स्मोकड सामन चे छोटे बिट्स १/४ पाउंड - होल फूड्स, वेगमन्स, ट्रेडर जो वगैरे ठिकाणी स्मोकड सामन चे छोटे स्क्रॅप्स वजनावर विकतात. तसले तुकडे. मोठे ( महागडे ) सामन पीसेस आणून हा प्रकार करू नये
पातीचा कांदा २-३, पांढरा भाग अन हिरवा भाग वेगवेगळे बारीक चिरून
क्रीम चीझ १/२ कप
मेयो १/४ कप
शॅलट्स किंवा लाल कांदा अगदी बारीक चिरून १/४ कप
हिरवे ऑलिव्ह्स किंवा कॉर्निशाँ बारीक चिरून किंवा केपर्स २-३ टेबलस्पून - आंबटपणा अन क्र्ंच साठी
एखादी सेरानो किंवा थायबर्ड मिरची बारीक चिरून
२-३ काड्या कोथिंबीर बारीक चिरून
मीठ , मिरपूड चवी प्रमाणे
मेयो अन क्रीम चीझ एकत्र फेटून घ्यावे .
त्यात कांदा, शॅलटस, ऑलिव्ह्स, कोथिंबीर, मिरची घालून मिसळून घ्यावे.
शेवटी हलक्या हाताने सामनचे तुकडे मिक्स करावेत. मीठ अगदी थोडे लागेल. चव बघून मीठ घालावे.
फ्रेंच ब्रेडच्या स्लाइसेसवर किंवा क्रॅकर्सवर घालून सर्व्ह करावे. ६-७ तास आधी करुन फ्रिज मधे ठेवता येईल. त्यापेक्षा जास्त मी कधी ठेवून पाहिले नाही.
यात कधी कधी छोटे चेरी टॉमेटो अर्धे चिरून घालते मी.
मेधा मस्त आहे...मी कोथिंबीर
मेधा मस्त आहे...मी कोथिंबीर कधी घतली नाही..
केपर्स पण बारीक चिरून छान लागतील या मधे.