Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ किलो चिकन साफ करुन धुवुन
२ बटाटे फोडी करुन
ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या.
हिंग, हळद,
चवीप्रमाणे मिठ
१ लिंबु
गरम मसाला १ चमचा
तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे.
मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.
वाढणी/प्रमाण:
५-६ जणांसाठी
अधिक टिपा:
बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते.
ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
वहीनी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागु धन्स कांदा - खोबर वाटण
जागु धन्स
कांदा - खोबर वाटण असलेली पाकक्रुती सांग ना .
हे सगळे एकत्र चोळावे. तेलावर
हे सगळे एकत्र चोळावे.

तेलावर मिश्रण घालुन बटाटे घालुन वाफेवर शिजत ठेवावे.

हे आहे तयार ग्रिन चिकन

तोंपासु एकदम. पाणि टाकायची
तोंपासु एकदम.
पाणि टाकायची गरज नाही का
वर्षा अजिबात पाणि नको. अग
वर्षा अजिबात पाणि नको. अग चिकनच्या कढई किंवा टोपावर ताट ठेउन त्यावर पाणी ठेवायचे. मग खाली चांगली वाफ तयार होते. तसेही चिकनला शिजवल्यावर पाणी सुटते. पण जर तुला ग्रेव्ही हवी असेल तर पाणी गरजे प्रमाणे टाक.
अश्विनी....डायरेक्ट २रा/ ३रा
अश्विनी....डायरेक्ट २रा/ ३रा फोटो बघ! पहिला फोटो तु पाहणारच नाहीस...
अश्विनी दिसल्या जागीच गायब
अश्विनी दिसल्या जागीच गायब होईल पहिल्या फोटोने.
जागु
जागु
मस्त तोंपासु ...
मस्त तोंपासु ...
अश्विनी....डायरेक्ट २रा/ ३रा
अश्विनी....डायरेक्ट २रा/ ३रा फोटो बघ! पहिला फोटो तु पाहणारच नाहीस...>>> अगदी अगदी गं
कसंतरीच झालं.
बाकीचे फोटो उंधियो सारखे दिसताहेत.
बाकीचे फोटो उंधियो सारखे
बाकीचे फोटो उंधियो सारखे दिसताहेत.>>> अरेरे.. आशु काय ग हे.
ही पण मस्त आहे ग पाकृ
ही पण मस्त आहे ग पाकृ

नवरोबाला आवडेल
बोनलेस चिकन घ्यायचं की
बोनलेस चिकन घ्यायचं की हाडांसकट ?
सहीच फोटो. मी बटाटे नाही
सहीच फोटो. मी बटाटे नाही घालत, पण कांदा घालते. चांगलं लागतं ते पण.
या गटारीला हाच बेत करावा का या विचारात पडलेय.
जागू, धन्यवाद. मी तळलेला
जागू, धन्यवाद.
मी तळलेला कांदा वाटून घालते(ओले, सुके खोबरे, तीळ, खसखस ऑप्शनल). बडीशेप पण वाटणात घेते. आणि चिकनला मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट लावून मुरवत ठेवते. गरम मसाला आख्खाच फोडणीत घालते.
पराग, चालत असेल तर हाड असलेले चिकन घे. चव चांगली येते.
हा फोटो-

"ग्रीन" चिकन असं हवं. लालू,
"ग्रीन" चिकन असं हवं. लालू, तू तुझी कृती शेप्रेट टाक.
मी चिकन नेहमी(करी वा कोणतेही
मी चिकन नेहमी(करी वा कोणतेही ग्रेव्ही करताना) , व्होल फूडमधले फिले वापरते. मी आधी २/३ मि. परवते व नन्तर पाणी टाकुन ३/४ मि.च शिजवते पण तरी चिकन नेहमी च्युयी होते असे माझी मुलगी तक्रार करत राहते. टेन्डर राहावे यासठी कसे शिजवावे? किती मिनीटे शिजवावे?
बोनलेस चिकन घ्यायचं की
बोनलेस चिकन घ्यायचं की हाडांसकट ? >> पग्या खरा खवय्या असशील तर मग तु बोनलेस चिकन खाणार नाहीस कधी
खायला मला काही प्रॉब्लेम
खायला मला काही प्रॉब्लेम नाही... करायची वेळ आली तर हाडं वगैरे नको वाटतात.
अमेरिकेत बुचरकडे किंवा हलाल
अमेरिकेत बुचरकडे किंवा हलाल मीट स्टोअर मधे घेतलं चिकन तर ते पाहिजे तसे तुकडे करून देतात.
ग्रोसरीमधल्या पेक्षा थोडं महाग पडतं, पण विथ बोन पाहिजे असेल तर तो चांगला पर्याय आहे.
"पब्लिक्स" मधे त्यांच्या
"पब्लिक्स" मधे त्यांच्या स्वतःच्या "ग्रीनवाईज" ब्रँडचं चिकन मिळतं. हे ऑरगॅनिक असतं. आणी तिथे तुम्ही होल चिकन सिलेक्ट केलं की तुम्हाला हवे तसे विथ किंवा विदाऊट बोन पीसेस करून मिळतात. हलाल मीटचं दुकान अगदीच जवळ नसेल तर हा एक चांगला पर्याय आहे.
जागू ताई तिकडे पारंपारीक चिकनच्या रेसेपी वर प्रश्ण विचारलाय. उत्तर द्याना.
लाजो, सिंडरेला धन्स, पराग, मी
लाजो, सिंडरेला धन्स,
पराग, मी नेहमी हाडांसकटच घेते.
चिंगि अग करुनच टाक बघ आवडेल.
लालू ,तेही मी नेहमी करते, पण ग्रिन चिकन कधीतरी चेंज म्हणुन करते.
मिरा, चिकन हे मटणापेक्षा खुप जलद शिजत. अग बटाटा शिजला की मी पाहते तेंव्हा चिकन शिजलेल असते. बटाट्या एवढाच वेळ चिकन शिजायला लागतो. बटाटा टाकत नसशिल तर उकळी आल्यावर ५ मिनीटांनी शिजलय का ते तोडून बघत रहा.
मिनी, अगदी बरोबर.
मेघा, अमेरीकेच्या ज्ञानाबद्दल मी ०.
प्रॅडी तुम्हाला उत्तर दिल आहे.
अगं त्या 'ग्रीन चिकन'मध्येच
अगं त्या 'ग्रीन चिकन'मध्येच मी वर लिहिलेल्या गोष्टीही घालते असं म्हणायचं होतं.
मी ग्रीन चिकन बनवताना चिकन
मी ग्रीन चिकन बनवताना चिकन शिजले की उरतायच्या आधी अर्धी मुठ किंवा त्यापेक्षाही कमी असा वाळलेल्या मेथीपानांचा चुरा टाकते. खुप छान चव येते मेथीपानांमुळे.
साधना मीही आता टाकुन बघेन.
साधना मीही आता टाकुन बघेन.
जागु चिकनात बटाटे? बटाटे
जागु चिकनात बटाटे?
बटाटे घालण्याचं काही विशिष्ट कारण?