चार शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या लिंबाएवढा गूळ, चार पाच कोकमे, अर्धा कप तांदळाचे पिठ, दोन कांदे, लाल तिखट, हळद, हिंग, जिरे,मीठ, तेल
शेंगांचे बोटभर लांबीचे तूकडे करून घ्या. कांदा उभा पातळ चिरुन घ्या.
तेलाची हिंग हळद जिर्याची फोडणी करुन घ्या.
त्यावर कांदा टाकून लालसर करुन घ्या. त्यावर शेंगाचे तूकडे टाकून जरा परता,
मग त्यावर तीन चार कप पाणी टाका. उकळी आली, कि गॅस मंद करुन, अर्धवट
झाकण ठेवून, शेंगा शिजवून घ्या.
मग त्यात आमसूले व लाल तिखट टाका. (तिखट हवे तर कांद्याबरोबर परतूनही घेऊ
शकता, पण ते करपणार नाही, याची काळजी घ्या.)
जरा उकळले कि गूळ घाला, तांदळाचे पिठ थोड्या पाण्यात मिसळून टाका व रस
दाट झाला, कि उतरा.
भातावर घेता येते, किंवा नूसतेही पिता येते.
याला आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते, तांदळाचे पिठ नसल्यास थोडी भाजलेली कणीक घ्या. बेसनाने तितकी चांगली चव येत नाही. लसूण, कोथिंबीर घालू शकता, पण गरज नाही.
वा काय छान रेसीपी वाटतेय.
वा काय छान रेसीपी वाटतेय. लगेच करुन खाविशि वाटतेय. आता भारतात जाइ पर्यंत थांबवे लागेल पण.
वा छान आहे रेसिपी दिनेशदा.
वा छान आहे रेसिपी दिनेशदा.
मस्तच... करुन पाहते.
मस्तच... करुन पाहते.
दिनेशदा जेवणातला माझा एक
दिनेशदा जेवणातला माझा एक आवडता घटक\
जी आमटी असेल तर फक्त आमटी पोळी वर जेवण भागते
शेंगोळ्या नावाचा एक अप्रतिम
शेंगोळ्या नावाचा एक अप्रतिम पदार्थ घरी आई करते. हुलग्याच्या पिठापासून करतात
दिनेशदा अगदि ह्याच पद्धती ने
दिनेशदा अगदि ह्याच पद्धती ने करते हि आमटि , छान लागते!
भारीच वाटतेय. करुन पाहीन.
भारीच वाटतेय. करुन पाहीन. थँक्यु.
नेहमीच्या शेंगाच्या कढी आणि वरणापेक्षा वेगळा प्रकार.
हा प्रकार खरेच मस्त लागतो.
हा प्रकार खरेच मस्त लागतो. मला दहिभाताबरोबर खायला आवडते.
हेही करून पहायला हवं. [
हेही करून पहायला हवं.
[ कोकणात जिर्याऐवजी मोहरी वापरतात. धणे व किसलेल्या नारळाचा रस घालतात. मी तर रस काढताना मिक्सरमध्येच थोडा कांदा व तांदळाचे पिठ टाकतो. मग ग्रेव्ही छान जमून येते.<<मला दहिभाताबरोबर खायला आवडते.>> अगदी खरंय ! दह्याबरोबर याचा पोत व रंग पण उभारून येतो !! ]