गण गण गणात गणपती - गणा गणा - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:35
2010_MB_Ganesha2_small.jpg

गीत २ : गणा गणा (गणेश गजर)
गीत : पेशवा
संगीत : योग
गायक : योग व समूह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है रे.........!! एकदम झकास !!
दिमडी वगैरेचा आवाज मस्त !!
तुस्सी छा गये दोस्त !
पेशवा.....शब्द पण जबरी Happy
वातावरण निर्मिती जबरदस्त झाली !!

आभारी.

शब्द जेव्हा दुसर्‍या कवीचे असतात त्यातही विशेषतः पेशव्याचे तेव्हा त्याला न्याय देण्याची मोठी जबाबदारी असते. खुद्द पेशव्याने हे गीत ऐकून ईमेल मधून दाद दिल्याने ती जबाबदारी व्यवस्थित पार पडली असे मला वाटते. अन्यथा गीत लिहीताना त्याच्या डोक्यात काय कल्पना होती, सादरीकरणाबद्दल काही विशेष विचार होते का वगैरे मला काहीच माहिती नाही कारण यावर माझे अन त्याचे काहीच बोलणे झाले नव्हते.
माझ्या विनंतीखातर त्याने गीत लिहून दिले अन मी २००% जीव ओतून काम केले, एव्हडेच! "गणा गणा" चा गजर ऐकणार्‍याच्या मनात अन आसमंतात घुमत रहावा हाच फोकस ठेवून ही रचना केली होती. बर्‍याच गणेश मंडळांन्नी हे गीत वारंवार वाजवायला सुरुवात केली आहे असे मी ऐकले. ते छान झाले असेल तर ती केवळ श्री गजाननाची कृपा, दोष असतील तर अर्थातच माझे.

स्टुडियोतील वादक मंडळींन्ना हे गीत वाजवताना खूप मजा आली.. आजकाल अशा प्रकारचे लोकगीताचा बाज असलेले काम कमी झाले आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामूळे त्यांन्नीही हात धुवून घेतले Happy

जयश्री,
आता पुढील गीत तुझे लिहीलेले आहे ते अपलोड होईल तेव्हा त्यालाही कितपत न्याय मिळाला ते पहा Happy
(पुन्हा एकदा: हेड्फोन मधून ऐकले तर क्लॅरिटी अधिक आहे असे लक्षात आले. पुढील खेपेला या सर्व तांत्रिक बाबींकडेही अधिक लक्ष द्यायचा विचार आहे.)

फारच सुंदर गीत आणि संगीत.
एकदम झकास !!

आवडले.

पुढिल गीताच्या प्रतिक्षेत

पेशव्या भारी, तुझ्याकडून भक्तीगीत - शब्द भारी आहेत. मजा आगया.

योग महाराज, आपलं संगीत ह्या गाण्याला उत्कृष्ट असं आहे, एकदम फर्स्ट रेट !! लोकगीत गाणार्‍याचा उदा मिलिंद इंगळे वगैरेचा विचार नाही का केलास गायक म्हणून? पण जे काय झालं आहे ते भारी आहे. गणा गणा ने मजा येते.

तुझे अभिनंदन. गणा गणा महाराष्ट्रात गाजो...

गाणं झक्कास. शब्द आणि संगीत दोन्ही..
गणपतीची अलंकारीक गोड गोड नावं न घेता साधं सोपं गणा हे फारच आवड्या...
योग, संगीत एकदम अ‍ॅप्ट आहे. अगदी वाद्यमेळासकट. एकदम प्रोफेशनल.
पण माफ करा आवाज थोडा अजून रस्टीक आणि खणखणीत असायला हवा असं वाटलं. थोडा अजून शाहीरी बाजाचा. (हे माझं मत. ते चूक असू शकतं!)