सरंग्याचा रस्सा (कालवण)
सरंग्याच्या तुकड्या ५-६
लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
मिठ चवीनुसार
तेल
वाटण : पाव वाटी ओल खोबर, ५-६ लसुण पाकळ्या, अर्धा इंच आले, १ ते २ मिरच्या, थोडी कोथिंबीर.
सरंगा फ्राय
सरंग्याच्या तुकड्या ५-६
लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या
हिंग, हळद
२ चमचे मसाला
मिठ चवीनुसार
तेल
सरंग्या च्या रस्स्याची पाककृती :
तेलावर लसुण फोडणीला टाकावा. हिंग, हळद, मसाला, वाटण, तुकड्या, चिंचेचा कोळ, मिठ घालून उकळी येउ द्यावी. उकली आल्यावर ४-५ मिनीटे शिजवुण गॅस बंद करावा.
सरंगा फ्राय ची पाककृती.
तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन थोडा वेळ मॅरीनेट करावे. मग तवा तापल्यावर त्यात तेल सोडून लसूण पाकळ्या टाकाव्यात म्हणजे तुकड्यांना खमंग वास येतो. मग तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
वाटणात खोबर नाही घातल तरी रस्सा चांगला होतो.
तुकड्या फ्राय करण्यापुर्वी मॅरीनेट करण्यासाठी आल, लसुण ची पेस्ट, लिंबू रस ही लावतात. पण तसे केल्यावर तुकड्या चिकटतात मग त्याला थोडा रवा लावला की चिकटत नाहीत.
हे घ्या सरंगे
हे घ्या सरंगे
![sarangamb.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u379/sarangamb.JPG)
जागु, हे घ्या सरंगे म्हणुन तू
जागु, हे घ्या सरंगे म्हणुन तू लिहिलेस खरे, पण रविवारी सरंगे रु. ३०० ला एक असे होते
त्यामुळे मी इथल्या फोटोसारखे त्यांना फक्त बघुनच मन शांत केले... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही, फोटोही ! अगदी आता मसाला
सही, फोटोही ! अगदी आता मसाला लावायला घ्यावा असं वाटतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या तळलेल्या तुकड्या
ह्या तळलेल्या तुकड्या
![fry.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u379/fry.JPG)
वा वा काय मस्त पापलेटं आहेत.
वा वा काय मस्त पापलेटं आहेत. तोंपासु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा काय मस्त पापलेटं
वा वा काय मस्त पापलेटं आहेत>>>>>हे म्हणजे कुठच्याही चॉकलेटला कॅड्बरी चॉकलेट म्हणण्यासारख आहे. अनीलभाई तो राजा सारंगा आहे.
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
धनु भापो गं....
धनु भापो गं....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
साधनास अनुमोदन, जागू मला मासे
साधनास अनुमोदन,
जागू मला मासे खरेदी करताना काय काळजी घ्यावी या बद्दल काही माहीती हवी आहे. खर तर मला पापलेट ( सरंगा हे त्याचे नअविन नाव आजच माहिती झाले. ) सुरमई , फ्राँज इ. प्रकारच खूप आवड्तात. पण खरेदी कर्ताना ताजे मासे व आईस मधील शिळे मासे कसे ओळखावे तेच कळत नाही नसल्यामुळे माशावाल्या बरोबर फसवतात. त्यामुळे टिप्स आवश्यक आहेत.
डब्यातली कोबीची भाजी दुपारी
डब्यातली कोबीची भाजी दुपारी कशी काय घशाखाली ढकलावी हा विचार करत असतानाच तुझा हा धागा वर आला
एका दिवशी किती ते दु:ख भोगावे माणसाने?? तळलेल्या तुकड्या पाहुन पोटात दुखायला लागले..
नानाजी मासे चांगले कडक असले
नानाजी मासे चांगले कडक असले पाहीजेत. पापलेट शिळे झाले की त्यावर सुरकुत्या पडतात. तसेच त्यांचे कल्ले उघडून पहायचे ते लालसर असायला हवेत.
कोलंबीचे डोके धडा वेगळे झालेले असले म्हणजे ती जरा शिळीच असते. चांगली कडक आणि सलग कोलंबी पाहुन घ्यायची.
खेकड्यांचे पोट दाबुन पाहायचे जर नरम असले तर घेउ नये.
बोंबिल पण ताजे असताना थोडे गुलाबी व ताठ असतात. नंतर ते मलुल व काळपट पांढरे पडतात.
अजुन आठवेल तसे सांगते.
सरंगात व पापलेटात काय फरक
सरंगात व पापलेटात काय फरक असतो? दिसण्यात कि चवीला?
मी मासे खात नाही पण मला
मी मासे खात नाही पण मला इथल्या पाकृ वाचायला आणि फोटो पहायला आवडतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागु मस्तंच गं रेसिपी.....
आम्ही "हलव्या"ला सरंगा
आम्ही "हलव्या"ला सरंगा म्हणतो. फोटो दाखवलास ते कापरी पापलेट!!
पापलेटाचे कल्ले दाबुन बघायचे, त्यातुन लालसर पाणी न येता सफेद आले तर चव मस्त असते.
जागू , धन्यवाद, वेळो वेळी
जागू , धन्यवाद, वेळो वेळी टिप्स अपेक्षीत , आज लंच अवराला आपला रेसिपी पाहिला आणी बायकोने दिलेली चांगली भाजी सुध्दा बेचव लागली . खूपच छान धागा.
भ्रमर हलवा काळपट असतो.
भ्रमर हलवा काळपट असतो. हलव्याची चव पण पापलेटपेक्षा वेगळी असते.
ध्वनी मोठा पापलेट म्हणजे सरंगा. त्याला थोडि काळपट त्वचा आलेली असते.
पापलेट पुर्ण चकचकीत असत.
नानाजी, दक्षीणा धन्स.
सगळ्यात मोठा फरक म्हणजे
सगळ्यात मोठा फरक म्हणजे हलव्याला खवले असतात. पापलेट नी सरंग्याला ते नसतात. त्याना जरासेच अगदी मऊसर असे गिलाकडे असतात. पण हलवाचे खवले मात्र कोळणीला कोयतीने काढावे लागतात.
साधना अगदी बरोबर. वरच्या
साधना अगदी बरोबर. वरच्या सरंग्यामधे बघा अगदी तुरळक खवले आहेत. पापलेटला आजिबातच नसतात.
मी जितक्या वेळा मासे घ्यायला
मी जितक्या वेळा मासे घ्यायला गेले तितक्या वेळा मी त्यांचे कल्ले दाबून पाहिले, पण कुठल्याच रंगाचे पाणी आले नाही.... लालही नाही आणि पांढरेसुद्धा नाही). मग मी ते मासे घेतले नाहीत.
अशावेळी ते मासे फ्रेश आहेत का, हे कसे कळते? (हसू नका बरे :))