Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:42
चराचरांतून अशी माजली (पोवाडा)
गीत, संगीत : योग
गायक : योग व समूह
चराचरातून अशी माजली दुष्टांची जुलूमाई
पाटी कोरी ठेवून येते बाळांची सटवाई
माऊलीची लाज आता राखाल का
पावाल का देवा धावाल का?
भूपुत्रांच्या नशीबी येती रक्तफुलांची ताटे
स्वार्थापोटी बाग खुरडती गद्दारांचे काटे
इथल्या कैलासावर असतो सैतानाचा डोळा
पाहून सारे स्तब्ध तरी तो सांब सदाशिव भोळा
हरण्या विघ्ने तव भक्तांची धावाल का
पावाल का देवा धावाल का?
हीन दीनही भासती आता शक्तीपीठे सारी
पैशासंगे बोल बोलती कलमे ही व्यापारी
गर्दीतूनही घुमतो येथे विद्वेशाचा वारा
सीमेवरती रोज निखळतो तरूण कोवळा तारा
देण्या बुद्धी सिद्धी आम्हां बोलाल का
पावाल का देवा धावाल का?
कलीयुगी या किती माजले पाप ताप उदंड
रंग रूप ही घेवून सजती किती निशाणी बंड
काळरात्र ती येता देईल कुठला देव पहारा
छतपत्रींचे तेज शोधतो सूर्याचा गाभारा
राष्ट्रकुळाला मार्ग दावण्या भेटाल का
पावाल का देवा धावाल का?
नसांनसांतून उसळू द्या रे अस्मितेचे मलंग
दगडातूनही चेतवा रे राष्ट्रप्रेमी अभंग
देहामधूनी घडवा आता शक्तीचे बजरंग
स्वराज्य यावे कल्याणाचे उठा उठा श्रीरंग
सुख शांतीची पहाट देवा पुरवाल का
पावाल का देवा धावाल का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहा....क्या बात है....!! एकदम
अहा....क्या बात है....!!
एकदम दमदार
शब्द पण ताकदवान योग !!
फक्त शेवटच्या कडव्यात "श्रीरंगा"च्या ऐवजी "हेरंबा" वगैरे चाललं असतं असं वाटलं ...कारण अल्बम गणपतीचा आहे
जया, आभारी. पण जे काही
जया,
आभारी. पण जे काही स्फुरलय ते श्री गणरायाच्या ईच्छेनेच तेव्हा त्यांचा काही विशेष आक्षेप नसावा
हे गाणे फारच मस्त आहे! पण
हे गाणे फारच मस्त आहे! पण ऐकता येत नाहीये
Link खराब झाली आहे का?
अभिजित
जबरदस्त ! खणखणीत ! खुप खुप
जबरदस्त ! खणखणीत ! खुप खुप छान योग !
योग .. जोरदार आहे पोवाडा!
योग .. जोरदार आहे पोवाडा!
मस्त रे बापू.
मस्त रे बापू.
खणखणीत ! मस्त.
खणखणीत ! मस्त.
ये ब्बात! जबरी झालाय पोवाडा.
ये ब्बात! जबरी झालाय पोवाडा.