गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 25 October, 2010 - 10:27

"यू मे नॉट अ‍ॅग्री टू इट टूडे मोना... बट यू विल हॅव टू ट्रस्ट इट... इट्स अ फॅक्ट... अ मेल्स सपोर्ट इज मस्ट फॉर अ फिमेल इन लाईफ..."

अत्यंत मिश्कील डोळे, ज्यांच्यात एक अवखळ, बालकांना शोभावी अशी भुर्‍या रंगाची छटा होती, त्यांत मागच्या समुद्राच्या लाटांचे प्रतिबिंब पडलेले होते. पुरूष असूनही राकटपणापेक्षा त्याच्यात बॉयीश लूक्स अधिक होते. आणि चेहर्‍यावर कायम भुरळ पाडणारे स्मितहास्य! ज्यावर विश्वास ठेवायला कुणीही क्षणात तयार होईल! रेमंड्सच्या त्या ग्रे ब्लेझरमध्ये त्याचा गुलाबी गोरा रंग आता लालसर होऊ लागला होता. फॉस्टरचा टिन घोट घोट घशात उतरवत 'बघ कसे तुला चिडवले' असा लूक चेहर्‍यावर ठेवून जतीन खन्ना समोर बसलेल्या मोना गुप्ताकडे मिश्कीलपणे पाहात होता. पण त्याला अपेक्षित तो परिणाम झाला नाही. लहानपणी ती चिडायची आणि चिडून काहीतरी बडबडायची. पण त्या गोष्टीला आता वीस वर्षे झाली होती. त्यावेळेस ती फक्त पाच वर्षांची होती. आता पंचवीस! आणि जतीन तीस!

अचानकच, जतीनचा आत्मविश्वास किंचित डळमळावा असं काहीसं ठाम प्रकारचं स्मितहास्य मोनाच्या चेहर्‍यावर आलं! डोळ्यात मात्र त्या हास्याची भावना जेमतेमच उतरली होती. कारण डोळे काहीश्या निर्धाराने अधिक व्यापलेले होते.

मोना गुप्ता! अजून अल्लडच वाटावी अशी तरुणी! श्रीमंती मात्र तिच्या व्यक्तीमत्वातूनच जाणवत होती. तिची कार, युनिफॉर्ममधला ड्रायव्हर, तिचा पेहेराव, अ‍ॅक्सेसरीज, चेहर्‍यावरील भाव आणि त्वचेही झळाळी! सर्वातून श्रीमंती ओसंडून वाहात होती. मात्र चेहर्‍यावर एरवी जे स्वप्नाळू, मिश्कील भाव असायचे त्यांची जागा आता खूपच परिपक्व भावांनी घेतलेली होती. आणि आत्ताचे हे काहीसे मिश्कील, काहीसे निर्धारातून आलेले स्मितहास्य हा त्याच भावांचा पहिला आविष्कार होता.

"इझ इट? ओ आय डिडन्ट नो दॅट? बट व्हॉट आय डू नो इज.. अ मेल कॅन नॉट बॉर्न अनलेस अ फिमेल गिव्ह्ज हिम द बर्थ... चेक प्लीज..??"

थांबलेल्या मॅनेजरकडे पाहात मोनाने बिल मागीतले तेव्हा जतीनला आयुष्यात पहिल्यांदाच एक गोष्ट जाणवलेली होती. हा अल्लड गोरापान चेहरा, हे असे ट्रेंडी कपडे, या अशा अ‍ॅक्सेसरीज, कोणत्यातरी हिंदी किंवा इंग्लीश पिक्चरचा प्रभाव असल्याप्रमाणे केलेला मेक अप आणि हेअर स्टाईल आणि जणू जस्ट कॉलेजमधून बाहेर पडली असावे असे वाटावे असे वागणे.. या सर्वाच्या मागे एक व्यक्ती आहे... जिच्यावर पुर्वी... खूपच पुर्वी आपला कंट्रोल होता... आता मात्र... तो अजिबातच नसावा असे दिसत आहे..

आणि ही भावना मनात नव्यानेच उगवल्यामुळे बॉयीश दिसणार्‍या जतीनच्या मनातला पुरुषी अहंकार काही प्रमाणात दुखावला गेला होता. वर्षानुवर्षे मामांच्या तालमीत तयार झाल्याने त्याच्या चेहर्‍यावर मनातल्या भावनांची पुसटही रेघ दिसली नाही.

आणि गुप्ता हेलिक्स लिमिटेडच्या अकाउंटमध्ये सही करून मोना उठली तसा जतीन यंत्रवत चालत तिच्या कारमध्ये तिच्या शेजारी जाऊन बसला.

"ग्रॅन्ड मराठा"

मोनाने ड्रायव्हरला सोडलेली आज्ञा ऐकून ड्रायव्हरलाही जरा बरे वाटले. आत्ताच ताजमधून बाहेर पडत होते. इथून स्ट्रेट सेव्हन स्टार हॉटेल! चला! पार्किंगमधून निदान भारी भारी पब्लिक तरी बघता येईल. एखादा नट किंवा नटीसुद्धा! आणि मग संध्याकाळी शांतपणे पुण्याला निघायचं! मॅडम एकदम भारीच आहेत. महिन्याभरापुर्वी आपल्याला सांगायच्या ब्ल्यू डायमंडला घे, सेंट्रलला घे! आणि तासनतास मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या, खरेदी करायच्या आणि घरी यायच्या! कालपासून एकदम रंगच पालटला आहे. मुंबई! ताज! इथून ग्रॅन्ड मराठा!

हा ड्रायव्हर होता गुप्तांचा! त्याचे नांव पराग! असेल तिशीचा! पण भरपूर फिरलेला होता. आणि एस क्लास मर्सिडिझ तो त्या कारच्याच दर्जाप्रमाणे वापरायचा आणि हाताळायचा! शिडशिडीत शरीरयष्टीचा सावळा पराग सीट बेल्ट घालून ड्रायव्हिंग सीटवर बसला की सहज आठ आठ तास ड्रायव्हिंग करू शकायचा!

तिकडेही समुद्र अन इकडेही!

मात्र जायला लागणारा सव्वा तास फारच कटकटीचा! आले एकदाचे ग्रॅन्ड मराठा!

खाडखाड दारे उघडून मोना आणि जतीन बाहेर पडले आणि गेले ते थेट तिसर्‍या मजल्यावरच्या कॉन्फरन्स रूममध्ये!

नो कॅमेरामन्स, नो न्युजपेपरवाले!

नाही म्हंटले तरी गुप्तांची मुलगी आहे म्हंटल्यावर एक दोन नवीन मेंबर पटकन उठून उभेच राहिले. त्यात जतीनच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाचाही परिणाम होताच! पण बाकी सगळ्यांसाठी मोना ही मोनूच होती.

अंगाखांद्यावर खेळलेली! त्यानंतर फक्त अ‍ॅन्युअल फंक्शन्सना दिसणारी! सगळ्यांशी सन्मानपुर्वक वागणारी आणि म्युझिक सुरू झाल्यानंतर मात्र डान्स फ्लोअरवर मैत्रिणींबरोबर धुंद होऊन नाचणारी!

लोहिया अंकल मेन सीटवर बसले होते. यात कुणालाच हरकत असू शकत नव्हती. ही वॉज जॉईंट एम्.डी.!

अ‍ॅन्ड ही वॉज देअर सिन्स द कंपनी वॉज फाउंडेड!

मोना आली ती तडक स्वतःसाठी असलेल्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची लोहिया अंकल यांच्या खुर्चीपासून दोन खुर्च्या सोडून होती. या दोन खुर्च्यांवर अर्देशीर इंजीनीयर आणि सुबोध गुप्ता बसलेले होते. अर्देशीर इंजीनीयर कंपनीचे सर्व बाबतीतले सल्लागार होते. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर! वय वर्षे साठ! तरीही ऑन रोल! आणि सुबोध गुप्ता होते गुप्तासाहेबांचे पुतणे! सख्या मोठ्या भावाचा एकमेव मुलगा! आता भाऊ आणि वहिनी तर केव्हाच मेलेले होते. पण त्याला दिलेले वचन गुप्तासाहेबांनी पाळलेले होते. सुबोधला मी माझ्या उद्योगात सेटल करेन! सुबोध कर्तबगार माणूस होता. मोनापेक्षा तो जवळपास दहा वर्षांनी मोठा होता. लहानपणी ते दोघे कधीच एकत्र नव्हते. सुबोध वडिलांबरोबर सिमल्याला असायचा! एखाद दोन वेळाच भेट झालेली असेल. सिमल्याचे हॉटेल काही कारणाने बंद पडले आणि वडिलांनी धसकाच घेतला. त्यात ते गेले आणि तीन वर्षांनी सुबोधची आई! मग सुबोध पुण्याला आला आणि गुप्तासाहेबांना भेटला. त्यांनी त्याला कन्स्ट्रक्शन आर्म बिझिनेस बघायला मुंबईला बसवले. हा बिझिनेस गुप्ता हेलिक्सचा कोअर बिझिनेस नव्हता. पण नवीन उदयाला येत असलेली शाखा होती ही!

सगळ्यांनी एकमेकांना विश करेपर्यंत हव्या त्या बेव्हरेजेसचे वाटप झाले. मोना सर्वांशी आत्मविश्वासाने बोलत होती.

दहा एक मिनिटांनी अर्देशीर बोलू लागले. सर्व संवाद इंग्लीशमध्येच होते.

"मित्र मैत्रिणींनो, एका फारच वाईट घटनेनंतर आपण सर्व पहिल्यांदाच भेटत आहोत. त्या दिवशी भेटलो होतो, पण तेव्हा त्या प्रसंगाचे अत्यंत वाईट सावट सर्वांच्या मनावर होते. ते तर आजही आहे. पण आज आपल्यापुढे गुप्ता हेलिक्स आणि त्यातील सर्व शाखांचे भवितव्य काय असेल याचा निर्णय घेण्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे.

मला आठवते.. मी, लोहिया आणि मोहन.. तिघेही त्या उमेदवारीच्या काळात खूप कष्ट करायचो.. अत्यंत कष्टाने उभारलेल्या या उद्योगजगताचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ.. मोहन गुप्ता आज आपल्यात नाहीत.

सर्वप्रथम एक मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूयात!

.... धन्यवाद!

ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे. पण मोहन यांच्या विचारानुसार आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करावीच लागणार आहे. आपल्या उद्योगावर आज जवळपास प्रत्यक्षरीत्या बाराशे तर अप्रत्यक्षरीत्या तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. हा प्रचंड मोठा धक्का पचवून आपल्याला हे चक्र असेच चालू ठेवायचे आहे. आणि ही मोहनचीही इच्छा होतीच स्वतःची!

सगळे जण जमले आहेत. मोनाबेटीही आली आहे. आता मी मुख्य मीटिंगला सुरुवात करावी असा प्रस्ताव मांडतो "

कंपनीचे सर्व सी.ए., शासनाचे दोन अधिकारी, एक कंपनी सेक्रेटरी व बहुतांशी लहानमोठे भागधारक आलेले होते. जतीनने नेहमीच्या रिवाजानुसार सूत्रे हातात घेतली.

जतीन हा गुप्ताजींचा भाचा! बहिणीचा मुलगा! त्यालाही असेच बहिणीला दिलेल्या वचनामुळे उद्योगात घेतले होते त्यांनी! आणि गुप्ता हेलिक्सचा कोअर बिझिनेस हार्डंड अ‍ॅन्ड ग्राऊंड हेवी ड्युटी गिअर बॉक्सेसचे वेस्टर्न आणि साउदर्न झोनचे मार्केट एकट्या जतीनकडे होते.

नॉर्मली, मुंबईत झालेल्या मीटिंग्ज तोच अँकर करायचा.

"सर्व सन्माननीय सदस्यांनो.. मला अत्यंत खेद होतो की या मीटिंगला आपले स्फुर्तीस्थान गुप्ता अंकल नाहीत. एखादे जहाज बुडावे अशी आपल्या उद्योगाची अवस्था होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच आज एकत्र यायचे आहे आणि गुप्ता अंकलचे स्वप्न पुर्ण करायचे आहे.

अर्थातच, आजच्या मुख्य अजेंडाकडे वळत आहे. नवीन एम्.डी. नेमण्यासाठी जमलेल्या या सर्व सदस्यांना मी काही माहिती सांगू इच्छितो.

प्रथम लोहिया अंकल! गुप्ता अंकल यांचेच समवयीन, वय पंचावन्न व गुप्ता हेलिक्स व इतर सर्वच उद्योगांमध्ये गुप्ता अंकलंच्या खांद्यास खांदा लावून सुरुवातीपासून असलेले लोहिया अंकल आज २९ % भागधारक आहेत.

अर्देशीर सर! अर्देशीर सर आपल्या सर्वांनाच, इन फॅक्ट गुप्ता अंकल यांनाही सिनियर आहेत. ते ऑन रोल ई.डी. आहेत व दहा टक्के भागधारक! इतर सर्वांकडेच कमीअधिक प्रमाणात भाग आहेत.

मुख्य म्हणजे, गुप्ता अंकल यांचे सर्व ५१ % भाग हे त्यांची कन्या व माझी बहीण मोनालिसा गुप्ता यांच्या नावे नॉमिनेट झालेले आहेत.

विविध कायदेतज्ञांची मते घेऊन मी आता हा प्रस्ताव मांडत आहे.

की सर्वश्री सुबोध गुप्ता यांनी भागधारकांच्या मते नवीन एम. डी. पद कुणाला मिळावे याचा प्रस्ताव मांडावा. त्यावर सोळंकी यांनी अनुमोदन द्यावे.

सुबोध?? प्लीज.. "

सुबोध गुप्ता बोलू लागला.

" अंकल गेले.. काहीच बोलावेसे वाटत नाही.. पण.. शो मस्ट गो ऑन.. हे त्यांचेच वाक्य आहे... मी प्रस्ताव मांडतो की.. लोहिया अंकल यांनी या पदाचा भार स्वीकारावा व... त्यांना इतरांनी अनुमोदन द्यावे.."

"अनुमोदन... "

"... येस.. वी सपोर्ट.."

आता पुन्हा अर्देशीर सर बोलू लागले.

"एकंदर परिस्थिती पाहता, अत्यंत अनुभवी व कार्यक्षम नेतृत्व आपल्याला आज हवे आहे.. मी जरी अनुभवी असलो तरी माझी प्रकृती आता साथ देत नाही.. तेव्हा.. सर्वानुमते आपण..."

"अंकल...?? कॅन... कॅन आय से समथिंग??"

मोनालिसाने या क्षणी तोंड उघडणे अतर्क्य होते.

"येस मोनू???? "

ही काय बोलणार किंवा ही कशी काय मधे बोलली हेच आधी कुणाला समजत नव्हते.

सगळे तो धक्का पचवत असतानाच तिने आणखीन मोठा धक्का दिला सभागृहाला...

"इव्हन.. आय कॅन अ‍ॅक्सेप्ट दॅट पोझिशन.. इफ यू फील अ‍ॅप्रोप्रिएट.. आय मीन... इट इज लॉफुल टू... "

'तुम्हाला योग्य वाटलं' तर हा मोठेपणा देतानाच 'कायद्यानेही तेच योग्य आहे' हा शालजोडीतलाही दिला गेलेला होता.

स्टन्ड! एव्हरीवन वॉज सिंपली स्टन्ड!

'हे' अगदीच होऊ शकणार नाही असे लोहियांना किंवा इतरांना मुळीच वाटत नव्हते. पण ते या सभागृहात, या फोरमवर डायरेक्ट होईल असे मात्र मुळीच वाटत नव्हते. आजवरची सर्व रिलेशन्स लक्षात घेऊन मोना लोहिया आणि अर्देशीर सरांशी आधी बोलेल आणि ते तिला त्यातून बाहेर काढतील व तिला भरपूर फायदाही करून देतील असे वाटत होते सगळ्यांना!

पण! मोनाने प्रकरण पूर्ण तापल्यावरच हा घाव घातला होता.

अर्देशीर खाली बघत होते. सुबोध चक्रावून मोनाकडे! जतीन लोहियांकडे! सर्व मेंबर्स एकमेकांकडे ! आणि लोहिया???

"ओह ऑफ कोर्स बेटा?? ऑफ कोर्स.. हे तूच करायला हवे आहेस.. वुई जस्ट थॉट यू आर अ बिट इनेक्स्पिरिअन्स्ड... सो.. बाय ऑल मीन्स... लेडिज अ‍ॅन्ड जंटलमेन.. अवर न्यू एम्.डी. इज???

मिस मोनालिसा गुप्ता... द मोस्ट कॅपेबल... यंग... एनर्जेटिक लीडरशीप.. शॅल वुई क्लॅप??? "

टाळ्यांचा कडकडाट चाललेला असतानाच युनियन लीडर नाना सावंतचा प्रवेश झाला. तो सरळ एका खुर्चीवर जाऊन बसला. त्याने इतरांना आणि इतरांनीही त्याला अभिवादन केले. खरे तर या मीटिंगला तो असण्याची गरजच नव्हती. पण आलेल्या माणसाला हाकलणार कसे?

नाना - काय झालं काय? टाळ्यांचा कडकडाट??
सुबोध - नवीन एम. डी....
नाना - अभिनंदन लोहियासाहेब... आमचाही सत्कार स्वीकारा...
लोहिया - मै नही नाना... मॅडम हुई है एम. डी.

नाना हबकून त्या 'एवढ्याश्या' पोरीकडे अचंब्याने पाहात होता.

सात वाजता मर्सिडिझमधून मोना पुण्याला निघाली तेव्हा जतीन, सुबोध आणि अर्देशीर लोहियांच्या शेजारी उभे होते.

त्यांच्यातीलच कुणीतरी मिश्कीलपणे म्हणाले..

"आगे आगे देखिये... होता है क्या..."

आणि बरोब्बर तीन दिवसांनी पुण्याच्या पिंपरी एम आय डी सी मधील प्लॅन्टच्या आलिशान केबीनमध्ये मोनालिसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत व अभिवादने स्वीकारत प्रवेश केला तेव्हा...

... गेली दहा वर्षे मोहन गुप्तासाहेबांचा अत्यंत विश्वासू पी.ए. म्हणून वावरणारा गोरे आत आला आणि चकीत नजरेने मोनालिसाकडे पाहात म्हणाला..

"गुड मॉर्निंग मॅडम"

गुलमोहर: 

पौर्णिमा यांची पोस्ट आवडली Happy
इथे गोडमिट्ट प्रतिसाद वाल्यांना " स्वटोसं "बद्दलही माहितच असेल !
स्वतःच लेखक, टोळीतही स्वतःला प्रतिसाद देण्यासाठी बनव्लेले अनेक आयडीज, संघटनेत नुसतीच स्वस्तुति ! Proud
बाकी चालु द्या !!

स्वतःच लेखक, टोळीतही स्वतःला प्रतिसाद देण्यासाठी बनव्लेले अनेक आयडीज, संघटनेत नुसतीच स्वस्तुति

===

हे लै भारी.

लेखकाचा प्रतिसाद कादंबरी पेक्षा जास्त फडतूस,.

बाकी चालु द्या.

मायबोलि सारख्या फोरम चा मूळ उद्देश निवोदित लेखकाना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हाच आहे. ईथे लिखणाचि कयम स्तुतिच व्हावि अस कोणिच म्हणणार नाहि. Positive feedback निश्चितच प्रोत्साहित करतो. पण टिका करतान हे भान ठेवयला हवे कि ति टिका Constructive अहे क उगिच आपल कोणि तरि अपल्याहून अधिक चान्गल लिहितय तर त्याला लाव हुसकवुन, अशा प्रकारचि आहे हे जहरि टिका करणार्या लो़कांनी स्वता एकदा तपासायला हवय.
बेफिकिरजीं च लि़खाण आणी प्रतिक्रिया मी गेले ६ महिने वाचते आहे. त्यांनी बरेच वेगवेगळे विषय प्रभवि पणे मांडले अहेत. सर्वच विषयातल अचुक technical knowledge सर्वच लोकंना असु शकत नाहि. पण कोणि सुधरणा सन्गितलि तर तिचा नीट स्विकार बेफिकिरजी करतात, infact, आभार मानुन करतात, हे मी तरि पहिलेले अहे.

बाकि चालु दे: खरच आहे, public फोरम आहे, कोणि कोणाला परवनगि दिल्याचा आव आणणं हस्यास्पद्च आहे.

आक्षरी: बेफिकिर यांच्या लिखणाचे बरेच चाहते अहेत. silent readers देखिल बरेच अहेत, तुम्हि त्यांच्या लिखणाला फडतुस म्हणावं आणि को़णि ते seriously घ्याव इतपत तुम्हि काहि उजेड पाड्लेला दिसत नाहि. शिवाय तुमचा बहुमुल्य वेळ घालवुन तुम्हि हे वचाच अस red carpet देखिल कोनि घातलेल नहि.तुम्हाल नक्कि कसलि पोट्दुखि आहे? आपल्याल खायच नहि तर उगिच नसवु पण नका.

मायबोलि वरच प्रतिक्रिया war बघुन इतके दिवस प्रतिक्रिया देत नव्हते. पण आज गप्प बसणे counter productive होइल असे वाटले.म्हणुन लिहिले.

बेफिकिर : विषयाचि मांडणि आणि वेग या बाबतित अपल्या कडुन खुप कहि शिकण्या सरखे आहे. क्रुपया
लि़खाण थांबवु नका. तुमच्या सरखि लोक लिहायचि थांबलि तर नुकसान फोरम च आहे.
धन्यवाद,
शिरीन

बेफिकीर सुरुवात मस्त कथानकाची..
बाकी साटोस चे टेंशन नका घेऊ आणी त्याचा परिणाम आपल्या लिखानावर होईल असे होऊ देऊ नका
आपण ओल्ड मंक त्यांच्यामुळेच आटोपती घेतली असे वाटले.. Sad

सर्वांचे त्यांच्या प्रेमळ प्रोत्साहनासाठी व आधारासाठी मनःपुर्वक आभार मानतो.

शिरीन - आपले विशेष आभार कारण आपण मला आलेला वैताग खरच घालवलात!

-'बेफिकीर'!

मला वाटतं की चित्रपट, कादंबरी, टीव्ही मालिका इत्यादी माधमांचा मूळ उद्देश मनोरंजन करणे हा आहे. कितीतरी चित्रपट आणि मालिकांमध्येही अचाट आणि अतर्क्य असतेच ना! तरीही आपण घटकाभरचा विरंगुळा म्हणून असे चित्रपट व मालिका बघतो. तेव्हा प्रत्येक वेळी 'हे खटकलं', 'ते अवास्तव वाटलं', 'प्रत्यक्षात असं होतं तरी का?' असे शेरे मारायला तो सिनेमा बनवणार्‍या, डाररेक्ट करणार्‍या आणि पटकथा लिहिणार्‍या संबंधित व्यक्तींकडे जातो का?? बघतो आणि सोडून देतो.

फार फार तर आपापसांत किंवा माबोवर स्पेशली त्याच कारणांसाठी असलेल्या बाफं वरती जाऊन गप्पा छाटतो (उदा. संथ चालती या मालिका आणि चित्रपट ग्रूप मध्ये अशा टाईपचे असलेले बाफ). मग इथे सुद्धा तोच रूल लागू का नाही करता येत??? बेफिकिर म्हणजे कुणी सर्वज्ञ नव्हेत की त्यांना सर्व विषयांचे नॉलेज असणारच!! त्यापेक्षा मग 'बेफिकिरजी यांचे अ. आणि अ. लिखाण' असा एक बाफ चालू करून त्यावर ही सगळी टिंगल टवाळी/शेरेबाजी/टोमणे वगैरे करूयात. टाईमपास म्हणून! Proud

सर्वच विषयातल अचुक technical knowledge सर्वच लोकंना असु शकत नाहि. >>> शिरीन ला अनुमोदन.

शिवाय प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी. कुणाला नारायण धारप अफलातून लिहितात असं वाटतं तर कुणाला फडतूस, अतर्क्य काहीही लिहितात असं वाटतं. सुशिंच्या कादंबर्‍यांचे नायकही अशीच अफलातून जी वास्तवात शक्यही होणार नाहीत अशी साहसे करतात. थोड्या वेळाचे मनोरंजन म्हणून वाचावे आणि सोडून द्यावे. शिवाय वर लेखकाने स्वतःच 'मोनालिसा तिथपर्यंत पोचणे' हा टप्पा गाठलेला दाखवणे हे टारगेट अपेक्षित होते असे म्हटले आहे, जे कदाचित स्टोरीचे मेन गेट आहे. त्यामुळे अधले मधले डीटेल्स (अवास्तव वाटले तरी) 'लेखकाने घेतलेले लेखन स्वातंत्र्य' या नावाखाली सोडून देता येणार नाही का?

कोणि सुधरणा सन्गितलि तर तिचा नीट स्विकार बेफिकिरजी करतात, infact, आभार मानुन करतात, हे मी तरि पहिलेले अहे. >>> अगदी हेच लिहायला मी ही इथे आले होते.

बेफिकिरजी,

हे काय तुमच्या परवानगीने चाललंय? की तुम्ही अती शहाणे आहात जे पोरा सोरांना 'खेळा पण आवाज करू नका' असे सांगताय! असे मी 'त्या' लोकांना म्हणतो. आपल्याला नाही. म्हणून म्हणालो, या लेखनाचा काही भाग दुरुस्त, संपादीत अथवा रद्द करणे जोवर एखाद्याच्या हातात नाही तोवर त्याने 'बाकी चालुद्या ' असे म्हणण्याची टिमकी गाजवू नये. >>>>

तुमच्या आतापर्यंतच्या संयत प्रतिसादांना सूट होणार नाही असा हा प्रतिसाद आहे. 'चालू दे' असे म्हणणे खरंच इतके ऑफेंडींग आहे का? इथल्या प्रतिसादांचा एक सलग फ्लो चालू होता. तो मध्ये थोडासा खंडीत करून पौर्णिमाने जरा काटकोनात टर्न मारला. काहीतरी वेगळा प्रतिसाद दिला आणि जुना फ्लो कंटीन्यू करून देण्यासाठी 'बाकी चालू दे' असं लिहिलं. मला तरी वाटतं हीच जनरल रीत आहे आणि माबोवरती अन्य कितीतरी बीबींवरती सर्वमान्य पद्धतीने चालूही आहे.

कदाचित गेल्या काही दिवसांपासून बर्‍याच कारणांमुळे तुमच्यावर व्यक्तिशः जी टिकेची झोड उठत आहे, त्यामुळे तुम्ही हा नागाचा फणा काढला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण छोट्या गोष्टींचा (किंवा शब्दांचा) पण इश्यू करून उगीचच विरोधाला विरोध केला जातोय असा एकंदर फील येतोय. पण त्याची गरज नाही असं मला वाटतंय. :पर्सनल मत:

बाकी, मी बेफिकिरजींचे सर्व लेखन वाचलेले नाही. मी त्यांची फॅनही नाही. तसेच अन्य काही बीबींवरती बेफिकिरजी यांनी तथाकथित स्त्रीविषयक विधाने केलीत असे ऐकून आहे, पण प्रत्यक्षात ती वाचलेली नाहीत. एक तटस्थ व्यक्ती म्हणून जे वाटले ते लिहिले.

ज्यांना बेफिकीरजींच लिखाण आवडत नाही ते सवड काढून ते वाचतात का ?आणि वरुन फडतुस वैगरे फालतु शेरे देतात का?हा मला पडलेला गहन प्रश्न आहे...त्यांना इतका जास्त वेळ आहे.?या सगळ्यांनी चार कादंब-या काय एक एक दर्जेदार चारोळी तरी लिहुन दाखवावी. इतके विघ्नसंतोषी लोक मी आजपर्यंत पाहीले नव्हते..अरे साहित्य ही काय इतकं फालतु राजकारण करायची गोष्ट आहे? माझ्यासारखे कित्येक लोक फक्त बेफिकीरांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यासाठी मायबोलीकर झाले आहेत. आणि हे म्हणतात खोटे इमेल आडी.....बेफिकीरजींच्या सगळ्या सायलेट फॅन्सना मायबोली येण्याच जाहीर आवाहन मी करीत आहे. आणि टिकाकारांनो स्वतः थोडा उजेड पाडा. आणि जे आवडत नाही ते वाचून वेळ वाया घालवू नका. समिक्षा करण्याचा आव आणत असाल तर त्याच्या दर्ज्याचा विचार करा.. कुचकट प्रतिसाद म्हणजे समिक्षा नव्हे...त्यामुळे लेखकाला लिहू द्या वाचकांना वाचू द्या...तुमचा इथं काहीही संबंध नाही...तुम्हाला बेफिकीरांच लेखन आवडत नाही या भावना पोहोचलेल्या आहेत..तुम्हाला घाबरुन त्यांनी लेखन बंद करावं अशी तुमची इच्छा असेल तर तसं व्हायला मायबोली तुमची प्रायव्हेट लिमिटेट कंपनी नाही.

बाकी जे काही चाललय ते चालुद्या म्हणण्याच्या योग्यतेचही नाही...
त्यामुळे ते लगेच थांबवा....

अहं ब्रह्मास्मिंना काही बाबतीत अनुमोदन...प्रश्न बेफिकीरांचे लिखाण आवडण्याचा किंवा न आवडण्याचा नाही तर एकंदरी सभ्यतेचा आहे. बेफिकीरांच लेखन मराठीत आतापर्यंत झालेल्या लेखनात सर्वात खालच्या पातळीच आहे असं एक क्षणासाठी मानलं तरी चालालय ते चुकीच आहे असं मला वाटतं....
आणि बेफिकीरजी,
उगाच यांना उत्तरं देण्यात शक्ती वाया घालवू नका..
ओल्ड मंकचा जो अतर्क्य शेवट फक्त यांना घाबरुन तुम्ही केलात तो तुमच्या बेफिकीरीचा पराभव आहे असं मी समजते. आताही असंच करायच असेल तर तुम्ही तुमच्या वाचकांशी प्रतारणा कराल..आणि त्याच्या विश्वासाला तडा पोहोचेल. मायबोलीवरच्या (चांगल्या किंवा वाईट) प्रतिक्रिया हिच तुमच्या साहित्याची अंतिम पोचपावती नाही.
शामा

माझ्यासारखे कित्येक लोक फक्त बेफिकीरांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यासाठी मायबोलीकर झाले आहेत. >> अनुमोदन आणि मोठठा मोदक..

बेफिकीर,
नमस्कार....
मी ओल्ड मंकच्या शेवटच्या भागावर प्रतिसाद नाही दिला..कारण्...तो वाचत असतानाच तुमच्याशी बोलले...खर तर काय लिहाव हा प्रश्नच होता....शेवट जरा घाईत झाला असच मलाही वाटल्...पण गोड झाला हे ही तितकच खरय...असो.....

तुमच्या आत्तापर्यन्त (कादम्बरी )च्या प्रवासात्...चन्गल्या वाईट प्रतिसादना तुम्हाला समोरे जावे लागले...पण त्यातुनही खुप काही घेण्यासरखे होते/आजही आहे......

तुम्ही तुमच्या लिखाणाचे सातत्य कायम राखत नवीन कादम्बरी सुरु केलीत्......आभार्...हे सगळ्याना(टिकाकाराना)....उत्तर आहे(उत्तर देण्याचे काम)....हे तुमच्या लेखणीने चोख बजावले आहे......म्हणुन लिहीत रहा...खुप बर वाटत तुमच लिखाण वाचुन्.....आनन्द मिळतो......

कोणि सुधरणा सन्गितलि तर तिचा नीट स्विकार बेफिकिरजी करतात, infact, आभार मानुन करतात, हे मी तरि पहिलेले आहे...
...खरय.....
जरास गोड प्रतिसादाबद्दल्-माणुस(मनुष्य जात) म्हणटल की....गोडवा हा हवाच...शेवटी मुळातच असाव लागत......गोड.....

बाळुमामा,सानी....तुम्हाला अनुमोदन.......
नवीन भाग आज वाचणार आहे......

लिहीत रहा....

सावरी

शामा,
खुप छान .....
समिक्षा करण्याचा आव आणत असाल तर त्याच्या दर्ज्याचा विचार करा.. कुचकट प्रतिसाद म्हणजे समिक्षा नव्हे...

सदळे मोदक तुम्हालाच बरका................उकडीचे...

सावरी

सुरेख सुरवात नेहमीप्रमाणेच. लेखन आवडलं. पुर्वी शशिकपूर ची भूमिका असलेला कॉर्पोरेट वरील एक चांगला पिक्चर पाहिला होता. नाव आठवत नाही.पण ही एक चांगली कादंबरी होईल हे निच्शित.

शामा,
<< माझ्यासारखे कित्येक लोक फक्त बेफिकीरांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यासाठी मायबोलीकर झाले आहेत. >> प्रचन्डं अनुमोदन....

बेफिकिरजी, मस्त सुरुवात, कॉरपोरेट लाईफ म्हनजे माझा जिव कि प्राण. पहिला भाग वाचुन कादंबरि खुप भन्नाट होणार ह्याचि पोहोच पावति मिळालि. खुप बारिक वाचल ते तर कळेलच. किति कॅरॅक्टर्स आहेत पहिल्याच भागात, ह्यावरुन बुध्धिबळाचा हा डाव खुपच रंगणार. आता कोण कोणाला कसा शह देणार ह्याचि ऊस्तुकता लागलि आहे.

शामा तुला अनुमोदन, आनि हे खर आहे कि बेफिकिर याना प्रतिसाद देन्या करता लोक सभासद होतात. मि एक silent वाचक आहे. सगल्याना एक विनति आहे क्रुपया प्रतिसाद निट द्या जेनेकरुन वाद उटणार नाहित. अनि जर कोनि चुकिच्या शब्दामधे प्रतिसाद देत असेल तर बकिच्यानि त्यावर प्रतिसाद देउ नयेत.

अरे हो, बेफिकिर तुम्हि खुप छान लिहिता. कलजि नसावि. बेफिकिरजी, मस्त सुरुवात... ओल्ड मंक ...शेवट जरा घाईत झाला ... take the positive things and leave the rest of the comments....Be happy for what you are doing.. if it is making single man happy then its worth to do it so Happy keep writing all the best..

शिरीन तुम्हाला १०० नव्हे तर १०१% अनुमोदन. जे काही मला लिहावेसे वाटत होते त्यातील एक न एक शब्द तुम्ही लिहीला आहे.

माझ्यासारखे कित्येक लोक फक्त बेफिकीरांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यासाठी मायबोलीकर झाले आहेत. >>> शामा हे अगदी खरे निदान मी तरी.

मायबोलीवर नविन दाखल झालेल्या सर्व सभासदांना नम्र विनंती...

जर तुम्ही केवळ बेफिकीर ह्यांच्या कथा वाचून इथे सभासद झाला असाल तर आनंदाची गोष्ट आहे... पण त्याच बरोबर असेही सांगावेसे वाटते आहे की मायबोली वर ह्या कादंबर्‍यांच्या बरोबरच प्रचंड साहित्य गेल्या १४ वर्षात निर्माण झाले आहे.. त्यातले काहीही न वाचता, नुसती टिका न करता काहीतरी लिहून दाखवा असे दुसर्‍यांना म्हणताना तुम्ही किती वाचन केले आहेत त्याचा विचार करा... आणि जर वाचले असेल तरी सुद्धा असे लिहिताना विचार कराच. कारण ह्याच भाषेत उलटा प्रश्न तुम्हालाही येऊ शकतो. थोडक्यात काय तर समोरच्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात हे ही मनात लक्षात ठेवा.

आता प्रश्न ह्या कथेमध्ये सुरवातीला जे काही पौर्णिमाने लिहिले आहे त्या संर्दभात... मोठे मोठे लेखक सुद्धा आपली कथा, कादंबरी वाचकांपर्यंत योग्य रित्या पोहोचावी म्हणून प्रचंड कष्ट घेऊन सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे मांडलेल्या आहेत ना ह्याची खात्री केल्या शिवाय पुढे जात नाहीत... समजा एखाद्याने, त्या गोष्टीतील सखोल ज्ञान असताना, योग्य काय आहे हे मांडल्यावर त्रागा करण्यासारखे त्यात काहीही नाहीये.. राहिला प्रश्न 'बाकी चालू द्या'चा तर तो चालू असलेल्या प्रतिसादांच्या प्रवाहात खंड पाडल्यावर तो प्रवाह पुन्हा पूर्ववत व्हावा ह्या हेतूनेच लिहिलेला आहे.

ओल्ड माँक... संपल्यापासुन दुसरा कुठलाही पेग घ्यावस वाटतच नाहिए....I mean दुसरा लेख वाचावं अस वाटत नाहिए....पण शेवटी बेफिकीर रावांच लेखन miss करुच शकत नही ना!!..नेहमीसारखच झकास सुरुवात्!!...आगे आगे देखते है होता है क्या!!..

माझी बेफिजीन्शी ओळख त्यांनी माझ्या गझलांवर दिलेल्या प्रतिसादांपुरतीच आहे
पण इतर ठिकाणीही त्यांची प्रतिमा तशीच आहे हे माहीत नव्हते.....................
मी उगाचच त्याना एक गुणी साहित्यिक समजायचो( समज गैर का असेना पण समजायचो........)
ते इतके पक्के बंडलबाज असतील हे माहीत नव्हते

पहीला भाग missing असल्याने कांदबरी वाचली नव्हती..
धन्यावाद..
बेफिकीरजीना नम्र विनंती की त्यानी जुने लिखाण परत मायबोलीवर आणावे.. नवीन वाचकान त्याचा लाभ घेता येईल.

Pages