व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी.

Submitted by admin on 3 April, 2008 - 13:03

व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी. मधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Davandi2riksha3.jpg

लोकहो... मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दुसरी दवंडी झाली बरंका!
अहो, विचार काय करत बसलात? चला पटापट! गणेशोत्सव स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीला लागा!

स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी इथे टिचकी मारा!

TV Asia वर गुरुवारी 'कम्युनिटी राऊंडअप' मध्ये लेझिम, मिरवणूक पहा..

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

२४ मार्चला नॅशनल मॉलवर रिझन रॅली आहे. डॉकीन्स, रँडी प्रभुती, तसेच तसलिमा नसरीन आणि इतर नावाजलेले लोक हजेरी लावणार आहेत. सकाळी १० ते १३:३० पर्यंत मी तिथे असणार आहे. डी. सी. भागातील कोणी येणार आहे का?

http://www.reasonrally.org/

Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!

दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!

मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!


decorative.gif

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

आईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)

नमस्कार लोकहो !

आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय - सिनेमा ! आपण अगदी तासन्तास चित्रपटांबद्दल, त्यातल्या गाण्यांबद्दल, कलाकारांबद्दल, आवडत्या/नावडत्या प्रसंगांबद्दल भरभरुन बोलत असतो. कित्येक वर्षांनंतरही त्यातले संवाद आपल्याला तोंडपाठ असतात, कलाकारांच्या चेहेर्‍यावरचे भाव आठवणीत असतात, एखादा प्रसंग आठवून आपल्या चेहेर्‍यावर हसू पसरतं.

भारतीय सिनेमाला १०० वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्त मायबोली देत आहे संधी चित्रपटांविषयीचं आपलं प्रेम शब्दरुपात साकारण्याची !! बक्षीसं तर आहेतच पण लाखो वाचकांना तुमच्या आठवणी सांगून तुम्ही त्या अजरामर करणार आहात.

Poster-mod.jpg गाथाचित्रशती लेखन स्पर्धेचं स्वरुप, विषय, नियम आणि अटी वाचा आणि सरसावू द्या लेखणी !!!

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

हाय डीसी कर्स

डीसी परिसरात वास्तुशांतीची पूजा सांगणारे कुणी मराठी गुरुजी आहेत ़का?
इथे किंवा माझ्या संपर्कातून कळवलं तरी चालेल.
धन्यवाद.

एक फॅमिली पुढच्या महिन्यात अ‍ॅनापॉलिस ला मूव्ह होणार आहे.त्यांना ५ वर्षाची मुलगी आहे जी पुढच्या वर्षी किंडरगार्टनला जाईल.त्यांना चांगल्या शाळा आणि अपार्टमेंट्सची माहिती हवी आहे.कोणी मदत करु शकेल का ?