Submitted by सुरेखा कुलकर्णी on 19 October, 2010 - 01:21
एकदा किनई फारच गंमत झाली
ढगांची आई गावाला गेली,
शाळेला छान सुट्टी मिळाली
ढगांना साय्रा मोकळिक झाली,
आकाशात सारे ढग झाले गोळा
बिजलीताईला म्हटले ये खेळायला,
बिजलीताई आली नाचत नाचत
ढगांनी फेर धरला हसत हसत,
ढग लागले सारे गडगडायला
बिजलीताई लागली कडकडायला,
साय्रांचा गोंगाट ऐकुन रागावले वारे
त्यांच्यावर केले त्याने सोट्यांचे मारे,
घाबरून सारे ढग लागले रडू
अंगणात मग पाऊस लागला पडू,
बिजलीताई म्हणाली रडुनका असे
वाय्राचे नाव आपण आईला सांगु कसे,
आईचे नाव ऐकून ढग लागले हसू
आकाशात पिवळे पिवळे ऊन लागले दिसू,
ढग सारे हसले सप्तरंगात
सप्तरंगी इन्द्रधनुष्य उमटले आकाशात.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खुप छान कविता
खुप छान कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुई, वर्षा प्रतिसाद
जुई, वर्षा प्रतिसाद मिळाल्यामुळे खुप छान
वाटलं. धन्यवाद.
छान. सार्या saaRyaa असे
छान.
सार्या saaRyaa असे लिहावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा खुपच छान ! मस्त
अरे वा खुपच छान ! मस्त मज्ज्जा आली वाचताना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे.
छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे
छान आहे
छाने
छाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान.
खूप छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
वा मस्तच आहे इंद्रधनुष्य
वा मस्तच आहे इंद्रधनुष्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)