Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
हाय अस्मिता... थँक्स खूप.
हाय अस्मिता... थँक्स खूप.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
प्लीज 'तुम्ही' म्हणू नकोस. 'तू' म्हण, म्हणजे लग्गेच गप्पा मारायला सुरुवात करता येईल
तू बेकरीत नवीन असलीस तरी सध्या मी एकूणच मायबोलीवर मोठ्या गॅप ने येत आहे... त्यामुळे सध्या तूच सिनीयर आहेत
धन्यवाद, फा आणि रमड....
तू' म्हण, म्हणजे लग्गेच गप्पा
तू' म्हण, म्हणजे लग्गेच गप्पा मारायला सुरुवात करता येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> चालेल.
हाय रार, वेलकम बॅक
हाय रार, वेलकम बॅक
चतुर नारचा लेख अस्मिताने वर
चतुर नारचा लेख अस्मिताने वर आणल्यामुळे वाचला परत. चतुर नार म्हंटल्यावर लक्ष गेलेच (गाणे या अर्थाने
). तो लेख तर मस्त आहेच पण परवा एकदा त्यातलेच मेरे सामनेवाली खिडकी मे परत पाहात होतो. त्यात पहिले कडवे संपताना एक नोटिस केले. "...अब आठ पहर इन आँखोंमे" पर्यंत गाणे एका लयीत आहे आणि मग "वो चंचल मुखडा रहता है" एकदम वेगात आहे. तेथे किशोरकुमारही ते सादर करताना आधीपेक्षा वेगात डोलतो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकीनुसार कमल हासन म्हणे तेव्हा पिक्चरविरूद्ध प्रोटेस्ट करायला गेला होता पण प्रत्यक्षात पिक्चर एन्जॉय करून बाहेर आला.
बाकी पुस्तके वाचणार्या हिरॉइन्स हा एक वेगळाच विषय आहे. इथे खिडकीसमोर उभे राहून वाचणारी सायरा बानो, मेरे सपनोंकी रानी मधे रेल्वेमधे वाचणारी शर्मिला, डीडीएलजे मधे जीले अपनी जिंदगी करायला निघालेली पण ट्रेनमधे शिरल्यावर बाहेर सुद्धा ढुंकून न बघता एक पुस्तक उघडणारी काजोल. दिचाहै मधे आमिरला शहर दाखवायला आलेली पण त्याच्याबरोबर बसमधे की लाइट रेल मधे बसल्यावर पुस्तकात डोके खुपसलेली प्रीती झिंटा.
तेव्हाच्या हिरॉइन्स कडे
तेव्हाच्या हिरॉइन्स कडे मोबाईल नव्हता. काय करणार बिचाऱ्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तर, तर रमड मी तर पुस्तक उघडत
पुस्तक वाचणारे किंवा वाचल्यासारखं करणारे हिरोही आहेत. पडोसन मधेच सुरवातीला 'मैं चली मैं चली' गाण्यानंतर सगळ्या तरुण सुंदरी पिकनिक करत असतात आणि सुनील दत्त पुस्तक वाचत असतो. त्यात पुरुषांनी पंचवीस वर्षे वय होईपर्यंत ब्रह्मचर्य व पंचवीस ते पन्नास गृहस्थाश्रमाचे पालन करावे अशी मौलिक माहिती दिलेली असते ते वाचून भोला मोठ्याने स्वगतात "मी तर सव्वीस वर्षांचा होईल सहा महिन्यांत म्हणजे माझे गृहस्थाश्रमाचे सहा महिने वाया गेले की चक्क" म्हणतो. मग त्याला "चतुर नार अवेअरनेस" येते. भोळा भाबडा आहे बिचारा.
मला चतुर नार गाणं पाठ आहे, त्यातला पर्फेक्ट 'केऑस' बघून असं वाटतं की दिग्दर्शकाने 'तुम्हाला काय करायचे ते करा' म्हणून सोडून दिलं असेल. महमूदची बिंदूवरची नजर लंपटपणाचा आदर्श नमुना आहे. हलकट नाही अजिबात पण लंपट. 'तू क्या जाने क्या है नारी, जिस तन लागे मोरे नैना' या ओळींच्या वेळी डोळे कसे करतो ते बघा. तिला खेटलेले विशेष आवडत नाही.
मेहमूद नाचायला लागला की इकडे भोलाचा कॉन्फिडन्स जातो व तो पलंगावर बसल्याबसल्या मागे सरकत जातो पुन्हा किशोरला त्याला गुदगुल्या करून 'दमके मुदन चिवरी चकड'
असं अगम्य बोलत पुढे आणावं लागतं. "इस नारी का दास न बन जो, राह चलत को राह भुलाये, काला रे जा रे जा रे" नंतर मेहमूदलाही रंगात आल्याने 'चुकून' मजा यायला लागते व ती कोपऱ्याने पोटात ढोसते, मजा नाही घ्यायची शर्यत आहे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंतर मेहमूद थोडा मागे पडतोय लक्षात येताच भोलाचा कॉन्फिडन्स जास्तच होऊन तो आवेशात उठून खिडकीजवळ जातो पुन्हा किशोरला तो दिसू नये म्हणून आडवं पडून फाशीसारखा दोर करून भोलाच्या गळ्यात पाडून मागे आणावे लागते.
नुसता गोंधळ पण काय मस्त भट्टी जमली आहे. अजूनही हसू येते. अशी सपोर्ट सिस्टीम असल्यावर 'चतुर नार' नाही पटली तर नवलच.
मला ते 'चंचल मुखडा' चे डोलने लिंक न क्लिकताच कळाले. पुस्तक वाचणाऱ्या हिरोईन्सही सगळ्या आठवल्या.
प्रीतीचे तर (Steve Martini असं काही तरी) पुस्तकही आठवले. काजोलचे Mills and Boons होते बहुतेक.
भन्नाट वर्णन केले आहेस. सगळे
या गाण्यात नाही तो बहुतेक, पण "भोले, नीचे से गा" हाही एक टोटल लोल संवाद आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिचाहै बद्दल - मला आधी ते स्टीव्ह मार्टिन (अॅक्टर) चे पुस्तक वाटले. पण नंतर याही (Steve Martini ) नावाचा लेखक आहे हे समजले. त्यामुळे ते पुस्तक दाखवण्यामागे एकदम सो हाय क्लास वाचत आहे असे काहीतरी दाखवायचे असेल.
रमड - म्हणजे आताच्या अशा सीन्समधे ती हिरॉइन रील्स तरी बघत असेल किंवा एखाद्या व्हॉटसअॅप अंकल किंवा काकूने पाठवलेले जीवनाचंही असंच असतं वाचत असेल का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल नेफिवर "रोशन्स" चा पहिला भाग पाहिला. नंतर रोशनचीच बरीच गाणी लावत बसलो होतो.
स्टीव्ह मार्टिन (अॅक्टर) चे
स्टीव्ह मार्टिन (अॅक्टर) चे पुस्तक वाटले. पण नंतर याही (Steve Martini ) नावाचा लेखक आहे हे समजले. त्यामुळे ते पुस्तक दाखवण्यामागे एकदम सो हाय क्लास वाचत आहे असे काहीतरी दाखवायचे असेल.
पांढऱ्याशुभ्र केसांचा 'फादर ऑफ द ब्राईड' मधला स्टीव्ह मार्टिन डोळ्यासमोर आला व ही जे पुस्तक वाचतेय त्यात शेवटी 'I' जास्तीचा असणे ही प्रिंट मिस्टेक असावी असे मनापासून वाटले.
पण ते 'उच्च अभिरुची' गटातील निघाले.
>>> मलाही.
भोले, नीचे से गा" >>>
सुरवातीच्या ट्रेनिंग मधे आधी उभ्याने गाणारा भोला हे ऐकून खाली बसून गायला लागतो. मग ह्याचं काहीच होऊ शकत नाही आता लिप सिंक करूनच इम्प्रेशन मारावे लागणार आहे असे ठरते. बहुतेक तेच...
हो तोच सीन
अस्मिता
अस्मिता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भोले, नीचे से गा >>> अरे ते कहर आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फा
आत्ताची हिरवीण रिल्स बघत असण्याची शक्यता जास्त. जीवनाचे fwds वाचत असेल तर ती पुरेशी तरुण तरी नसेल किंवा काहीच्याकाही वर टाकायला हा fwd योग्य आहे का हे चेक करण्यासाठी वाचत असेल ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अस्मिता, फा, रमड
अस्मिता, फा, रमड![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुस्तक वाचणार्या हिरो-हिरोईनचा विषय चालला आहे तर नाचे नागीन गली गली मधल्या गाण्यातल्या नितीश भारद्वाजचा उल्लेख व्हायलाच हवा. याच्यासाठी खास डान्स चालला आहे आणि सर "how to make your own high pressure spray plant" वाचत आहेत. (https://youtu.be/QRR_-WWAJ00?&t=147)
how to make your own high
how to make your own high pressure spray plant >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय पण नाव पुस्तकाच
काय पण नाव पुस्तकाच![smiley36.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/smiley36.gif)
अस्मिता , पायस काय मेमरी आहे तुमची!! धन्य आहात, दन्डवत स्विकारा...अस्मिताने काय परफेक्ट वर्णन केलय.
अस्मिता, फा, रमड आणि पायस....
अस्मिता, फा, रमड आणि पायस.... जबरी !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
)
मधे कधीतरी मी 'पडोसन' पाहिला परत एकदा आणि मला जाणवलं की सिनेमाच्या स्क्रीनप्लेमध्ये रेल्वेची स्टेशन असल्यासारखं आधी सगळी गाणी एकानंतर एक प्लेस केली आहेत.... आणि कथानकाची ट्रेन 'गाणी ते गाणी' असा प्रवास करत जाते
(पूर्वीच्या संगीत नाटकात आणि त्याच संगीत नाटकांवर आधारित सध्याच्या सिनेमात असतं तसं
how to make your own high
how to make your own high pressure spray plant >>> पायस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
परदेस मधली अपूर्व अग्निहोत्रीच्या रूम मधली पुस्तके, "लाल इश्क" मधल्या हॉटेलच्या लॉबीमधली पुस्तके हा आणखी एक रिसर्चचा प्रकार आहे
आणि ती जगप्रसिद्ध "इंजिनिअरिंग की किताब" ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याच संगीत नाटकांवर आधारित सध्याच्या सिनेमात असतं तसं >>>
मानापमान का? यात जुन्यातील काही गाणी स्किप केली आहेत ना? मग पिक्चरच्या सुरूवातीला लोकलच्या इण्डिकेटरसारखे एक गाण्यांची लिस्ट देऊन "निम्न गानोंपरही रूकेगी" लिहायला हवे त्यांनी. डबल फास्ट मानापमान ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निम्न >>> हे गाण्यांच्या
निम्न >>> हे गाण्यांच्या क्वालिटीबद्दल पण आहे का?
#नोमानओन्लीअपमान ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी पाहिला नाही त्यामुळे
आवडण्याची "जमीन तयार झालेली"
आवडण्याची "जमीन तयार झालेली" असतेच >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
)
यावर 'राज' मधलं तिचं वाक्य आठवलं - ' कब से इस प्यासी जमीन पर बारिश की एक बूँद तक नहीं गिरी... ' वगैरे. तिकडे अगदीच ९८ वीय झालं असतं, म्हणून इथे लिहिलं
( त्या वाक्याचा उत्तरार्ध - पर आज यहाँ तूफान आयेगा' असा आहे. तसं काही झालंच तर सांगायला विसरू नकोस बरं का
राज म्हणजे भट्ट कंपनीवाले
राज म्हणजे भट्ट कंपनीवाले पिक्चर आले होते त्यातला का?
हो हो , तोच.
हो हो , तोच.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही घे तुझ्यासाठी लिंक -
https://youtu.be/gIeVY90ivPU?si=x46_F7-ClZIPPkSI&t=632
कब से इस प्यासी जमीन पर बारिश
कब से इस प्यासी जमीन पर बारिश की एक बूँद तक नहीं गिरी >>
तयार जमिनीचा काँटेक्स्ट नाही पण हा डायलॉग ऐकून एएसएमआर मोडमधली बिपाशा नजरेसमोर येतेच.
एएसएमआर मोडमधली बिपाशा >>>
एएसएमआर मोडमधली बिपाशा >>> अगदी अगदी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तयार जमिनीचा काँटेक्स्ट घेऊन कल्पनेला फारच धुमारे फुटायला लागले होते बाकी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एएसएमआर मोडमधली बिपाशा >> ते
एएसएमआर मोडमधली बिपाशा >> ते धपापल्या उरावाली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)