१ कप बारीक रवा
१ कप आंब्याचा रस - फ्रेश/पल्प/टीन ( मी टीन मधला वापरला संपवायचा होता म्हणून..)
१/२ कप साखर ( गोडीनुसार प्रमाण कमी-अधिक करावे.)
१/४ कप तेल (कनोला/रिफाईंड/melted unsalted butter हि वापरता येईल. )
१ टीस्पून बेकींग पावडर
१ टीस्पून बेकींग सोडा
१ टीस्पून वेलची पावडर (नाही टाकली तरी चालेल)
बदामाचे पातळ उभे स्लाईस सजावटीसाठी
एका मोठ्या बोलमधे रवा, तेल, वेलची पावडर ,बेकींग पावडर,बेकींग सोडा एकत्र करा.
यात साख्रर आणि आंब्याचा रस घालून मिश्रण एकजिव करुन घ्या
बेकींग ट्रे /डिश्/पॅन जराचे तेल लावुन तयार ठेवा
बोलमधले सगळे मिश्रणं बेकींग ट्रेमधे घालून त्यावर बदामाचे काप पसरवा.
ओवनमधे ३७५ डिग्रि फॅरनहाईट्ला २०-२५ मिनिटे बेक करा.
टुथ पिक टेस्ट करुन बघा. केक तयार झाला असेल तर गार झाल्यावर कट करुन खा.
गरम केक तेवढाच चवदार लागतो.
ड्रायफ्रुट मिश्रणात टाकता येतील.
एकदम झट्पट होणारी रेसीपी... just mix and bake...
ही रेसिपी
ही रेसिपी http://evolvingtastes.blogspot.com/2010/07/easy-mango-cake.html इथली आहे.
Red Chilies, The Budding Cook या ब्लॉगवरची आहे.