2017मध्ये सरस खेळाचे प्रदर्शन दाखवणार्या श्रीकांतचा दुबईमध्ये मात्र पराभव झाला. सिंधूने राउंड रॉबिनचे तिन्ही सामने जिंकले व आज चेन युफेईचा पराभव करून अंतिम फेरीत पोचली आहे. सिंधुचा अंतिम सामना आकाने यामागूचीशी आहे. यामागूचीला तिने राउंड रॉबिनमध्ये हारवले आहे.
दुबई वर्षाखेरीच्या स्पर्धेत फक्त 8 अग्रमानांकित खेळाडूना आमंत्रण असते. चार जणांचा एक असे दोन ग्रुप पाडून त्यात प्रथम राउंड रॉबिन पद्धतीने सामने होतात. प्रत्येक ग्रुपमधले दोन विजेते उपांत्य सामन्यात पोचतात व मग शेवटी अंतिम सामना.
सिंधू महिला एकेरीतील ली चाँग वेई होत आहे की काय? वर्षभर उत्तम खेळ करायचा, आणि मोक्याच्या स्पर्धात रजतपदकावर समाधान मानायचे. साईनाविरुद्ध चीनची भिंत होती, सिंधुविरुद्ध जपानी त्सुनामी येते दरवेळी
काल सिंधू जरा आजारी वाटत होती.. दुसर्या गेम मधे ५ - ० आघाडीवर होती, आणि तिथून मॅच जाण्याची सुरुवात झाली.. तो पर्यंत सहज जिंकेल असे वाटत होते पण अचानकच मॅच फिरली,, यामागुचीनी खेळात कमालीचा बदल केला.. काही रॅलीज मधे तर गेम चा स्पीड एकदम अचानक वाढवला, सिंधू मध्यम पेसच्या गेमच्या अपेक्षेनेच खेळत होती पण एकदम आणि सिंधूच्या टाळता येऊ शकणार्या चुका चांगल्याच वाढल्या.. काही सिंपल चुका फार महाग ठरल्या.. दोन सर्व्हीस फॉल्ट्स, आणि सहज जिंकता येणार्या गुणांमध्ये शटल बाहेर जाणे हे फारच दुखदायी होते.. समालोचक पण म्हणत होते की सिंधू तिचा सर्वोत्तम खेळ खेळत नाहीये.. पण एकूणच मॅच मस्त झाली.. पण जबरदस्त नाही झाली... तरी पण हे वर्ष सिंधूसाठी फलदायीच म्हणावे लागेल..
Submitted by हिम्सकूल on 18 December, 2017 - 01:27
श्रीकांत किदम्बीचे हर्दिक अभिनंदन... कालच त्याला वर्ल्ड नंबर १ चे रँकींग जाहिरे झाले आहे...
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत आपल्या संघाने जबरदस्त प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकले आहे.. मलेशिया विरुद्धची फायनल मॅच मस्त झाली.. श्रीकांत ने ली चाँग वे ला किरकोळीत हारवले आहे. आता एकेरी आणि दुहेरीच्या स्पर्धा सुरु आहेत. त्याच्यात बघू काय होतंय ते..
दोन ते तीन पदकं मिळायची अपेक्षा आहे.
सायना आणि कश्यप यांना पुढील वैवाहिक आयुष्य समृद्धीचे आणि यशस्वी जावो ही सदिच्छा.
2018च्या बॅडमिंटन वर्ल्ड फायनल्समध्ये सिंधू सलग तिसऱ्या वेळेस. आता तासाभरात तिचा आणि इंटनॉनचा सामना सुरू आहे. सिंधूने पहिली गेम 21 16 घेतली. जवळजवळ पूर्ण वर्चस्व. दुसऱ्या गेममध्ये अत्यंत चुराशीचा खेळ दोघींकडून. शेवटचे 6 पॉईंट तर अटीतटीचे झाले. शेवटी 25 23ने सिंधूने गेम आणि सामना जिंकला.
सिंधू सलग तिसऱ्या वेळेस अंतिम फेरीत
समिर वर्मादेखील उपांत्य फेरीत पोचला आहे आणि त्याचा सामना चीनच्या शी युकी सोबत आहे.
महिला एकेरीत चीनची एकही खेळाडू नाही, पुरुष एकेरीत तसेच तिन्ही दुहेरी सामन्यात केवळ एक (मिश्रमध्ये 2).
जपान बॅडमिंटनमधील नवीन पॉवर हाउस बनले आहे.
भारतासाठी हे वर्ष फार यशस्वी ठरले नाही. श्रीकांतला फॉर्म गवसलाच नाही , समीर वर्माने चांगली कामगिरी केली. सिंधू अंतिम सामने ओळीने हारली. सायनाने अनपेक्षीत दमदार पुनरागमन केले. ती अजून एखाद दोन वर्षे तरी खेळेल असे वाटते आहे आता.
काय सामना सुरू आहे!
सिंधुने सुरुवातीला चांगली आघाडी घेतली, आता ओकूहारा चांगले खेळू लागली आहे.
जिंकली बाई एकदाची पहिला गेम. 14 -6 सिंधू आघाडीवर होती, तिथून ओकूहाराने 16-16 बरोबरी केली आणि मग फक्त सीसॉ सुरू होता.
टेक्टिकल चेस गेम वरून एकदम ब्लिट्झ सुरू व्हावे तसा प्रकार झाला.
दुसऱ्या गेमला सुरुवात.
11-9 सिंधू आघाडीवर दुसऱ्या गेमच्या मध्यंतरात. पुन्हा टेक्टिकल गेम सुरू दोघींचा.
सिंधुला इतके पेशंटली खेळताना क्वचितच पाहिले आहे
2017च्या कोरियन ओपन नंतर सलग 7 अंतिम सामने 2018मध्ये हारल्यावर सिंधूने 2018ची वर्ल्ड फायनल्स अखेरीस जिंकली. What an achievement!!! पहिली भारतीय खेळाडू वर्ल्ड फायनलमध्ये जिंकणारी. यापुर्वी सायना व ज्वाला गुट्टा/दिजू यांनी रजत पदक कमावले आहे.
सिंधू निर्विवादपणे आता आजपर्यंतची भारताची सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे, पदुकोण, गोपी आणि सायनाच्यादेखील वरती एका पायरीवर. टेक या बाव!!
सिंधू सलग तिसऱ्या वर्षी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात! आणि 5वे पदक. आजवर सिंधुने 2 कांस्य आणि 2 रजत पदके वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये मिळवली आहेत.
या वर्षी तिचा खेळ सामान्य राहिला, कुठलीही मोठी स्पर्धा ना ती जिंकली ना फार अंतिम फेरीत पोचली. पण सिंधू बिग स्टेज स्पर्धक आहे. वर्ल्ड फायनल्स, वर्ल्ड चॅम्पिअनशीप, ऑलिंपिक मध्ये तिचा खेळ बहरतो.
बासेलमध्ये चाललेल्या या स्पर्धेत उप-उपांत्य फेरीत तिने ताई तझू यिंग या सध्याच्या आघाडीच्या व खूप अवघड स्पर्धकाला मात दिली, 1गेम पिछाडीवरून. उपांत्य सामन्यात चेन यु फेला फारच किरकोळीत गुंडाळले.
आता उद्या अंतिम सामना तिच्या नेमेसिसविरुद्ध नओमी योकुहारा. योकुहारा स्टॅमिना आणि जिद्द या दोन्ही बाबीत सिंधुला वरचढ आहे.
उद्या सिंधुच्या पडकाचा रंग सोनेरी असावा ही सदिच्छा!
सिंधुने धुव्वा उडवला योकुहाराचा.
2014मध्ये 18 वर्षाच्या उगवत्या ताऱ्याला बाझेलमध्ये स्विस ओपनमध्ये पाहण्याचा योग आला होता. आज तिथेच ती वर्ल्ड चॅम्पियन झाली! एक भारतीय व बॅडमिंटनप्रेमी म्हणून माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस
2017मध्ये सरस खेळाचे प्रदर्शन
2017मध्ये सरस खेळाचे प्रदर्शन दाखवणार्या श्रीकांतचा दुबईमध्ये मात्र पराभव झाला. सिंधूने राउंड रॉबिनचे तिन्ही सामने जिंकले व आज चेन युफेईचा पराभव करून अंतिम फेरीत पोचली आहे. सिंधुचा अंतिम सामना आकाने यामागूचीशी आहे. यामागूचीला तिने राउंड रॉबिनमध्ये हारवले आहे.
दुबई वर्षाखेरीच्या स्पर्धेत फक्त 8 अग्रमानांकित खेळाडूना आमंत्रण असते. चार जणांचा एक असे दोन ग्रुप पाडून त्यात प्रथम राउंड रॉबिन पद्धतीने सामने होतात. प्रत्येक ग्रुपमधले दोन विजेते उपांत्य सामन्यात पोचतात व मग शेवटी अंतिम सामना.
आजची मॅच मस्तं झाली एकदम.
आजची मॅच मस्तं झाली एकदम. दुसऱ्या गेमच्या शेवटी सिंधू ने वेळीच योग्य बदल केला म्हणून बरं झालं.
सिंधू महिला एकेरीतील ली चाँग
सिंधू महिला एकेरीतील ली चाँग वेई होत आहे की काय? वर्षभर उत्तम खेळ करायचा, आणि मोक्याच्या स्पर्धात रजतपदकावर समाधान मानायचे. साईनाविरुद्ध चीनची भिंत होती, सिंधुविरुद्ध जपानी त्सुनामी येते दरवेळी
मिश्र दुहेरी वगळता चीनला एकही विजेतेपद नाही.
काल सिंधू जरा आजारी वाटत होती
काल सिंधू जरा आजारी वाटत होती.. दुसर्या गेम मधे ५ - ० आघाडीवर होती, आणि तिथून मॅच जाण्याची सुरुवात झाली.. तो पर्यंत सहज जिंकेल असे वाटत होते पण अचानकच मॅच फिरली,, यामागुचीनी खेळात कमालीचा बदल केला.. काही रॅलीज मधे तर गेम चा स्पीड एकदम अचानक वाढवला, सिंधू मध्यम पेसच्या गेमच्या अपेक्षेनेच खेळत होती पण एकदम आणि सिंधूच्या टाळता येऊ शकणार्या चुका चांगल्याच वाढल्या.. काही सिंपल चुका फार महाग ठरल्या.. दोन सर्व्हीस फॉल्ट्स, आणि सहज जिंकता येणार्या गुणांमध्ये शटल बाहेर जाणे हे फारच दुखदायी होते.. समालोचक पण म्हणत होते की सिंधू तिचा सर्वोत्तम खेळ खेळत नाहीये.. पण एकूणच मॅच मस्त झाली.. पण जबरदस्त नाही झाली... तरी पण हे वर्ष सिंधूसाठी फलदायीच म्हणावे लागेल..
श्रीकांत किदम्बीचे हर्दिक
श्रीकांत किदम्बीचे हर्दिक अभिनंदन... कालच त्याला वर्ल्ड नंबर १ चे रँकींग जाहिरे झाले आहे...
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत आपल्या संघाने जबरदस्त प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकले आहे.. मलेशिया विरुद्धची फायनल मॅच मस्त झाली.. श्रीकांत ने ली चाँग वे ला किरकोळीत हारवले आहे. आता एकेरी आणि दुहेरीच्या स्पर्धा सुरु आहेत. त्याच्यात बघू काय होतंय ते..
दोन ते तीन पदकं मिळायची अपेक्षा आहे.
सायना आणि कश्यप यांना पुढील
सायना आणि कश्यप यांना पुढील वैवाहिक आयुष्य समृद्धीचे आणि यशस्वी जावो ही सदिच्छा.
2018च्या बॅडमिंटन वर्ल्ड फायनल्समध्ये सिंधू सलग तिसऱ्या वेळेस. आता तासाभरात तिचा आणि इंटनॉनचा सामना सुरू आहे. सिंधूने पहिली गेम 21 16 घेतली. जवळजवळ पूर्ण वर्चस्व. दुसऱ्या गेममध्ये अत्यंत चुराशीचा खेळ दोघींकडून. शेवटचे 6 पॉईंट तर अटीतटीचे झाले. शेवटी 25 23ने सिंधूने गेम आणि सामना जिंकला.
सिंधू सलग तिसऱ्या वेळेस अंतिम फेरीत
समिर वर्मादेखील उपांत्य फेरीत पोचला आहे आणि त्याचा सामना चीनच्या शी युकी सोबत आहे.
महिला एकेरीत चीनची एकही खेळाडू नाही, पुरुष एकेरीत तसेच तिन्ही दुहेरी सामन्यात केवळ एक (मिश्रमध्ये 2).
जपान बॅडमिंटनमधील नवीन पॉवर हाउस बनले आहे.
भारतासाठी हे वर्ष फार यशस्वी ठरले नाही. श्रीकांतला फॉर्म गवसलाच नाही , समीर वर्माने चांगली कामगिरी केली. सिंधू अंतिम सामने ओळीने हारली. सायनाने अनपेक्षीत दमदार पुनरागमन केले. ती अजून एखाद दोन वर्षे तरी खेळेल असे वाटते आहे आता.
समीर वर्मा तीन गेम मध्ये हरला
समीर वर्मा तीन गेम मध्ये हरला सेमी फायनल.
सिंधूची फायनल ओकूहारा विरुद्ध आहे.
समीर वर्मा मस्त खेळला,
समीर वर्मा मस्त खेळला, दुसऱ्या गेममध्ये शेवटचे मोक्याचे पॉईंट्स घेतले असते तर त्याने सामना तिथेच जिंकला असता
काय सामना सुरू आहे!
काय सामना सुरू आहे!
सिंधुने सुरुवातीला चांगली आघाडी घेतली, आता ओकूहारा चांगले खेळू लागली आहे.
जिंकली बाई एकदाची पहिला गेम. 14 -6 सिंधू आघाडीवर होती, तिथून ओकूहाराने 16-16 बरोबरी केली आणि मग फक्त सीसॉ सुरू होता.
टेक्टिकल चेस गेम वरून एकदम ब्लिट्झ सुरू व्हावे तसा प्रकार झाला.
दुसऱ्या गेमला सुरुवात.
11-9 सिंधू आघाडीवर दुसऱ्या गेमच्या मध्यंतरात. पुन्हा टेक्टिकल गेम सुरू दोघींचा.
सिंधुला इतके पेशंटली खेळताना क्वचितच पाहिले आहे
2017च्या कोरियन ओपन नंतर सलग 7 अंतिम सामने 2018मध्ये हारल्यावर सिंधूने 2018ची वर्ल्ड फायनल्स अखेरीस जिंकली. What an achievement!!! पहिली भारतीय खेळाडू वर्ल्ड फायनलमध्ये जिंकणारी. यापुर्वी सायना व ज्वाला गुट्टा/दिजू यांनी रजत पदक कमावले आहे.
सिंधू निर्विवादपणे आता आजपर्यंतची भारताची सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे, पदुकोण, गोपी आणि सायनाच्यादेखील वरती एका पायरीवर. टेक या बाव!!
मॅच बघता आलीच नाही, पण ज्या
मॅच बघता आलीच नाही, पण ज्या पद्धतीचा स्कोर आहे त्या वरून सिंधुनी जबरी मॅच काढलेली आहे.
सिंधू सलग तिसऱ्या वर्षी
सिंधू सलग तिसऱ्या वर्षी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात! आणि 5वे पदक. आजवर सिंधुने 2 कांस्य आणि 2 रजत पदके वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये मिळवली आहेत.
या वर्षी तिचा खेळ सामान्य राहिला, कुठलीही मोठी स्पर्धा ना ती जिंकली ना फार अंतिम फेरीत पोचली. पण सिंधू बिग स्टेज स्पर्धक आहे. वर्ल्ड फायनल्स, वर्ल्ड चॅम्पिअनशीप, ऑलिंपिक मध्ये तिचा खेळ बहरतो.
बासेलमध्ये चाललेल्या या स्पर्धेत उप-उपांत्य फेरीत तिने ताई तझू यिंग या सध्याच्या आघाडीच्या व खूप अवघड स्पर्धकाला मात दिली, 1गेम पिछाडीवरून. उपांत्य सामन्यात चेन यु फेला फारच किरकोळीत गुंडाळले.
आता उद्या अंतिम सामना तिच्या नेमेसिसविरुद्ध नओमी योकुहारा. योकुहारा स्टॅमिना आणि जिद्द या दोन्ही बाबीत सिंधुला वरचढ आहे.
उद्या सिंधुच्या पडकाचा रंग सोनेरी असावा ही सदिच्छा!
सिंधुने धुव्वा उडवला
सिंधुने धुव्वा उडवला योकुहाराचा.
2014मध्ये 18 वर्षाच्या उगवत्या ताऱ्याला बाझेलमध्ये स्विस ओपनमध्ये पाहण्याचा योग आला होता. आज तिथेच ती वर्ल्ड चॅम्पियन झाली! एक भारतीय व बॅडमिंटनप्रेमी म्हणून माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस
लय भारी सिंधू !! मी उठलो तर
लय भारी सिंधू !! मी उठलो तर मॅच संपलीच होती. स्कोअर वरून एकदम एकतर्फी झाल्याच दिसतंय.. जबरीच !!
२०१७ सारखीच आजची मॅच एकतर्फी
२०१७ सारखीच आजची मॅच एकतर्फी झाली. सिंधूने वचपा काढला. अभिनंदन.
रिस्पेक्ट! जबरी!
रिस्पेक्ट! जबरी!
त्रिवार अभिनंदन !!
त्रिवार अभिनंदन !!
बॅडमिंटनमधे नंदू नाटेकरपासून सुरू झालेल्या भारताच्या जागतिक प्रगतिचा कळस !!!
मस्तच. मॅच इतकी एकतर्फी
मस्तच. मॅच इतकी एकतर्फी कुठल्याच फायनलला पाहिली नव्हती. जबरदस्त खेळली सिंधू. मजा आली. काल सुपर संडे ठरला.