बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल.....श्री ज्ञानदेव.....तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय

Submitted by vaibhavayare123... on 21 July, 2010 - 00:20

विठ्ठ्ल विठ्ठ्ल गजरी.....अवघी दुमदुमली पंढरी....
माऊली माऊली’ असा घोष करणार्‍या त्या वारकर्‍यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू जमले... थरथरणार्‍या शरीरांनी जमिनीवर माथा टेकून पंढरीच्या पांडुरंगापुढे त्यांनी हजेरी लावली. चेहर्‍यावर तृप्ती, हृदयात अन् मावेल इतका आनंद... वैष्णवांनी पंढरपूर नगरी फुलून गेली....
Rath.jpg

तहान भुक विसरुन, ऊन पावसाची आणि वय व्याधींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो मैल पायी चालत येणारे हे वारकरी खरोखरचं धन्य......
Vaarkari1.jpg

या विठुचा.... ग़जर हरी नामाचा झेडा रोविला.......या संतांचा....संतांचा...मेळा गोपाळांचा डाव मांडिला...
Dahi handi.jpg

मजल दरमजल करीत सर्व वारकरी विठुरायाच्या या पंढरी नगरीत दाखल होतात.....आणि लांबुनच मंदिराच कळस दिसताच जल्लोषाने गजर सुरु होतात......ज्ञानोबा माऊली...तुकाराम..........
Temlpe colour.jpg

शेवटी भेट होते त्या सावळ्या विठोबाच्या भक्तीत तन मन हरपलेले वारकरी आणि आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या सावळ्या विठोबाची...
ते सावळं, साजिरं मनोहर, पितांबर ल्यायलेलं ते रुपडं पाहताच भक्ताचा सगळा शिण क्षणात नाहिसा होतो. डोळ्यांत अश्रु दाटुन येतात आणि दाटलेल्या कंठातुन सहज शब्द येतात....याचसाठी केला अट्टाहास...अखेरचा दिस गोड व्हावा
बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल.....श्री ज्ञानदेव.....तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय
vitthal.jpg
लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन भक्त एकच मागणं मागतो

हेचि दान देगा देवा.....तुझा विसर ना व्हावा....
विसर ना व्हावा.....तुझा विसर ना व्हावा......
गुण गाईन आवडी...हेचि माझी सर्व जोडी.....
माझी सर्व जोडी....हेचि माझी सर्व जोडी.....
नलगे मुक्ति धन संपदा......संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी..
घालावे आम्हासी.....सुखे घालावे आम्हासी..
गुण गाईन आवडी...हेचि माझी सर्व जोडी.....
माझी सर्व जोडी....हेचि माझी सर्व जोडी.....
हेचि माझी सर्व जोडी.....हेचि माझी सर्व जोडी.....
बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल.....श्री ज्ञानदेव.....तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय

गुलमोहर: 

Happy

बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल.....श्री ज्ञानदेव.....तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय....!!!

छान फोटो आहेत. जय हरी विठ्ठ्ल!!

यु ट्युबवर विठुरायाच्या अभिषेकाचा व्हिडीओ पाहिला आणि आता हे फोटो, छान वाटले खुप.