‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

Submitted by अभय आर्वीकर on 31 October, 2010 - 12:30

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

नमस्कार मित्रांनो,
माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशीर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.

११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.

* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवावा.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!
. आपला स्नेहांकित
. गंगाधर मुटे

टीप : मायबोली प्रशासनाची अनुमती मिळाल्यास ‘रानमेवा’ मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध करुन द्यायचा विचार आहे, त्यापोटी विक्रीतून उपलब्ध होणारी रक्कम माबोच्या कोणत्याही उपक्रमांसाठी उपयोगी पडू शकेल.

गुलमोहर: 

गंगाधरराव,

मनःपुर्वक अभिनंदन! आपला कवी म्हणून होणारा प्रवास आपल्याला व्यक्तीकरणाची सर्वात अचूक व सच्ची पातळी गाठून देणारा असो व त्यातून आपल्या सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भावनिक परिस्थिती परावर्तीत होऊन त्यातून रसिकांना जीवनमूल्यांचे भान येतानाच त्यांचे रंजनही होवो अशी प्रार्थना!

पाच प्रती पाठवाव्यात! माझा पत्ता एस.एम.एस. द्वारे पाठवत आहे. मूल्य कसे पाठवायचे हेही कळवावेत!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

वाह वाह मुटेजी! अभिनंदन.
आपल्या मायबोली परिवारातील कार्यक्रम हा घरातीलच कार्यक्रम! त्या साठीही आपणास हार्दिक शुभेच्छा!!!

मुटेजी, (जिल्हाध्यक्ष (वर्धा जिल्हा),शेतकरी संघटना)
धन्यवाद !
आपल्यासारख्या कवीच्या अनेक अनमोल कवितेने भरलेल्या 'रानमेवा' या काव्यसंग्रहात माझ्या सारख्या एका नवशिक्या आणि शेतकरीपुत्राचा अभिप्रायला आपण जागा दिली, याला मी माझा मोठा सन्मान समझतो. आपल्या पहिल्या 'रानमेवा’ या काव्यसंग्रह प्रकाशनाला उपस्थित राहण्याची इच्छा तर खूप आहे, बघू या जमतंय का ते !
आपला 'रानमेवा' लाखो शेतकऱ्यांच्या घरातही पोहोचावा,आपल अख्ख आयुष्य या काळ्या मातीत
घालवलेल्या आपल्या मायं-बापाच दु:ख त्यांच्या पोराले आता आणखी कळू दे, अन्यायाविरुद्ध
लढण्यास त्याले आणखी स्फूर्ती मिळू दे, हीच इच्छा !
आपल्या रानमेव्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत.
Happy

अभिनंदन मुटेजी,
बुलढाणा येथे धाड या गावी माझे येणे होणार आहे. आपण प्रकाशन स्थळ व वेळ कळवल्यास प्रकाशनास येणे जमू शकेल. डॉ.श्रीकृष्ण राउत यांचीही भेट होईल. आपल्या ''रानमेव्यास'' असंख्य शुभेच्छा....... आपण रानमेवा विक्रीतून येणारे उत्पन्न माबो साठी उपलब्ध देवू करता हे आपल्या सुहृदयपणाचे लक्षण आहे. आपल्या भविष्यातील उपक्रमास व वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

अभिनंदन आणि शुभेच्छा!!
मायबोली खरेदी विभागात पुस्तक विक्रीस ठेवण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधा.

मनापासून अभिनंदन मुटेसाहेब. Happy पु.ले.शु.
माबोवर नवीनच असल्याने तुमच्या सगळया कविता वाचायला जमलं नाही....आता आवर्जून वाचेन .
******************************************************************************************************

" सोन्यारूप्याने सजला, मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा विठोबा, पानाफुलांमध्ये राजी !"

Pages