१२५ ग्रॅम चॉकलेट स्लॅब. मी चॉकलेटं करण्यासाठी स्लॅब विकत आणलेली , त्यामुळे ती वापरली. त्याजागी प्लेन कॅडबरी डेअरीमिल्क वापरले तरी चालेल.
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर. मी अमुल बटर वापरले
३ अंडी
पाऊण कप साखर
पाव कप मैदा
१. ओवन २०० डिग्री सेल्सिअसला तापायला लावा.
२. चॉक्लेट आणि बटर एकत्र विरघळवुन घ्या. गॅसवर करायचे असेल तर पाव भांडे भरुन पाणी गरम करत ठेवा आणि त्यात अर्धे आत/अर्धे बाहेर राहिल असे दुसरे एक भांडे बसवुन त्यात चॉक्लेट आणि बटर टाकुन विरघळवा. थेट गॅसवर चॉक्लेट आणि बटर ठेऊन विरघळवु नका. ही स्टेप मायक्रोवेवमध्येही करता येईल.
३. अंडी (योकसकट), साखर आणि मैदा एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. बेकींग पावडरची गरज नाही.
४. वरील मिश्रण चांगले फेटले की त्यात चॉकलेटचे मिश्रण थोडे थोडे घाला. (थोडे मिश्रण घाला, सगळे चांगले मिक्स करा, परत थोडे घाला, मिक्स करा असे सगळे चॉकलेट संपेपर्यंत करा)
५. माझ्याकडे छोटे केक्स बेक करायची वेगळी भांडी नाहीत म्हणुन मी आपले चहाचे सिरॅमिक कप वापरले. कप्सना आतुन बटर लावुन घ्या. आणि प्रत्येकात कप ३/४ भरेल इतके मिश्रण ओता.
६. ओवनमध्ये मोजुन १० मिनिटे बेक करा.
७. बाहेर काढुन दोन मिनिटे थंड होऊ द्या. मग केकच्या बाजुने सुरी फिरवुन केक सोडवुन घ्या, कपावर छोटी ताटली ठेऊन कप उलटा करुन केक बाहेर काढा.
८. गरमगरम खायला द्या...
१. केक मोजुन १० मिनिटे बेक करा. जास्त वेळ बेक केल्यास केक पुर्णपणे बेक होतो आणि लाव्हा रस पाहिल्याचा आनंद मुलांना मिळत नाही. तसेच केक करुन बराच वेळ झाल्यासही लाव्हा सुकतो. त्यामुळे जराजरा गरम असतानाच मुलांना द्या.
२. मावेत हा केक नीट होत नाही. मुलीने करुन पाहिला पण मावेतला केक आतुन बाहेर बेक होत आला त्यामुळे सेंटर बेक झाले आणि लाव्हा बाहेरच्या बाजुला राहिला
रुपाली, कुकरमध्ये केला तरी
रुपाली, कुकरमध्ये केला तरी चालेल वाटते. ते लाव्हा वगैरे बाहेर वाहायचा ऑप्शन ड्रॉप करुन ४५ मिनिटांऐवजी १५-२० मिनिटे बेक केलास तर केक पुर्ण बेक होईल, तोही चवीला चांगला लागतो. मस्त मऊ स्पॉन्जी होतो.
साधनाताई धन्यवाद.. आता या
साधनाताई धन्यवाद..
आता या रविवारीच ट्राय करुया म्हणतेय; नंतर श्रावण चालु होईल.. 
पण मग मला आच जरा मोठी ठेवावी लागेल का? आणि कप मध्येच करु का?
रुपाली, कुकरमध्ये केक कसा
रुपाली, कुकरमध्ये केक कसा करता सांगाल का?
मी नेहमी ओहनमध्येच करते.
साधना, खुपच छान पाककृती.
उद्या टाकेन पर्फेक्ट रेसीपी
उद्या टाकेन पर्फेक्ट रेसीपी आईला प्रमाण विचारुन...
काल हा उद्याग केला. केक मस्तच
काल हा उद्याग केला. केक मस्तच झाला.. लेक खुष अगदी.
फोटो काढावा म्हणुन बाहेर काढला तर जास्त पातळ असल्याने नीट निघाला नाही.
माझ्या मते १० मिनीट बेकींग कमी वाटले.. १४ मिनीट केल्यावर हवा तसा झाला.
साधना धन्स ग.. खुप पैसे वाचतील आता.( डॉमिनोज मधे खाल्ल्यापासुन सारखा हवा होता त्याला ) आणि आपण केल्याचे समाधान
मी माबो वर जनरली रोमात असते.
मी माबो वर जनरली रोमात असते. आज जवळ-जवळ एका वर्षाने माबो वर actively लिहित्ये.

तुमची ही रेसिपी वाचली, लगेच करून बघितली आणि शाब्बासकी सुद्धा मिळवली..
पण माबो वर येऊन, रेसिपी बघून केली आणि धन्स सुद्धा दिले नाहीत असा करायला मी कृतघ्न नाहीये.. त्यामुळे खूप खूप धन्स..तुमच्या रेसिपी मुळे मला खूप 'ब्राऊनी' points मिळाले..
मुग्धा..
मुग्धा..
मी करुन पाहिले. मस्त झाले.
मी करुन पाहिले. मस्त झाले. प्रमाण अगदी योग्य आहे. धन्यवाद साधना.
पाककृती तंतोतंत फॉलो केली. पण
पाककृती तंतोतंत फॉलो केली. पण १० मिनिटांच्या (फार तर ११ झाली असतील) बेकिंगमधे लाव्याचा दगड झाला. मा. का. चु.?
एक शंका: साधे मग अवन किंवा
एक शंका: साधे मग अवन किंवा मावेच्या कन्व्हेक्शन मधे बेक करताना तडा जाऊन फुटत नाहीत का?>>>> ते मग ला ओपाला चे आहेत ते मावे सेफ आहेत. त्यावर कपाच्या तळाशी खालील बाजुस मावे सेफ लिहीलेले असते. साधे कप फुटतील.
पाककृती छान आहे.
पण १० मिनिटांच्या (फार तर ११
पण १० मिनिटांच्या (फार तर ११ झाली असतील) बेकिंगमधे लाव्याचा दगड झाला. मा. का. चु.?
कदाचित २०० डिग्री तापमान लाव्याला आवडले नसेल. १० मिनिटांसाठी थोडे कमी ठेवले किंवा तापमान वाढवुन वेळ कमी केला तरी लावा प्रवाही होईल असे वाटते.
माझा लाव्हासुद्धा कधी वाहलाय तर कधी गोठलाय. पण गंमत म्हणजे जे काही होते ते खुप मस्त लागते. जरी केक झाला तरी छान लागतो. फक्त कॅलरीजच भरपुर आहेत यात म्हणुन हल्ली करत नाही.
Pages