छोटे गोल बटाटे ( बेबी पोटॅटो) --१२ ते १४
वाटण
आलं लसूण पेस्ट (१ मोठा चमचा)
ताजी धणे जिरे पूड (१ मोठा चमचा)
ग्रेव्ही साठी साहित्य
जिरं आणी हळद फोडणी साठी
कांदा बारीक चिरलेला ( २ मोठे)
वाईन राईप टोमॅटो बारीक चिरून( २ मोठे)
दही फेटून ( १ मोठा चमचा)
गरम मसाला ( १ छोटा चमचा)
साखर चवीला
मीठ चवी प्रमाणे
तिखट ( आवडी प्रमाणे. जसा तिखट पणा हवं तसं)
पुदिन्याची पानं ( ४-५ )
कसूरी मेथी ( १ छोटा चमचा)
कोथिंबीर (मूठभर बारीक चिरून)
पूर्वतयारी
बटाटे सोलून काट्याने टोचून मिठाच्या पाण्यात चार पाच तास बुडवून ठेवावे. भाजी करायला घेताना त्याच पाण्यात मायक्रोवेव मधे ५-६ मिनिटे उकडून घ्यावेत. चाळणीवर ओतून निथळून घ्यावेत.
कृती
१)एका नॉनस्टिक पॅन मध्ये थोडंसं तेल घालावं. त्यात निथळून घेतलेले बटाटे घालावेत.झाकून थोडा वेळ शिजू द्यावं. मधून मधून ढवळून सगळी कडून लालसर करून घ्यावेत.
२)एकीकडे दुसर्या पातेल्यात थोडं तेल घालून जिरं हळदीची फोडणी करावी.
३)त्यात कांदा परतून घ्यावा.
४) कांदा परतल्यावर आलं लसूण पेस्ट घालावी. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतावे.
५)आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावा.
६)तेल सुटू लागल्यावर तिखट, धणे जिरे पूड्,गरम मसाला घालावा. पुदिन्याची पानं हातानेच तोडून घालावी.
७)थोडं परतून दही घालावं. नीट ढवळून हवं असल्यास थोडं पाणी घालावं. आपल्या आवडी प्रमाणे ग्रेव्ही पातळ करून घ्यावी. मीठ घालावं. जर फार आंबट वाटत असेल तर चिमूटभर साखर घालावी.
८)कसूरी मेथी चुरडून घालावी. आता परतलेले बटाटे घालावेत. मिसळून सारखं करावं.कोथिंबीर घालावी आणी पराठ्या बरोबर गरमा गरम सर्व करावं. ( माझ्या कडे थोडं १/२ न १/२ होतं. गॅस बंद करता करता मी ते घातलं. साधारण छोटी नैवेद्याची वाटी. )हवं असल्यास क्रीम घालता येईल.
प्रेडी मस्तच रेसिपी. हा दम
प्रेडी मस्तच रेसिपी. हा दम आलुचाच प्रकार आहे का ?
वाईन राईप टोमॅटो बारीक चिरून(
वाईन राईप टोमॅटो बारीक चिरून( २ मोठे)>>>>> म्हणजे काय? आपले नेहमीचेच टोमॅटो ना?
@ जागू , अगं मूळ रेसिपी दम
@ जागू , अगं मूळ रेसिपी दम आलूचीच होती. मी थोडे फेरफार केले.
@ मुक्ता, रसरशीत लाल बुंद टोमॅटो घ्यायचे. वाईन ( व्हाईन खरं तर) टोमॅटो हा ईथे उसगावात मिळणारा प्रकार. छान रसरशीत आणी चवीला पण छान असतात. ग्रेव्ही मधे छान मिळून येतात.
मी हिच भाजी चॉप्ड टोमॅटोचा
मी हिच भाजी चॉप्ड टोमॅटोचा टीन मिळतो तो वापरुन करतो. बराच त्रास वाचतो. बेबी पोटॅटो, नूसते तेलातही शिजतात.
हो दिनेशदा, तेलावरही शिजतात
हो दिनेशदा, तेलावरही शिजतात हे बटाटे.
प्रडी, रेसिपी मस्त आहेच, फोटोही टाक जमलं तर.
ज्ञाती धन्यवाद!!अगं नेमका
ज्ञाती धन्यवाद!!अगं नेमका सध्या कॅमेरा नाहीये घरी म्हणून नाही काढता आला फोटो. पुढच्या वेळी काढते.बटाटे तेलावर शिजतात पण ग्रेव्ही मुरायला फार वेळ दिला जात नाही. बरेचदा केल्या केल्या भाजी खाल्ली जाते. मिठाची चव बटाट्यात चांगली मुरावी म्हणून मी ते थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले आणी त्याच पाण्यात ठेवून मायक्रोवेव्ह केले.
.
.