मित्रहो,
मी बाळ श्रीरंग घैसास.४७ वर्षे वयाचा एक शिक्षक आहे. शाळेत अर्धवेळ शिक्षकी व एका खाजगी शिकवणी वर्गात शिकवण्याचं काम करतो. मी बी.ए.,बी.एड.आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील्,आई व एक मतिमंद बहीण आहे.वडील भिक्षुकी करायचे व त्यांचेपश्चात परंपरेने मी ही भिक्षुकी करतो. आई ,वडील व बहीणीची आबाळ होवू नये म्हणून मी विवाह केला नाही.गेली कित्येक वर्षे माझी आई अंथरुणास खिळून आहे. आईची किडनी काम करत नाही.दोन ते अडिच महिन्यांनी आईस डायलिसिस करावा लागतो.देसाई गाव ते '' कौशल्य'' हॉस्पीटल्,ठाणे आईला नेणे हे दिव्य मला दर दोन -अडिच महिन्याने पार पाडावे लागते.मी यास दिव्य म्हणतोय कारण अँब्युलन्स मिळविणे,आईला त्यात ठेवणे ( आईचे वजन ९०-९२ किलो आहे ),हॉस्पीटलात तिला स्ट्रेचरवर उतरवणे,डायलिसिस साठी लागल्यास रक्त मिळविणे,पुन्हा परत येणे,हे माझ्यासारख्या शरीराने किरकोळ व्यक्तीस फार जिकिरीचे होते.
माझे वडील गुडघेदुखीने सतत आजारी असतात.त्यांचे जेवण व इतर सगळं मलाच करावं लागतं. बहीण मतिमंद असून तिचे वर सतत लक्ष ठेवावे लागते.ती झोपलेलि असताना फक्त तिचा काहीच त्रास नसतो,अन्यथा ती फार जोरजोराने बडबडत असते व अकारण रडू लागते.
जी गोष्ट मला लिहायची नव्हती,ती सुद्धा लिहीतोय्,की ती ऋतुमती असताना तिची सर्व प्रकारची स्व्च्छता मलाच पहावि लागते. असो.
वरील सर्व गोष्टीं मुळे मला बर्याचदा खूप नैराश्य येते.माझ्या शाळेत माझी बरेच जण हेटाळणी करतात्,पैसे अपुरे पडतात.मानसिक ताण असह्य होवून मी २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.पण बहीणीचा निरागस चेहरा,तिची जगण्या ची दुर्दम्य इच्छा शक्ती यामुळे मी दोन ही वेळेस परत आलो.
आत्महत्या करणे हे भेकड पणाचे लक्षण आहे हे जरी खरे असले तरी बर्याचदा मला असे वाटते की माझे कुटुंबिय नसते तर कदाचित मी आत्महत्या करण्यात सफल झालो असतो.
असो. आत्महत्या या विषयावर आपणां सर्वांचे मत जाणून घेणे आवडेल.
बाळकवी, तुम्ही ज्या हिमतीने
बाळकवी, तुम्ही ज्या हिमतीने परिस्थितीशी लढताय त्याचे कौतुक वाटते....कधीतरी असा breakdown होऊ शकतो, त्यात काहीच नवल नाही. तुम्ही तो मांडलात हे खूप चांगलं झालं. आणि माबोकरांनी दिलेले प्रतिसाद वाचल्यावर तर सर्वांचा मनापासून आदर वाटला.
@ मामी....सलाम ! तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवायला मदत करता...hysterectomy चा मुद्दा विशेष पटला. तुमचा दृष्टीकोन वाचून वपु आठवले. त्यांच्या लिखाणातही असा सकारात्मक सूर असतो.
Today give a stranger one of your smile...that might be the only sunshine in his life !!!
Hats off to you sir
Hats off to you sir !!!!!!!!
इश्वर तुम्हाला या परिस्थितीशी झगडण्याची शक्ती देवो अणि आत्महत्या नाहीच........ तो यावर उपाय नाही.....
खरं माझी काही बोलायची पात्रता
खरं माझी काही बोलायची पात्रता नाही पण तरीही एक पिंक टाकतेय - कमीतकमी तुमच्या बहिणीसाठी काही समाजसेवी संस्था मदत करू शकते का ते पहिले तर थोडा भार कमी होण्यास मदत होईल असे वाटते...
तुमची किती ओढाताण होत असणार याची कल्पना आहे.पण तुमच्या एवढा त्रास घेणारे माणसं कमीच असतात आणि त्यावरूनच तुम्ही मानसिक ताकद दिसून येते.
बाळ्कवी, मामी च्या
बाळ्कवी, मामी च्या प्रतिक्रियेशी सहमत आहे ,तुम्हाला पण चांगले दिवस येओ हिच देवाला प्रार्थना.
तुमच्या भावना समजू शकतो पण
तुमच्या भावना समजू शकतो पण तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबीयांची काय सोय?
तेंव्हा आहे तसेच चालुद्या कधीना कधी यातून नैसर्गिक रीतीने तुमची सुटका होईलच आणि त्या वेळी तुम्हाला आत्महत्या
करावीशीही वाटणार नाही पण त्या उलट कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटेल !!!
शक्य असेल तर डायलिसिससाठी काही charitable trusts कडून आर्थिक मदत मिळते का ते पहावे !! बऱ्याचशा कंपन्या अशी मदत tax free असल्यामुळे करण्यासाठी तयार असतात !!! काही हॉस्पिटल्स मध्ये अश्या कारणास्तव वेगळा विभाग असतो
किंबहुना तुमचे कष्ट अश्या परिस्थितीत सापडलेल्या इतरांना प्रेरणा देतील !!!
बाळकवी तुम्हाला
बाळकवी तुम्हाला सलाम!!!
स्वःताच्या ईच्छा, स्वप्न मारुन अस जगण आणी जगत रहाण ह्याला खूप बळ, त्यागवॄत्ती लागते. मला रडु आल तुमच जीवन वाचुन. तुम्हाला शुभेच्छा. (तुम्ही रोज वा जमेल तेव्हा स्वःतासाठी स्वःताला वाटेल/ आवडेल अस काहीतरी नक्की करत जा त्याने तुम्हाला रीलॅक्स आणी रीफ्रेश वाटेल)
माझाही एक जवळचा मित्र तो
माझाही एक जवळचा मित्र तो आत्महत्या करण्यापुर्वी मला महिना अगोदर भेटला, तासभर बसुन बोललो आम्ही,शेवटी त्यांन कायमच घर सोडुन (भावी पत्नीच्या घरी,त्यांच्या मर्जी/आग्रहानुसार) जाण्याविषयी मला सल्ला विचारला, मी हे चुकीच आहे अस सांगीतल,(घरच्यांनी तर पुर्ण विरोध केला) पण मला अस काही करेल हे स्वप्नात देखील वाटल नव्हतं.
बाळकवी, तुम्ही धन्य आहात.
बाळकवी,
तुम्ही धन्य आहात. समाजाच्या अनेक संपृक्त समस्यांचे तुम्ही समर्थपणे समाधान करत आहात.
मला तुम्ही करत असलेले काम खूप मोलाचे वाटते. माझ्या त्याकरता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आईचे वजन अतिरिक्त स्थूलतेमुळे आलेले असावे असे दिसते.
तुम्ही तिला हे पटवून देऊन स्थूलता कमी करण्याकरता मानसिकदृष्ट्या तयार करू शकलात,
तर आहारनियमनाद्वारे एखाद-दोन महिन्यांत तिचे वजन ६० किलोपर्यंत कमी करणे संभव आहे.
ते जर थायराईडमुळे असेल तर इथे मायबोलीवरच नानबा यांचा एक लेख आहे तो अवश्य वाचावा.
वोघार्ट हॉस्पिटलला जठरबंधनाचे एक लहानसे ऑपरेशन करूनही स्थौल्य नाहीसे करतात.
या संभावनांचा विचार आणि अंमल करून आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करा.
मायबोलीवरील आम्हा सर्वांचा आपणास नैतिक पाठिंबा आहे आणि शुभेच्छाही आहेत!
आई आता सिनियर सिटिझन असणार...
आई आता सिनियर सिटिझन असणार... सिनियर सिटिझन साठी प्रि एक्झिस्टिंग कवर करणार्या म्हणजे पॉलिसीच्या आधीपासुन जरी आजार असेल तरी क्लेम मिळेल , अशा पॉलिसी आहेत. स्टार हेल्थ, ओरिएन्टल इन्शुरन्स येथे चौकशी करावी... पहिला एखादा वर्ष क्लेम नाही मिळणार कदाचित, पण नंतर मात्र रेगुलरली मिळू शकेल.. कॅशलेसचाही फायदा मिळू शकेल... खास त्यांच्यासाठी अशी एखादी पॉलिसी घेऊन ठेवा.. तुमचा आर्थिक भार कमी होईल.
Pages