Submitted by अविकुमार on 2 August, 2010 - 14:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ मध्यम आकाराचे बटाटे
२ छोटे चमचे तेल
लाल तिखट
२ छोटे चमचे जिरे
चवीपुरते मिठ
क्रमवार पाककृती:
१. बटाटे स्वच्छ धूवून घेऊन 'साले न काढता' त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
२. जाड बूडाच्या भांड्यात तेल आणि जिर्याची फोडणी करावी.
३. आता त्यात बटाटे आणि चवीपुरते मिठ टाकून मोठ्या आचेवर बटाटे शिजू द्यावेत. झाकण ठेवू नये. अशाप्रकारे बटाटे शिजायला साधारण १० मिनीटे लागतील. बटाते सतत हलवत रहावे लागतात.
४. आता बटाट्यांवर लाल तिखट भुरभुरावे आणि पुन्हा निट हलवून घेऊन मंद आचेवर पूर्णपणे शिजू द्यावे. मंद आचेमुळे शिजलेले बटाटे क्रिस्पी होतात.
५. लिंबू पिळून गरम गरमच खायला घ्यावे!
वाढणी/प्रमाण:
१-२
अधिक टिपा:
उपवासाशिवाय बनवायचे असेल तर जिर्याऐवजी मोहरीची फोडणी एकदम मस्त लागते. तसेच चाट मसाला भुरभुरला तर अजून मस्त!
माहितीचा स्रोत:
उसगावातील एक पंजाबी मित्र.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा प्रकार ओव्हनमध्ये पण मस्त
हा प्रकार ओव्हनमध्ये पण मस्त होतो. चाट मसाला वगैरे घालून जेवणात स्टार्टर म्हणून करायला एकदम सोपा आणि टेस्टी.
म्हणजे, ओव्हन मधे बटाट्याच्या
म्हणजे, ओव्हन मधे बटाट्याच्या फोडींवर तेल, मिठ आणि मिरची भुरभुरुन ठेवून द्यायचं असंच का रुनी? माझा आपला एक अंदाज.
हो टिकी आहे की चाट?
हो टिकी आहे की चाट?
भरत नावात काय आहे ? अवि याला
भरत नावात काय आहे ?
अवि याला टिक्की म्हणता येणार नाही, कारण टिक्की म्हणजे गोलाकार चपटी वस्तू.
हा प्रकार मी न तळता, बटाटे वगैरे कंद भाजून करतो.
माझ्याकडे असलेली कृती :
माझ्याकडे असलेली कृती : मायक्रोवेव्ह चाट
बटाटे उकडून साले काढून घनाकार (क्युब) कापून त्यावर तेल शिंपडून नीट ढवळायचे, कोथिंबीर, भाजलेल्या जिर्याची पूड, सैंधवे मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेल्या हि.मिरच्या घालून नीट ढवळून १ मिनिट मावे. करायचे. खायला देताना बटाट्याचे वेफर्स चुरून घालून द्यायचे.