माणी

Submitted by अल्पना on 27 October, 2010 - 05:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल भोपळा, हिंग, जीरे, मेथ्या, तिखट, हळद, धणे पूड, जीरे पूड, गरम मसाला, ३ चमचे आमचूर, २-३ चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, साखर, फोडणीसाठी सरसोचे तेल / रिफाइंड तेल

क्रमवार पाककृती: 

एका कढईमध्ये /पॅनमध्ये थोडेसे सरसोचे तेल तापवून घ्यावे. तेल चांगले तापल्यावर त्यात थोडा हींग, मेथ्या, जीरे टाकून फोडणी करावी. त्यात लाल भोपळ्याचे २-४ मोट्ठे तुकडे टाकावेत. (पंजाबी भाजीत / हॉटेलातल्या भाजीत आलू किंवा गोबीचे असतात तसे. मी पहिल्यांदा आपल्याकडच्या सवयीप्रमाणे छोटे तुकडे घातले होते, तेंव्हा नवर्‍याचा तु.क. मिळाला व चव बदलते असेही कळले. Happy )

त्यात नेहेमीप्रमाणे हळद, तिखट, मिठ, जीर्‍याची, धण्याची पूड वगैरे घालावे. अर्धा -एक चमचा गरम मसाला घालावा. थोडेसे पाणी घालून भोपळा शिजू द्यावा.

३-४ वाट्या पाण्यामध्ये बेसन आणि आमचूर चांगलं मिक्स करून घ्यावं. ब्लेंडरनी मिक्स केलं तर छान मिक्स होतं, बिलकुल गाठी रहात नाहीत. भोपळा शिजत आला की त्यात हे बेसन घातलेलं पाणी घालावं. थोडीशी साखर घालावी. आता याला भरपुर उकळी आणावी. उकळताना आलेला फेस निघून जाईपर्यंत उकळावं.

आंबटगोड चवीचं माणी छान लागतं भाताबरोबर.

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

पंजाब-हिमाचल भागात केला जाणारा पदार्थ आहे. लग्ना-कार्यामध्ये, कोणत्याही पुजेमध्ये ह्या पदार्थाचे महत्व आहे. पंजाबमधल्या हिमाचल प्रदेशाला लागून असलेल्या भागामध्ये आणि हिमाचलच्या काही भागामध्ये शुभकार्यांमध्ये /गावजेवणामध्ये दाल, चावल, माणी, मिठा सलुणा अन मदरा असे जेवण करायची पद्धत आहे. यात दाल म्हणजे मा आणि राजमा मिक्स दाल, हरबर्‍याची डाळ अश्या दोन डाळी वेगवेगळ्या करतात. चवळी अन दही, ड्राय फ्रुट वापरून मदरा नावाचा प्रकार अन साखरेच्या पाकात बडीसोप, किसमिस, खोबरं वैगरे घालून मिठा सलुणा. या स्वैपाकाच्या प्रकाराला कच्ची रसोयी म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन प्रकार आहे. नक्की करुन पाहीन . सध्या हालोवीन सिजनमध्ये लाल भोपळ्याचा सुकाळ आहे.
अशा अजुन नवीन पाक. येउ द्या Happy

पंजाबी कढीसारखी, पळीवाढ पालेभाजीसारखी.
ही सगळी कच्ची रसोयी जर उरली असेल तर एकत्र भातात कालवून भाताला तुप्-जीर्‍याची फोडणी देतात दुसर्‍या दिवशी. मस्त लागते.
मी आज कालच्या उरलेल्या दोन्ही डाळी, माणी अन भात एकत्र देवून, त्यात थोडी साखर घालून फोडणी दिली होती. एकदम मस्त ब्रेफा झाला. Happy

अल्पना भारी झालं आहे हे माणी. (हा पदार्थ खाल्ला नसल्यामुळे ओरिजनल चव कशी असते माहित नाही)
पण आत्ता तयार झालेला पदार्थ लैच भारी झाला आहे. Happy

MANI.jpg

मस्तय प्रकार.

युपीमध्येही ही अशी कच्चा खाना / पक्का खाना ची संकल्पना आहे.

रोटी, चावल वगैरे आपलं नेहमीचं जेवण म्हणजे कच्चा खाना. आणि पुरी, कचोरी असं तळण केलं की तो होतो पक्का खाना.

आज घरी मां चने की दाल आणि माणी बनवले होते. बेसन लावायच्या ऐवजी भाजलेले मक्याचे पीठ लावले होते आज.