गण गण गणात गणपती - निघाली बाप्पांची पालखी - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:50
2010_MB_Ganesha2_small.jpg
निघाली बाप्पांची पालखी (गणेश निरोप)
गीत, संगीत : योग
गायक : योग, सारीका व समूह


निघाली निघाली निघाली बाप्पांची पालखी
लाट लाट ही भक्तांची सागरासारखी
चला चला रे गाऊया बाप्पांची आरती
एकमुखाने बोला बोला गण गण गणात गणपती ||

देहभान हे गुलाल झाले उधळू तुमच्या पायी
निरोपास ही उभे ठाकले विठ्ठल रखुमाई
बोला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल रखमाई ||

निरोपाच्या वेळी बाप्पा करू नका हो घाई
कौतुकाला गोंधळाला आली अंबाबाई
बोला उदे उदे उदे ग अंबाबाई ||

त्रैलोक्याचे राजे तुम्ही गणांचे गणराया
जागराला आले जेजुरीचे खंडेराया
बोला येळकोट येळकोट जयमल्हार येळकोट येळकोट जयमल्हार ||

डौलात चालली गणरायांची स्वारी
कृपा असावी देवा सदैव आम्हांवरी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया||



Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

अहाहा.... क्या बात है.. एकदम फर्मास.

गीतरचनाही मस्तच.
बाप्पाच्या निरोपाला विठ्ठल-रखुमाई, अंबाबाई, खंडेराया येतात, ही कल्पनाच जाम आवडली.

वाद्यवृंदही जबरदस्त.साजेसा आवाज.
खूप आवडली. Happy