Submitted by निंबुडा on 11 June, 2010 - 11:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१) अर्धा किलो अळकुड्या
२) ग्रेव्हीसाठी:
- १ कप दही (छान फेटलेले हवे. आणि खूप आंबट नको.)
- आले + हिरव्या मिरच्या + कोथिंबीर + पुदीना यांचे वाटण
- बारीक चिरलेला टोमॅटो
३) फोडणीसाठी:
- ओवा
- हळद
- तेल
४) चवीसाठी:
- मीठ
- गरम मसाला
- लाल तिखट
क्रमवार पाककृती:
१) मीठाच्या पाण्यात अळकुड्या उकडून घ्या. (मी प्रेशन कुकर मध्ये उकडून घेते.) फार मऊ होऊ देऊ नका.
२) उकडलेल्या अळकुड्यांची साले काढा व हव्या त्या साईझ चे तुकडे करून गुलाबी रंग येईस्तोवर तेलात परतून घ्या.
३) तेलात वर दिलेले फोडणीचे साहित्य घालून फोडणी करा.
४) या फोडणीत ग्रेव्ही चे साहित्य घालून परता.
५) नंतर तळलेल्या अळकुड्या घाला व चांगलं परता.
६) गरजेनुसार पाणी घाला (ग्रेव्ही पातळ्/दाट जशी हवी तशी करण्यासाठी) व उकळू द्या.
७) चव बघून तिखटपणा कमी वाटल्यास लाल तिखट घाला.
वाढणी/प्रमाण:
आपापल्या अंदाजाप्रमाणे
अधिक टिपा:
- आग्रा व मथुरा येथे ही भाजी केली जाते.
- अळुकुडी/अळकुडी= अळुकंद = अरबी
(माझ्या साबा अळकुडी ला अडकुळी म्हणतात. मला पहिल्यांदा हडकुळी असे ऐकायला आले. )
माहितीचा स्रोत:
उषा पुरोहितांचे पाहुणचार (शानदार पाककृती) नावाचे पुस्तक.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो फोटो. ओ अॅडमिन हिला
फोटो फोटो.
ओ अॅडमिन हिला सांगा हो..
आणि हा परप्रांतिय पदार्थ मराठमोळ्या माबोवर??
झक्की साहेब कुठे आहेत?
ए मस्त आहे गं हा प्रकार,
ए मस्त आहे गं हा प्रकार, डुबकीवाल्या आलूसारखाच..... मी अरबीऐवजी आलू घालून किंवा पनीर घालून करुन बघणार लवकरच! एव्हाना डुबकीवाले आलू घरात ''फेव्हरिट'' लिस्टवर गेलेत सध्या! शाही अरबीही फार तिखट वाटत नाहीए आणि करायला अगदी सोप्पाय!
ए मस्तच दिस्तेय म्हणजे वाटतेय
ए मस्तच दिस्तेय म्हणजे वाटतेय ही अरबी.. वाचतांनाच तोंडाला पाणी सुटत होतं
परप्रांतिय पदार्थ मराठमोळ्या
परप्रांतिय पदार्थ मराठमोळ्या माबोवर?? >>>
काय परप्रांतिय ??? अरबी ?? अरे, ही अळकुडी मूळची भारतीय नाही का?
निंबुडा, आज केली तुझ्या
निंबुडा, आज केली तुझ्या रेसिपीनी अरवीची भाजी. एकदम मस्त. अरवी एवढी टेस्टी लागू शकते ह्याचच कौतुक वाटलं. अरवी मायक्रोवेव्हमध्ये उकडून घेतली. कुंडीत लावलेला पुदीना आणि कोथिंबीर होतीच आणि अक्षरशः १० मिनिटात भाजी तयार. धन्यावाद ग. फोटोपण बघ.
ओये मला सांगा ही अळकुड्या काय
ओये मला सांगा ही अळकुड्या काय भानगड आहे????????
हडकुळी >>>>>>>>
हडकुळी >>>>>>>>
हे अळकुडी नक्की काय असते?
हे अळकुडी नक्की काय असते?
बाजारात मागताना काय मागायचे
बाजारात मागताना काय मागायचे 'अळकुडी' म्हणजे? दुकानदार येड्यात काढायचा नाही तर..........
अळकुडी/अरवी ही भाजी आहे हो,
अळकुडी/अरवी ही भाजी आहे हो, दुकानदाराकडे नका मागू. आल्यासारखी वेडीवाकडी असते बर्याचदा. शिजवून केली तर बटाट्याच्या भाजीसारखीच दिसते.
अरवी नावाने ही सर्वत्र मिळते!
अरवी नावाने ही सर्वत्र मिळते! हे आळूचे कंद आहेत म्हणून ह्याल अळकुड्याही म्हणत असावेत!
मध्यन्तरी चण्डीगडात असताना खूप वेळा खावी लागल्याने आता कंटाळा आलाय.. ह्या रेसिपीने एकदा ट्राय करायला हवी!
दुकानदाराकडे नका मागू>>>
दुकानदाराकडे नका मागू>>> भाजीवाला दुकानदार नसतो का?
तपकीरी रंगाचे मध्यम आकाराचे कंद असतात ते का?
भाजीवाला दुकानदार नसतो का? >>
भाजीवाला दुकानदार नसतो का? >> नाही दुकानदार असायला दुकान हवे ना
हे अळकुडी नक्की काय
हे अळकुडी नक्की काय असते?>>>>>>>>>>>>>++++१
निंबुडा काहीच सांगत नाहीत...
निंबुडा काहीच सांगत नाहीत... लवकर सांगा... लोक खोळंबलेत
निंबुडा, तु वर्णन केलेली भाजी
निंबुडा, तु वर्णन केलेली भाजी मार्केटमधे पाहिली आहे. याने घशाला खवखवत नाही ना?
अळकुड्या म्हणजे अळुचे कंद..
अळकुड्या म्हणजे अळुचे कंद.. उत्तर भारतात हे कंद खातात.. आपण अळूची पाने खातो, कंद फारसे खात नाही.. याला अरवी किंवा आरवी म्हणतात.
इथे फोटो आहे.. http://en.wikipedia.org/wiki/Colocasia
आ रा रा रा रा......... लोक
आ रा रा रा रा.........
लोक नुस्ते पेटलेत अळकुड्यांमागे
(मी इथे इमॅजिनू लागलेय की लोक माझ्या उत्तराची वाट पाहत खोळंबलेत आणि "ये इलु इलु क्या है ये इलु इलु?" च्या चालीवर "ये अळकुडी अळकुडी क्या है ये अळकुडी अळकुडी ?" करत बसलेत.)
जामोप्यांनी दिलेल्या लिंक वरती वरून दुसरा फोटु अळकुड्यांचा आहे. अळूचे कंद असतात ते. आता भाजीचा अळू की भजीचा अळू ते काय आपल्याला माहीत नाय ब्वा! (दिनेशदांना विचारले पाहिजे)
याने घशाला खवखवत नाही ना?
>>
कधी कधी खाजरे निघू शकतात हे कंद. पण ते बाजारातून घेतानाच ओळखण्याची टॅक्ट नाही माहीत. मी तरी अति लांबट, बारके असे घेत नाही. चांगले टण्णे टण्णे पाहून घेते. मग ते खाजरे निघत नाही असा अनुभव आहे.
टण्णे टण्णे .... हा हा हा सही
टण्णे टण्णे .... हा हा हा सही !
आज करून पाहिलं; वर प्र.चि.त
आज करून पाहिलं; वर प्र.चि.त दिसतंय तसंच 'टेक्स्चर' आलंय. छान रेसिपी. धन्यवाद.
[ फोडणीला ओवा किंचित जास्त पडला माझ्याकडून; पुढच्या वेळेस होईल अधिकच छान !]
वा वा (अळकुडी म्हणजे अर्वी
वा वा
(अळकुडी म्हणजे अर्वी होय! व्हेरी रिच इन प्रोटीन्स)
मस्त पदार्थ सांगितलात
या रविवारी करणार
मस्त रेसिपी आहे. आता अशा
मस्त रेसिपी आहे. आता अशा प्रकारे करून बघणारच !
माझ्या लिस्ट्वर ....वेगळी
माझ्या लिस्ट्वर ....वेगळी रेसिपी ..:)
दही आणि अरवी हे काँबो चांगलं लागेल आणि दह्याचा आंबटपणा अरवीचा खाजरेपणा कमी करु शकेल असं वाटतंय...
तुझ्याकडचा फोटो पण टाक गं केव्हा जमेल तेव्हा
निंबुडे, अळकुडी माझी अत्यंत
निंबुडे, अळकुडी माझी अत्यंत आवडती. आणताना खूप आणते कारण ठरवलेल्या रेसिपीत जाण्याआधी माझ्याच पोटात जास्तं जाते... येता जाता.
एक प्रश्नं... नुस्तं दही असलेले ग्रेव्ही उकळण्यात फुटत नाही?
नुस्तं दही असलेले ग्रेव्ही
नुस्तं दही असलेले ग्रेव्ही उकळण्यात फुटत नाही?
>>>
नाही . दही फुटत नाही. चांगले घोटुन घ्यायचे आणि पाणी टाकतोच ना नंतर! ताकही चालू शकेल. पण दही जरा दाट असल्याने कन्सिस्टन्सी चांगली येते.
माझी फार आवडती भाजी आहे ही. फक्त अळकुड्या खाजर्या नसल्या पाहिजेत.
<<<<फक्त अळकुड्या खाजर्या
<<<<फक्त अळकुड्या खाजर्या नसल्या पाहिजेत.>>> पण नेमकं हे कसं ओळखचं ? काही टीप्स आहेत का ?:)
अळकूड्या, खाजर्या आहेत का हे
अळकूड्या, खाजर्या आहेत का हे ओळखायची वरुन तशी काही टिप नाही, पण कोंब किंवा टोकाकडचा भाग गुलाबी / लालसर असेल तर सहसा खाजर्या असतात. ( सुरणाच्या बाबतीत मात्र एक परिक्षा करता येते, कापलेल्या सुरणाचा नखभर भाग घेऊन तो आपल्या कानाला, जिथे भिकबाळी घालतात तिथे लावायचा. खाजरा असेल, तर मिनिटभरात खाज सुटते. भाजीवाल्याकडून घ्यायच्या आधीच हे करता येते.
तशी शेतकर्यांना पण खाजर्या सुरणांची कल्पना असतेच, त्यामूळे, आता खाजरे सुरण बाजारात कमीच येतात.)
खाजर्या अळकुड्या, कापतानाही खाजतात. त्यावेळीच लक्षात यायला हवे. पण अख्ख्या उकडल्या, तर असे नाही करता येत.
आपल्या भाजीच्या अळूच्या गड्ड्या गोलसर असतात, त्याची पण भाजी करतात. पण बाजारात अरवी येते ती वेगळी अळूची जात आहे. गोव्यात त्यांना मुंडले असा शब्द वापरतात.
गोव्यातच आणखी एक मोठ्या अळूचे मूळ खाण्यासाठी वापरतात ( नाव विसरलो ) जमिनीतून काढल्यावर ते खुपच खाजरे असते पण दोन आठवडे तसेच ठेवले कि त्याची खाज जाते. त्याची बहुदा कापे करतात.
अळूची मूळे तशी अनेक देशात खातात. ( टॅरो ) अनेक देशांत तर तांदूळ / मका याच्या ऐवजी ती खातात.
न्यू झीलंडमधले स्थानिक तेच खातात. नायजेरियात पण तो कोकोयॅम नावाने खातात.
पण जर कल्पना नसेल, तर अनोळखी कंद, जरी ते अरवी / सुरणासारखे दिसत असले तरी खाऊ नयेत. प्रसिद्ध लेखिका, दुर्गाबाई भागवत यांना सुरणातूनच विषबाधा झाली होती आणि त्या खुप आजारी पडल्या. त्या
आजारपणातच त्यांनी, ऋतूचक्र लिहून पूर्ण केले.