Submitted by अवल on 3 July, 2010 - 09:53
( हे चित्र नव्याने काढले आहे. खालची कवितामात्र आधीचीच !)
घरचे सारे काम, अन सासूचा पहारा
संध्याकाळची वेळ, अन सा-यांच्याच नजरा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
कालिंदीचा तट, तिथे गोपांचा मेळावा
कदंबाची सावली, जिथे सगळ्यांना विसावा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
मनीची मझ्या घालमेल, त्यात तुझा पुकारा
होते कालवाकालव, मन पिसाटवारा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
गोळा झाले सारे, गोकुळ भोवती तुझ्या
राहिले नाही भान, जनाजनास सा-या
आता हरकत नाही, सख्या वाजव तुझा पावा कृष्णा , वाजव ना पावा !
गुलमोहर:
शेअर करा
नंदिनी, >>>या वयात का होइना
नंदिनी, >>>या वयात का होइना तुला चित्र काढता येतय हे नशीब.<<< अगं मान्य आहे पन्नाशी जवळ आलीय माझी पण "ह्या वयात" वाचल्यावर मला मी जख्ख म्हातारी झाल्यासारखं वाटल
पण तरीही आवडलं, मला अशी जख्ख म्हातारी पण तरीही लिहिती-वाचती म्हातारी व्हायला आवडेल 
भूषण, विपु पहाल ?
अरू चित्रं आणि कविता दोन्ही
अरू चित्रं आणि कविता दोन्ही अप्रतिम... अगदी पूरक एकमेकांना..
वा, हे देखील अवगत आहे तुला
वा, हे देखील अवगत आहे तुला ???
"ह्या वयात" वाचल्यावर मला मी जख्ख म्हातारी झाल्यासारखं वाटल >>> एवढ्या कला आहेत तुझ्याकडे, तू कधीच म्हातारी होऊ शकत नाहीस....
अह्हा ! खुप सुंदर !
अह्हा ! खुप सुंदर !
वा! अप्रतिम! चेहरा सुंदर जमला
वा! अप्रतिम! चेहरा सुंदर जमला आहे. डोळे, नाक, ओठ, ओठातले हसु... सुंदर्...पाहुन मन प्रसन्न झाले.
आरतीताई,कविता माहित होतीच पण
आरतीताई,कविता माहित होतीच पण तिला साजेसे चित्रही खूपच सुरेख आलेय!
फारच छान. कान्हा आणि त्याची
फारच छान. कान्हा आणि त्याची मुरली अगदी जवळची आहे.
चेहर्यावरचे भाव खूप सुंदर उतरलेत.
Pages