Submitted by आनंदयात्री on 7 September, 2010 - 04:17
आरशालाही स्वत:चा अर्थ कळला पाहिजे
चेहरा माझा खरा मज त्यात दिसला पाहिजे
पावलांना वाट कळते, एवढे नाही पुरे
त्या धुळीला हा प्रवासीही उमगला पाहिजे
पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे
वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)
वाट दु:खाची कितीही, संपुनी जाईलही
फक्त दु:खानेच माझा हात धरला पाहिजे
लेखणी बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे
जाणिवा हृदयास भिडल्या- ओळखावे हे कसे?
आपुल्या डोळ्यांतला तो मेघ भरला पाहिजे
आटला नाही कधीही आठवांचा हा झरा
आत माझ्या खोल त्याचा उगम असला पाहिजे
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शेअर करा
काळजाच्या वेदनांचा संप मिटला
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे - वा वा!
-'बेफिकीर'!
छान नचिकेत! मस्त
छान नचिकेत! मस्त ग़ज़ल!
'वेदनांचा संप' कल्पना आवडली. मत्ला खूप आवडला. बाकी ग़ज़ल मस्त आहे पण हे दोन खासच!!
वाहवा.... अतिशय तरल... हळुवार
वाहवा.... अतिशय तरल... हळुवार गझल....
पावसाच्या उल्लेखांनी मन कुंद होवून गेलं....
अभिनंदन नचिकेत...
वाह.......!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह.......!!!!!!!!!!!!!!!!!!!
छान ग़ज़ल!
छान ग़ज़ल!
सुंदर गझल!!!........ आडोसा ह
सुंदर गझल!!!........
आडोसा ह शेर खूप आवडला
आटला नाही कधीही आठवांचा हा
आटला नाही कधीही आठवांचा हा झरा
आत माझ्या खोल त्याचा उगम असला पाहिजे >> मस्तच गझल !!
मस्त ग़ज़ल! आवडली
मस्त ग़ज़ल!
आवडली
काळजाच्या वेदनांचा संप मिटला
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे
मस्त!!
सुरेख.
सुरेख.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार दोस्तहो...
खूप छान गझल. निवडक दहात
खूप छान गझल.
निवडक दहात नोंद!!!
<< पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे
वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे) >> क्या बात है!!!
गझल आवडली. तिसर्या शेरातील
गझल आवडली.
तिसर्या शेरातील 'अन' उगाचच आला आहे असे वाटते.
गणेशजी, विशेष आभार!! अजयजी,
गणेशजी, विशेष आभार!!
अजयजी, मीटरसाठी एक गुरु कमी पडत होताच.. पण अन् ऐवजी मग वापरला तर? अर्थछटा किंचित बदलते असं मला वाटतं.. सध्या मला "मग" हाच योग्य वाटतोय...
व्वा क्या बात है नचिकेत ...
व्वा क्या बात है नचिकेत ... एकदम मस्त हळुवार गज़ल..
पाऊस, संप फार आवडले....!!!!
बाप रे,काय मस्त लिहता हो
बाप रे,काय मस्त लिहता हो तुम्हि.?
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला पाहिजे)
कव्स कशाला टाक्ला?
व्वा छान गझल नचिकेत... पाठ
व्वा छान गझल नचिकेत...
पाठ फिरवुन जायला अन् तू सखे वळशीलही
पावलांनाही तुझा निर्धार पटला पाहिजे
काळजाच्या वेदनांचा संप मिटला पाहिजे >>> शेर आणि मिसरा दोन्ही आवडले पण एक शंका आहे फोनवर बोलूयात
पाठ फिरवुन जावयाला तू भले वळशीलही
पावलांना पण तुझा निर्धार पटला पाहिजे
हे कसे वाटतेय?
धन्यवाद बाळकवी. मिल्या thanks
धन्यवाद बाळकवी.
मिल्या thanks रे..
फोनवर नक्की बोलू.
तुझा बदलही ठीक वाटतोय.. त्यातला तो भले शब्द perfect आहे...
वाह... वाह... वाह... अप्रतिम
वाह... वाह... वाह... अप्रतिम
सर्वच शेर आवडले , सूंदर गझल
सर्वच शेर आवडले , सूंदर गझल
वाह..
वाह..
हर्षल, किरणजी,
हर्षल, किरणजी, मयुरेश
धन्यवाद!
सुंदर.
सुंदर.
नचिकेत... आटला नाही कधीही
नचिकेत...
आटला नाही कधीही आठवांचा हा झरा
आत माझ्या खोल त्याचा उगम असला पाहिजे
तुझा शेर वाचला अन काळजाच्या पायथ्याचि आठवन झाली, पण अन खटकतोय...
बाकि आशयसंपन्न अशी गझल आहे...
मतला भावला
शुभेच्छा.......
आवडली!
आवडली!