श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ३३

Submitted by बेफ़िकीर on 16 September, 2010 - 03:45

अनुच्या मावसबहिणीच्या लग्नाचे रिसेप्शन झाले आणि अनु आणि महेशला मावशीने आपल्या आलिशान बंगल्यात त्या दिवशी राहायचा आग्रह केला. श्री घरी निघून आला. ते दोघे मात्र राहिले. अनुवर तिच्या मावशीचे विशेष प्रेम होते व आजच स्वतःच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी निदान अनुच्या अस्तित्वाने तरी भरून निघेल अशा आशेने मावशीने त्या दोघांना तिथेच राहायला सांगीतले.

झोपाझोप झाली तेव्हा या दोघांसाठी असलेल्या खास खोलीत अनु आपला शृंगार उतरवत होती. महेश तिच्याकडे आसूसलेल्या नजरेने पाहात होता. कधी एकदा ही आवरतीय आणि आपल्या जवळ येतीय असे त्याला झाले होते. त्याचे टक लावून बघणे व्यवस्थित जाणवलेले असल्यामुळे अनु मुद्दाम मिश्कीलपणे आरशात पाहात हळू हळू आवरत होती.

शेवटी अनावर झाल्याने महेशने तिला जवळ खेचले आणि हसत हसत अनुने स्वतःचे समर्पण करायला सुरुवात केली.

एवढ्या मोठ्या बंगल्यातील ही एवढी मोठी बेडरूम! अ‍ॅटॅच्ड बाथरूम! एसी रूम! बेडवरची चादरच इतकी मखमली की जणू हनीमून स्वीट बूक केल्यासारखे वाटावे. महेश आज स्वर्गसुख कशाला म्हणतात ते अनुभवत होता. अनुशी एकरूप व्हायची सवय लागल्यापासून नैनाची आठवण पुसट पुसट होत चालली होती. त्यानंतरही कित्येक दिवस मधेच एकदम नैनाची ती खिडकी दिसली की महेशला शॉक बसल्यासारखे वाटायचे. पण हळूहळू त्याचेच मन त्यालाच सांगू लागले होते! 'वेडेपणाच होता की काय तो???'

'नाही नाही' म्हणत महेश स्वतःच्या मनाची खूप दिवस समजूत घालत होता. पण त्याच्या लक्षात आले. एकदा का रात्रीची जेवणे झाली अन बाबा झोपायला निघाले की आपल्याला कधी एकदा अनुला जवळ घेऊ असे होऊन जाते. याचाच अर्थ! नैनावर आपले फक्त शारिरीक प्रेम असणार!!!

किती मजा आहे नाही 'मन' या अदृष्य घटकाची? कधीच समाधानी नसणे, सतत काही ना काही मागण्या करणे आणि काळाप्रमाणे बदलत राहणे हे तीन घटक ही मनाची ओळख!

अनुच्या सहवासाच्या ओढीने आता महेशच्या मनातील नैनाची प्रतिमा अस्पष्ट, धूसर व्हायला लागली होती. सच्च्या प्रेमिकांच्या जगात या अपराधाला कधीच माफी मिळाली नसती. पण ते जग स्वतःच शापित असते. ते काय माफी देणार अन काय शिक्षा देणार?

मध्यरात्रीचे दोन वाजले होते. तृप्त झालेले दोन देह अजून जागेच होते. एकमेकांच्या कानात मधुर कूजन करत होते. ही रात्र कधीच संपू नये असे वाटत होते दोघांनाही! महेशच्या कुशीत विसावलेल्या अनुने स्वप्नाळू डोळे करत म्हंटले..

अनु - अशी खोली.. आपल्याला घेता आली तर... किती मजा येईल नाही?
महेश - हं! ... घेऊ.. कधीतरी येईलच घेता...
अनु - कधी?
महेश - तुझ्यासाठी वाट्टेल ते कष्ट करेन मी.. दोन जॉब्ज करेन.. पण आपण असे घर घ्यायचेच..
अनु - हं! .. आत्ता बोलतोयस...
महेश - म्हणजे?
अनु - उद्या घरी गेलास की रात्र होईपर्यंत माझ्याकडे बघणार पण नाहीस..
महेश - म्हणजे??
अनु - पुरुष खूप आपमतलबी असतात...
महेश - काहीही काय? हा काय आपमतलब आहे? हे प्रेम आहे.. प्रेम..
अनु - प्रेम आहे प्रेम... बायको जवळ आहे तोपर्यंत प्रेम.. सकाळ झाली की संपलं प्रेम..
महेश - शप्पथ, ऑफीसमधे असताना एक क्षण नसतो जेव्हा तुझी आठवण येत नाही...
अनु - सांग बरं... काय आठवण येते??
महेश - हेच... आत्ता अनु काय करत असेल..
अनु - आत्ता म्हणजे??
महेश - दहा वाजता... आंघोळ झालेली असेल... अशी मस्त दिसत असेल...
अनु - हं! सगळ्या आठवणी असल्याच... हो तिकडे..

महेश हसू लागला. त्याने तिला अधिक जवळ ओढली.

अनु - ऐक नं...
महेश - हं...
अनु - महेश.. मला ... एका गोष्टीची खूप काळजी वाटते..

पटकन महेशच्या मूडमधे बदल झाला. तिच्या पाठीवरची मिठीची पकड सैल करत तिच्याकडे गंभीरपणे पाहात त्याने विचारले.

महेश - कसली??
अनु - आपलं आयुष्य कसं असेल रे?
महेश - म्हणजे??
अनु - म्हणजे.. आता दोन वर्ष होत आली. तुझा जॉब तोच आहे.. घरही तेच... सगळं तेच..
महेश - ... मग?
अनु - आपण आपल्या संसारात प्रगती नको का करायला??
महेश - प्रगती म्हणजे?
अनु - म्हणजे.. आपण घर घ्यायच्या मागे लागलं पाहिजे, स्वतःचं घर, आपण आता मुलाचा विचार करायला हवा, पैसे गुंतवणे सुरू केले पाहिजे, तुला आणखीन चांगला जॉब करायला पाहिजे, मी जॉब करायला पाहिजे.. कितीतरी गोष्टी आहेत...

महेश - अनु.. हे सगळं आपण करायचंच आहे..
अनु - ... पण कधी?? व्हेन विल वुई बिगिन अवर लाईफ??
महेश - आपोआप सगळं होईल अनु..
अनु - महेश.. आयुष्यात आपोआप काहीही होत नसते..
महेश - तू अशा वेळेस असे विषय काढून अशी निराशाजनक का बोलतेस??

अनु किंचित दूर झाली. उठून बसली. एसीच्या थंड हवेचा झोत उघड्या पाठीवर पडल्याने शहारून रजई घेतली पांघरून आणि अंधारात दिसणार्‍या अंधाराकडे बघत बसली. महेशही उठून बसला आता. त्याला अजून अनुचा मोह सुटत नव्हता. त्याच्या मनातील विचार शरीरसुखापलिकडे आत्ता तरी जाऊ शकत नव्हते. तिचे तोंड आपल्याकडे वळवत त्याने विचारले.

महेश - काय झालं एकदम??
अनु - काही नाही रे.. कधी कधी वाटतं की ...
महेश - ... काय?
अनु - की .. तुला मी आवडेनाशी झाले तर माझं काय होईल??
महेश - यडचाप आहेस... झोप...
अनु - महेश ... थांब... जरा डिस्कस करूयात...

आता खरे तर महेशला वैताग आला. अनु प्राप्त होणार नसेल तर इतक्या उशीरा नुसत्या गप्पा मारायला जागे राहण्यात त्याला काहीही इंटरेस्ट नव्हता. पण तोंडावर वैताग दाखवणे योग्य होणार नव्हते. आत्ताच इतके तुडुंब प्रेम केल्यानंतर लगेच रागवारागवी झाली तर प्रॉब्लेमच झाला असता.

महेश - ... बोल..
अनु - ... आपण काहीतरी प्लॅन करायला हवा...
महेश - .. हो.. मलाही पटतंय..
अनु - महेश ... उद्यापासून आपण फ्लॅट्सच्या जाहिराती बघू...
महेश - .. हं.. मला काय वाटतं अनु.. की.. तूही... जॉब कर..शील .. का?

'कर' हा शब्द महेशने अनुच्या चेहर्‍याकडे पाहात 'करशील' या शब्दात बदलला होता. अनुला राग आलाच नव्हता त्याच्या या प्रस्तावाचा! तिच्या माहेरी झालेल्या संस्कारांचा व माहेरच्या राहणीमानाचा परिणाम म्हणून तिला फक्त वाईट वाटले होते. जॉब करायची इच्छा तिलाही होतीच! पण तो जॉब तिला 'जरूर' म्हणून नको होता, मन रमवण्याचे साधन म्हणून हवा होता. आणि आता लोन घेतले तर हप्ता परवडायचा नाही हे पाहून महेश तिला 'जरूर' म्हणून जॉब करशील का विचारत होता.

अनु - करेन की... आपल्या संसारासाठी जे काय हवे असेल ते करेन...
महेश - तसं नाही गं.. म्हणजे.. मला आणखीन चांगला जॉब मिळेपर्यंत..
अनु - बाबांच्या सुंदरम कंपनीत नाही का घेणार तुला??
महेश - त्याच्यापेक्षा आमचीच कंपनी मोठी आहे..
अनु - पण तिथली स्केल्स चांगली आहेत ना जास्ती??
महेश - नाही.. बिगिनर्ससाठी नाहीत... एक्स्पिरियन्स्ड लोकांना चांगला पगार मिळतो..
अनु - मला वाटतं फ्लॅटच्या जाहिराती पाहण्यापेक्षा तू टाईम्स वाचायला सुरुवात कर... नोकरीच्या अ‍ॅड्स
महेश - हं!
अनु - मी पण वाचायला लागते अ‍ॅड्स.. अ‍ॅप्लाय करायला सुरुवात करूयात... आपलं पण लाईफ आहेच की
महेश - येस्स... उद्याच सुरुवात करू...
अनु - आणि दोघांनाही नोकर्‍या मिळाल्या की सरळ एक फ्लॅट बूक करूयात..
महेश - चालेल... मग कुणाची मदतही लागणार नाही..
अनु - असं नाही म्हणायचं.. पालकांना वाटणारच की? आपल्या मुलाचं बरं व्हावं..
महेश - म्हणजे??
अनु - माझे बाबा अन तुझे बाबा खुषीने जे देतील ते घ्यायचं..
महेश - .. अनु.. माझ्या मनात नेहमी एक विचार येतो..
अनु - ...
महेश - आपण दोघे एकमेकांचे झालो आहोत.. आता.. तुझ्या बाबांकडून आप्ण काही घेणे योग्य नाही..
अनु - असं कसं म्हणतोस?? मी एकुलती एकच आहे ना? त्यांना नाही का वाटणार?
महेश - तेही बरोबर आहे म्हणा... पण...
अनु - हवं तर तुझ्या बाबांकडून काही नको घ्यायला..
महेश - असं कसं?? आपलं एकंच घर आहे...
अनु - .. महेश... एक.. बोलू का??
महेश - ... हं..
अनु - आपण नवीन फ्लॅट घेतला तर... बाबा..
महेश - .... काय... काय बाबा??
अनु - बाबा पण येणार तिथे??

झण्णकन शॉक बसला महेशला! त्या एसीच्या गारठ्यातही त्याला असह्य वाटले क्षणभर!

म्हणजे काय म्हणते ही? म्हणजे आपण नवीन घर, स्वतचे घर घेतले तर... बाबांना न्यायचे नाही तिथे? असे कसे म्हणते ही? आपण बाबांना नाही नेले तर कोण नेणार त्यांना स्वतःबरोबर?? आहे कोण त्यांना?

अनु - रागावलास ना..??
महेश - ... अनु... नीट विचार कर... त्यांना.. न्यायलाच लागेल आपल्याला..
अनु - .....
महेश - ... आता... तू रागवलीस ना??
अनु - ...
महेश - बोल ना??
अनु - ....
महेश - अनु.. असे गप्प राहणार असशील तर काय डिस्कशन होणार आपलं?
अनु - .....
महेश - ... अनु... बोल आधी... आधी इकडे बघ..
अनु - महेश तुला काहीच कसं समजत नाही???
महेश - काय झालं??
अनु - ... 'काय' काय झालं??
महेश - अगं .. बाबा कुठे राहणार मग??
अनु - म्हणजे काय?? वाड्यातली खोली काय सोडणार आहोत का आपण??
महेश - ... वाड्या... अगं पण.. त्यांच्याकडे बघायला नको का??
अनु - हाच... हाच मोठा प्रॉब्लेम आहे..
महेश - ... काय ?? यात काय प्रॉब्लेम आहे??

महेशच्या सैल झलेल्या आलिंगनातून सुटून अनु उभी राहिली. गाऊन अंगावर चढवून ती खिडकीपाशी गेली.. आणि महेश तिच्यापाशी जायला निघणार तेवढ्यात ती बोलू लागली... ती काय बोलते याच्याकडे महेश लक्ष देऊ लागला व बेडवरच बसून राहिला..

अनु - महेश.. लग्न करून मुलगी सासरी येते.. तेव्हा.. लहानपणापासून ज्या अंगणात ती खेळलेली असते, जेथे तिचे लाड झालेले असतात, रुसवे, फुगवे, हट्ट, हसणे, मजा... सगळं सगळं झालेलं असतं... ते सगळं.. त्या सगळ्या आठवणी.. ती सगळी माणसे ती सोडून येते... लग्नानंतर आपल्या आईला सोडून सासरी जाणार्‍या गाडीत बसताना कसे वाटते ते माहीत आहे तुला??? एका मुलाला ते समजणार नाही.. ते एका मुलीलाच समजते.. काय वय असते लग्नाच्या वेळेस?? वीस.. एकवीस... काय समज असते त्या वयात? ठीक आहे.. कायद्याने लग्नाचे वय आहे.. पण.. कसला अनुभव असतो?? पूर्णपणे परक्या वातावरणात एकदम प्रवेश करायचा.. तेही असे नाही की तिथे आपण एखादे महत्वाचे माणूस म्हणून जाणार आहोत... तिथे मुलगी जाते एक सून म्हणून.. जिच्याकडून फक्त आणि फक्त वागण्याच्या अपेक्षा असतात.. ही चहा विचारत नाही, ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत नाही, ही अशीच वागते अन ती तशीच बोलते.. फक्त अपेक्षा! का? तिला समजून घेणारे फक्त एक माणूस असते त्या घरात.. समजून घेणारे म्हणजे?? समजून घेऊ शकणारे... किंवा.. खरे तर ज्याने समजून घ्यायला हवेच असे... ते म्हणजे तिचा नवरा.. आमच्याकडे अशा अशा रीती आहेत... हे हे लोक आमच्या घरात फार महत्वाचे आहेत.. हे सगळे सगळे ती मुलगी जमेल तसे शिकते.. त्या सर्व क्षणी तिला आधार फक्त एकच असतो.. तो म्हणजे तिचा नवरा.. आपला नवरा आपल्यावर प्रचंड प्रेम करतो.. आणि त्याला आपल्याच सुखासाठी झटायचे आहे.. अशी परिस्थिती येणे इतके साधे स्वप्न असते त्या मुलीचे... बाकी काहीही स्वप्न नसते तिचे.. अगदी साधे स्वप्न! ज्याच्यासाठी मी सगळ्यांना सोडून इथे आले अन अत्यंत नवख्या वातावरणात काहीही अनुभव किंवा ज्ञान नसताना अपेक्षांचे ओझे पेलतीय अन कशीबशी वावरतीय.. त्या माणसाने फक्त माझ्या सुखासाठी झटावे असे स्वप्न! यात तिचे काय चुकते?

पण! महेश.. ! माझ्याबाबतीत हे सगळे घडलेच नाही. मला सासू नाही. तुला भाऊ, बहीण कुणी नाही. त्यामुळे सासरी येणे हे जरी क्लेषकारक असले तर प्रत्यक्ष सासरी आल्यावर मला सासरच्या घरातून कोणताच त्रास झाला नाही. बाबा खूप प्रेमळ आहेत. नाही असे नाही. त्यामुळे.. इतर मुलींना सासरी आल्यानंतर होऊ शकतात तसा कोणताही मनस्ताप मला झाला नाही.. पण...

तुमचा वाडा ही एक औरच चीज आहे.. काय वाडा आहे तो?? काय जगावेगळं आहे त्या वाड्यात? का सगळे जण असे एकमेकांवर हक्क असल्यासारखे वागतात?? माझ्या आजीला मारणार्‍या, आईला शिव्या देणार्‍या अन मलाही मारणार्‍या त्या शेजारच्या आजींचे तुम्ही दोघे अजून का एवढे करता? का माझ्याकडूनही तीच अपेक्षा करता?? त्यांनी तुला लहानाचे मोठे केले.. मान्य! पण त्यांना तरी कोण होते तुमच्या दोघांशिवाय? तुझ्या लक्षात का येत नाही की तुला मोठं करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरंगुळा होता महेश.. त्या एकट्या पडलेल्या होत्या.. वाड्यातील प्रत्येकाला वाट्टेल तसे बोलून अन वागवून त्या अप्रिय झालेल्या होत्या.. दुर्दैवाने तुझ्या आई तुझ्यावेळेस गेल्या.. त्या आजींना ही सुवर्णसंधी वाटली.. बाबांना इंप्रेस करून त्यांनी तुला सांभाळले.. कसे सांभाळले ते मला माहीत नाही.. प्रेमाने की कर्तव्य म्हणून की स्वार्थ म्हणून.. पण सांभाळले.. याचे कारण एकच होते... त्यांना त्यांच्या म्हातारपणी एक हक्काचा माणूस हवा होता आधार म्हणून.. तुम्ही दोघेही साध्या स्वभावाचे आहात.. बायकांचे प्लॅनिंग बायकांना बरोब्बर समजते महेश.. त्या पवार आजींनी तुम्हाला भुलवले अन तुम्ही भुललात.. ठीक आहे.. ते माने आजोबा जाऊन सहा महिने झाले तरी आजवर मी तुझ्याशी एका शब्दाने त्या विषयावर बोलले नाही... पण आज बोलते... पवार आजींनी तुझ्यासाठी खूप केले ना?? मग माने आजोबांनी नेमके काय केलेले होते तुझ्यासाठी?? .. ते वाट्टेल तेव्हा आले तरी मी त्यांना चहा करून द्यायचा ही अपेक्षा कशासाठी?? गेलेला माणूस आहे.. खरे तर गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये.. पण.. मी विचारते की का ती अपेक्षा होती माझ्याकडून?? तुझ्या का लक्षात येत नाही की वाड्यातील माणसांबद्दलच्या तुमच्या दोघांच्या मनात असलेल्या भावना व माझ्या मनातील भावना मुळातच भिन्न असणार.. मी माझा संसार उभा करायला बघणार.. ती माझी सर्वात मोठी प्रायॉरिटी असणार...

समीरदादांचेच बघ.. अगदी तुझ्यासाठी सर्व काही केले त्यांनी लहानपणापासून.. पण.. कुठल्यातरी सभ्य वस्तीत तू पाहिलं आहेस की वाट्टेल तेव्हा दारू पिऊन दुसर्‍याच्या घरी जातात??? अजूनही कित्येकदा तुम्ही दोघे फिरायला वगैरे जाता.. तुला त्यात अपमान वाटत नाही?? जो माणूस मला फालतू छोकरी म्हणाला त्याच्याचबरोबर तू पुन्हा फिरायला जातोस यात तुला काहीच वावगे वाटत नाही?? मग उद्या वाड्यातला लहान मुलगाही मला फालतू छोकरी म्हणेल.. श्शी! छोकरी हा काय शब्द आहे?? इतके घाणेरडे बोलूनही तू पुन्हा त्यांना मान देऊन राहतोस??

त्यांच्या आई! प्रमिला काकू! ही बाई काय माझी सासू आहे? जरा हे कर गं! जरा ते आण गं! जरा यांना चहा टाक गं! का? मी का करायचं? एवढा मोठा घोडा झाला तुमचा दारुडा मुलगा.. सून का नाही आणत हक्काची घरात? मी का म्हणून तालावर नाचायचं?

महेश.. आजवर मी अशी बोलले नव्हते... पण हद्द झाली काल.. काल हद्द झाली म्हणून आज मुद्दाम हा विषय वाढवतीय मी.. त्या किरणदादांची बायको मुलाला घेऊन आली.. एवढा दिड वर्षाचा मुलगा... पण त्याने तिथेच शू केली... ही गेली त्याला घाईघाईत उचलून घरी... साफसफाई कोण करणार?? ते माझं काम आहे?? वाड्यातले कुणीही येते अन काहीही करते... हे काय घर म्हणायचे?? तरी मी सगळे साफ केले.. आता वाटते तिला हाक मारून बोलवायला हवे होते.. तूच सांग महेश... आपला संसार राहिला बाजूला... अन मी या सगळ्यांचे पडेल ते काम करायचे का??

... मगाचच्या विषयावर येण्यासाठी मी ही सगळी पार्श्वभूमी सांगीतली महेश... आपण फ्लॅट घेतलाच तर ... बाबांनी तिथे येऊ नये असे खरे तर मी कधीच म्हणाले नसते... माझ्यावर तसे संस्कारच नाहीत.. पण.. बाबांचा सगळा जीव लागणार वाड्यात.. ते सारखे तिथे जाणार.. तिथले लोक इथे येणार... म्हणजे परिस्थिती तीच.. पुन्हा बाबा मला सांगणार.. अनुराधा..वाड्यात चाललोय... तो काल आणलेला चिवडा दे गं जरा डब्यात.. मावशींना घेऊन जातो...

तूच विचार कर... बाबांचे मन तरी लागेल का वाड्याबाहेर?? त्यापेक्षा.. ते तिथेच राहिले तर आपण आठवड्यातून तीन वेळा त्यांना भेटायला जात जाऊ.. अर्थात... या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या आहेत... फ्लॅट अजून बूकही केलेला नाहीये आपण... पण... महेश.. मी नोकरी करायला लागले तर.. घरातले सगळे कोण करणार? मला कसं झेपेल ते?? म्हणून म्हणते.. आपापले आई वडील करतील तेवढी आर्थिक मदत घ्यायला हवी.. अरे आपण नाही का करणार आपल्या मुलांचं सगळं?? तसंच तेही करतायत.. त्यात शरम वाटायचे कारणच नाही..

अडीच वाजलेले होते. टक्क जागे होते दोघेही! अनुला खिडकीत उभे राहून इतके बोलल्यानंतर मागे बेडवर असलेल्या महेशकडून काहीतरी रिझनेबल रिप्लाय अपेक्षित होता. पण महेश आडवा होऊन उशीला येणारा अनुच्या केसांचा सुगंध घेण्यात रममाण झालेला होता. शेवटी कर्तव्य म्हणून तो म्हणाला....

"अ‍ॅज यू विश अनु... ये इकडे..."

शांत झालेली अनुराधा मंद हासत महेशच्या जवळ आली.

अनु - ... अंहं.. आता नाही.. झोप आता...
महेश - .... झोप? आता कसली येतीय झोप?
अनु - .. अरे??... सकाळी सात वाजता गुड नाईट म्हणायचंय का एकमेकांना??

महेशच्या आवेगी हालचालींमुळे घड्याळ्यातील वेळेला शुन्य किंमत देऊन अनु त्याच्या बाहुपाशात विलीन झाली. महेशला विजयाचा आनंद मिळाला होता... इतक्या रागावलेल्या बायकोला इतक्या उशीराही आपण समाधानकारक उत्तर दिले अन त्याचे बक्षीस म्हणून आता ती आपल्यावर प्रेम उधळणार....

... मात्र! विजय अनुचा झाला होता...

"अ‍ॅज यू विश अनु...."

या उत्तरातून महेश श्रीनिवास पेंढारकर यांनी स्वत्व गमावलेले होते... दास्ताने वाड्याचे, स्वतःच्या बापाचे सर्व उपकार एका कमनीय बांध्याच्या आकर्षणापुढे तुच्छ ठरलेले होते...

आता.... दिलेला शब्द पाळायचा यासाठी महेशला बाबांना कधीतरी कन्व्हिन्स करावे लागणार होते... की...

"नवीन घरात तुम्ही नका येऊ बाबा... तुम्ही इथेच राहा.."

आणि याची कसलीही कल्पना नसलेला महेश अनुवर चुंबनांची अविरत बरसात करण्यात गढलेला होता.

==============================================

"कळकट्ट झालंय नुसतं सगळं... "

अनुचा हा स्त्रीसुलभ उद्गार ऐकून महेश हासला.

"हसतोस काय?? काही वाटत नाही का रे तुला?? "

अजूनच हासला महेश! बाबा शेगावला गेले होते सकाळी! मधू काका अन पमा काकू बरोबर! परवा संध्याकाळी येणार होते. शेगाव, पैठण, शनी शिंगणापूर आणि शिर्डी एकदमच करून!

महेशला स्वतःची ट्रीप आठवली. आपण ट्रीपच्या वर्गणीसाठी बाबांशी भांडलो, वाद घातले, अबोला धरला... आणि बाबांनी आपल्या नकळत शाळेत येऊन वर्गणी भरली सुद्धा होती... नाशिक, शिर्डी आणि शनी शिंगणापूर! व्वा! काय मस्त ट्रीप झाली होती ती!

पण हा एकांत मिळाल्यावर त्याने सरळ रजाच काढली. आता कंपनीतही तो बर्‍यापैकी स्थिरावल्यामुळे रजा वगैरे मिळायला काही फारसा प्रॉब्लेम येत नव्हता. गुरुवारी सुट्टी! बाबा मंगळवारी सकाळीच गेलेले.. गुरुवारी रात्री येणार! म्हणजे दोनच दिवसांची रजा काढायला लागली.

आणि आत्ता तो सकाळी पावणे आठला उठून अनुच्या हालचाली निरखत निरखत चहा घेत होता. तिला त्याच्या मनात असलेल्या विचारांची काहीही कल्पना नसल्यामुळे ती आणखीनच चिडून वैतागत होती. आणि आंघोळी व्हायच्या आधीच ती चिडल्यामुळे इतकी मादक दिसत होती की समोर ठेवलेल्यातला उरलेला अर्धा चहा मगाशीच गार झाला हे महेश विसरूनच गेला होता. .... आठवले..

"ए... चहा गरम कर ना.. गार झाला.."

"हीच कामं करते मी सारखी... चहा चहा चहा"

'चहा' वरून महेशला पुन्हा माने आजोबांची आठवण झाली. म्हणायचे म्हणून म्हणाला होता मधू काका! 'यापुढे वाड्यात कुणी पुन्हा चहा केला तर वाडा पेटवून देईन'! असं कोण चहाशिवाय राहू शकतं का? काय एकेक माणसं काळाच्या खोल दरीत दिसेनाशी होतात नाही? मानेकाका होते तेव्हा वाडा म्हणजे हॅपनिंग प्लेस वाटायची! आता सगळं वातावरण नुसतं मृतवत वाटतं! इतक्या दिवसांनंतरही!

पण अनुने पुन्हा चहा गरम करून दिलाच!

ती आंघोळीला निघाली अन खोलीचे दार बंद करून आत वळली तेवढ्यात महेशने तिला आपल्याकडे ओढले..

अनु - सोड.. स्सोड... दुसरं काही सुचतंच नाही..

महेश हसतच होता.

अनु - घाणेरडा..
महेश - त्यात काय घाणेरडा??
अनु - आंघोळ तरी झालीय का?
महेश - चल... आज आपण दास्ताने वाड्याचा गोवा करू... तुम और मै साथमे नहायेंगे..
अनु - गोवा कसला करतोयस?? सोड.. ती मोनी येईल आत्ता..
महेश - मोनी आयेगी तो वापस जायेगी..
अनु - वा वा वा! म्हणे वापस जायेगी... अन मग दिवसभर अनु राबेंगी...

अनुचं ते भ्रष्ट हिंदी ऐकून महेश त्याही परिस्थितीत हासला. ते पाहून तीही हासली अन स्थिरावली.

महेश - सव्वीसच्या सव्वीस अप्सरांच्या मार्गदर्शनाखाली इंद्राने तुला खास बनवलंय..
अनु - चहा पुन्हा पुन्हा गरम करून द्यायला..
महेश - तुला बनवताना केशर, मध आणि चंदन यांचा मुबलक प्रमाणात वापर झाला स्वर्गात..
अनु - अन मग दास्ताने वाड्यात पाठवलं मला..
महेश - तुला बनवताना मेनकेला हेवा वाटला होता...
अनु - मी एकाच खोलीत राहणार म्हणून...
महेश - अप्सरा जळफळाट होऊन नृत्य करू लागली...
अनु - सगळ्यांच्या तालावर कसे नाचायचे हे मी शिकावे म्हणून...
महेश - रंभा हे लावण्य पाहून स्वतःच मोहीत झाली व नंतर मुर्च्छित!
अनु - इतक्या सुंदर बायकोचा असला नवरा? हे पाहून...
महेश - तिलोत्तमा मत्सराने डोळे विस्फारू लागली...
अनु - इतकं 'श्रीमंत' सासर मिळणार म्हणून..
महेश - कुबेराने त्या दिवशी तिन्ही लोकांना कॉकटेल डिनर दिले..
अनु - पेंढारकरांचे नशीब उघडले म्हणून..
महेश - नारद मुनी विष्णूला तुझ्या सौंदर्याचे वर्णन ऐकवू लागले..
अनु - लक्ष्मी माहेरी गेलीवती का?

महेशच्या हातातून सुटून अनु पळाली तसा महेशही हसत हसत धावला. किती धावणार? बारा बाय चवदाची खोली! पुन्हा अडकले एकमेकांच्या मिठीत!

अनु - आज काय हॉलिडे मूड का?
महेश - रोजच असतो.. पोटापाण्यासाठी जावं लागतं बाहेर एवढंच...
अनु - आहाहाहाहा! रोजच असतो.. सोड... मला आवरायचंय.. मग बसशील जेवायला वाढ म्हणून..
महेश - आज हम खाना नही खायेंगे..
अनु - आज हे राष्ट्रभाषेत का प्रेम चाललंय पण म्हणे??
महेश - हिंदी है हम वतन है.. हिंदोसता हमारा..
अनु - असुदेत.. माझं वतन दास्ताने वाडाय..
महेश - पास बैठो तबीयत बहल जायेगी... मौतभी आगयी हो तो टल जायेगी...

दार वाजले.

अनु - मौत भी आगयी हो तो टल जायेगी ठीक आहे... मोनी आगयी हो तो क्या होगा?

नाराज होत महेशने दार उघडले. मागे अनु खोडकरपणे हसत उभी होती.

महेश - कोण पाहिजे??

दारात एक मध्यमवयीन व कामगाराप्रमाणे दिसणारा माणूस उभा होता.

"ताईंनी यायला सांगीतलवतं... पेंटर आहे मी.."

अनु - अरे हां हां! या या! महेश... मी म्हंटलं आपण बाबांना सरप्राईझ देऊ... हे आपली खोली रंगवणार आहेत... फक्त तीन हजारात.. मज्जा येईल की नाही??

प्रश्न तीन हजारांचा नव्हता. प्रश्न अनुने परस्पर काहीतरी डिसीजन घेतला याचाही नव्हता. प्रश्न होता तो तीन दिवस मस्त हनीमून झाला असता तर मध्येच हा पेंटर घुसला घरात! आता कसला डोंबल्याचा हनीमून!

सगळा रसच संपल्याप्रमाणे, पण पेंटरला 'या' असे म्हणत महेश पुन्हा खुर्चीवर बसला एवढेसे तोंड करून! अनुला महेशच्या मनातले दु:ख समजले. ती मिश्कीलपणे गुणगुणू लागली.

फासलें ऐसे भी होंगे.. ये कभी सोचा न था...
सामने बैठा था मेरे... और वो मेरा न था...

महेशने तिच्याकडे पाहून रागारागात हातातला पेपर आपटला अन 'आलोच मी' असे म्हणून तो घराबाहेर निघून जाताना अनु खळखळून हसत होती. आणि पेंटरबरोबर आलेले आणखीन दोन लोक घरात येत होते.

तासाभराने महेश परत आला तेव्हा माळ्यावरचे सर्व सामान गॅलरीत काढून ठेवलेले दिसले. बरेच दिवसांनी तोही ते पाहात होता. त्यामुळे पुन्हा जुने फोटो वगैरे चाळत बसला. अनुने 'तो काहीच मदत करत नाहीये' यावर नाराजी प्रकट केल्यावर मग तो घरात पाहिजे ती सगळी मदत करू लागला. तुफान वेगात आवराआवरी चाललेली होती. एवढ्याश्या खोलीत इतके सामान आहे हा साक्षात्कार अनुच काय, महेशलाही होत होता. मात्र! एक सूक्ष्म बाब महेशच्या अजिबात ध्यानात आलेली नव्हती. ती बाब सूक्ष्म असली तरी महत्वाची होती.

त्य दिवशी संध्याकाळी, सगळे सामान इतस्ततः विखुरलेले, खोलीचा आधीचा जो काय उरला सुरला रंग होता तो घासून काढलेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पेंटर चहा वगैरे निघून गेले तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे महेशचे अनुकडे लक्षच नव्हते. नुसता वैतागला होता तो. 'हे रंगाचं आजच काढायला हवं होतं का' हा प्रश्न त्याने दिवसभरात किमान पाच वेळा विचारला होता व पाचही वेळा 'बाबांना सरप्राईझ द्यायचं होतं' हेच उत्तर मिळालं होतं! एकाचवेळेस 'अनु बाबांच्या सुखाचा इतका विचार करते' याचा त्याला आनंद होत होता तर 'चांगला हनीमून वाया घालवला' याचे दु:खही!

अनु - जेवायला बाहेर जाऊयात ना?
महेश - मग आता पर्याय काय आहे??
अनु - कुठे जायचं??
महेश - अभिषेकला जाऊ..
अनु - ड्रिन्क्स घेणारेस??
महेश - आता इतका वैतागलो आहे म्हंटल्यावर..
अनु - मी नाही का वैतागले??
महेश - तूही घे ना मग??
अनु - 'तूही घे ना' म्हणे! वाढलंय तुझं हल्ली..परवा बाबा विचारत होते..
महेश - काय?
अनु - महेश ड्रिन्क्स घेतो की काय? मधे मधे वाटतं तसं...
महेश - मग काय म्हणालीस??
अनु - मी म्हंटलं मला नाही माहीत..
महेश - बर चला.. मी खाली होतो.. तू ये लवकर..

अभिषेकला जेवून आले अन खोलीच्या पसार्‍याकडे पाहात जमेल तितकी जागा करून झोपले. अजूनही ती सूक्ष्म बाब महेशला जाणवलेली नव्हती.

दुसरा दिवस मात्र बराचसा सुसह्य वाटला. त्याचे कारण 'होता त्यापेक्षा जास्त पसारा होऊच शकत नव्हता' हे एक आणि 'जो काही पसारा होता तो आवरला जात होता' हे दुसरे! क्रीम कलरच्या रंगांचे थर बसायला लागले तसे आजवर जुनाट वाटणारी खोली झळकायला लागली. मधेच कुणीतरी भंगारवाला आला त्याला अनुने बर्‍याच जुन्या, कामातून गेलेल्या लोखंडी वस्तू, काही कपडे वगैरे दिले. त्याचे त्याने काही फुटकळ पैसे दिले त्याचाही अनुला अन महेशला आनंदच झाला! 'च्यायला, या वस्तूंचे पैसे मिळाले??'! महेशच्या मनात विचार येत होता. गंजलेलं उलथ्न, फुटके पातेले वगैरे असल्या वस्तू होत्या त्या!

त्या दिवशी मात्र घराला जरा बरी कळा आली आणि ऑइलबाउन्डच्या कोर्‍या करकरीत वासामधे हनीमूनची एक झलक त्या खोलीला पाहायला मिळाली.

तिसरा दिवस उजाडला. पेंटर्सचे काम झालेलेच होते काल! आज ते येऊन पैसे घेऊन जाणार होते आणि घरात उरलेली आवरा आवरी करायची होती. रात्री बाबा यायच्या आत कसं सगळं लख्ख दिसायला पाहिजे होतं!

आणि... दिसलंही लख्ख! काय खोली दिसत होती! एरवी येऊन काहीतरी भुरट्या चौकश्या करून जाणारे वाड्यातले लोक आज तोंडात बोटे घालून सौ. अनुराधा पेंढारकर यांचा झपाटा पाहात होते. महेशने संध्याकाळी सहा वाजता खोलीवरून एक शेवटची नजर फिरवली तेव्हा अनु महेशच्या फिरणार्‍या नजरेकडे आशेने पाहात होती. त्याने एक दिलदार कॉम्प्लिमेंट द्यावी असे तिला वाटत होते.

आणि महेशने तिचा सरळ एक धसमुसळा किसच घेतला. मिळाली कॉम्प्लिमेंट!

मन लावून स्वयंपाक केला आज अनुने!

आणि साडे सात वाजता रिक्षा थांबली.. श्री, मधू अन प्रमिला आत आले तसे 'श्रीला आता प्रचंड आनंद होणार' याची अपेक्षा असलेला संपूर्ण दास्ताने वाडा स्तब्ध होऊन श्रीकडे पाहू लागला. श्रीला काहीच समजत नव्हते लोक आपल्याकडे का पाहतायत? जिना चढून तो वर आला आणि दारातच...

..'गट्टू'ने स्वागत केले..

" माझे प्रिय बाबा... श्रीनिवास पेंढारकर.. यांचे त्यांच्या नव्या नव्या रंगवलेल्या खोलीत.. मी व अनुराधा.. हार्दिक स्वागत करत आहोत.."

अवाक झालेला श्री एकदा खोलीकडे, एकदा महेशकडे आणि एकदा अनुकडे असा बघतच बसला..

मधू अन प्रमिलाही वर आले. आता मावशी हळूच स्वतःच्या खोलीतून बाहेर येऊन गॅलरीत मागे अंधारात उभ्या राहिल्या.

अत्यानंद झालेला श्री खोलीकडे बघत होता. घरात स्त्रीचा वावर असला की घर कसे लख्ख होते हे आज सिद्ध केले होते अनुने! तीही खूप अपेक्षेने सासर्‍यांच्या आनंदी चेहर्‍याकडे पाहात होती.

श्री - महेश.. अरे.... अरे .. हे काय सगळं??

मागून अनु पुढे झाली...

"सरप्राईझ सरप्राईझ... आमच्या बाबांसाठी..."

महेश व अनुला दोघांनाही जवळ घेतले श्रीने! मग मागे मान वळवून सगळ्या वाड्याकडे पाहिले.

'बघा माझा मुलगा अन सून कसे आहेत, त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे, एवढेच नाही तर कर्तृत्ववानही आहेत' असा अभिमान होता महेशच्या नजरेत! मधू, प्रमिला आणि मावशी श्रीला झालेला आनंद पाहून निरागसपणे स्मितहास्य करत असतानाच.....

..... खाडकन काहीतरी आठवल्यासारखी श्रीची मान पुन्हा घरात वळली...

"महेश.... फोटो????? आईचा फोटो कुठंय?????"

निमिषार्धात वातावरण बदलले.

अनु - .. आहे.. तुमच्या कप्प्यात ठेवलाय... नवीन रंग आहे ना.. म्हणून खिळा नाही ठोकला...

कै. रमा श्रीनिवास पेंढारकर यांना आता कपाटातील श्रीच्या अंधार्‍या कप्यात बसून बाहेरचे काहीच दिसणार नव्हते...

पायाखालची वाळू सरकलेला श्री मावशींकडे उद्ध्वस्त होऊन पाहात होता. मावशींनी 'असुदेत रे' अशा अर्थाने मान हालवली अन श्रीने स्वतःला कलेक्ट केले. पण त्या क्षण, दोन क्षणांमधे श्रीच्या चेहर्‍यावर झालेले वादळी बदल अनु अन महेशला चांगलेच जाणवले. तेवढ्यात श्रीचे लक्ष माळ्यावर गेले.. माळ्यावरचे सर्व सामान आता दिसतच नव्हते... जुनी ट्रंक, पिशव्या.. काहीच नाही. त्या ऐवजी तिथे होते वेगवेगळे फ्लॉवर पॉट्स, शोभेच्या वस्तू वगैरे! ज्या महेश अन अनुला लग्नात आहेर म्हणून मिळालेल्या होत्या...

श्री - हे... इथलं सामान कुठे गेलं सगळं??

महेश - कागदपत्रे अन आईच्या साड्या वगैरे इथे खाली ठेवल्यायत..

श्री - अन.. .. फोटो???

महेश - इथे आहेत.. कोनाड्यात...

श्री - पण.. कितीतरी सामान होतं इथे...

अनु - ती खेळणी वगैरे किरणदादाच्या मुलाला दिली खेळायला...

श्री - खे... कोणती खेळणी???

अनु - एक जुना मेकॅनो.. पत्ते... बुद्धीबळ... सापशिडी....

विदीर्ण नजरेने श्री अनुकडे पाहात म्हणाला...

श्री - ... आणि.... ती... लाल रंगाची..लाकडी डबलडेकर...

अनु - ती मोडलेलीच होती.... भंगारवाल्याने घेतली... साडे सात रुपये दिले...

गुलमोहर: 

सही....

मस्त चालु आहे कथा.
लवकर आला हा भाग.. बाकिचे पन असे लवकर येऊ दे..... मी माबो सारखे येतो ते या कथेसाथिच..............

श्री - ... आणि.... ती... लाल रंगाची..लाकडी डबलडेकर...
अनु - ती मोडलेलीच होती.... भंगारवाल्याने घेतली... साडे सात रुपये दिले... >>>

Sad Sad Sad श्रीच्या मनात त्या क्षणी काय वादळ उठले असेल, याची कल्पना सुद्धा सहन होत नाही...
जीवापाड जपलेल्या आठवणींचे मोल साडे सात रुपये ???? Sad Sad Sad कसलाय हा महेश? ? ? ह्याला कशाचेच काही नाही का? बायको म्हणेल ती पूर्व? ? ? बरेच शब्द आहेत मनात त्याच्याबद्दल, पण आवरते घेते Sad

काय लिहाव तरि काय? सांगा ना.
अनु च्या बुद्धिचातुर्या वर हसावे कि महेश च्या ......... रडावे(खुप शब्द आहेत, चांगले आणि वाईट हि, कोणता वापरु समजत नाहि).

बेफिकिर, तुम्हि ग्रेट आहात, काय अचुक शब्दात अनु चे बोल लिहिलेत, त्याला तोड नाहि.
आणि संताप संताप होत होता, महेश चि भुमिका वाचुन.

खूप दिवसांनी प्रतिसाद देतेय्...त्याबद्दल क्षमस्व.. पण एकूण एक भाग वाचलाय मी...रोज..वेळच्या वेळी....अप्रतिम लिहिलंय...
>>>>कथेचा शेवटाकडचा प्रवास चांगला चाललाय
अनुमोदन...
कारण ही कथा श्रीनिवास पेंढारकर - एक बाप यांची आहे... महेशची नाही...पु.ले.शु.

सर्वांचे मनःपुर्वक आभार! उद्या व परवा सुट्टी असल्यामुळे कदाचित अंतीम भाग वाचले जाणार नाहीत. तरीही उरलेल्या दोन भागांपैकी पहिला आज प्रकाशित करण्याचा मानस आहे. बघू काय काय सुचते अन कसे सुचते!

-'बेफिकीर'!

बेफिकीर, उरलेले दोन भाग? Uhoh कल्पनासुद्धा सहन होत नाहीये.... खरंच एवढ्यात आटोपायची गरज आहे का? Sad

>>> दोन्ही ही !!!

पुढच्या भागाची >>>>>...आता महेश काय करतोय ते कुतुहल आहे ....ज्या बापाने लाहानाचे मोठ्ठे केले त्याला साथ देतो की जिच्या बरोबर आयुष्य घालवायचे आहे तीला साथ देतो ????

कादंबरी संपण्याची >>> कारण बेफीकीर फार फार मस्त विषय मस्त पणे हाताळत आहेत ....त्यांची हाफ राईस सोडुन बाकी (जवळपास) सारे उपलब्ध लेखन मला ईन्टरेस्टींग वाटते ...या कादंबरी नंतर कोणता विषय घेतात हे ही कुतुहल आहेच ना !!!

मग ठिके प्रगो Happy
त्यांच्या 'बाप' वरील कवितेनुसार महेश "जिच्या बरोबर आयुष्य घालवायचे आहे तीला साथ देतो" असेच कथानक आहे. पण बेफिकीरजींनी तसेच लिहावे असे नाही. सुखद एन्डिंग केले तरी छान वाटेल...सतत निगेटिव्हीटी अगदी नकोशी झाली आहे.... बाकी त्यांची मर्जी.

प्रसाद गोडबोले,

लिंकही देत आहे व कविताही! आपल्याला 'हाफ राईस' विशेष आवडली नाही याबद्दल दिलगीर आहे.

http://www.manogat.com/node/16698

नवे फूल संसारवेलीस आले, मिळाली जशी बातमी, धावला
सुखाला न काहीच सीमा अता बाप वेडावला फक्त वेडावला
तिथे वेगळे दुःख आहे नशीबी जरा कल्पनाही मनाला नसे
नवे फूल देऊन गेली लता, वृक्ष संसाररूपी न फोफावला

अता बाळ आईविना राहिला, त्यास सांभाळले पाहिजे हे खरे
कसे का असेना मुलाला तरी वाढवायास आता हवे हे खरे
'तिचे रूप मानू मुलाला अता' बाप बोले स्वतः शी, धरे धीरही
कसेही असो दैव, मानून ते माणसाने पुढे जायचे हे खरे

घरी बाळ आला, तशी सांत्वनाला किती माणसे लोटली त्या घरी
मुठी चोखता बाळ पाहून घे विस्मयाने घराला कितीदा तरी
रडू येतसे भूक लागेल तेव्हा, नसे त्यास आई, बिचाराच तो
जरी बाप होता, तरी माय ती माय, तृष्णा न भागेल पाण्यावरी

कधी दूध पाजा नि आंघोळ घाला, कधी झोपवा आणि जागे रहा
कशाने रडे, तो न झोपे कशाने, कसे खेळवावे मुलाला पहा
कितीही जरी लोक आले "बघू का" म्हणायास, काही क्षणांचेच ते
असा काळ काढून बाळास आता पुरे होत आलेत महिने सहा

लळा लागला त्यास, बापास त्याचा, अता सर्व मार्गावरी लागले
अता बाप कामासही जात होता, कुणी ना कुणी बाळ सांभाळले
जरा काळ आणीक गेला, अता बाळ बोलायला लागला बोबडे
तरी शब्द पहिलाच 'आई' निघाला, नि ऐकून ते बापही गलबले

अता खेळणी, गोष्ट काऊचिऊची, सुरू जाहली जेवताना मजा
धरा रे, पळा रे, करा गाइ आता, किती यायची खेळताना मजा
कुशीतून बापास तो बोबडे बोल ऐकावयाचा नि झोपायचा
मजा झोपताना, मजा जागताना, मजा सर्व ते पाहताना मजा

हळू काळ गेला जरासा पुढे, चार वर्षे पुरी होत आली अता
अता घातले त्यास शाळेत, इच्छा पित्याची फलद्रूप झाली अता
डब्याला बिचारा स्वतः लाटुनी बाप पोळ्या असे देत बाळास त्या
तसा रोजचाही स्वयंपाक शिकला, घराचा असे तोच वाली अता

कधीही न रागावला बाप पोरावरी, एकदाही न फटका दिला
बघे चित्र तो बायकोचे, रडे आणि सांगे कहाण्या मुलाच्या तिला
वही, पुस्तके, दप्तरे, खेळणी, सर्व संस्कार, अभ्यास चालू असे
कसासा तिच्यावीण तो काळ त्याने स्वतः एकट्याने असा काढिला

"कधीही न नेलेत हॉटेलमध्ये, कधीही न मी चित्रपट पाहिला
कधीही न मी बागही पाहिली, सर्कशीचा तसा योगही राहिला"
"तसा फार पैसा नसे" बोलला बाप "माझ्याकडे बाळ, सांगू कसे?"
बिछान्यात रात्री बिचारा रडे एकटा बाप, अश्रू छुपा वाहिला

उधारी करोनी पुरे लाड केले, कशीशी उधारी पुरी फेडली
स्वतःची दिली चार पैश्यात आणी मुलाला नवी सायकल घेतली
जरा ताप आला मुलाला कधी की पुरी रात्र जागायचा बाप तो
स्वतःची कधी प्रकृती पाहिली ना जरा तापता पाठही टेकली

सफारी मुलाला हवा याचसाठी दिली ट्रंक भगारवाल्यासही
सहल-वर्गणीला करे काम जास्ती पुन्हा येउनी सर्व स्वैपाकही
दहाव्वीस आले बरे गूण आता पुढे शिक्षणाला किती खर्च तो
करे नोकऱ्या तीन, कर्जे करोनी प्रवेशास दे देणगी बापही

कधी ऐकले, पोरगा बोलला वाक्य मित्रांपुढे एक खुश्शालसा
"कसे यायचे आज पार्टीस मी बाप माझा असे यार कंगालसा"
तसे वाक्य ऐकून, वाईट वाटून, पाणावली लोचनेही जरी
स्वतः औषधे टाळुनी देत पैसे मुलाला म्हणे 'जाच खुश्शालसा"

जशी लागली नोकरी त्या मुलाला सुखावून गेला तसा बाप तो
उभा राहिला आपला बाळ आता, जरा आपलाही घटे व्याप तो
म्हणे पोरगा एक मैत्रीण आहे, तिच्याशी अता लग्न लावून द्या
मनाशी म्हणे बाप, हा काय आनंद आहे, मनाला पुऱ्या व्यापतो

जसे लग्न झाले, घराला जराशी कळा चांगली यायला लागली
नवी सून होती किती लाघवी, बाप मानायचा पोरगी आपली
घराला तिने सजविले, सर्व कामे बघू लागली एकट्यानेच ती
मुलाला उरे स्वर्ग बोटांवरी पाहुनी लाडकी बायको आपली

तशातच घरी पत्र आले मुलाला, नव्या नोकरीचे, मनासारख्या
पगारात होती किती शुन्य जाणे, सुवीधा न त्या मोजण्यासारख्या
म्हणे पर्वणी जाहली, बाप बोले, समाधान ती सूनही पावली
पुढे बाळ बोले अशी पाहिजे, नोकऱ्या त्या नको 'भारतासारख्या'

कळेनाच बापास की काय बोलून गेला असे पोरगा आपला
जराश्यात ते स्पष्ट झाले नसे नोकरी येथली, बाप खंतावला
"नको रे मुला, का कशाला उगी जायचे त्या तिथे, काय आहे तिथे?"
परंतू सुनेने मुलाचीच बाजू जशी घेतली, तो म्हणू लागला

"मुलांनो, अरे मी कसे यायचे त्यातिथे, जन्म माझा असे येथला"
मुलाने शिसे ओतले, कान जाळून तो शब्द बापाकडे पोचला
"तुम्हाला कुठे यायचे त्यातिथे, त्यातिथे फक्त आम्हीच जाणार हो"
असे वाक्य ऐकून, आधार शोधायला लागला, बाप तो मोडला

रडू थांबता आज थांबेचना, बाप बोले "नकारे, नका जाउ की"
"कसेही असो आज उत्पन्न, आपण सुखाने घरी आपल्या राहु की"
म्हणे पोरगा "अल्पसंतुष्टता हीच तुमची सदा भोवली आजवर"
तरीही बिचारा म्हणे बाप "जाऊ नका रे, कुठेही नका जाउ की"

"अरे एकट्याने कसे मी जगावे, मला सांग तुमच्यामुळे मी जगे"
"न आई तुझी राहिली, सांग पोरा, कसे एकट्याने जगावे म्हणे? "
मुलाला, सुनेला न काहीच होते, निघालेच ते दूरदेशाकडे
पुरी तीन वर्षे अता जाहली, बाप आता इथे एकट्याने जगे

कधी जाग येते, जणू बाळ रडले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घास काऊचिऊचा न चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सर्कशीला न पैसेच उरले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सायकल घेतली, छान झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घेतलेल्या सफारीत चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी देणगीचे पुरे कर्ज झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी एक पार्टीस पैसे पुरवले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी वाटते मूल झालेच नाही, असे वाटता तो रडू लागतो

अता प्रकृती साथ देते कुठे, आज कोणीच नाही बिचाऱ्यास त्या
पुरा जन्म वायाच गेल्यापरी भावना व्यापणारी बिचाऱ्यास त्या
कधीही नका यार आधार काढू पित्याचा कुणी, एवढेसे करा
कथा आठवा एवढी, द्या समाधान, आणीक शांती बिचाऱ्यास त्या

मला 'हाफ राईस' अतिशय आवडली होती. बापपेक्षासुद्धा जास्त. तुमच्या आत्तापर्यंतच्या कादंबर्‍यामधली ती माझी सगळ्यात आवडती... पण माझा शेवटी फारच अपेक्षाभंग झाला. 'तिथे' पण आणि 'इथे' पण तुमच्या कथानकातले मुलीचे पालक फारच अविचारी, दुराग्रही आणि दूरदृष्टीचा अभाव असणारे बुवा. आपल्या मुलीचे सुख त्यांना समजतच नाही...कुणीही कितीही पोटतिडकीने समजवा त्यांना... Sad Uhoh

बेफिकिर, काहो अस करता, अजुन वाढलि कादंबरि तरि चालेल, प्लिज.
निगेटिव्हीटी जरि असलि तरि ते सत्य आहे, आनि आपण हि, हे चित्र कुठे ना कुठे पाहिलेले असतेच कि(अस माझे मत), आनि तुमच्या मनात आहे तसाच शेवट करा.

परेश, कुठे ना कुठे नाही हो, हे असेच चित्र आपण कायम पाहत असतो. म्हणून तर किमान कादंबरीत तरी आपली त्यापासून सुटका व्हावी असे वाटते... पण
तुमच्या मनात आहे तसाच शेवट करा.>>> ह्याबाबतीत मात्र तुम्हाला अनुमोदन. Happy

सानि, तुम्हि म्हण्ता आहात ते योग्य हि आहे, किमान कथा कदंबरी मध्ये तरि शेवट सुखद असावा, पण ह्यपि एडिंग(happy endings) चा हि कंटाळा येतो, हे हि तितकेच खर. आणि हो, आजकाल सगळिक्डेच हे द्रुश्य पहायला मिळत(थोडी धास्ति वाटतिय हे लिहिताना), त्या मुळे आणि बेफिकिर हे खरच वास्तववादि लेखक असल्यामुळे(तुम्हि डिस्को २०३ .... वाचलि आहेतच), बेफिकिर स्टाईल एन्ड चालेल.

<<<मला 'हाफ राईस' अतिशय आवडली होती. बापपेक्षासुद्धा जास्त. तुमच्या आत्तापर्यंतच्या कादंबर्‍यामधली ती माझी सगळ्यात आवडती... >>>>>सानीला अनुमोदन. हाफ राइस ही माझी सुध्दा सर्वात आवडती कादंबरी आहे. पण बेफिकीर जींचं सगळच लिखाण मला आवडतं,मग ती कदंबरी असो कि कथा असो कि गझल.