पाऊस नुकताच संपत आलेला... आणि त्यात आलेली ३ दिवस सुट्टी.
डोक्यात बेत रंगु लागले आणी बेत ठरला नर्सोबाच्या वाडीचा (तीच ती नृसिंहवाडी) दत्तगुरुंच ठिकाण.
नर्सोबाची वाडी, श्री दत्त म्हणजे (ब्रम्हा-विष्णू-महेश) यान्च रुप. याच श्री दत्तगुरुन्च्या पादुका नर्सोबाच्या वाडीत आहेत.
हे ठिकाण आहे, मुम्बईहून अन्दाजे ३८६ कीमी, सान्गलीहून २२ कीमी, आणी कोल्हापुरहून ४५ कीमीवर.
छत्रपती शिवाजी टर्मीनसहून सुटणारी (सन्ध्याकाळी ८.३० वा) सह्याद्री एक्सप्रेस (व्हीटी - कोल्हापुर) दादरला पकडली आणी आमचा प्रवास सुरु झाला. मुम्बईहून अंदाजे ३८६ किमी वर असलेल्या मिरजेला (सकाळी ६.३०) उतरून आम्ही वाडीला (४०-५० किमी) जायची बस पकडली आणी मनाने एकाच ठाव घेतला "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा". एक वेगळीच ओढ लागली होती. बोचरी थन्डी आणी बाहेर हिरवाकन्च निसर्ग लक्ष वेधून घेत होता. जागोजागी उसाचे फड दिसत होते. नुकताच जाग आलेली गाव खूप छान दिसत होती. एकन्दरच मन खूप प्रसन्न होत.
दत्तगुरुंच्या ध्यानस्मरणात असतांनाच वाडीला कधी आलो कळालच नाही. सामान ठेवून सुचिर्भुत होऊन महापूजा आटोपली. (भक्तनिवासाची सोय आहे. गरम पाणी, एक बादली रु.१५) या किमतीत मिळते. अत्यन्त स्वच्छ अशा त्या परिसरात मन एकदम शान्त झाल होत. मन्दीराच्या आवारात ४-५ अशी छोटी मन्दीर आहेत. औदुम्बराची झाडे प्रकर्षाने आढळतात. न्रुसिह सरस्वती स्वामीन्नी येथे १२ वर्षे वास्तव्य केले होते. न्रुसिह सरस्वती स्वामी हे दत्तगुरुन्च्या १६ अवतारान्पैकी एक. ईतर ठिकाणासारखी येथे दत्तगुरुन्ची मुर्ती नाही, त्यान्च्या पादुका हेच येथील आकर्षण.
क्रुष्णा आणी पन्चगन्गेच्या तीरावर असलेली ती श्री दत्तगुरुन्ची पाऊले जेव्हा महापुजेदरम्यान याही देही याची डोळा पाहिली तेव्हाची स्थिति काय वर्णावी.......
या पादुका दुध, दही, पन्चाम्रुत यान्नी धुऊन मग त्यावर फुलान्ची आच्छादने घालतात वर मग शाल अन्थरून मुखवटा ठेवला जातो. अस म्हणतात की क्रुष्णेला कीतीही पुर आला तरी ती काही दत्तगुरुन्च्या पाउलापर्यन्त पोहोचु शकत नाही.... त्या पाउलान्चे आपण फोटो घेउ शकत नाही तरी मी ते घेतलेच. आणी कायमची ती माउली माझ्या मनात उमटवली.... क्रुष्णा नदी नेहमीप्रमाणे सन्थ वाहत होती (सन्थ वाहते क्रुष्णामाई) याचा उलघडा तिथे झाला.. तिचे पात्र खूप मोठे, ईतके की पाण्यात उतरणारा क्षणभर विचार करेल...
क्रुष्णेच्या पलिकडच्या तिरावर अजून एक दत्तान्च एक मन्दिर आहे. त्याचा ईतिहास असा,
दत्तगुरुन्च्या काळात वाडीत एक अत्यन्त गरीब स्त्री होती. दतगुरु जेव्हा तिच्याकडे भिक्शा मागावयास गेले, तेव्हा दारिद्र्यापोटी आलेल्या गरीबीमुळे तिच्याकडे दत्तगुरुन्ना देण्यास काहीही नव्हते. तेव्हा तिथून पुढे जातान्ना दत्तगुरुन्नी तिच्या ओसरीत लावलेला घेवड्याचा वेल मुळासकट उपसून टाकला. त्यान्च्या अशा वागण्याने ती स्त्री अतिशय दु:खी झाली.. कारण तीचा जो काही उदर्निर्वाह होत असे तो त्या वेलिवरच. पण तिच्या नवर्याने तीची समजुत घातली (दत्तगुरुन्नी अस केल म्हणजे कहितरी नक्कीच हेतु असेल). या विचाराने त्याने त्या वेलीजवळची माती सारवण्यास सुरुवात केली असता, त्यास द्रव्याने भरलेला हन्डा तिथे सापडला. याची विचारणा दत्तगुरुन्जवळ करताच ते म्हणाले की तुझ दारिद्र्य दूर करण्यासाठी मी ते केलेल आहे. पण जर का याचा उल्लेख कुणाजवळ करशील तर पुन्हा दरिद्री होशील. शेवटी स्त्रीच ती, केला तीने झाल्या गोष्टीचा उल्लेख आणी पुन्हा दरीद्री झाली.
तर ती वेल उपटलेली जागा क्रुष्णेच्या पल्याड आहे. (वेळेअभावी तेथे जाणे झाले नाही :()
वेळ होता आमच्याकडे म्हणून मग वाडीहून सांगली आणी तेथून औदुम्बर असा प्रवास ठरला. या प्रवासातही निसर्ग सुखावत होता. सांगलीहून बस मिळेना (खूप अन्तराने बसेस आहेत) म्हणून मग एक कार केली आणी मार्गस्थ झालो. वाटेत म्हसोबाचे एक मन्दिर लागले तिथे जाऊन आलो आणी पुढे निघालो. कोयनेच्या तीरावर वसलेल हे श्री दत्तगुरुन्च आणखी एक ठीकाण. तिथल दर्शन घेतल आणी माघारी फिरलो.
अशी ही आमची यात्रा अतिशय प्रसन्न, सुखद आणी आठवणीत राहणारी ठरली. आपणासही या यात्रेचा योग लवकरच येवो आणी श्री दत्तगुरुन्ची पाउले आपल्या घरी सुख-सम्रुद्ध्ही-सम्पन्नता घेउन येवोत हीच दत्तगुरुन्च्या चरणी प्रार्थना.... "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"
याच प्रवासाची ही काही प्रकाशचित्रे....
नोटः प्रचि साधारण ८० असल्याकारणाने सदर सादर होण्यास वेळ लागेल त्याबद्दल क्षमस्व.
प्रवासचित्रे (मुम्बई-नरसोबाची वाडी)
प्रचि ७
नरसोबाची वाडी बस स्थानक
प्रचि १३
ईथल्या स्थानिक विक्रेत्याने सान्गीतल की ह्या रुद्राक्शान्ना हा असा आकार नैसर्गीकरीत्या येतो.
प्रचि १६
मुख्य मन्दीरच्या आवारात एक शिवलिन्ग
प्रचि २६
याच त्या आपल्या श्री दत्तगुरुन्च्या पादुका
प्रचि २७
अशा रितीने पदुकान्ची पुजा करून मग मुखवटा चढवला जातो.
प्रचि ४७
जागोजागी असलेले ऊसचे फड
प्रचि ४८
प्रवासचित्रे (वाडी-ओउदुम्बर)
बाप्पा प्रवासात
प्रचि ५२
श्री क्षेत्र ओउदुम्बर (ऐलतीरवरुन पैलतीरावर)
प्रचि ५६
श्री दत्तगुरुन्ची मुर्ती
प्रचि ५७
न्रुसिह सरस्वती स्वामी
प्रचि ६१
पोट्पूजा (राजगीर्याचा लाडू)
प्रचि ६३
प्रवासचित्रे (मिरज-मुम्बई)
प्रचि ८०
हा छोट्या कोलान्ट्या उड्या मारुन पैसे मिळवत होता आपल्या आईच्या आणी छोट्या बहीणीच्या उदरनिर्वाहासाठी.... या वयात....
आम्ही पण दिवाळीत कोल्हापुर ते
आम्ही पण दिवाळीत कोल्हापुर ते वाडीला बाईकवर गेलो होतो. फार छान वातावरण होते. आठवणीना उजाळा मिळाला.
खुप छान सफर घडवलीत . धन्यवाद.
खुप छान सफर घडवलीत . धन्यवाद. लहानपणी ( सांगलीचा असल्याने) दर पोर्णिमेला केलेली नरसोबावाडीची सफर आठवली.
सर्व छायाचित्रे मस्तच
अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
खुप छान प्रवास केला तुम्ही.
खुप छान प्रवास केला तुम्ही. माझा पण निचय आहे जाण्या साठी पण नोव्हेंबर महिन्या मध्ये.
धन्नो, amolk9, प्रश >>>
धन्नो, amolk9, प्रश >>> प्रतिसादाबद्दल आभार..
धन्नो, फार छान वातावरण होते >>>> अगदी.... मीच आता जाऊन आलो तर पुन्हा जायची ओढ लागलीए...
amolk9, लहानपणी ( सांगलीचा असल्याने) दर पोर्णिमेला केलेली नरसोबावाडीची सफर आठवली.>>> पोर्णिमेला काही वेगळपण असत का तिकडे???
प्रश, माझा पण निचय आहे जाण्या साठी पण नोव्हेंबर महिन्या मध्ये. >>> म्हणजे एकदम गुलाबी थन्डी सोल्लीड गारवा असेल मग तिकडे
खूप मस्त वाटले...माझे पण
खूप मस्त वाटले...माझे पण बालपण कृष्णेच्या तीरावर गेले...कुरुंदवाडपासून २ कि.मी. अंतरावर असल्यामुळे रोज पोहायला जायचो...अजूनही कुरुन्द्वाडला गेलो की अंघोळीला नरसोबावाडीलाच जातो...पुन्हा एकदा बालपणीचे दिवस आठवून बरे वाटले...लेख खूप मस्त आहे... पु. ले. शु.
अरे हे सदर पुन्हा वर आलं??
अरे हे सदर पुन्हा वर आलं??
अजो, प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद... पण प्रवासात तुमच्या कुरुंदवाडच्या एस्.टी ने खूप त्रास दिला मात्र...
वाडीच्या दर्शना बद्द्ल
वाडीच्या दर्शना बद्द्ल धन्यवाद, खुप इच्छा आहे जायची , अजुन नाहि योग आला जायचा, पण फोटो पाहुन खुप समाधान वाट्ले
प्रती खूपच सुरेख
प्रती खूपच सुरेख पावसाळ्यातल्या दिसतायत आणि आजून १ गोष्ट पुन्हा प्रती टाकताना वडा - पाव अश्या काही प्रती असतील त्या वेगळ्या टाका कारण मधेच तोंडाला पाणी सुटल नां................आता द्या आणून
मस्तचच फोटो आहेत !!
मस्तचच फोटो आहेत !!
मस्त घडविले नरसोबावाडी दर्शन
मस्त घडविले नरसोबावाडी दर्शन
एकदम मस्तच फोटो... तीकडे
एकदम मस्तच फोटो... तीकडे जण्याची तीव्र इच्छा जाग्रुत झालीय... देवाच्या क्रुपेने लवकरच योग घडुन येइल...
एक पण चित्रं दिसत नाहिये
एक पण चित्रं दिसत नाहिये
सही ! नरसोबाची वाडी आणि
सही !
नरसोबाची वाडी आणि हिरवागार परिसर बघुन मन अगदी प्रसन्न झालं.
Pages