२ कप कणिक,
३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी,
१/२ कप कनोला ऑइल्/वेजीटेबल ऑइल/क्रिस्को,
१/२ कप घट्ट दही,
२ मध्यम अंडी(१ व्हाईट १अक्खे (लो फॅट आहे ना)),
१ चमचा बेकींग सोडा, १ चमचा बेकींग पावडर,
सिनामन,
वॅनिला इसेन्स,
अर्धा कप साखर/मेपल सिरप,
( मी आधी इथे लिहिलेली कारण ब्लॉग वर संकलित करायची होती पण बर्याच मायबोलीकरांनी विचारली म्हणून परत इथे लिहिली.)
आधीच ओवन ३७५ वर ओवन चालून करून ठेवा.
१) कणीक बेकिंग पॉवडर व बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या.
२) केळी सोलून 'हातानेच' मॅश करून घ्यायची. त्यातच सिनामन, मीठ किंचीत व दही टाकून मिसळायचे. मग साखर टाकून मग ऑईल टाकून एकजीव करा व बाजूला ठेवायचे.
३) एक आक्खे अंडे वेगळ्या बोल मध्ये फेटून घ्यायचे दर दुसरे अंड्याचे पांढरे फक्त घ्यायचे. इसेन्स टाकून दोन्ही मस्त फेटून घ्यायचे व वरील मिश्रणात मिक्स करा.
४) हळूहळू कणीक मिक्स करून घ्या व अलगद हाताने ढवळा मिश्रण. आता त्यात अक्रोड, बेदाणे वगैरे टाका.
ओवन मध्ये २५ मिनीटे बेक करा. सुइ घालून पहा झालाय का मग थंड होवून काढा. एक स्लाईस बरोबर वॅनीला आईसक्रीम व स्लाईसवर चॉकलेट सॉस टाका, मस्त लागते. हे खाल्ले तर लो कॅलरी रहाणार नाही मग.
चॉकलेट सॉस:
कुठल्याही आवडती डार्क चॉकलेट घेवून अर्थ बॅलेन्स मध्ये विरघळून मग त्यात साखर व क्रीम/एवापोरेटेड मिल्क पॉवडर जराशीच घालून डबल बॉइलर मध्ये विरघळून घ्यायचे. जर लहान मुलांना द्यायचे नसेल तर ह्या मिश्रणात जरासे थंड झाले की त्यातच cognac नाहीतर expresso टाकायची. एकदम रिच टच येतो साध्या केकला. थंडीत एकदम मस्तच.
कोणी केलाच हा ब्रेड तर फोटो टाका इथे. मला आवडेल. माझे फोटो हरवलेत ह्या ब्रेडचे.
१.मिश्रण खूप घट्ट झालेच तर जरासे दूध मिक्स करा.
२. बे़कींग सोड्याला वास येतो असे बर्याचदा एकले म्हणून त्याल ऑप्शन म्हणून " डबल अॅक्टींग बेकींग पॉवडर वापर". ती वापरत असाल तर फक्त वरील मिश्रणात दिड चमचाच घ्या.
छान आहे पाकृ यात थोडा अक्रोड
छान आहे पाकृ
यात थोडा अक्रोड किंवा बदामाचा भरड चुरा घालायचा मस्त नटी फ्लेवर येतो
बनाना ब्रेड बरोबर कॅरॅमल सॉस किंवा व्हॅनिला कस्टर्ड किंवा दोन्ही पण खुप मस्त लागत
धन्स!! ब्लॉग सुरु झालाय का??
धन्स!! ब्लॉग सुरु झालाय का?? मला लिन्क पाठव हं!!
वा.. आज करुन पाहते आणि टाकते
वा.. आज करुन पाहते आणि टाकते फोटो..
साधना, फोटो टाकच पण थोडा
साधना, फोटो टाकच पण थोडा पाठवून पण दे, cognac टाकून खायला
मनु, खूप खूप धन्यवाद ग.
मनु, खूप खूप धन्यवाद ग.
आशु, कुरिअर करते. मनु,
आशु, कुरिअर करते.
मनु, तुझ्या इतर रेसिपीज पण जमतील तर टाक ना इथे. नाहीतर ब्लॉग सुरू करुन लिंक तरी दे
धन्यावाद सगळ्याना. हळूहळू
धन्यावाद सगळ्याना.
हळूहळू टाकते इथे सर्व रेसीपी. पण ब्लॉगचे म्हणाल तर त्याला लॉगीन करूनच ५-६ महिने झालेत. ४-५ रेसेपी लिहिल्या मग कामामूळे फिरत होते व आता बरे नसल्याने बहुधा वेळ लागेल. त्याआधी इथेच लिहिते रेसीपी व ब्लॉग झाला पुर्ण की देते लिंक.
मनःस्विनी, तुझ्या बर्याच
मनःस्विनी, तुझ्या बर्याच रेसिपी वाचल्या आहेत आणि काहि करूनहि पाहिल्या आहेत. सगळ्याच रेसिपी छान असतात तुझ्या. मागे एक eggplant hummas ची रेसिपी दिली होतीस ती देशिल का परत? मी करुन बघावी म्हणुन खुप शोधली पण सापडत नाहीये..
दिप्ती, तू हे म्हणतेस
दिप्ती, तू हे म्हणतेस का?
http://www.maayboli.com/node/12332
http://www.maayboli.com/node/4983
(तुला विपू कशी बघायची माहीती आहे का? नाही तिथे दिली नाही कारण मला तरी मी नवीन असताना विपू माहित न्हवती काय प्रकार तो. ):)
..
..
हो,हो हेच कित्ति दिवस शोधत
हो,हो हेच कित्ति दिवस शोधत होते मी. thanks.
..
..
मस्त रेसिपी !! धन्स मनस्विनी
मस्त रेसिपी !! धन्स मनस्विनी हा फोटो तुझ्यासाठी
छान आहे रेसिपी. या प्रमाणात
छान आहे रेसिपी. या प्रमाणात ४ लोकांसाठी होईल का?
हो अंजली मेजरींग कप्स वापरून
हो अंजली
मेजरींग कप्स वापरून वरील प्रमाणे केलेस तर.. भरपूर होईल चार जणांसाठी
ओके धन्यवाद
ओके धन्यवाद
ही कृती लिस्ट् वर
ही कृती लिस्ट् वर आहे....झेपणेबल वाट्तेय....:)
वरचा फोटु पण मस्तच आहे.....
मागे फु ने वरून एक झुकिनी ब्रेड केला होता....
अवांतर या प्रकाराला सरळ केक का नाहि म्हणत? चव अल्मोस्ट तशीच असते निदान ब्रेड इतकी तरी अगोड नसते...असो ब ब दे मे छो छो बा...;)
छान झाला ब्रेड. फक्त एक
छान झाला ब्रेड. फक्त एक प्रश्न हा खूप स्पाँजी होत नाही का? माझा थोडा दडसल्यासारखा झालाय पण चव मस्स्स्त धन्यवाद इतक्या सोप्या रेसिपीसाठी.
जमला मला पण. ओव्हन नसल्याने
जमला मला पण. ओव्हन नसल्याने जरा कटकटी झाल्या, पण वर्थ इट!
छान झालाय. मेपल सिरप
छान झालाय. मेपल सिरप वापरल.थोडा कमी गोड झालाय. पण ब्रेकफास्टसाठी मस्तच.