गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू)

Submitted by निंबुडा on 31 May, 2010 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) बटाटे

२) ग्रेव्ही साठी

  • कोथिंबीर
  • पुदीना
  • दही
  • आमचूर (ऐन वेळी आमचूर नसल्यास मी चाट मसाला वापरते.)
  • हिरवी मिरची
  • आलं

३) फोडणी साठी

  • तूप
  • जिरं
  • बडिशोप
  • ओवा
  • मेथीचे दाणे
  • हळद

****मोहरी नको****** (मला नाही बाई आवडत. तुम्हाला आवडत असल्यास घाला.)

४) चवीसाठी:

  • मीठ
  • तिखट
  • गरम मसाला
क्रमवार पाककृती: 

माझ्याकडे एक रेसिपी बुक आहे. त्यामध्ये ही उत्तर प्रदेशीय भाजीची रेसिपी दिलेली आहे. नावाच्या वैचित्र्यामुळे आमच्या घरात ती फेमस आहे. त्या पुस्तकाचे नाव आणि लेखिकेचे नाव आता आठवत नाहिये. शोधून नक्की देईन. या रेसिपी बुक मधल्या काही काही भाज्या आणि सूप्स माझे फेवरिट आहेत. त्यांपैकीच एक ही गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू) ची भाजी. खाली दिलेल्या रेसिपी मध्ये मूळ कृती पुस्तकाप्रमाणे असली तरिही मी माझ्या मनाने त्यात काही बदल केले आहेत. त्यामुळे ही निंबुडा पद्धतीची भाजी आहे याची कृपया नोंद घ्यावी. Happy

काल (रविवारी) साबांची तब्येत बरी नसल्याने स्वयंपाकघराचा ताबा अस्मादिकांकडे होता. त्यामुळे माझ्या पाककौशल्याला स्फुरण चढले आणि वर सांगितलेल्या रेसिपी बुक च्या मदतीने मी ही भाजी ट्राय केली. (माहेरी खूप वेळा केली होती, पण सासरी आवडेल की नाही याची शाश्वती नसल्याने आगाऊपणा केला नव्हता).

१) साधारण ५-६ बटाटे मऊ उकडून घ्या. साल काढून हाताने फोडून घ्या. एका कढईत (पॅन मध्ये) तूपावर मीठ घालून हलके परतून घ्या.

२) ग्रेव्हीची कृती:

  • कोथिंबीर + हिरवी मिरची + पुदीना + आलं मिक्सर मध्ये बारीक वाटून पेस्ट बनवून घ्या.
  • दही (४-५ चमचे पुरे आहे. खूप घातल्यास भाजी आंबट होते.) + आमचूर फेटून घ्या.

३) फोडणी:
कढईत तूपावर वर दिलेले फोडणी साहित्य घालून फोडणी करा आणि त्यात वर दिलेल्या (स्टेप नं. २ मधील) मिरची+कोथिंबीर ची पेस्ट आणि फेटलेले दही + आमचूर घालून परता.

४) थोडा वेळ परतल्यानंतर गरम मसाला घाला.

५) उकडून स्मॅश केलेला व तूपावर परतलेला बटाट्याचा लगदा यात घाला. अंदाजाने पाणी घाला. व ढवळा.

६) चवीनुसार मीठ घाला. तिखटपणा कमी वाटल्यास तिखट टाका.

७) ग्रेव्ही घट्ट होऊन बटाटा त्यात छान एकजीव होईस्तोवर ढवळा.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

माझ्या मेहेनतीचे चीज: नवरोबा, साबा आणि साबु ना भाजी आवडली. Happy
चाटून पुसून कढई साफसूफ Wink
या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे तेल वापरलेले नाही. ओन्ली तूप Lol

माहितीचा स्रोत: 
उषा पुरोहितांचे पाहुणचार (शानदार पाककृती) नावाचे पुस्तक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म्म्म्म.. चांगली वाट्टेय रेसिपी.. करुन बघितली पाहिजे..
निंबे.. तूप म्ह्ण्जे साजूक ना का वनस्पती वापरल होतस?

तूप म्ह्ण्जे साजूक ना का वनस्पती वापरल होतस?

साजुक तूप गं........ आमच्याकडे वनस्पती तूप नाही वापरत. घरी कढवलेलं कणीदार साजुक तूप Happy

येस्स्स! सह्ही पाककृती आहे.... लवकरात लवकर स्वतःवर व घरातल्यांवर प्रयोग करणार!!!! Happy मला फोडणीतले घटक फार आवडले.... त्यांची वेगळीच चव येणार आणि तुपाच्या - जिर्‍याच्या फोडणीचा खमंग दरवळ व स्वाद! अहाहा!!

आमचूर किती चमचे?

एक टी-स्पून पुरे होईल.

अजून एक variation आहे.
जर घरातले दूधी भोपळा/लाल भोपळा या भाज्या खात नसतील पण या भाज्या त्यांच्या पोटात जाव्यात अशी इच्छा असेल तर या भाज्या उकडून त्यांची प्युरी ग्रेव्ही मध्ये टाकता येईल. Wink

मी कधीकधी टोमॅटो ची प्युरी किंवा टोमॅटो चे बारीक तुकडे करून फोडणीत परतूनही घालते या भाजीला. स्वाद येतो छान. पण अशा वेळी दही जरा बेताने घालावे. टोमॅटो आणि दही या दोन्हीचा अतिरेक झाल्यास आंबट होऊन जाईल.

तुपाच्या - जिर्‍याच्या फोडणीचा खमंग दरवळ व स्वाद! अहाहा!!

अकु, बडीशोपेचा स्वाद फार छान लागतो. तसंच पुदीनामुळेही चव येते.

ते पुस्तक आहे माझ्याकडे, त्यात बटाट्याच्या बर्‍याच कृति आहेत. हा प्रकार छान लागतो.
मूळ कृतित बरेच तेल असते, (खरे तर तेलात डुबकी घेत असतात बटाटे )

>>मला वाटतं ही रेसिपी उषा पुरोहितांच्या पाहुणचार पुस्तकातील आहे. <<

आज घरी जाऊन बघते त्या पुस्तकाचं नाव......... काल वेळ नाही मिळाला Sad

त्यातल्या रेसिप्या खरंच छान आहेत.

निंबुडे, कालच रात्री ही भाजी केली होती! अहाहा, काय सांगू तुला.... अ प्र ति म!
अजिबात तेलकट, तुपकट नाही, पुदिना-बडिशेपेचा अफलातून स्वाद आणि थेट गंगाकिनारी हरिद्वार किंवा ऋषिकेशला घेऊन जाणारी चव! मला तर एखाद्या द्रोणात ही गरमागरम भाजी, उत्तरेच्या स्टाईलच्या पुर्‍या, जलेबी आणि साथमें लस्सी मलई मारके.... अशीच खावीशी वाटत होती! (पुर्‍या व जलेबी सोडून बाकी सर्व इच्छा पूर्ण!;-)) आणि मग त्यावर बनारसी मीठा पान! स्वर्ग कुठं आणि कशासाठी असतो? Proud

गंगाकिनार्‍याच्या अजून काही रेसिपीज असतील त्या पुस्तकात तर टाक इथे अजून! धम्माल चव असते त्या पदार्थांची! Happy

धन्स, अकु.

तुमच्या कालच्या response वरूनच मला असे vibes येत होते की तुम्ही नक्की करून पाहणार ही भाजी.
तुम्ही पुरीचा उल्लेख केलात आणि आठवलं. त्या पुस्तकातही उत्तर प्रदेशात ही भाजी पुरी (याला ते लोक पुडी असे संबोधतात) सोबत खाण्याची पद्धत आहे.

गंगाकिनार्‍याच्या अजून काही रेसिपीज असतील त्या पुस्तकात तर टाक इथे अजून! <<<

शोधून बघते. अजून एक अळकुडी (अरबी) ची पण भाजी आहे त्यात. "शाही अरबी" अशा नावाची. ती पण माझी फेवरीट आहे.

बरोबर... तिकडे तिला पूडी-भाजी अशाच कॉम्बोमध्ये खाण्याची पध्दत आहे! Happy अरबी मी खात नाही, पण रेसिपी इंटरेस्टिंग असेल तर मग अरबी ऐवजी इतर भाज्या वापरता येतील!
मला ह्या डुबकीवाल्या भाजीचा मसाला फार आवडला. गंगेत डुबकी लगावायची आणि मग ही गरमागरम सब्जी-पूडी हादडायची! Proud

अरबी ऐवजी इतर भाज्या वापरता येतील!

येस्स्स... मी एकदा दम आलू वापरून ती शाही अरबी (शाही दम आलू Wink ) केली होती. या गंगा किनारेवाले आलू मध्येही दम आलू वापरता येतील नै??? मग स्मॅश करायला नको. नुसते उकडून तूपावर परतून घ्यायचे आणि ग्रेव्ही मध्ये डुबक्या मारायला सोडायचे. Happy

छाने रेसिपी, वाचताना मला आधी बटाट्याच्या फोडी असतील असच वाटलेलं पुढे मॅश केल्याच कळल. फोडीपण मस्त लागतील.
हि भाजी करुन बघेन आजच.
अळकुड्यांची रेसिपी पण टाक. मी आणलेत आत्ता Happy

पार्ल्यातली चर्चा वाचून ह्या बीबी वर आलो.. भाजी टेस्टी लागेल असं वाटतय..
मात्र...

"काल (रविवारी) साबांची तब्येत बरी नसल्याने स्वयंपाकघराचा ताबा अस्मादिकांकडे होता. त्यामुळे माझ्या पाककौशल्याला स्फुरण चढले आणि वर सांगितलेल्या रेसिपी बुक च्या मदतीने मी ही भाजी ट्राय केली. (माहेरी खूप वेळा केली होती, पण सासरी आवडेल की नाही याची शाश्वती नसल्याने आगाऊपणा केला नव्हता)."

हा प्यॅरा वाचून तुमची घरात फारच कुचंबणा होते आहे की काय अशी शंका येत्ये.. तुम्ही कोणाशीतरी (माबोवरच्या "विशिष्ठ" आयडीजशी) बोलून का बघत नाही ??? Wink

सगळ्यांना रेसिपी आवडली आणि अकु, अमृता व स्वरा१२३ यांनी करून पाहून आवडल्याचे कळवले... छान वाटले. सर्वांना धन्यवाद.

हा प्यॅरा वाचून तुमची घरात फारच कुचंबणा होते आहे की काय अशी शंका येत्ये.. तुम्ही कोणाशीतरी (माबोवरच्या "विशिष्ठ" आयडीजशी) बोलून का बघत नाही ???
>>>

पराग, सासर कोब्रा (फणा काढलेला नाग डोळयांसमोर आणा Wink ) आणि माहेर देब्रा त्यामुळे बर्‍याचशा बाबतीत विभिन्नता आहे. Happy आणि माझ्या साबांच्या हाताला अशी काही चव आहे की मी काहीतरी अगडम बगडम करून खायला घातले आणि नाही आवडले तर पंचाईत असे वाटून शक्यतो मी नसत्या भानगडी करायला जात नाही. कुचंबणा वगैरे काय....... ?? कै च्या कै !!!! Wink

तुपाच्या - जिर्‍याच्या फोडणीचा खमंग दरवळ व स्वाद! अहाहा!!!
खरचं अहाहा!!!!!!!!
मी sunday ला करुन पाहीन...

निंबुडा, आजच ही भाजी करून बघितली. छान झाली होती. चक्क नवर्‍याने कुरकुर न करता एक पोळी जास्त खाल्ली, म्हणून कारण विचारलं तर म्हणाला, भाजी बरी झालीये. I take it as a compliment. Proud

निंबुडा, डुबकीवाले आलू करुन पाहिले. छान चव आहे, सर्वांना आवडली. धन्यवाद.
मी फोटो काढला आहे, हरकत नसेल तर इथे टाकते.

rassa.jpg

Pages