लीक चे सूप

Submitted by मेधा on 30 July, 2010 - 17:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लीक ची एक जुडी ( ३-४ मध्यम आकाराचे लीक )
१ पांढरा कांदा
१ मध्यम बटाटा
कपभर दूध
१ चमचा बटर
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
मीठ, मिरपूड

क्रमवार पाककृती: 

लीकचा पांढरा भाग कापून स्वच्छ धुउन घ्यावा. त्यात चिकार वाळू असते. त्यामुळे व्यवस्थित धुणे मस्ट आहे.
लीक, कांदा , बटाटा ( साल काढून) बारिक चिरावा.
पातेल्यात तेल व बटर गरम करुन त्यावर कांदा व लीक पारदर्शक होईपर्यंत परतावे. मग बटाटे घालून जरा परतावे. मग दूध व २ कप पाणी घालून मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत शिजवावे. दूध उतू जाणार नाही याकडे लक्ष असू द्यावे. चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालावी.
बटाटे शिजले की सुप थोडे गार होऊ द्यावे व इमर्शन ब्लेंडर ने मिसळून घ्यावे. हे सूप रुम टेम्परेचर ला सर्व्ह करतात

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोक
अधिक टिपा: 

ही अगदी लो कॅल रेसिपी आहे. मूळ रेसिपीमधे भरपूर क्रीम , बटर असते.

माहितीचा स्रोत: 
नेट, फूड नेटवर्क वर पाहून प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users