सुखाचे दिवस चालले असतांना अचानक आयुष्यात येणाऱ्या थोड्या थोडक्या दुखांनाही ....दुखांना म्हणण्या पेक्षा अडचणीनाहि मनुष्य घाबरायला लागतो.सुख म्हणा किवा दुख म्हणा क्षणिक असतात हे पुरेपूर माहिती असतं, पण मन ते मानायला तयारच नसतं. आपल्याला हवे तसे किवा असे म्हणता येईल ज्यात सुख वाटते, आनंद मिळतो असेच क्षण असेच दिवस माझ्या वाट्याला यायला हवे असे प्रत्येकाला वाटत असते पण विधीचा विधान थोडाच बदलता येतो.
रात्रीला झोप आली नाही म्हणून आजचा सुर्यनारायण जरा उशीरा उगवला तर किती बर होईल, अस जरी वाटत असलं तरी सूर्य कधी आपली वेळ टाळेल काय? पाण्यात पडलेला दगड जसा बुडणारच, अगदी आपल्याला नको वाटला तरीही. पण हे सर्व समजत असलं तरी परिस्थिती आली कि एरवी नेट धरून हिम्मतीने कोणाच्याही
पाठीशी उभे राहून सांत्वन करणाऱ्या मनुष्याला किती हतबल व्हायला होत हे त्याच तोच जाणतो. परिस्थितीने येणारी विवशता इथवर कशी आणून सोडते काळातही नाही.
पण......पण 'क्षणिक'
माझ्या जीवनात सुख क्षणिक होत मानणाराने हेही मानायलाच हवं, नियतीचा खेळ हा निव्वळ कृरच नसतो. उलट मी तर म्हणेन कि तो सुखदच जास्त असतो. दुख ओढवून आणता येत नाही. ते कधीतरी अचानक येऊन ठाकत. पण सुख तर क्षणातून, मनातून, आकाशातून, निसर्गातून, हवेतून, प्रेमातून- रागातून, हसण्यातून- रडण्यातून इतकाच नाहीतर चांगल्यातून अन वाईटतूनही शोधून आणता येत. हो ना?
(No subject)
धन्यवाद!
धन्यवाद!
छान जमल आहे. अजून फूलवायला
छान जमल आहे.
अजून फूलवायला होता लेख.
धन्यवद गुल, पुढे आणखी प्रयत्न
धन्यवद गुल, पुढे आणखी प्रयत्न करते.