Submitted by रेव्यु on 14 October, 2010 - 05:56
मैना खेरचे बडबड गीत !!!
आज मेली मैना खेर
मुलांनी धरला फेर
अर्धी शाळा अर्धी सुट्टी
होती ती तर म्हातारी बुट्टी
अर्धा डबा खाल्ला
अर्धा डबा सांडला
चिमणीच्या दातांनी तोड पेरू
सगळी मजा दोघांनी करू
गळके हौद , चुकार नौकर
आजचा दिवस तरी विसर
कोण कुठला साहेब आला
इंग्रजीचा ताप डोक्याला दिला
मराठीचा जर तास असतो
गाण्याचाच मग का नसतो
इतिहासात होती ही मैना ?
भूगोलात तर शोधून सापडे ना
शास्त्राच्या बाई कावल्या का
पुस्तकात शोधून दमल्या का
छान ,छान चित्रे काढू या
उंच झोके घेऊ या
मैना खेर रोज मरो
शाळेतून सुटका देव करो
गुलमोहर:
शेअर करा