माझी मुलगी राधा, पहिल्या दिवशी शाळेत जाऊन आल्यावर तिच्या नविन वर्षाच्या डायरीत ८वी पर्यंत फक्त सहामाही आणि वार्षिक अशा २ च परीक्षा वर्षभरात घेणार असल्याचं कळलं. 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत, मुलांना जास्तीत जास्त प्रमाणात शाळेकडे खेचण्याचा, तळागाळातल्या मुलांनाही शाळेची, पर्यायाने शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या मधे २ मतप्रवाह आहेत .............
१. अनेक पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दर महिन्याला तो परीक्षानामक राक्षस येऊन मानेवर बसणार नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण हे ओझं न वाटता शाळेत जाणं हा आनंदाचा भाग होईल. परीक्षांमुळे येणारे ताण तणाव, निकालाची भिती, अपेक्षाभंग, पालकांचा वाढता दबाव, स्पर्धा, उंदिर-शर्यत(rat-race :फिदी:), त्यामुळे मुलांमधे नकळत निर्माण होणारी असूया या सगळ्या गोष्टींना आळा बसेल.
२. दुसरा मतप्रवाह असा की, जर परीक्षाच नसतील तर मुलं परीक्षेचे वेळापत्रक लागेपर्यंत पुस्तकाला हात सुद्धा लावणार नाहीत. एका सत्रात एक परीक्षा ती सुद्धा १०० गुणांची, यामुळे अचानक मुलांवर अभ्यासाचं ओझं पडेल. शिवाय परीक्षाच नसतील तर मुलांचा कस लागणार कसा??? त्यांना आतून drive येणार तरी कसा? दर महिन्याला घेणात येणार्या चाचणी परीक्षांमुळे मुलांचे २-२ का होईना, धडे डोळ्याखालून जात होते.
यावर एक उपाय म्हणजे, गुणपद्धती ऐवजी श्रेणीपद्धत अंगिकारावी. शिवाय आता चाचणी परीक्षा नाहीत तर त्याऐवजी आठवड्याला प्रत्येक मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे अवलोकन करण्यात यावं.... सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, म्हणजे प्रत्येक मूल हे परीक्षार्थी न होता खर्या अर्थाने विद्यार्थी बनेल....
याबद्दल तुम्हाला काय वाटतं???
आर्क्....तुझ्याशी सहमत!
आर्क्....तुझ्याशी सहमत!
सगळ्यानाच सारखा पगारवाढ देता
सगळ्यानाच सारखा पगारवाढ देता येत नाही तसे मार्कही देता येत नाहीत >>>> नाहि पटले. मार्क का नाहि देता येणार ?
>> अहो प्रत्येक मुल प्रत्येक विषयात सारखेच मार्क कसे मिळवेल. जो गणितात कच्च्चा आहे त्याला पक्क्या मुलापेक्षा कमीच मार्क पडणार ना. ह्यात न पटण्यासारखे काय आहे?
अर्चनाशी सहमत. किमान श्रेणी
अर्चनाशी सहमत.
किमान श्रेणी पद्धत तरी हवीच. शाळेत पहिला नंबर एकाचाच येइल पण A श्रेणी तर बर्याच जणांना मिळु शकते. त्यातुनच आपण नक्की कोठे आहोत हे कळेल.
अहो प्रत्येक मुल प्रत्येक
अहो प्रत्येक मुल प्रत्येक विषयात सारखेच मार्क कसे मिळवेल. जो गणितात कच्च्चा आहे त्याला पक्क्या मुलापेक्षा कमीच मार्क पडणार ना. >>>
कारण दोघाना एकाच मापात तोलले जाते. जो गणितात कच्च्चा आहे त्याच्यात कमतरता आहे असा समज निर्माण झाला म्हणजे तणाव येणारच. आणी आजच्या परिक्षा हाच प्रश्न (problem) निर्माण करतात.
If every child is special तर एकच मापदन्ड कसा लावता ?
जो गणितात कच्च्चा आहे
जो गणितात कच्च्चा आहे त्याच्यात कमतरता आहे असा समज निर्माण झाला म्हणजे तणाव येणारच. >> ह्यालाच मी scope for improvement म्हणते. मी तर माझ्या मुलाला असे सांगेल "बाबारे कमी मार्क पडलेत म्हणजे तु ह्या विषयाकडे जरा जास्त लक्ष दीले पाहिजेस.प्रयत्न करुनही कमी मार्क पडले तर ठीक आहे but atleast give your best.हवे तर आपण थोड्या वगळ्या पध्दतीने शिकायचा प्रयत्न करु" उगीचच तणाव वगैरे शब्द वापरुन आपणच घाबरायचे कशाला.सगलेच कसे आवडीचे /तणावविरहीत मिळेल बरे.
माझ्या MSW केलेल्या मैत्रिणीला जेव्हा GRE द्यायची वेळ आली तेव्हा गणिताचे महत्व पटले, PG होईपर्यंत गणित टाळत होती आवडत नाही आवदत नाही म्हणुन्.मग पुन्हा ती ७वी ची scholarshipची पुस्तके आणुन अभ्यास करावाच लागला.तेव्हा नाही पण आता तरी तणाव आलच की.stress is very part and parcel of your child's life, better start stress management training right from the beginning.
माझे दोन पैसे. मी गेले सहा
माझे दोन पैसे.
मी गेले सहा महिने आणि त्याआधी चार वर्षापूर्वी लहान मुलाच्या शिकवण्या घ्यायचे. त्यातून मिळालेले हे अनुभव कण.
माझ्याकडे सध्या जी १५मुलं शिकवणीला येतात त्यापैकी ४ मुलं ही दारिद्र्य रेषेखालील आहेत. ७ मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. ४ मुलं मराठी मीडीयममधे पण प्रायव्हेट शाळेतली आणि उरलेली ४ मुलं ही इंग्लिश मीडीयममधली आहेत. सर्वच मुलं पाचवीपेक्षा कमी असल्याने "परीक्षा नाही तर अभ्यास कशाला?" हा प्रश्न प्रत्येकाने विविध स्वरूपात विचारला.
यापैकी सध्या जिल्हा परिषदेच्याच मुलाचा विचार करू पाहताया मुलाना कित्येक गोष्टीचे बेसिक ज्ञान नाही, ही बाब सतत सामोरी येत राहते. पहिलीपासून इन्ग्रजी असताना पूनमचे स्पेलिंग punamm किंवा महालक्ष्मीनगरचे स्पेलिंग लिहिताच येत नाही. शिक्षक स्वत: सफरचंद म्हणजे अॅपल आणि गाजर म्हणजे कॅरोट. हे शिकवतात. ज्या पोराने आयुष्यात सफरचंद पाहिले नाही, त्याला अॅपल काय आणी ए पी पी एल ई काय!! (क्रमिक पुस्तकामधे अॅपल पाय असा संदर्भ आहे, यावरून सफरचंदाचे पाय अशी कल्पना कित्येक मुलाच्या डोक्यात आहे) या मुलाचे अनुभव विश्व अधिक समृद्ध व्हावे, यासाठी सध्याची शिक्षणपद्धती काहीही करत नाही. उलट आहे ते पाठ करा आणि पास व्हा. असाच शिक्षकाचापण सूर आहे. मला शिकवायचे आहे तितके मी शिकवणार आणि वर्गाच्या बाहेर पडणार, त्याना समजले नाही तर पोराची जबाबदारी!! बर्याचदा, सरकारी शिक्षकाना किती काम आहे, किती ताण आहे हे वाचायला मिळते, प्रत्यक्षात याच्याइतके सुखी आयुष्य कुनाचे नसते!! प्रायव्हेट नोकरीमधे जितके ताण आहेत तितकेच त्याना असतात, वर सुट्ट्या आणि कामाची वेळ सोयीनुरूप असतात. तरीदेखील याना मुलाच्या शंका समजून घ्यायला आणि त्याला उत्तरे द्यायला वेळ नसतो. (या शिक्षकाचे स्वतःचे आकलन एखाद्या विष्यावर किती असते हा पुन्हा एक संशोधनाचा विषय!!) जी पोरं शिकवणीला येतात, त्याच्या बाई निबंध कित्येकदा मला विचारून लिहून घेतात!!! आणि पोराना ते वर्गात डिक्टेट करतात.. पोरं तो निबंध पाठ करतात आणि बाई त्यावरून मार्क्स देतात...
काय उपयोग आहे त्या परीक्षेचा? त्या निबंधाचा?? आणि तो भाषा विषय शिकण्याचा???
आठवी नववीतली पोरं भूमितीतली प्रमेयं पाठ करतात!! बीजगणितातली गणितं पाठ करतात!!!
परीक्षेतले मार्कस हे बर्याचदा त्या पोराच्या पाठांतराचे मार्क्स असतात. ही पोरं नंतर आयुस्यात "गाढवकाम्"च करू शकतात, कारण लहानपणीच कधीतरी त्याची कल्पनाशक्ती, कुतूहल, हस्तकौशल्य हे या शिक्षणपद्धतीने मारून टाकलेलं असतं. अशा परीक्षा असण्यापेक्षा नसलेल्या बर्या!!!
पण मग मुलाचा "अभ्यास" कसा होतोय हे कसे तपासणार??? सोप्पय.. वेगवेगळे प्रोजेक्ट्स करवून घ्या. झाडाचे मुख्य अवयव कोणते? मूळ, खोड, पान. फळ, फूल आनी पान हे पाठ करवून घेण्यापेक्षा त्याना विविध झाडातले अवयव शोधायला शिकवा. त्याची चित्र काढून घ्या. त्यातून खोडाचे विविध प्रकार, पानाचे विविध प्रकार मुलं स्वत:हून ओळखतील असे प्रश्न विचारा.
हे अस्लं सर्व कराअय्चं तर ते एका दिवसाचं किंवा वर्षाचे काम नव्हे. डी एड बी एडचा अभ्यासक्रम त्यानुसार बदला. दरवर्षी शिक्षकासाठी परीक्षा ठेवा. आधी त्याना अभ्यासाला लावा. तर कुट्।ए ते पोराना शिकवू शकतील. मग संपूर्ण शिक्षणक्रम बदला. विषय बदला. पुस्तकांच स्वरूप बदला.
नुसतं परीक्षा बंद म्हणून प्रॉब्लेम सुटत नाहीत., उलट असल्या आचरट कृतीनी प्रॉब्लेम्स वाढतच आहेत. अकरावी प्रवेश हे उत्तम उदाहरण आहेच डोळ्यासमोर!!!!!
पण मग मुलाचा "अभ्यास" कसा
पण मग मुलाचा "अभ्यास" कसा होतोय हे कसे तपासणार??? सोप्पय.. वेगवेगळे प्रोजेक्ट्स करवून घ्या. झाडाचे मुख्य अवयव कोणते? मूळ, खोड, पान. फळ, फूल आनी पान हे पाठ करवून घेण्यापेक्षा त्याना विविध झाडातले अवयव शोधायला शिकवा. त्याची चित्र काढून घ्या. त्यातून खोडाचे विविध प्रकार, पानाचे विविध प्रकार मुलं स्वत:हून ओळखतील असे प्रश्न विचारा. >>>>हे अगदी खरय पण माझ्या डोळ्यासमोर ऑफिसमधलीच २-३ उदाहरणं आहेत. हे प्रोजेक्ट्स माझ्या ऑफिस कलिग्स थोडं स्वतः डोकं लावून, कधी माझी किंवा इतरांची मदत घेऊन पुर्ण करतात. कव्हर पेजवर पाल्याचं नाव टाकतात. झाला प्रोजेक्ट्स तय्यार आणि शाळेत पण जीतका चकचकीत, गुळगुळीत प्रोजेक्ट्स तितके मार्क असा प्रकार आहे त्यामुळे सगळेच पालक ह्या ना त्या प्रकारे अशी मदत (?) करत असतात. ह्यात त्या बाळांना काय मिळालं शिकायला? शून्य
शाळेच्या स्तरावर बदल, शिक्षण पद्धतीत बदल ह्या फार लांब पल्ल्याच्या गोष्टी आहेत. काही गोष्टींची सुरुवात आपल्या पासून होऊ शकते
१) जसं अवाजवी अपेक्षा न ठेवणं
२) भले शाळेत घोकंपट्टी असेल तरी आपण शिकवताना मुलांच्या ओळखीतले संदर्भ देऊन शिकवणं. जसं "ऐ - ऐरणीतला हे सानिकाला शाळेत शिकवलं पण कळलच नाही. पण "ऐक ना आई अशी हाक मारतो त्या "ऐक" ना मधला ऐ तिला पटकन कळला
३) छोटे छोटे प्रोजेक्ट्स शाळा घेवो न घेवो पालकांनी मुलांसाठी घेणे. (तोंडी, लेखी कसेही)
सध्या मी घेत असलेले प्रोजेक्ट्स
१) तिला स्वतःला लसुण कुंडीत लावायला दिलेय. पाणी घालतेय ती आणि मी. थोडी लसणीची पात उगवायला सुरुवात झालेय. काही दिवसांनी एक लसूण पातीसकट काढून दाखवेन मग तिचं तिला कळेल मुळं, पानं कोणती आणि कशी ते
२) तोंडी प्रोजेक्ट्स मधे मराठी आणि इंग्रजी र्हाईमिंग वर्डस शोधतो दोघी. मराठी साठी असे गृप केले "आई ताई बाई माई"
"परी, घरी, तरी, जरी"
मग आम्ही दोन ओळी जुळवल्या
पिंकू परी
आली घरी
कधी तरी मधेच तिच्या डोक्यात येत काही बाही आणि विचारते ह्याला हे र्हाईमिंग वर्ड जुळत का?
म्हणजे जे पेरलं ते रुजतं कधीतरी उगवतं हे नक्की
३) काही शैक्षणिक CDs खूप चांगल्या आहेत. माझ्याकडे Mcmillan Co. ची english grammer for 2nd ची CD आहे त्यात विझार्ड आणि मुलं अशी थीम घेऊन छान सोप्या पद्धतीने ग्रामर चा काही भाग शिकवलाय. ही CD शाळेनेच दिलेय.
शाळा पातळिवर बदल करायला खूप मोठी ताकद लागेल, संघटन लागेल. आणि त्यातही प्रॅक्टिकल अडचणी असू शकतील. सध्या आहे ती शिक्षण पद्धती मला फॉलो करणं भागच आहे. पण माझ्या लेव्हलवर जेव्हढ शक्य होईल तेव्हढ द्यायचा यथाशक्ती प्रयत्न करते. तरिही मर्यादा आहेत.
माझ्या ओळखीच्या अशा पालकांचा एक गृप करुन त्याद्वारे काही करता येऊ शकतं असं मला वाटतं. तिच्या शाळेतल्या काही पालकांशी बोललेय मी तसं. काहीजणी तरी तयार आहेत.
तरीही सध्या शाळेचा अभ्यास हा रहाणारच आहे. शिकवायची मेथड बदलायचा प्रयत्न आहे. अर्थात हे मी घरी गेल्यावर एखाद तास आणि विकांतालाच करु शकते त्यामूळे अजूनही होमवर्क ही जबाबदारी आजी ओल्ड स्कूल मेथडने पार पाडते आणि म्हणूनच मी पुस्तकातले काही कंसेप्ट हे अशा प्रकारच्या दोघींचेच प्रोजेक्टस घेऊन करते.
अजून बरच काही आहे लिहीण्यासारखं. सध्या येव्हढं पुरे ना मंजे बोअर करण?
कवे, आर्क, ताण तणाव झेलायला
कवे,
आर्क, ताण तणाव झेलायला मुलांना शिकवलं पाहिजे हे अगदी १००% पटलं कारण पुढच्या आयुष्यात त्याशिवाय निभाव लागणार नाही. नुसत्या परीक्षा बंद करून प्रश्न सुटणार नाहीत. आणि ताण तणाव हे अभ्यासामु़ळे येत नसून परीक्षेतील यशापयशावर आणि त्यासंबंधी असलेल्या अपेक्षांमुळे येतात.
जसं शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज आहे त्याचप्रमाणे पालकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांची मानसिकता बदलाची सुद्धा गरज आहे. सगळे खापर परीक्षापद्धतीवर फोडण्यात अर्थ नाही. परीक्षेचे स्वरुप बदलणं आणि त्याची प्रत्यक्ष कार्यवाही या प्रोसेस मधे पुढच्या किती पिढ्या पाठांतराचे मार्क मिळवण्यात इतिकर्तव्यता मानणार ते प्रत्यक्ष परमेश्वर जाणे!
अजून एक प्रॅक्टिकल शिक्षणामधे
अजून एक प्रॅक्टिकल शिक्षणामधे अॅड करता येण्यासारखं
१) पक्षीदर्शन, फ्लेमिंगो वॉच प्रोग्रॅम आम्ही तिला बरोबर घेऊन केला. मुदलात मलाच बर्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि त्यातल्या माझ्या छोट्याश्या मेंदूने जर थोड्याश्याच टिपल्या तर त्या बालजीवाकडून मी सगळं लक्षात राहीलची अपेक्षा करुच शकत नाही. तरिही नेलं होतं तिला. पुढेही नेईन. ती आपणहून यायला तयार होते अशा प्रत्येक ठिकाणी नेईन. एका वेगळ्या जगाची ओळख तर झाली तिला. आवड आहे का? पुढे त्यात कितपत आवड राहील पुढची गोष्ट. पण पहिल्या पायरीवर तर नेलं तिला (आम्हीही प्रथमच गेलेलो अशा कार्यक्रमाला :P)
२) ट्रेक ला (तिला मला झेपणार्या) मुद्दाम नेते तिला.
सगळंच माझ्या डोक्यात नाही रहात तर तिच्या कसं बर राहील? पण काहीतरी नक्की मागे रहातं. दरवेळी काही पेरलं जाईल अशी अपेक्षा न ठेवता अनुभव घेत रहायचा मुलांच्या जोडीने. आपण पेरणारे ते कसदार जमिन वगैरे कल्पना पण न आणता मनात. त्यांच्या त्यांच्या मेंदूत काहीना काही चाललेलच असतं. कुठे ना कुठे हे अनुभवलेलं येईलच की जमेस.
क्या लेक्चर झाडा ना मंजे
(पोस्ट नको पण रिक्षा आवरते असं झालं का नाही तुला?
)
ताण तणाव झेलायला मुलांना
ताण तणाव झेलायला मुलांना शिकवलं पाहिजे हे अगदी १००% पटलं >>>
हे impossible आहे. परत परत आपण त्याच loop मधे फिरतो आहोत.
किती झेलायला शिकवणार ताण तणाव ? किति limit पर्यन्त ? शिवाय प्रत्येक मुलाची सन्वेदनशीलता वेगळी असते. काहिजण ताण हा ताण म्हणुन घेणारही नाहित, तर काहि जण पालक ज्याला normal समजतात अशा गोष्टीही ताण म्हणुन घेउ शकतात. दुसर्याबाबतीत हे मोजायला काहिहि परीमाण नाहि.
ताण तणाव हे अभ्यासामुळे येत नसून परीक्षेतील यशापयशावर आणि त्यासंबंधी असलेल्या अपेक्षांमुळे येतात. >>> बरोबर आहे. हाच तर मुद्दा आहे. परीक्षा आली कि यशापयश आले आणी अपेक्षा आल्या. मग शिक्षणातील मजा आणी सहजता निघुन गेली.
मर्यादा आहेतच पण म्हणुन जे व्हायला पाहिजे ते आजच्या परीस्थितीत practical नाहि म्हणुन मान्डलेच नाहि, केवळ आहे त्यात जुळवुन घेण्याचा प्रयत्न केला तर कधी सुधारणा होणारच नाहि.
कविता नवरे, परीक्षापध्द्तीवर
कविता नवरे, परीक्षापध्द्तीवर कुठलेही खापर न फोडता मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही करत असलेल्या जाणीवपुर्वक प्रयत्नांबद्दल मनापासुन कौतुक आणि अभिनंदन. मुळात सरकारने तयार केलेली शिक्षण/परीक्षापध्दती ही mass education साठी असते. त्यात थोदे कमी ,थोदे जास्त होणारच.बरेच शिक्षणतज्ञ त्या पध्दत वेळोवेळी बदल सुचवत असतातच, म्हणुच दर काही वर्षांनी अभ्यासक्रम बदलत असतो. ती आदर्श करायचा प्रयत्न चालुच असतो पण त्यात काही त्रुटी राहणारच.
इथे तुम्ही पालक म्हणुन स्वतःची जबाबदारी ओळखुन प्रचलित पध्द्तीत मुलाला काय देत आहात हे जास्त महत्वाचे. इथे तुम्ही फक्त पैसे देउन जबाबदारी संपत नाही , आपल्या मुलाच्या weak areas ना समजाउन घेउन त्यावर काम करणे हे काम पालकांचे आहे.त्यासाठी भरपुर वेळ आणि संयम लागतो.भरपुर डोके लढवावे लागते , कष्ट घ्यवे लागतात.शिक्षकाचे काम grading करुन हे weak areas पालकांच्या लक्षात आणुन देणे.इथे परीक्षा हवीच.पालक बर्याचदा ही जबाबदारी खासगी शिकवणीवर टाकतात्.तिथे चांगला शिक्षक भेटला तर ठिक नाहीतर मुल त्या विषयात कायमचे गंदलेच म्हणुन समजा.
पाठांतराचे म्हणाल, तर त्या त्या विषयात भरघोस मार्क मिळवणार्या कुठल्याही मुलाला विचारा तो पाठांतर करत नाही असेच त्याचे उत्तर असेल.किंबहुना गणित,व्याकरण असे विषय ज्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्यात कुठे लागते पाठांतर, सगळी त्य विषयातली topper मुले हेच सांगतात कळले होते म्हणुन बिंदोकपणे पाठ न करताही पेपरमधे लिहु शकलो.मी स्वतः माझ्या भाच्याच्या व्याकरणाचा अभ्यास घेतला आहे. आधी तो बिंडोकपने पाठ करायचा, परीणीती अशी ही कमी मार्क,नीट समजाउन दिल्यावर आता इग्रंजीच (ही त्याची प्रथम भाषा आहे) काय मराठी व्याकरणातही (ज्याचा कुणीच अभ्यास घेतला नाही) उत्तम मार्क मिळतात.
<<<<आर्क, नंबर ऐवजी ग्रेड
<<<<आर्क, नंबर ऐवजी ग्रेड दिल्या तरी मुलांमधे नकळत स्पर्धा सुरू होतेच..... त्याला 'ए' ग्रेड मिळाली, तुला 'सी' कशी काय मिळाली...... त्यातून ताण तणाव सुरुच राहतात>>>>>
यातून स्पष्ट होतेय की ताण पालकच देतात. सी ग्रेडवाल्या मुलाला आपण ए ग्रेडच्या स्पर्धेत नाही हे कळत असते पन त्याच्या पाल्कांना नाही.
ग्रेडमुळे १ आणि १/२ गुणांसाठी मुलांचा जीव खाणार्या पालकांपासून मुलांची थोडी सुटका होईल.
कविता, हा विचार खरंच योग्य
कविता, हा विचार खरंच योग्य आहे. पण होतं काय, की जेव्हा आपण "शिक्षणाचा"विचार करतो त्यामधे सर्वाचेच पालक इतके सुजाण असतील, सुशिक्षित असतील आणि मुख्य म्हणजे आपल्या पाल्याला इतका वेळ देऊ शकणारे असतील असे होत नाही. मुळात परीक्षा रद्द हा उपाय शाळेतील मुलाची गळ्ती थांबावी असा एक उद्देश ठेवूनदेखील घेण्यात आला आहे. मुलाची गळती ही जास्त करून ग्रामीण भागात आणि शहरी भागातील गरीब वस्तीतल्या शाळामधे दिसून येते. यावरती उपाय म्हणून मध्यान्ह भोजन उपक्रम राबवण्यात आला होता आणि त्याचा कित्येक ठिकाणी बोजवारा उडालेला आहे!!
मुलं शाळेत आठ तास असतात. या आठ तासात त्याच्याकडून बरंच काही करवून घेणं शक्य असतं. मी वर म्हटलं तसे विविध प्रोजेक्ट्स, ज्यामधे मुलं स्वतःचे डोके लावून काहीतरी शिकतील. हे सर्व शाळेतच करवून घेणं शक्य आहे. आणी यासाठी सरकारतर्फे विविध शिक्षणतज्ञाच्या मार्फत साधने देखील बनवली जातात. इंग्रजीचे शुद्ध उच्चाराची एक ऑडिओ कॅसेट प्रत्येक सरकारी शाळेला मिळते. किती शिक्षक ही कॅसेट मुलाना ऐकवतात? मुळात अशी काही सोय शाळेमधे आहे हेच कित्येक मुलाना माहित नसतं. याला शाळेची, शाळेतल्या शिक्षकाची आणि त्याच्या वरच्या सरकारी अधिकार्याची उदासीनता कारणीभूत आहे. या सर्वावर उपाय करण्या ऐवजी थेट परीक्षा रद्द करून काय मिळणार आहे??? यातून शाळेतील गळती थांबणार आहे का?? खाजगी शाळांमधून या ना त्या मार्गाने परीक्षा होत राहणार. तिथली मुलं या सर्व ताण तणावाखाली जगायला शिकणार आणि सरकारी शाळामधली मुलाची काय हालत आहे ते कुणालाच लक्षात येणार नाही. अशा वेळेला अजून प्/न्धरा वर्शानी जेव्हा ही मुलं मोठी होतील, काही काम करायला लागतील तेव्हा तिथले ताण तणाव कसे सहन करणार??? तेव्हा कुठून शिकणार स्ट्रेस मॅनेहमेंट? याचा सरकारने काही विचार केलेलाच दिसत नाहिये.
किती झेलायला शिकवणार ताण तणाव ? किति limit पर्यन्त ? शिवाय प्रत्येक मुलाची सन्वेदनशीलता वेगळी असते. काहिजण ताण हा ताण म्हणुन घेणारही नाहित, तर काहि जण पालक ज्याला normal समजतात अशा गोष्टीही ताण म्हणुन घेउ शकतात. दुसर्याबाबतीत हे मोजायला काहिहि परीमाण नाहि. >>>> सध्याचे जे काही लिमिट्स आहेत त्यामधे भरपूर मुलं कोप अप करू शकत आहेत. मात्र, काही मुलाना हा ताण जाणावतोय. त्याच्यासाठी ज्याप्रामाणे "सामान्य गणित" पहिलीपासून इंग्रजी असे उपाय काढले गेले तशा पद्धतीचे अज्जून उपाय तज्ञाच्या मार्फत काढले पाहिइजेत. तरच सुधारणा होइल. नुसत्या परीक्षा रद्द करून आताच्या शिक्षणपद्दतीमधे आपण आपल्याच विद्यार्थ्याना अपंग बनवत आहोत.
'तणावरहित परीक्षा' असा
'तणावरहित परीक्षा' असा काहीतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे का?
सध्याचे जे काही लिमिट्स आहेत
सध्याचे जे काही लिमिट्स आहेत त्यामधे भरपूर मुलं कोप अप करू शकत आहेत. >>> नाहि वाटत असे. तसे असते तर ही चर्चा करण्याची वेळच आली नसती.
पन्धरा वर्षानी ताण येतील म्हणुन आतापासुनच ताण कशाला देयचा ? उलट सहजतेने वागायला शिकलेली मुले office मधले स्वताचे आणी दुस्र्यान्चे आयुष्यही सुखि करतील. यात जरुर काहि generations जातील पण सुरवात तर होइल.
आयुष्यभर ताण सहन केलेली ४०-५० वर्षाची माणसे ही आत्महत्या करतात. आणी ताण- तणाव हि काहि skills नाहि practice करायला. आधी म्हट्ल्याप्रमाणे प्रत्येक मुलाची सन्वेदनशीलता वेगळी असते आणी येणारे प्रश्नही (प्रोब्लेम्सही) defined नसतातच
'तणावरहित परीक्षा' असा काहीतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे का? >>>> अवघड वाट्ते. परीक्षा म्हणजे ताण येणार.
'तणावरहित परीक्षा' असा
'तणावरहित परीक्षा' असा काहीतरी सुवर्णमध्य >>>
कालचं आदित्यच्या शाळेतलंच एक उदाहरण -
सध्या त्यांच्या शाळेत Continuous and Comrehensive Evaluation ही पध्दत अवलंबण्यात येत आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून त्यांना विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स दिले जातात. असे प्रोजेक्ट्स की जे करायला मुलांनाही मजा येईल.
त्यात गेल्या आठवड्यात आदित्यच्या गृपला एक अॅड कँपेन करायला सांगितलं. प्रॉडक्ट मुलांनीच निवडायचं होतं. आदित्यच्या गृपनं टूथपेस्ट हे प्रॉडक्ट निवडलं. त्यात त्यांना स्टिल अॅड आणि मोशन अॅड दोन्हीही करायचं होतं. गृपमधली १-२ मुलं लिखाणात एक्सपर्ट होती. त्यांनी मोशन अॅडचं स्क्रिप्ट लिहिलं, एक दोघं मिमिक्री इ. त पटाईत होते, त्यांनी त्या छोट्याश्या स्क्रिप्टवर आधारित अॅक्टींग करून दाखवायचं. (आख्ख्या वर्गासमोर आणि शिक्षिकेसमोर ). आदित्यची चित्रकला चांगली आहे तर त्यानं स्टिल अॅडचं डिझाईन, ड्राईंग इ. कामं केली. आणि काल त्याचं सादरीकरण झालं.
आता त्या गृपमधल्या मुलांचं या आठवड्याचं गुणांकन त्या अॅड कँपेनच्या आधारावरच होणार. गृप अॅक्टिविटी म्हणून मुलं कसं काम करतात, त्यांचा आपापसांतला ताळमेळ, गृप लीडरने केलेली आखणी, त्याला इतर सदस्य कसं फॉलो करतात ते सगळं पाहिलं जाणार. प्रॉडक्ट निवडीचं स्वातंत्र्य मुलांनाच देण्यामागेही हेच कारण असणार की गृपमधल्या निरनिराळ्या मुलांची निरनिराळी स्किल्स लक्षात घेऊन त्याप्रमाणे आरामात अॅड करता येईल असं प्रॉडक्ट निवडण्याचं कसब मुलांनी दाखवायचं.
या प्रॉजेक्टदरम्यान आदित्यच्या मित्रांचे जे सारखे घरी फोन यायचे आणि त्यांच्या संभाषणापैकी जे काही माझ्या कानावर पडायचं त्यावरून हे अगदी सहज कळत होतं की मुलांना ते करायला मजा येतेय. आपण काहीतरी काँक्रिट करतोय याचं समाधान मिळतंय.
पुढे त्या ७-८ जणांच्या गृपपैकी एखादा जरी अॅडवर्ल्डमधे गेला तर त्याला याचा थोडासा का होईना नक्कीच फायदा होईल.
पारंपारिक परिक्षापध्दतीत ठीकठाक मार्क्स मिळवणारे विद्यार्थी अशा प्रोजेक्टसमधे मात्र चमकदार कामगिरी करताना दिसून येतायत. (हे वाक्य माझं नाही तर आदित्याच्या वर्गशिक्षिकेचंच आहे. :))
हे impossible आहे. परत परत
हे impossible आहे. परत परत आपण त्याच loop मधे फिरतो आहोत.
किती झेलायला शिकवणार ताण तणाव ? किति limit पर्यन्त ? शिवाय प्रत्येक मुलाची सन्वेदनशीलता वेगळी असते. काहिजण ताण हा ताण म्हणुन घेणारही नाहित, तर काहि जण पालक ज्याला normal समजतात अशा गोष्टीही ताण म्हणुन घेउ शकतात. दुसर्याबाबतीत हे मोजायला काहिहि परीमाण नाहि.
>>> सुरवात छोट्या छोट्या छोट्या गोष्टींनीच करायची ना (शाळेतही १०वीचे प्रश्न पहिलीच्या मुलाला टाकतात असे मी तरी पाहिले नाही बाबा!),हळु हळु मुलाचे limit वाढत जाते. मोजायच्या परीमाणाचे म्हणाल तर आपणच आपल्या मुलाचे observer व्हायचे. तेव्हडे कष्ट तर पालक म्हणुन घ्यायलाच हवेत ना!
अगदी सोप्पे उदाहरण शाळेत १ ते १० पाढे ह्याचे परीक्षा/स्पर्धा आहे.तुमचे मुल पाढ्यात पटाईत असेल तर प्रश्नच नाही, कच्चे असेल तर त्याला थोडा तणाव येणार,भीती वाटणार.ते कमी मार्क घेउन घरी येणार. तुम्हाला कळले की पाढ्याची जरा बोंब आहे म्हणुन.पाढे शिकवायच्या वेगवेगळ्या tricks असतात, शाळेत सगळ्याच वापरल्या जातात असे नाही, तुम्ही घरी त्या वापरुन मुलाला पाढे शिकवा. मुलाला तणाव येइल ह्या भीतीने ते केलेच नाहीत तर मग मुलाचा गुणाकार ,भागाकार पण कच्चाच राहण्याचा तोटा तुमच्याच मुलाला रोजच्या व्यवहारात होणार(पुढच्या अभ्यासात होणार हे वेगळेच) .तुम्ही मुलाला थोडा ताण देउन हे करुन घेतले तर पुढच्या पाढ्यांच्या परीक्षेला ते मुल हसत हसत सामोरे जाईल.
इथे तुमच संयम,वेळ,कष्ट घ्यायची तयारी फार महत्वाची आहे.ती नसेल तर परीक्षा/शिक्षण पध्दती वाईट ही हक्काची आरोळी आहेच ठोकायला.
सुरवात छोट्या छोट्या छोट्या
सुरवात छोट्या छोट्या छोट्या गोष्टींनीच करायची ना (शाळेतही १०वीचे प्रश्न पहिलीच्या मुलाला टाकतात असे मी तरी पाहिले नाही बाबा!),हळु हळु मुलाचे limit वाढत जाते. मोजायच्या परीमाणाचे म्हणाल तर आपणच आपल्या मुलाचे observer व्हायचे. तेव्हडे कष्ट तर पालक म्हणुन घ्यायलाच हवेत ना! >>>
अहो तुम्हि कशाचीहि कशाचीहि तुलना करताय. १०वीचे प्रश्न पहिलीच्या मुलाला टाकणे हे फार वेगळि गोष्ट आहे हो! आपण ताण-तणाव याबद्द्ल बोलत आहोत.
छोटे- छोटे ताण-तणाव तुम्हि निर्माण करणार ? आणी मग मोठे ? अहो असे असते का ? कसे करणार ते ? आणी त्याची practice करवणार ?
अहो तुम्हि ज्याला छोटे ताण समजाल त्याला मुलं मोठे ताण समजले तर काय होइल ह्याची कल्पना आहे का ? अहो प्रत्येक माणसाची (मुलाची ) संवेदनशीलता वेगळी असते हे कसे समजत नाहि तुम्हाला ?
अहो पण इतके संवेदनशील राहून
अहो पण इतके संवेदनशील राहून या जगात निभाव लागेल का? भारतात तरी नाहीच नाही.
आणि इतक्या जर का संवेदना जपायच्या असतील, तर त्यानी घरात राहूनच शिक्षण घेतलेले बरे. पुन्हा ह्या घरात घेतलेल्या शिक्षणानंतर कधीतरी बाहेरच्या जगात यावेच लागेल हे विसरून चालणार नाही!
अहो तुम्हि ज्याला छोटे ताण
अहो तुम्हि ज्याला छोटे ताण समजाल त्याला मुलं मोठे ताण समजले तर काय होइल ह्याची कल्पना आहे का ? अहो प्रत्येक माणसाची (मुलाची ) संवेदनशीलता वेगळी असते हे कसे समजत नाहि तुम्हाला ?
>>> ओके शाळेत पाठवुन शिकवुच नका मुलाला, तणाव न देता घरात बसुन शिकायची home learning method शोधुन काढा ,अमलात आणा ,त्याचे documenentation करत रहा , पुढे ते मुल जगाच्या परीक्षेत यशस्वी झाले तर mass education साठी ती पध्दत वापरता येइल असा feasible आराखडा तयार करा, तो सरकारला सादर करा, सरकार आणि सारा समाज तुमचा ऋणी राहील.
अहो पण इतके संवेदनशील राहून
अहो पण इतके संवेदनशील राहून या जगात निभाव लागेल का? भारतात तरी नाहीच नाही.
आणि इतक्या जर का संवेदना जपायच्या असतील, तर त्यानी घरात राहूनच शिक्षण घेतलेले बरे >>>>
अहो परिक्षेचा ताण न देणे हे आणी संवेदनशीलता या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा काय संबंध ? तुम्हाला माझी पोस्ट समजली नाहि असे दिसते.
ओके शाळेत पाठवुन शिकवुच नका मुलाला, तणाव न देता घरात बसुन शिकायची home learning method शोधुन काढा >>>
तुमचे दुसरेच टोक आता. अहो ताण न देता शिकवण्याचे सोडुन तुम्हि शाळेत शिकवणेच बंद करयचे म्हणता. हिच अतिरेकि व्रुती आहे. काय संबंध आहे दोन्हिचा ? केवळ विरोधाला विरोध म्हणुन लिहु नका.
हे वाचा. सगळ्यांना दिलासा
हे वाचा. सगळ्यांना दिलासा मिळेल.
आनंददायी परीक्षा
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=82218:2...
फार चांगला लेख. मागे मी
फार चांगला लेख. मागे मी कोणाला तरि हेच विचारायचा प्रयत्न केला होता तेव्हा उत्त्र मिळाली नव्हती. पण इथे चर्चा वाचायला बरे वाटते.
माझे काहि विचार (थोडे वेगळे आहेत पण मंजिरिला तीच्या शिक्षकांशि बोलताना उपयोगी होतील असे वाट्ते)-
खर सांगा १०च्या पुढ्चे पाढे पाठ करुन कितिसा फायदा होतो? जर कोणाला १७ नव्वे अस विचारल तर १७चा पुर्ण पाढा मनातल्या मनात म्हणावा लागतो ना (मलातरि) त्यापेक्षा १७ * ९ करायची सोपी पध्द्त शिकवली तर?
याच प्रकारे जर इतिहासात सन शिकवले तर त्याचा फायदा किति होतो. आपल्यापैकी कितिजणाना सनावळी आठवतात?
याचा अर्थ असा नाहि की हे सगळे शिकवु नये. पण ते शिकवण्याची पद्धत बदलावि. म्हणजे वर आधिच म्हट्ल्याप्रमाणे प्रोजेक्ट बेस करावी. पण या प्रोजेक्ट्ला मार्क देउ नये. त्यामुळेच मग पालक चकचकीत रिपोर्ट करायला जाणार नाहित.
मुलांना छोट्या छोट्या ग्रुप मधे शिकवावे. शिक्षक जास्त नसतील तर हे त्रासाचे आहे म्हणा. यासाठि शिक्षक मुल हे प्रमाणच बदलाव लागेल. आपल्या कडे कितितरि बेकारि आहे, शिक्षकांची संख्या वाढ्वायला काय हरकत आहे? आणि सगळे शिक्षक मुलांना सांभाळण्यात स्किल्ड (बीएड, डिएड) असणेच जरुरि नाहि. त्यापेक्षा एका वर्गाला एक स्किल्ड शिक्षक ठेवुन बाकीचे विषय शिकवायला त्या त्या विषयातले तज्ञ/ माहित्गार प्रोजेक्ट बेस वर आणता येतील. उदहरन म्हणजे पाचवीच्या मुलांना विज्ञानातला एखादा भाग शिकवायला, एखादा प्रयोग दाखवायला कशाला बिएस्सीच पाहिजे? अगदि कॉलेजमधे शिकणारि ३ ४ मुल पण बोलवता येतील. परत नेहमीचा शिक्षक समोरच असल्याने मुलांना सांभाळणे फारसे जड जाणार नाही. हस्तकला शिकवण्यासाठि कशाला बिएड होणे जरुरी आहे? कोणीहि जे खरच हस्तकला जाणतात ते प्रोजेक्ट बेस वर हायर करता येणार नाहित का? मोठ्या वर्गांना काहि भाग शिकवायला खरोखर संशोधन करणारे, कीन्वा कंपनीत काम करणारे लोक सुद्धा येउ शकतील.
या सगळ्यामुळे वर्ग शिक्षकाकडे जास्त वेळ शिल्लक राहुन मुलांचे अवलोकन करणे सोपे जाईल. मुलांकडे लक्ष देणे सोपे जाईल. मुलाण्चा कल बघुन त्यांना मार्गदर्शन करता येईल. आणि योग्य चाचपणि करणार्या परिक्षा सुद्धा घेता येतील. आणि मुलांना पण वेग्वेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेट्ण्याची नवनविन माहिती मिळण्याची संधी मिळेल.
सावली, खूप छान प्रतिसाद
सावली, खूप छान प्रतिसाद
परीक्षापद्धत नक्कीच बदलली आहे, म्हणजे अजिबात परीक्षाच न घेणं जसं कुणालाच स्वागतार्ह वाटत नव्हतं तसंच सध्याची पद्धत ही तितकीशी पटणारी नव्हती. त्या पार्श्वभूमीवर आत्ता घोषित केलेलं परीक्षेचं वेळापत्रक दिलासा देणारंच आहे.
आता ते अॅक्चुअल इम्प्लिमेंट कसं करतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण सावलीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे बीएड, अथवा डिएड असणं गरजेचं आहे का नाही यावर वेगळा बाफ काढावा लागेल.
..
..
Pages