Submitted by uju on 22 July, 2010 - 04:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
बारीक चिरलेली सिमला मिरची (४), बारीक चिरलेली काकडी (३),हिंग, मीठ, तेल
क्रमवार पाककृती:
पॅनमध्ये तेल तापवून त्यात हिंग परतून त्यात बारीक चिरलेली सिमला व काकडी घालून मीठ घालून पाच ते आठ मिनीट वाफेवर शिजवावी.भाजी लगेच तयार होते.
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
अधिक टिपा:
फूलक्या सोबत मस्त लागते. कोणाला ओळखताच येत नाही नक्की कशाची आहे भाजी ते .
माहितीचा स्रोत:
मैत्रिण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वेगळाच प्रकार. सुचली कशी ?
वेगळाच प्रकार. सुचली कशी ?
काकडीचे पाणी सुटत नाही का?
काकडीचे पाणी सुटत नाही का?
दिनेशदा, ही बहुधा सिंधी
दिनेशदा, ही बहुधा सिंधी प्रकारची भाजी आहे. हो ना उजू?
>>पाच ते आठ मिनीट वाफेवर
>>पाच ते आठ मिनीट वाफेवर शिजवा>><<
म्हणजे झाकण ठेवून त्यावर पाणि घालून शिजवायची ना?
दिनेशदा मैत्रिणीने
दिनेशदा मैत्रिणीने सांगितली.
अकु,सिंधी रेसिपी नाहीये ग ही.
मी अमि, हो वाफेवर म्हणजे तू म्हणते तशीच, फक्त शिजल्यावर झाकण काढून कोरडी होइस्तोवर परतवून घ्यायची.
फक्त खूप मउ नाही शिजवायची भाजी, आणि हिंग पण थोडा जास्तच घालायचा नेहमीपेक्षा फोडणीला.
मस्तच लागते.
उजु, मी काल केली होती ही
उजु, मी काल केली होती ही भाजी. मस्त झाली होती. गेले दोन-तीन दिवस काही ना काही निमित्तानं खूप तिखट खाल्ले होते. काल ही साधी बिनतिखटाची पण खमंग भाजी खूप आवडली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तु टॅगमध्ये 'सिंधी' का
तु टॅगमध्ये 'सिंधी' का घातलय्स?
मी पण परवा फक्त काकडीची भाजी
मी पण परवा फक्त काकडीची भाजी केली होती.
तेल, मीठ वगैरे सांभाळून घालावं लागतं.. कारण या भाजीला ते खूप कमी लागतं.
भारी आयड्या. काल पास्त्यात
भारी आयड्या. काल पास्त्यात घालून पाहिलं हे काँम्बीनेशन. खूप छान वाटलं.
अरे, या भाजीला मसाला काहीच
अरे, या भाजीला मसाला काहीच नाही का? तरी मस्त लागते का? करायलाच हवी मग!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)