थुपका/थुकपा

Submitted by प्राची on 9 September, 2010 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाज्या बारीक चिरलेल्या. (गाजर, बीन्स,सिमला मिरची, फ्लॉवरचे तुरे),
१/४ वाटी कोबी उभा चिरलेला,
१ मिरची उभी चिरलेली,
२-३ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून,
१/४ इंच आले ज्युलिअन,
१ वाटी शिजवलेले नुडल्स ,
३-४ मॅगी मसाला मॅजिक क्युब्ज,
१/२ टेस्पून कॉर्नफ्लोअर,
३ १/२ वाट्या पाणी,
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत थोड्याशा तेलावर भाज्या परतून घ्याव्या. सतत परतत अर्धवट शिजवाव्या.
२. मसाला क्युब्ज फोडून भाज्यांवर मसाला आणि मीठ घालून परतावे.
३. भाज्यांवर पाणी (हलके गरम करून) घालावे आणि ढवळावे.
४. हे सूप चांगले उकळावे.
५. कॉर्नफ्लोअर १ १/२ टेस्पून पाण्यात मिसळून सूपमध्ये घालावे. चांगली उकळी आणावी.
६. बाऊलमध्ये नुडल्स घ्यावेत. त्यावर हे गरम सूप घालून खायला द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
2 जण
अधिक टिपा: 

१. यात कोथिंबीर घालू नये.
२. ऑथेंटिक पाककृतीमध्ये ताजा मसाला (धणे, जिरे, लवंग, जायफळ, वेलदोडा, मिरे यांची पावडर) घालून बनवतात. ऑथेंटिक पाककृती इथल्या पार्लरमधल्या लद्दाखी मुलीने सांगितली होती.
घरी उरलेल्या मॅगी मसाला क्युब्जचे काय करावे, याबाबत सर्च केले असता Nestleच्यासाइटवर ही रेसिपी मिळाली. मॅगी मसाला मॅजिक क्युब्ज वापरूनही चवीत फरक पडत नाही. साइटवरील रेसिपीपेक्षा मी कॉर्नफ्लोअर कमी घालते. पण आवश्यक दाटपणा मिळतोच.
३. आले-लसूण नाही घातले तरी चालेल.
४. नूडल्सऐवजी स्पॅगेटी घातल्यास त्याला 'थान्थुक' म्हणतात. Happy
५. हा तिबेटियन पदार्थ आहे.
६. मांसाहारी असाल तर चिकन/मटण घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
१ http://niyasworld.blogspot.com २. Nestleची साइट.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हा थुपका करून पाहिला. आले वापरले नाही. कॉर्नफ्लोअरऐवजी तांदळाचे पीठ पाण्यात मिसळून घातले. कांदा, कोबी, घेवडा घरात होते. हे सर्व बारीक चिरलेल्या लसणावर व हिरव्या मिरचीवर परतले, त्यात मॅगी मसाला, लाल तिखट व मीठ घातले. सढळ हाताने पाणी घालून पाण्याला एक वाफ आल्यावर त्यात तांदळाची कालवलेली पिठी व चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ आणली. नूडल्स किंचित परतून घेतल्या (मला त्यांची परतून क्रिस्पी चव आवडते). त्या या सुपात घालून जेमतेम शिजू दिल्या. तांदळाच्या पिठीने चांगले दाट झाले सूप. बोलमध्ये हा थुपका वाढून त्यावर किंचित लोणी घातले. सोबत लादीपाव खरपूस भाजून. सुपात पाव बुडवून खायला मजा येते. Proud
थंड हवेत हा प्रकार खायला मस्त आहे.

Pages