भटकंती कोल्हापूरची

Submitted by जिप्सी on 27 October, 2010 - 01:30

काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये गप्पा मारता मारता कोल्हापूरचा विषय निघाला आणि मला माझी ३ वर्षापूर्वी केलेली कोल्हापूरची भटकंती आठवली. त्याच भटकंतीचे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरला नाही. :). चार दिवसात भरपूर भटकलो तरीही सिद्धगिरी म्युझियम राहिले (आम्ही संध्याकाळी ६:३० वाजता गेलो आणि ते ७:३० ला बंद होणार होते :(). जेंव्हा गेलो तेंव्हा रामनवमी असल्याने तांबडा/पांढरा रस्सा न खाताच यावे लागले. :(.
आता खास कणेरी मठाला भेट देण्यासाठी आणि तांबडा/पांढरा रस्सा खाण्यासाठी तरी परत एकदा कोल्हापूरची भटकंती करायला पाहिजेच. Happy

एक ऐतिहासिक आणि राजेशाही शहर म्हणुन कोल्हापूर मनात ठसले. त्याच कोल्हापूरची हि भटकंती.
==================================================
कुलस्वामिनी अंबाबाई - महालक्ष्मी मंदिर
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

==================================================
भवानी मंडप
==================================================
प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

==================================================
न्यु पॅलेस
==================================================
प्रचि ८

==================================================
छ. शाहू महाराज कुस्त्यांचे मैदान
==================================================
प्रचि ९

==================================================
शालिनी पॅलेस
==================================================
प्रचि १०

==================================================
रंकाळा तलाव
==================================================
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

==================================================
दख्खनचा राजा - जोतिबा मंदिर
==================================================
प्रचि १६

प्रचि १७

==================================================
पन्हाळा
==================================================
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

==================================================
कुंभोजगिरी (भगवान पार्श्वनाथ मंदिर)
==================================================
प्रचि २२

==================================================
बाहुबली
==================================================
प्रचि २४

==================================================
श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
==================================================
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

==================================================
दुध कट्टा (गंगावेश)
==================================================
प्रचि २९

==================================================
पंचगंगा घाट परिसर
==================================================
प्रचि ३०

==================================================
एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापूरी साज ......
==================================================
ठुशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे काय भारी काढलेस रे फोटो! मस्तच! Happy माझ्या कोल्हापुराच्या आठवणी जाग्या केल्यास. गंगावेशीला मावशीचे सासर होते. मोठ्ठा वाडा. अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्या वाड्यात हुंदडण्यात घालवल्या आहेत. संध्याकाळी रंकाळ्यावर फेरफटका. अंबाबाईचे दर्शन घेतल्याशिवाय कोल्हापुरास गेल्यासारखे वाटायचे नाही. तिथेही खेळायचो खूप. आणि सुरुवातीला कोल्हापुरात सोळंकीचे एकच दुकान व दुकानाच्या वर लॉज होते. आम्ही अनेकदा तिथेच उतरायचो. आणि खाली आइस्क्रीम पार्लरमध्ये कसाटा आइस्क्रीम खायचे.... अहाहा! आठवले ते दिवस! थँक्स रे योगेश हे फोटोज शेअर केल्याबद्दल! Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद Happy

सुतकाळीच्या ! फक्त जोडीनं जा लवकरच.. आईच्या दर्शनाला.. >>>>सुकी, Happy Happy पुढच्या वर्षीपर्यंत नक्की रे Wink

लेका, जुन्या आठवणींना उजाळा दिलास. खरं त्या आठवनी नाहीतच, कारण त्या साठी विसरावं लागतं.>>>मल्ली तुला १०० उकडीचे मोदक Happy

नंतर त्या शुद्ध भारी दुधाची गुंगीच येते.>>>>>अके :). पण काहीजणांना ते धारोष्ण दुध पचत नाही Happy

कोल्हापूरातील राजाभाउची भेळ खाल्लास काय?>>>येस्स्स्स. फक्त तांबडा/पांढरा रस्सा नाही चाखला :(.

तुला माझ्याकडून पुन्हा एकदा धपाटे कशाबद्दल मिळतील हे कळले असेलच .>>>>> Proud Proud

कोल्हापूरला जावे आणि सोळंकीचे आईस्क्रीम खाऊ नये, हे महापाप !>>>>> पुढच्या फेरीत याची आवर्जुन नोंद घेतली जाईल Happy

मस्तच आहेत सगळे फोटो. महालक्ष्मीचा पण असता तर मस्तच.>>>>>जागु, महालक्ष्मीचा फोटो काढु दिला नाही Sad

ती डिकमल कट्ट्यासह आली असती तर मजा आली असती.>>>हबा डिकमल म्हणजे काय रे?

प्रचि ५ मधला शाहू महाराजान्चा खरा फोटो तिथेच असलेल्या एका रूममद्धे आहे. तो बघितलास का??>>>>>स्मिहा, तो फोटो नाही पाहिला, पण न्यु पॅलेसमध्ये शाहु महाराजांचा जीवनपट उलगडणारे वस्तुसंग्रहालय आहे. त्यात त्यांचे भरपूर ओरीजनल फोटोज होते ते मात्र पाहिले.

गंगावेशीला मावशीचे सासर होते. मोठ्ठा वाडा. >>>अकुजी, गंगावेशीलाच माझ्या मित्राच्या बहिणीचे सासर आहे आणि त्यांचा सुद्धा लाकडी वाडा (अजुनही) आहे. जुन्या मराठी चित्रपटात दाखवतात ना तसाच एक लाकडी पाळणा पण आहे. Happy

हो, हो, मावशीचा वाडाही लाकडीच होता.... भलेमोठे लाकडी, नक्षीचे प्रवेशद्वार, त्यातच एक छोटा दरवाजा, आत प्रवेश केल्यावर बाहेरच्या आल्यागेल्यांना बसायला दगडी ओसरी, अंगणात दगडी कारंजे व हौद, तिथेच हात-पाय धुवायला एक मोठे दगडी खोलगट भांडे होते. त्यात पाणी भरून ठेवलेले असायचे. मग ओसरी होती. तिथे मोठा लाकडी झोपाळा. पितळेच्या कड्यांचा. कुरकुरणारा. भिंतीतले कोनाडे. काचेचे कंदिल, चिमण्या, हंड्या. लाकडी तुळयांचे छत. भिंतीला अंग घासले की अंगाला तो रंग लागायचा. वाड्यात अंधारे कोपरेही खूप होते. एक अडगळीची खोली होती जिच्याबद्दल बर्‍याच भुताटकीच्या कहाण्या सांगून मोठी भावंडे आम्हाला लहान मंडळींना घाबरवून सोडायची. आणि वाड्याच्या दारातून दिवसभर म्हशींची चालणारी ये-जा बघताना खूप मजा यायची. तो रस्ता पण त्यांच्या प्रसादाने सुगंधित झालेला असायचा!

योगेश,
लई भारी सफर आणि फोटो !
अडीच वर्षे नोकरीनिम्मित काढली ,
आमच्या जवळचाच जिल्हा,पण २-३ गोष्टी सोडल्या तर बरचं बघायचं राहुन गेलयं ..
या व्यस्त नोकरीमुळं अशा प्रकारचं नुकसानही बरचं झालयं
Happy

मस्तच फोटो रे.. झक्कास.. प्रत्येक फोटो कुठल्या जागेवर उभा राहून घेतला आहे ते सांगू शकतो नक्की...
तरी ४ दिवसात बरच पाहिलस रे ...

गिरिविहार,
दिनेशदा, मल्ली ने सांगितल्याप्रमाणे बिनधास्त जा... कोल्हापुरात तुला जिथ हवे तिथे नेऊन सोडणारी माणसे आहेत...
प्लॅन न करता गेलास तरी चालेल, तिकडेच जाऊन लोकाना विचार काय काय बघू म्हणून..तुला सगळी ठिकाणे सांगतील, हिश्टरी सकट Happy

नाहीतर कोल्हापूर बाफ वर मेसेज टाक...

जुना राजवाडा म्हणजे भवानी मंडप आणि आजूबाजूचा परिसर.. आता तिथे, मंडप, शाळा, सरकारी ऑफीसे, पोलिस चौकी इ आहे

छ. शाहू महाराज कुस्तांचे मैदान म्हणजे पूर्वीचे खासबाग मैदान..

योग्या,
साठमारी मैदान पाहिलेस का? भवानी मंडपातच खाशाबा जाधवांचा फोटो आहे तो विसरलास का? पहिले सुवर्णपदक!

चंबूखडीचा गणपती पाहिलास का? खिद्रापूरच मंदीर पण छान आहे..
पुण्या-मुंबईतल्या कित्येक लोकाना अजूनही पटत नाही की असे धारोष्ण दूध अजूनही मिळते

मस्त रे योगेश Happy

>शिवाय कोल्हापूरात कुणीही अगदी व्यवस्थित रस्ता दाखवतात
हे खरं आहे.
पण आमचे काही बेरकी मित्र अगदी 'बरोब्बर' रस्ता सांगतात. त्यांची आणि तुमची भेट नाही झाली म्हणजे मिळवली Wink Light 1

पण मजा येईल ह्यात वाद नाही. लय भारी मजा येइल!

योग्या, प्रचि ६ मधला जो रेडा आहे ना, तो शाहू महाराजान्नी मारलेला रेडा आहे बर का...
लोक त्याची पूजा करतात....

कोल्हापूरची माणसं, त्यो कोपर्‍यावर डांब हाय न्हवं का ? त्यो रं त्यावर पाईप लावलाय त्यो. तिथं ती बाई उभारली न्हवं का ? ....
असा पत्ता सांगतील !!

साठमारी मैदान पाहिलेस का? भवानी मंडपातच खाशाबा जाधवांचा फोटो आहे तो विसरलास का? पहिले सुवर्णपदक!
चंबूखडीचा गणपती पाहिलास का? खिद्रापूरच मंदीर पण छान आहे..>>>>>मन-कवडा हे नाही रे पाहिले Sad आता पुढच्या फेरीत पाहेन :). खिद्रापूरला जायचे होते पण वेळेअभावी राहिले.

ऋयाम, दिनेशदा Proud Proud

दिपमाळ, रेडा, रंकाळा (प्रचि ११), १४ - १५ स्स्लर्र्रप ,१८,२७,२८, दूधकट्टा, साज अन नथ, ठुशा ---वा वा वा ! मस्त की राव !
शप्पथ, जुन्या आठव्णी काय धबाधब येताहेत :स्वप्नरंजन करणारी बाहुली:
सही Happy

जिप्सी.फोटो नेहमीप्रमणेच अप्रतिम.
पण मला इतके ऊशीरा कसे दिसले हे फोटो? हां . बरोबर तेव्हा माझ नेट संपावर गेल होत. असो. प्रतिसाद ऊशीरा दिल्याबद्दल क्षमस्व.

मस्त फोटो,खूप आवडले. कोल्हापुर खरेच झकास आहे.भवानी मंडपातील हळदी कुंकवाचे डोंगर पुढे घेउन विक्रिसाठी बसलेले लोक्,फुले,निशिग्म्धाच्या आणी शेवंतीच्या फुलांचा वास आठवला.

Pages