आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2010 - 05:31

आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.

2010_MB_AamchyakaDachaaGanapatee.jpg

सगळ्या मायबोलीकरांच्या सूचनांचा विचार करून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी हा कार्यक्रम ठेवला आहे. इथे तुमच्या घरच्या, सोसायटीतल्या, मंडळातल्या किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवाबद्दल लिहा. पण इथवरच न थांबता पर्यावरणातील संभाव्य धोक्यांचा विचार करून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही स्वागतार्ह बदल केलेत कां? उदाहरणार्थ - गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणायला सुरुवात केली किंवा गणेशमूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यासाठी मूर्तीचा आकार कमी केला किंवा मखर करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करणं बंद केलं इ.इ. असे बदल केले असतील तर ते इथे आवर्जून लिहा जेणेकरून इतर मायबोलीकरांना प्रेरणा मिळेल.

तसंच तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपक मस्तच... अस्सल सेलिब्रेशन.. ढोल बरोबर.. ताशा आणि झांजपथक मिसिंग.. पुढच्या वेळेस नक्की.

चंपक.. सिडनीमधे ढोल बांधणारे अन पानं आवळणारी लोकं आहेत काय ?

नील वेद - द्रोण ची आयडीया एकदम भारी.
जयवी, योगमहे - सुंदर सजावट.
रेशिम - गणपतिंचे चित्र सुरेख काढ्लये.

घरी मुर्ती बनवणार्या सर्व जणांचे खूप खूप कोतुक.

गणपती बाप्पा मोरया !

हा आमचा मागिल वर्षीचा गणपती. आमचा गणपती साखरचौतीला म्हणजे येणार्‍या संकष्टिला असतो म्हणून ह्या वर्षीचा फोटो पुढल्या वर्षी. पण आम्ही दर वर्षी थर्माकोलचा मखर न बनवता फुलांचे डेकोरेशन करतो. ह्यामुळे नंतर फुकट जाणारे व पोलुशनला कारणीभुत असणारे थर्माकोल वापरले जात नाही. व गणेशाची पुजाही अगदी सुटसुटीतपणे करता येते.
Ganapati.JPG

"गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!"

आमच्या घरी विराजमान झालेले लाडके बाप्पा

बाप्पांचे खास फ़ोटो सेशन

पुण्यातले पहिले पाच मानाचे गणपती आणि बरोबर प्रचंड गर्दी खेचणारे चार महत्त्वाचे गणपती..

DSC06468_1.JPG

श्री कसबा गणपती ---------

DSC06476_1.JPG

पालखीत बसलेला श्री कसबा गणपती ---

DSC06475_1.JPG

तांबडी जोगेश्वरी गणपती ----------

DSC06473_1.JPG

गुरुजी तालीम मंडळ गणपती ----------

DSC06471_1.JPG

तुळशीबाग गणपती ------------

DSC06466_1.JPGDSC06467_1.JPG

केसरीवाडा गणपती ------------

DSC06479_1.JPG

अखिल मंडई गणपती - शारदा गजानन -------------

DSC06443_1.JPG

पालखीत बसलेले शारदा गजानन

DSC06442_1.JPG

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अर्थात सुवर्णयुग तरुण मंडळ ---------

DSC06463_1.JPG

यंदाच्या देखाव्याचा महाल ---

DSC06453_1.JPG

आणि त्या महालाची सुरक्षा बघाण्यासाठी असलेला वनराज ---

DSC06456_1.JPG

महालातील एक झुंबर ---

DSC06462_1.JPG

नेहमीपेक्षा वेगळ्या कोनातून ---

DSC06455_1.JPG

हुतात्मा बाबूगेनू मंडळ ---------------

DSC06446_1.JPGDSC06447_1.JPG

श्री जिलब्या मारुती मंडळ ----------------

DSC06441_1.JPG

वा हिम्या, मस्त प्रचि सगळीच.. धन्यवाद.

हा आमच्या घरचा गणपती. सांगलीला ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती बसतो, त्यांच्या सगळ्यांकडे फळांचे तोरण बांधायची पद्धत आहे (इतर गावातही असेल, पण मला कल्पना नाही). दीड दिवस, कारण नंतर फळं खराब व्हायची शक्यता असते. आमचा गणपती देव्हार्‍यात बसवतात. सजावटीला फक्त बागेतली फुलं आणि पत्री वापरली आहेत. ही मूर्ती अगदी छोटी असते दर वर्षी, ८ इंचांची. गावातले एक पारंपारिक मूर्तीकार आहेत, ते ह्या एकाच साच्यात मूर्ती घडवतात आणि समस्त चुलत चुलत कुटुंबही त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतात.. पहिल्या दिवशी ज्यांच्याकडे दर्शनाला जाऊ, सगळ्यांकडे एकाच साच्यातली, एकसारखी दिसणारी मूर्ती Happy

IMGP0120.JPGIMGP0132.JPG

क्लोज-अपः

IMGP0123.JPG

हिम्सकूल खुप खुप धन्यवाद.
घरबसल्या सगळ्या गणपतींचं दर्शन झालं.

सगळ्यांचे बाप्पा खूप सुंदर! स्वतः मूर्ती बनवणार्‍यांचे विशेष कौतुक!
हिम्सकूल, धन्यवाद पुण्याच्या सगळ्या गणपतींचे दर्शन घडवल्याबद्दल.

इथे तुमच्याकडचा गणपती तर आवर्जून लिहाच पण त्याबरोबर पर्यावरणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्याकडच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही बदल केले असतील तर ते इथे जरूर लिहा. >>

इथे चेन्नईत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करायला परवानगी नाही..त्यामुळे ज्यांना विसर्जन करायचं असतं ते लोक "मातीच्या गणपतींचं" विसर्जन करतात..अश्या मातीच्या मूर्त्या बाजारात मिळतात पण त्या अजिबात रंगवलेल्या नसतात. आणि मुळात त्या मातीच्या अस्तात कि नाही याची ही शंका मला होती..
आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेतली आणि पुढे पाच वर्षे त्याच मूर्तीची प्रतिष्टापना करणार आहोत.

हडपसर-ससाणेनगर परिसरातील काही गणपती

१) IMG_2535 (Medium).JPG

याच मंडळाचा दहिहंडीचा हलता देखावा केला होता

[IMG_2532 (Medium).JPG

२) इथे पण हलता देखावाच होता, पण ती कोपर्‍यातील मूर्ती काही शेवटपर्यंत हालली नाही Wink

IMG_2542 (Medium).JPG

३) हिंगणे आळीतील मंडळाने केलेला "संत तुकारामांचे वैकुंठगमन" ह देखावा.

IMG_2549 (Medium).JPG

४) IMG_2554 (Medium).JPG

५) ससाणेनगरमधील एक गणपती

IMG_2583 (Medium).JPG

६) सोलापूर रस्त्यावरील मंडळाचा गणपती

IMG_2592 (Medium).JPG

७) युथ क्लब, मंडई येथील शिर्डी मंदिराची प्रतिकृती

IMG_2538 (Small).JPG

आणि हा बाप्पासाठी प्रसाद Happy

IMG_2445 (Medium).JPG[

Pages