मधुसूदन सत्पाळकर स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध-स्पर्धेचे आयोजन
मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक कै. मधुसूदन सत्पाळकर ह्यांच्या १२ ऑक्टोबर ह्या स्मृतिदिनी गेल्या वर्षापासून राज्यव्यापी निबंध-स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही त्यांच्या सातव्या स्मृतिदीनी एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लोकशाहीची सर्वसामान्य व्याख्या सारेच जाणतात. तरीही आज प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात त्याविषयी शंका आहे. ती शंका आम्हाला जाणून घ्यायची आहे. कदाचित त्यातूनच लोकशाही सशक्त आणि सुदृढ बनण्याचे मार्ग सापडतील आणि लोकशाही समृद्धिची स्वप्नं पाहणार्या सामान्य जनतेला दिशा मिळेल. यासाठी या निबंध स्पर्धेचे विषय आहेत ’भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?’ व ’लोकशाही समृद्धिसाठी राजकीय मानसिकता बदलण्याचे मार्ग.’
यापैकी कोणत्याही एका विषयावर आपण सुमारे २५०० ते ३००० शब्दमर्यादेत लिहून २०ऑगस्ट २०१० पर्यंत आमच्याकडे पाठवावेत. मान्यवर परीक्षकांकडून निवडल्या गेलेल्या निबंधास प्रथम क्रमांक (रु. १५,०००/-), द्वितीय क्रमांक( रू. १०,०००/-) आणी तृतीय क्रमांक (रू. ५,०००/-) अशी रोख रकमेची पारितोषिकं स्मृतिचिन्हासह दिली जातील.
हा समारंभ १२ ऑक्टोबर २०१० रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत थाटात साजरा होईल. याच कार्यक्रमात याच दोन विषयांवर मान्यवरांच्या सहभागाने परिसंवाद होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा अधिकाधिक यशस्वी करावी.
संपर्क: मैत्रेय मास कम्युनिकेशन सर्विसेस प्रा. लि.
पारधी हाऊस,तिसरा मजला, एम.जी.रोड, जैनमंदिरासमोर, बॅंक ऑफ इंडियाच्या वर,
विलेपार्ले (पू), मुंबई- ४०० ०५७ फोन (०२२) २६१०१०१६, २६१५०३५८
फोनवर संपर्क साधण्याची वेळ: सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
ही माहीती, मला मैत्रेय प्रकाशनाशी संबंधित असे माझे मित्र श्री. मनोज आचार्य ह्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
संपादकांना विचारणा अशी की हे
संपादकांना विचारणा अशी की हे निवेदन मुदत संपेपर्यंत वाचकांच्या नजरेसमोर राहावे म्हणून मुखपृष्ठावर ठेवता येईल काय?
निबंधासाठीचे दोन्ही विषय
निबंधासाठीचे दोन्ही विषय चांगलेच आहेत. या स्पर्धेत नक्कीच सहभागी होणार.