Submitted by जो_एस on 14 May, 2008 - 03:43
भुलून गंधाला त्यांच्या, सारेच असतात जवळ जात
काटे घेतात रक्त शोषून नि गुलाब लाल होतात
चंद्र चमकतो अंधारात, चोरून सूर्याचा प्रकाश
कातडे ओढून का कुठे गाढवांचे वाघ होतात?
भारतातले सामान्य लोक, म्हणे जास्त अन्न खातात
यालाच तर सारे चोराच्या, उलट्या बोंबा म्हणतात
जग हे ऐंशी टक्के सारे, बुडते रोज अंधारात
विसां साठीच फक्त ते सारे दिवे उजळून निघतात
हिशोब कशाचा तो आता, मी फारसा ठेवत नाही
मने मोडून पडताच सारे अंक विसरून जातात
इथे बळी तो कान पिळी, इतरांस कोणी नसे वाली
देवा कृपा करून जरासा देशीलका त्यांना हात
सुधीर
गुलमोहर:
शेअर करा
सुधीर, काही
सुधीर,
काही काही कल्पना छान आहेत पण कुठले वॄत्त आहे? मला लय लागत नाहीये
हा मा.बु.दो.स का?
गझलियत कमी पडतीय असे वाटतेय ह्यात...
अर्थात हे आपले माझे मत...
चु.भु.दे.घे.
visit http://milindchhatre.blogspot.com
सुधीर, कल्प
सुधीर,
कल्पना चांगल्या आहेत. बहुधा गजलचे व्याकरणही ठीक असावे (जाणकार बोलतीलच). मात्र गाण्यासारखं म्हणता येत नाही, तरी कवितेसारखं लयीत वाचता येईल.
-सतीश.
गांभिर्या
गांभिर्याने विचार मांडले आहेत. पण लय जुळ्त नाहीये. बाकी आवडले.
नरेन्द्र