोंडाला सुटणार्‍या पाण्याला कसं थांबवायचं गं.....!!
नक्की करुन बघेन.