सी. के. पी. पद्धतीचे मुगाचे बिरडे

Submitted by अवल on 14 June, 2010 - 13:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रथम काही गोष्टी स्पष्ट कराव्यात असे वाटले. सी. के. पीं. मध्ये मूग, वाल आणि चवळी यांचा विशिष्ठ पद्धतीने केलेल्या रश्श्याला "बिरडं" ही उपाधी Happy लावली जाते. आता पर्यंत मूगाच्या बिरड्यांच्या दोन पद्धती इथे लिहिल्या गेल्या. पण मला या दोन्ही पद्धती माझ्या पद्धती पेक्षा काही बाबतीत वेगळ्या वाटल्या. म्हणून या लिखाणाचा प्रपंच !

लागणारे जिन्नस : मूग - आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे. रात्री पातळ फडक्यात बांधून ठेवायचे. दुसर्‍या दिवशी कोमट पेक्षा थोडे गरम पण उकळत्यापेक्षा गार अशा पाण्यात मोड आलेले मूग टाकावेत. १० मिनिटांनी मोड तुटणार नाहीत ही काळजी घेत हलक्या हाताने थोडे चुरावेत. मग भांडे हळू ( पीठ चाळताना जशी चाळणी हलवतो तसे) हलवत त्यातले पाणी दुसर्‍या भांड्यात ओतत जावे. पाण्याबरोबर सालंही सुटत जातात. असे २-३ दा करत बहुतांशी साले सुटून जातात. मग न सुटलेले मूग सोलावेत. प्रत्येक मूग सोललेलाच असला पाहिजे. बिरड्यात साल तरंगताना दिसले तर आमची सी. के. पी. जात बुडते Wink ही सर्व प्रक्रिया दिनेशदांनी सांगितलीच आहे. काही माझे फेर्फार फव-त !
तर असे पूर्ण सगळे
१. सोललेले मूग २ वाट्या
२. अर्धा खोवलेला ओला नारळ ( यात खोबर्‍याची तपकिरी साल थोडे जरी आले तरी आमची जात बुडते, लक्षात घ्या )
३. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
४. १/२ इंच आलं
५. दोन बारीक चिरलेले कांदे
६. लिंबा एवढा चिंचेचा गोळा / कैरी मिळाल्यास मध्यम आकाराची अर्धी कैरी -चार भाग करून
७. चिंचेच्या निम्म्याने गूळ
८. थोडी कोथींबीर
९. तेल, हळद, हिंग, तिखट, धणेजिरे पूड, मीठ चवीनुसार ( यातही तिखट = सी. के. पी. तिखट =लाल संकेश्वरी मिरच्या [डेखं तोडलेल्या] + धणे + बडिशेप यांचे खास प्रमाण )

क्रमवार पाककृती: 

१. चिंच अर्ध्यावाटी पाण्यात भिजत घालावी.
२. ४ मोठे चमचे तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात आधी कांदे परतावेत.
३. कांदे लालसर झाले की त्यात मूग टाकावेत, त्यात हळद, तिखट, धणेजिरे पूड टाकावे. हे सर्व मंद गॅसवर किमान ७-१० मिनिटं परतावे.
४. हे परतणे चालू असताना, ओले खोबरे व लसूण एक कप पाण्यात बारीक वाटून घ्यावे. चिंचेचा कोळ काढून घावा.
५. आता परतलेल्या मूगात २ कप पाणी घालावे व २ उकळ्या आल्यावर झाकण ठेऊन मूग शिजू द्यावेत.
( अरेच्च्य्या एक सांगायचं राहिलच. झाकण खोलगट घेऊन त्यात पाणी घालावे, अन अजून पाणी लागले तर हे वरच्या झाकणातलेच पाणी टाकावे नाही तर पुन्हा जात बुडण्याचा संभव आहेच )
६. मूग शिजल्यावर त्यात वाटण, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, चिरलेली कोथींबीर टाकून एक उकळी आणावी.
७. बाजारात कैर्‍या मिळत असतील तर चिंचे ऐवजी कैरीच वापरली पाहिजे असा ही दंडक आहे. ( मला स्वतःला असे कैरी घातलेले बिरडे जास्ती आवडते हे खरे )
हे सी.के.पी. पद्धतीचे मूगाचे बिरडे !

हुश्श्य !

आता माझ्या या सगळ्या लेखनाबद्द्ल मला जाती बहिष्कृत करण्यात आलं असेल बहूदा. आता याला जबाबदार तुम्ही सगळे "आमच्या" बिरड्यावर चर्चा करणारे माबोकर !

वाढणी/प्रमाण: 
सी.के.पी. व्यव-ती असल्यास २ व्यव-तींना पुरेल. अन्यथा चार व्यव-तींना पुरेल
अधिक टिपा: 

मी स्वतः सी.के.पी. आहे. अन सी.के.प्यांच्या स्वयंपाका बद्दल मला सार्थ अभिमान आहे तरी हे लिहिले आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आधीच मनापासून माफी मागते__/\__

माहितीचा स्रोत: 
माझी सी. के. पी. जात :)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा सिंडीकडे मुगाच्या साली आम्हाला काही सगळ्या काढता आल्या नाहित त्यामुळे मी जी आजोळुन सिकेपी आहे तिची, पक्षी माझी जात बुडली. Proud

आरती, पुढच्या वेळी तुझ्या पद्धतीने बिरडं करुन पाहिन. Happy

आर्च, आधी तुझी जात सांग Proud

ते मूग चांगले नव्हते गं अमृता (काय करावं बाई, सगळी कडे सांगत सुटलीये) Proud

आरती, ये हुई ना बात. शेजारच्या काकुंनी लहानपणी भरपूर वेळा खाऊ घातलेय हे. त्यामुळे मूगाचे बिरडे म्हणजे असेच, असे माझे मत झाले.
पण कांदा कापणे, तो सवताळणे, ते खास हिरवे वाटण, ते आंबट वरण, ती गवारीची भाजी, त्या गूळपोळ्या, निनावं, कानवले.. सगळे करावे तर गुप्ते, सुळे, समर्थ, चौबळ, खोपकर, मथुरे, भिसे आदी मंडळीनीच.

आरती, धन्यवाद!
जात बुडते - अगदी अगदी! खोलगट झाकण, खोबर्‍याची तपकीरी साल्..आईच्या हाताखाली काम करताना ह्या अगदी खास सुचना असायच्या Happy

आई श्रावण सोमवारी हमखास मुगाचे बिरडे करायची, का हे कधी विचारले नाही, कारण मुगाचे बिरडे खुप आवडते मला. कृती वाचुन तर आत्त्ताच खावेसे वाटतेय.
पन्ना, मी पण अर्धी सीकेपी Happy

पाकृ छानच आहे आणि त्याहीपेक्षा सवाई तुझी कॉमेन्ट्री! Proud

दिनेशदा, गौरी, अरुंधती आणि सगळेच धन्यवाद Happy
आर्च लवकर दे झब्बू, नाही तर मीच मला एक झब्बू देतेय- "सी. के. पी. पद्धतीचे तळक्या वाटणाचे मुगाचे बिरडे" Proud

"सी. के. पी. पद्धतीचे तळक्या वाटणाचे मुगाचे बिरडे"
वरच्या लिखाणातले खालचे मुद्दे असे बदला
लागणारे जिन्नस >>>२. अर्धा खोवलेला ओला नारळ ( यात खोबर्‍याची तपकिरी साल थोडे जरी आले तरी आमची जात बुडते, लक्षात घ्या )
३. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
४. १/२ इंच आलं
<<<

या ऐवजी : अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे , दोन उभे चिरलेले कांदे,४ -५ लवंगा, दोन मोठे दालचिनीचे तुकडे आणि १०-१२ लसणाच्या पाकळ्या

क्रमवार पाककृती : >>>४. हे परतणे चालू असताना, ओले खोबरे व लसूण एक कप पाण्यात बारीक वाटून घ्यावे. <<<
या ऐवजी : लोखंडाच्या कढईत २ चमचे तेल टाकून उभा चिरलेला कांदा मंद गॅसवर लाल परतून घ्यावा. अगदी बिर्याणीला लागतो तसा. तो बाजूला काढून ठेवावा. त्याच कढईत किसलेले सुके खोबरे, लवंगा, दालचिनी, लसूण टाकून तेही लाल परतून घ्यावे. आता त़ळलेला कांदा आणि खोबरे बारीक वाटून घ्यावे वाटण घट्ट्च असावे, साधारव चटणी सारखे.
आता हे वाटण परतत ( खरा सी.के.पी. शब्द सवतळणे - दिनेशदा यु गॉट इट Happy ) असलेल्या मूगात टाका. पुन्हा ५-७ मिनिटं परता. बाजूनी तेल सुटू लागले की मग पुढील कृती सुरू करा
<<<

सी.के. प्यांचे हेच ते प्रसिद्ध तळके वाटण.

अर्थात असे बिरडे फव-त मूग अन चवळीचेच करतात. वालाच्या बिरड्यासाठी वरची ओल्या खोबर्‍याचीच कृती.

वाव.. अगदी लांबलचक कृती आहे, बट वाचुन वाटले इट्स वर्थ इट....
कुठलाही पदार्थ अगदी निगुतीने करायचा ही सिकेप्यांची खासियत आहे बहुतेक...

वा चविष्ट आहे. मलाही मुगाच बिरड आवडत. पण आमच्या घरात माणसे जास्त असल्यामुळे बिरडही जास्त लागत. आणि त्यातुन मुगाच बिरड काढण म्हणजे फार किचकट काम. पण तुझी रेसिपी पाहील्यामुळे मला उत्तेजन आलय काढायला. आता ह्या सोमवारी करेन म्हणजे रवीवारचा अर्धा तास माझा बिरड काढण्यात जाणार.

ज्ञाती , अगं ते प्रत्येक सीकेपी घरात वेगवेगळे असते. माझ्याकडे १ किलो मिरचीला २०० ग्रॅम धणे अन ५० ग्रॅम बडिशेप असते. गेला बाजार तिखटातच धणे पूड आणि बडिशेप पूड मिक्स करून ठेवली तरी चालते. ( मी कधी कधी असं करते हे सांगू नका बरं इतर सीकेप्यांना Wink )
गौरी अगं मला तो सीकेपी मसाला अजिबातच आवडत नाही म्हणून मी त्याच्या भानगडीत कधी पडले नाही. साधना, जागू Happy

सी के पी फारच नाजूक जात !!!
खिम्याच्या पॅटिसचे कव्हर पारदर्शक झाले नाही. वरुन टाकलेला रुपया, कानवल्याच्या खाजीत रुतला नाही, रुमाली वडीच्या बेसनाचा भगरा झाला, तरी जाते.

( दोन्ही ) रेसिपी एकदम मस्त !
सीकेप्यांच्या घरात स्वयंपाक करु न शकणारी मुलगी पैदाच होत नाही की काय अशी मला आता शंका येऊ लागली आहे Happy

आमचं मुगाचं बिरडं (आईची पध्द्त)

हिंग मोहरी तडतडली की तिखट टाकायच आणि लगेच कांदा टाकायचा. तिखट जळू द्यायच नाही. तेलावर तिखट टाकलं की बिरड्याला लाल रंग येतो. ( बिरड्यावर लाल तवंग दिसतो.) कांदा थोडा पारदर्शक झाला की मोड आलेले, सालं काढलेले मूग टाकायचे. त्यावर हळद टाकायची. ते जरा सवताळले की लसूण आणि जिर्‍याचं वाटण लावायच. एक वाटी मोड अस लेल्या मुगासाठी ३-४ छोट्या पाकळ्या लसूण आणि अर्धा ते पाऊण टि स्पून जीरे पुरतात. वाटणाचा कच्च्या लसणाचा वास गेला की २ वाट्या पाणी टाकून मूग शिजवायचे. शिजले की कोकम किंवा चींच, गूळ आणि मिठ घालायच. मूग शिजले पाहिजेत पण मोडले नाही पाहीजेत. मोड्पण मोडले नाही पाहिजेत. शेवटी ओलं खोबर दालचीनीचा तुकडा घालून वाटायच. अगदी गुळगुळीत आणि ते आणि बारीक चिरलेली कोथींबीर टाकून उकळी आणायची. दाट, पातळ जसं हवं त्याप्रमाणे पाण्याच प्रमाण अ‍ॅडजस्ट करायचं. गरम गरम तूप भातावर मुगाच बिरडं एकदम मस्त लागतं. आमच्याकडे तिखटात धणे, बडिशोप वगैरे घालत नाहीत.

सवताळणे हा पण खास सीकेपी शब्द आहे का :)?
लालु च्या रेसिपी मधे पहिल्यांदा वाचला, अता इथे !
बाकी आरती, आर्च, मेधा सगळ्यांच्या रेसिपिज छान आहेत , पण मुगाची सालं काढून दिली पाहिजेत कोणीतरी!
फक्त विदर्भातला नवर्‍याचा 'विदर्भ' टॅग बुडेल जर खोबरं घातलेली उसळ खाल्ली तर Biggrin
मुळात पोळी भाता बरोबर उसळ खाणे हेच विदर्भातून हद्दपार करायला पुरेसं आहे , फक्त स्नॅक म्हणून खातात तिथे उसळी :).

फक्त स्नॅक म्हणून खातात तिथे उसळी >>>>>>> अगदि बरोबर.....पोळी भाता बरोबर उसळ खाणे हि कल्पना पन सहन होत नाहि विदर्भात.

अमेझिंग..

मला जात बुडायची भिती नसल्याने काळ्या पाठीचे खोबरे आणि थोडी साले असलेले मुग वापरुन करेन.

फक्त ते ७-१० मिनिटे परतणे याला काही पर्याय आहे का?? आधीच्या जमान्यात सैपाक इतका फर्मास होत असे याचे मूळ या ७-१० मिनिटे परतण्यात आहे असे मला राहुन राहुन वाटते Happy

नक्तयाच्या बिरडयाची रेसिपीपण टाक ना.

आता हे काय आणखी? हे कुठले कडधान्य??

नक्तयाच्या बिरडयाची >>> साधना, कडधान्य नविन नाही. मूगाचं बिरडं पण वेगळ्या पद्धतीनं करतात.

अवलच्या मूगाच्या धाग्यावर मी थोडक्यात आणि आठवेल तशी कृती लिहिली आहे बघ.

Pages