परग्रहवासी आणि मनुष्यजन्म

Submitted by गुंड्याभाऊ on 29 August, 2010 - 07:07

तसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच". आणि मनुष्यजन्माचा एक विलक्षण पैलु समोर आला, का कोण जाणे पण पुस्तकाचे एक एक पान वाचताना हेच विचार मनात येत होते कि यस्स कदचित इतके वर्ष जे प्रश्न मनाला भेडसावतायत त्यांची उत्तरे हेच पुस्तक देणार.
याचे कारण की लहान पणा पासुन माणुसाचे पुर्वज माकड होते हा डर्विन चा एकच सीद्धांत आपल्याला शीकवला गेला आहे त्यामुळे या विषयाचा कोणता दुसराही पैलु असु शकतो याचा आपण विचार नाहि केला.....हे पुस्तक ज्या मुळ इंग्रजी पुस्तकाचा (चॅरीऑट्स ऑफ गॉड) अनुवाद आहे त्याचे लेखक व शास्त्रज्ञ एरीक वॉन डॅनिकन याने डर्विन च्या सीद्धांताला आव्हान देत स्वतःचे संशोधन मांडले कि देव हे खरेतर अंतरळातील प्रवासी, हजारो वर्षापुर्वी हे प्रवासी पृथ्विवर आले आणि त्यांनी एक जीव निर्माण केला तो म्हणजे माणुस तेव्हा पासुन ते सतत एक चांगला माणुस बनविण्यासाठी धडपडतायत, ते दर सदतीस हजार वर्षांनी पृथ्विवर येतात चांगल्याना ठेवतात व निकृष्टांना नष्ट करतात. हे संशोधन करताना जगभर फिरुन अब्जाधिश डॅनिकन अगदी कफल्लक झाला, आणि पुन्हा आपल्या केलेल्या संशोधनाच्या जोरावर अब्जाधिश झाला. आज जगभरातुन असंख्य शास्त्रज्ञ डॅनिकन च्या या विचारावर संशोधन करीत आहेत. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णि हे त्या पैकीच एक. सुलभ मराठी भाषेत थक्क करणारी माहिती.(पण हे पुस्तक वाचताना मनाला वेदना होऊ शकतात).काही विचार करण्यास भाग पाडणारी माहिती जसे, १) नॉर्वे ला केंद्रबिंदु मानुन हजारो वर्षापुर्वि हरणाच्या कातडी वर चित्रीत केलेला जगाचा नकाशा, ज्या मध्ये अंटार्क्टीका चा बर्फाच्छिदीत भूभाग अचुक नोंदवला आहे जो आजच्या आधुनिक लेजर तंद्र्ज्ञानाने तयार केलेल्या नकाशाशी तंतोतंत जुळतो.जे तेव्हा माणसाला जमणे शक्यच नव्ह्ते कारण कोणत्याही प्रदेशाचा नीश्चित आकार ठरविण्यासाठी काही ठरावीक उंचीवर जावे लागते, पण जीथे विमानाचा शोधच दिड-दोनशे वर्षापुर्वि लागला तेथे हजारो वर्षापुर्वि मानवाला जगाचा नकाशा काढणे केवळ अशक्यच.हे त्यावेळी आपल्या अवकाशयानातुन पृथ्विवर येणाऱ्या परग्रहवासियांचेच काम असणार. २) ईजीप्त चा "द ग्रेट पिरामीड ऑफ गीझा" म्हणतात सुमारे साडे चार हजार वर्षापुर्वी मानवाने याची निर्मिती केली. एरीक वॉन डॅनिकन च्या मते तो पिरॅमीड तयार करण्यासाठी सुमारे सव्विस लाख दगड वापरले आहेत आणि ते सुद्धा एक एक दगड कमीतकमी दहा ते बारा टन वजनाचा. आज आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जरी ईतक्या वजनाचे पंधरा दगड जरी माणसाने एकावर एक रचले तरी विक्रम होईल. तर त्या काळी हे कसे शक्य झाले असेल याचि कल्पनाच केलेली बरी. शिवाय त्या पिरॅमिडची प्रत्येक बाजु हि पृथ्विला बरोबर मधुन छेदते, ते कसे? ....... सर्वच माहिती येथे नाही लीहीता येणार. तुम्ही सुद्धा हे किंवा या विषयावर काही वाचले असेल तर जरुर कळवा. ( बाळ भागवतांचे "देव छे ! परग्रहावरील अंतराळविर" हे सुद्धा य विषयावरील एक छान पुस्तक आहे...)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश, एरिक अन ती पुस्तके, त्यापैकी एक पुस्तक नशिबानेच नुकतेच वाचायला मिळाले (दुसर्याचे होते, वाचुन परत केले) अन नेमके तेव्हाच हिस्ट्री चॅनेलवर यावरच दाखवित होते, तेव्हा गुगल वरुन ती ती ठिकाणे, माहिती वगैरेही चाळली. त्यात तथ्य आहेच्च, व असेच "पुरावे" नाहीत म्हणून सोडून देता येत नाही.
संशोधक, होय, बरोबर. माझ्या इथे डिस्कव्हरीच्या दोन तिच चॅनेल सोबतच एका मागोमाग ही चॅनेल्स दिसतात म्हणुन नावात गोंधळ झाला होता. धन्यवाद.

"पुरावे" नाहीत म्हणून सोडून देता येत नाही. >>
पुरावे नाहीत म्हणुन सरसकट सोडुन देणे, जुन्या संस्कृतींना नावे ठेवणे हे एक टोक झाले.
व पुरावे नाहीत, अर्थवट / अप्रत्यक्ष सुचक गोष्टी आहेत म्हणुन लगेच स्वतःच्या मनानेच असेच होते, पुरावे अझ्युम करणे हे दुसरे टोक झाले.
जे जेवढे आहे तेवढेच मान्य करावे. पण बाकी साठी संशोधनही करावे. असे जुन्या संस्कृतीबद्दल संशोधन करणा-यांना हसु नये.

असे जुन्या संस्कृतीबद्दल संशोधन करणा-यांना हसु नये.
<<
अहो,

कसलं संशोधन? गणपतीचं मुंडकं उडवलं, तर मग तिथे हत्तीचं कशाला बसवलं? जे कापलं, ते परत जोडायला काय होत होतं?

हत्तीचं कापून आणलं अन ते जोडलं, ही प्लॅस्टीक सर्जरी, असल्या बाष्कळ स्टेटमेंट्सनी, जे खरेखुरे पायोनियर्स आपल्या देशात होऊन गेले, त्यांची पत जाते त्याचं काय?

सुश्रुत हा खरेच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक आहे. अन जगातले सगळेच सर्जन्स हे मान्य करतात. कपाळावरील कातडीचा पेडिकल ग्राफ्ट घेऊन नाक कापायची शिक्षा दिलेल्या लोकांसाठी तो चक्क नवे नाक तयार करी! त्यासाठीची सर्जिकल प्रोसिजर, त्याने डिझाईन केलेली इन्स्ट्रूमेंट्स. हे सगळं डॉक्युमेंटेड उपलब्ध आहे.

पण म्हणून गणपतीचे शिर जोडणे ही प्लॅस्टीक सर्जरी असे तुम्ही बरळत असाल, तर केवळ तुमच्यासारखे ज्या पदावर आहेत, त्या पदावरून केलेल्या असल्या विदुषकी वक्तव्यांमुळे आपल्याच देशाची मान खाली होते.

पण म्हणून गणपतीचे शिर जोडणे ही प्लॅस्टीक सर्जरी असे तुम्ही बरळत असाल,
>>
ओके,
मी असे कुठे बरळलो त्याची लिंक द्या.
आहे का?
-------------------

  1. मी कधीपासुन तुम्ही जे म्हणताय तेच म्हणतोय. मी जे म्हणतोय तेच तुम्ही म्हणताय.
  2. सुश्रुताचे मान्य करा आणि पुढे चला. गणपतीचे मान्य नाही , त्याचे पुरावेही नाहीत सोडुन द्या.
  3. त्यावरुन त्यावेळच्या संस्कृतीला / समुहाला हसु नका / बदना करु नका. एखाद्याला स्वखर्चाने गणपतीवर संशोधन करायचे असेल, तर त्याचे त्याला करु द्या. त्याचे स्वतःचे निष्कर्ष येऊ द्या. तुमचे लादु नका.

हा शेवटचा मुद्दा तुमचा आणि माझा वेगळा होतो आहे.

प्राचीन काळात भारतात विश्वगुरु कोण होते ? कुठल्या गुरुच्या च्या प्रतिमाएँ विश्वभरात स्थापित आहेत ?
विश्वगुरु कोण होते ? कोणाचे तत्वज्ञानाचे विश्व भरात अनूसरण केले जाते ? कोणाचे तत्वज्ञान विश्वभरा मधे पसरले गेले मान्य झाले ? कशा मुळे? कोणा मुळे भारताला जगभरात ओळखले जाते? जगभरात उत्खनानात कोणाच्या
प्रतिमा सर्वाधिक सापडल्या सापडत आहेत?

या धाग्याचा विषय गणपतीही नाही आणि सुश्रुतही नाही, त्यामुळे वरील चर्चेला आमच्याकडून पास.

ज्यांना इंटरेस्ट आहे अशा वाचकांनी ही लिन्क पाहून स्वतःच काय ते ठरवावे.

https://www.youtube.com/watch?v=OtBfBGCaABU

'हिस्ट्री टीवी १८' वर 'एन्शिएन्ट एलियन्स' या कार्यक्र्मात प्रत्येक मान्यता प्राप्त देवांना त्यांनी एलियन्स ठरवले आहे
बौद्ध धर्मियांच्या पॅगोडा'ज ला पण ते एलियन्स चे पृथ्वीवर उतरलेल्या यानाची प्रतिकृती मानतात.
त्यांचे जर सगळे खरे मानले तर सगळे देव मोडित निघतात मग त्यांच्या पुजा अर्चेचे काय औचित्य,महत्व?

>>>>> त्यांचे जर सगळे खरे मानले तर सगळे देव मोडित निघतात मग त्यांच्या पुजा अर्चेचे काय औचित्य,महत्व? <<<<< Lol
देव् मोडित् निघतात् वा निघतील् ते जरा बाजुलाच ठेवा हो. पण जर रामायण महाभारत कालिन व्यक्तिरेखा, देवीमाहात्म्य, व इतर पुराणांतील व्यक्तिरेखा, किंवा ज्यांना आम्ही "देव म्हणतो" ते ते सर्व एलियन्स होते असे म्हणले तरी किमान हिंदुंना काहि फरक पडतच नाही, कारण पृथ्विपेक्षाही वेगळ्या ठिकाणी कुठेतरी पाताळ आहे, स्वर्ग आहे, शेषशाई विष्णु आहे अशी हिंदूंची मान्यता आहेच्चे.... किंबहुना हिंदुंचे देव हे "अंतराळातुन पृथ्वीवर मानवाच्या कल्याणासाठीच" आलेत... Wink तेव्हा हिंदुचे देव मोडित निघतील की कसे याची काळजि करुन कृपयाच हिरमुसले होऊ नये Lol

बाकी पुजा अर्चा व जे जाळण्याकरता काहीजण परत परत उठतात ते वेदसाहित्य हे ज्या भाषेत आहे, त्या भाषेलाही "देववाणीच" म्हणतात, अन कुणी सांगाव? वरील उपपत्ती खरीच असेल, तर पृथ्वीच्या हिताकरता झटणार्‍या एलियन्सची भाषा/त्यांना समजु शकेल अशी भाषा केवळ "संस्कृत" हीच असेल?
तेव्हा बाकी सोडून द्या पुजा अर्चा वगैरे, पण देववाणी शिकुन घ्यायलाच हवी बर्का..... हो ना, उगाच समोर एखादा एलियन (देव?) पॅगोडाच्या रथातुन आयमीन यानातुन बसुन समोर आलाच, तरी त्याच्याशी मग बोलणार कोणत्या भाषेत? Wink तिथे अमकी भाषा पेठी, तमकी भाषा लादलेली , ढमकी भाषा प्रस्थापितांची वगैरे बयादी चालणार नाहीत हो..... Happy
मी तर बोवा आत्तापासुनच संस्कृत अभ्यास सुरु करणार, गंभिरतेने. Happy

आता कदाचित एखादी उपपत्ती अशीही निघु शकेल की गेल्या काही थोडक्याच वर्षात अचानकपणे भारताने जी अंतराळक्षेत्रात प्रगती केली आहे, त्यास देखील अशाच कुणा एलियन्सनी मार्गदर्शन केले नसेल कशावरुन? Wink Lol

"मध्यंतरी" रोमन लोकांच्या सिमेंटचे तंत्रज्ञानही गायब झाले होते. अंदाजे १००० वर्षानंतर आधुनिक माणसाल ते परत सापडले. मग यावरुन रोमन लोक परग्रहवासी होते असे म्हणता येईल का?
असे म्हणन्याएवजी या मधल्या हजारो वर्षाते ते तंत्रज्ञान गावब का झाले याचा शोध नको का घ्यायला?

मुद्दा अगदी बरोबर

पण कित्येक टनाचे दगड एकावर एक रचुन ( सिव्हिल इंजिनीयरींग सध्याचे तंत्रज्ञान नव्हते अश्या काळात ) ज्या आकृती दिसत आहेत त्या मानव निर्मीत नाहीत असे मानायला तर्क आहे किंवा नाही कारण

तंत्रज्ञान गायब होऊ शकेल कारण तंत्रज्ञानाचे डॉक्युमेंट्स बनवायचे ते युग नव्हते. एखादा माणुस किंवा त्याच्या कुटुंबातल्या अनेक पिढ्या एखादे तंत्रज्ञान विकसीत करायच्या. काही कारणाने पुढच्या पिढीत कुणी ते केले नाही तर ते तंत्र तिथेच संपत असेल.

पृथ्वीवर.... मी वाचले, मला आवडले. एक वेगळा विचार म्हणून बघायला काय हरकत आहे.

त्यात जी आश्चर्ये दिली आहेत त्यामागचे कोडे अजून उलगडले नाही. म्हणून ते पुढे कधी उलगडणार नाही असे नाहीय. फक्त माझ्या हयातीत यातली काही कोडी उलगडावीत अशी माझी इच्छा आहे. बाकी परग्रहवासी वगैरेवर माझा सध्या तरी विश्वास नाही, पुढचे बघू. विज्ञान रोज नवनवीन गोष्टी पुढे आणून ठेवत असते.

एरिश फोन डॅनिकेन बद्दल इथे वाचा. त्याने क्लेम केलेल्या बहुतेक गोष्टी खर्‍या नाहीत आणि त्याने रचलेल्या आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/Erich_von_D%C3%A4niken

Pages